Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.
या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.
अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295
अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229
अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आदिश्री: हे सगळे मला पूर्वी
आदिश्री: हे सगळे मला पूर्वी कुठेतरी वाचल्यासारखे का वाटते आहे? डेजा वू कि तुम्ही आधी पण कुठे पोस्ट केलेय?
Submitted by atuldpatil
मलाही असेच वाटत आहे
अमानवीय चा तीसरा धागा. पण तो
अमानवीय चा दुसरा धागा. पण तो बंद झाला बहुतेक म्हणून इथे टाकले. कुठलेच प्रतिसाद न आल्यामुळे मला वाटले की तो इन active आहे की काय. चुकले का माझे
अच्छा जुन्या धाग्यावर आहे.
अच्छा जुन्या धाग्यावर आहे. मला नक्की आठवत नव्हते म्हणून विचारले. तेंव्हा प्रतिसाद का दिला नाही आठवत नाही पण हे विलक्षण आणि म्हणून लक्षात राहण्यासारखे अनुभव आहेत हे मात्र खरे. काही गोष्टी गूढपणे घडतात त्यामागची कारणमीमांसा सापडत नाही आणि मर्यादेपलीकडे योगायोग घडतात तेंव्हा खरेच मती गुंग होते.
धन्यवाद अतुल खरं आहे.
धन्यवाद अतुल
खरं आहे. म्हणूनच अनाकलनीय !!
(No subject)
.
ही गोष्ट फार वर्षांपूर्वी
ही गोष्ट फार वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडली. त्यावेळी मी तळकोकणात एक पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो. मालक शुद्ध शाकाहारी होते. त्यांना नॉनव्हेजचा वाससुध्दा आलेला जमत नसे. मला फुल्ल तंबी दिली होती की नॉनव्हेज खाताना पकडला गेलास तर त्याच क्षणी वेळकाळ न बघता हाकलून दिले जाईल. मी सुरवातीला काही दिवस कंट्रोल केलं नन्तर लपून लपून मटण मासे आणायला लागलो. जेवण करताना स्ट्रॉंग धूप, अगरबत्ती लावायचो त्यामुळे घरमालकाला वास जायचा नाही. मी जेथे राहायचो तिथे आसपास एक स्मशान होतं. आजूबाजूची माणसं मटण आणताना त्या स्मशानभूमीत एक मटणाचा तुकडा फेकून देत असत. तसं केलं नाही तर तिथली भुतं पाठीवर येतात असा त्यांचा समज होता. मी ही गोष्ट कधीच केली नाही. एके दिवशी रात्री 2 वाजले असतील. दारावर जोरात थापा पडायला लागल्या. दार उघडलं तर घरमालक घामाघूम होऊन भेदरलेल्या अवस्थेत उभा होता. त्याचा तो अवतार बघून त्याला आतमध्ये घेतलं आणि माठातील थंडगार पाणी प्यायला दिलं. त्यांच्यामते घरात अमानवी शक्ती आली होती आणि त्याला विचित्र भास होत होते. मी समजून गेलो की मी मटणाचा तुकडा ठेवला नाही म्हणून भूत माझ्या पाठीवर आलं असेल आणि गोंधळून बिचाऱ्या घरमालकाच्या खोलीत घुसलं असेल. दुसऱ्या दिवसापासून हा त्रास खूपच वाढला, रात्र झाली की ते भूत सारखं 'मटण दे मटण दे' ओरडायला सुरू करायचं. घरमलकाने एक किलो मटण स्मशानभूमीत टाकुन पण काय फायदा नाही झाला. रात्री घरातली ताटं वाट्या अचानक वाजयच्या सोबतीला मटण दे आवाज असायचाच. शेवटी कुठल्यातरी अमावस्येला हा प्रकार अचानक बंद झाला.
इथले
इथले
शेवटी कुठल्यातरी अमावस्येला
शेवटी कुठल्यातरी अमावस्येला हा प्रकार अचानक बंद झाला.>>>>>> कंटाळलं असेल बिचारं.......
नाही संशोधक ! लॉक डाऊन सुरु
नाही संशोधक ! लॉक डाऊन सुरु झालं ना तेव्हा बंद झाले असेल भुताचे येणे. आखिर उसको भी उसकी फॅमिली की चिंता है ना । भुत हुआ तो क्या हुआ करोना से बचनेका रे बाबा ।
(No subject)
मी पूर्वी कंपनीत का
मी कंपनीत करताना आलेला हा खराखुरा अनुभव. या गोष्टीला साधारण दहा वर्ष झाले असतील. तर तेव्हा मी एका लहानशा कंपनीत काम करत होतो. जेव्हा ऑर्डर डिलिव्हरी असायची तेव्हा मटेरियल लोंडिंगला संध्याकाळी सुरवात होऊन संपेपर्यंत सकाळचे चार पाच आरामात वाजायचे. सुपरवायझर म्हणून मला तिथे थांबावेच लागे. तर असाच एका लोंडिंगच्या दिवशी रात्रीचे 12.30-1 वाजले असतील. ट्रकमध्ये लोंडिंग होत होती. मी कंटाळून केबिनमध्ये आलो आणि pc सुरू केला. नेटवर इकडे तिकडे सर्फिंग करून कंटाळा आल्यावर मी आयपी सॉफ्टवेअर सुरू केलं. एकमेकांना काही डॉक्युमेंट सेंड करायचे असतील तर या सॉफ्टवेअरचा उपयोग व्हायचा. जे pc सुरू असतील त्यांची लिस्ट तो दाखवायचा. मी सॉफ्टवेअर सुरू केल्यानंतर जे सिस्टीम pc कायम सुरू असत त्यांची लिस्ट दिसत होती. सहज चाळा म्हणून मी चार पाच वेळा ती लिस्ट रिफ्रेश केली तर अचानक एका कालीगचा pc त्या लिस्टमध्ये दाखवायला लागला. मेन ऑफिसला लॉक होता त्यामुळे कोणी तिकडे जाऊन pc सुरू करण्याची शक्यता शुन्य होती. पण pc तर ऑन झाला होता. अजून चार पाच वेळा ती लिस्ट रिफ्रेश केली तसा तो pc पुन्हा ऑफलाईन गेला. दुसऱ्या दिवशी आयटी वल्याकडे जाऊन कॅमेऱ्यात काय नक्की झालं ते पाहायला सांगितलं तर त्याच्या pc ची स्क्रीन कॅमेऱ्याच्या दृष्टीक्षेपात न्हवती. त्यामुळे काही खुलासा नाही झाला.
खुपच किरकोळ अनुभव बोकलत साहेब
खुपच किरकोळ अनुभव बोकलत साहेब
पूर्वी एकदा रात्री काम करत
पूर्वी एकदा रात्री काम करत बसलो होतो. थोडा वेळ बाजूला जाऊन आलो. पाहतो तर स्क्रीनवर माउस पॉईंटर आपोआपच थरथरत एका दिशेने हळूहळू सरकत होता. कीबोर्ड माउस सगळे जागच्या जागी स्थिर होते. घाबरलो. पण काही दिवसांनी लक्षात आले ओप्टीकल माउस मुळे असे होऊ शकते. (तेंव्हा ओप्टीकल माउस नवीनच आले होते)
@आसा, ते फायटिंगचे अनुभव
@आसा, ते फायटिंगचे अनुभव लिहिले की लोकांना खोटे वाटतात म्हणून जरा किरकोळ लिहिलाय.
आज चंद्रग्रहण होतं
आज चंद्रग्रहण होतं त्यानिमित्ताने मला एक जुना किस्सा आठवला. ही घटना माझ्यासोबत घडली होती. या दिवशी दुष्टातम्यांच्या शक्ती खूपच वाढलेल्या असतात. तर मी त्यावेळी midc मधल्या एका कंपनीत काम करत होतो. त्या दिवशी सोमवार असल्याने कंपनीला सुट्टी होती. मी आणि काही मोजका स्टाफ कंपनीत आला होता. दुपारी जेवल्यावर मी एकटाच कंपनीच्या आवारात फेरफटका मारायला निघालो. कंपनीच्या आवारात खूपच पपईची झाडे होती. मी फिरत असताना माझ्या पाठीवर कोणीतरी लहान खडे मारले. मागे पाहिलं तर कोणीही न्हवतं. खडे पपईच्या झाडाच्या दिशेने आले होते. पुढे आल्यावर मला सुक्या काठ्या गोळा करताना एक बाई दिसली. तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. मी तिला बघून जरा आश्चर्यचकित झालो कारण कंपनीच्या आवारात तर असं कोणाला यायला परवानगी न्हवती. मी तिला विचारलं बाई तुम्ही इकडे कशा काय तेव्हा ती बोलली की कंपनीला सुट्टी असली की चूल पेटवण्यासाठी ती लाकडं गोळा करायला कंपनीत येते. मी असाच कुठल्या गावच्या वैगरे एक दोन मिनिटे गप्पा मारल्या आणि पुन्हा ऑफिस बिल्डिंगजवळ आलो. तिथे कलीग उभा होता त्याने विचारलं काय झालं कोणाशी गप्पा मारत होतास? मी बोललो अरे एक बाई होती फाटे गोळा करत तिच्याशी बोलत होतो. तेव्हा तो बोलला अरे तिथे कोणीही न्हवतं. तू दोन चार मिनिटे तिथे थांबून कोणासोबत गप्पा मारत असल्यासारखे करत होतास म्हणून विचारलं. मला वाटलं हा आपली चेष्टा करतोय म्हणून मी जिथे गप्पा मारत होतो तिथे पाहिलं तर कोणीच दिसत न्हवतं. मी खात्री करण्यासाठी त्या जागेवर गेलो तेव्हा तिथेही कोणी न्हवतं. मग कलीग बोलला जाऊ दे अमावस्या पौर्णिमेला असल्या गोष्टी घडतात इथे.
जाऊ दे अमावस्या पौर्णिमेला
जाऊ दे अमावस्या पौर्णिमेला असल्या गोष्टी घडतात इथे >>>
त्या दिवशी सोमवार असल्याने
त्या दिवशी सोमवार असल्याने कंपनीला सुट्टी होती. >>>>>

एम् आय डी सी सोमवारीच बंद
एम् आय डी सी सोमवारीच बंद असते लोड शेडिंगमुळे
---------
रच्याक
बोकलत त्या बाईना सरपणाने प्रदूषण करण्यापेक्षा पिवळे राशन कार्ड दाखवत एल पी जी सब्सिडी घेऊन वापरायला सांगायचं ना
माझ्यासोबत घडलेली ही गोष्ट
माझ्यासोबत घडलेली ही गोष्ट खरोखरच खरी आहे.
बोकलत, चंद्रग्रहण झालं आता
बोकलत, चंद्रग्रहण झालं आता सुर्यग्रहणाचे काही किस्से येऊद्या...
सुर्यग्रहणांचे काय किस्से
सुर्यग्रहणांचे काय किस्से असणार ? बोकलतना पाहुन सुर्य शरमेने काळवंडला, खाली मान घालुन काळ्या ढगा आड लपला. ढगुल्याला त्याची उष्णता सहन न झाल्याने तो वितळुन खाली पृथ्वीवर पडला. लोक म्हणाले पर्जन्य राजा आला. सुर्याला राग आला . आपण सर्वात्मक सर्वेश्वर या यश्किंचीत मानवाला घाबरलो? भितीने काळवंडलो तर लोक म्हणाले ग्रहण लागले. असे कुठे असते का?
असला कसला हा मानव ? तांत्रिक आहे की काय कोकणातल्या जंगलातला? की सज्जनगडाच्या पायथ्यावरला? बोल बोल बोकलता, आहेस कोण तू?
(No subject)
रश्मी
रश्मी

रश्मी..
रश्मी..
रश्मी
रश्मी

मी हा धागा फार आवडीने वाचत
मी हा धागा फार आवडीने वाचत होते! पण अलीकडे ह्या धाग्याची पा वाट लागली आहे! अफसोस!
अश्या तुम्ही एकट्याच नाहीत
अश्या तुम्ही एकट्याच नाहीत
तुमच्या सगळ्यांना माझे अनुभव
तुमच्या सगळ्यांना माझे अनुभव खोटे का वाटतात बरे?
अश्या तुम्ही एकट्याच नाहीत +1
अश्या तुम्ही एकट्याच नाहीत +1. पहिले इथले प्रतिसाद वाचले की वेगळंच फिलिंग यायचं - बापरे असंही असतं असे. आता धागा धड विनोदी नाही धड गंभीर नाही असं झालंय.
(No subject)
Pages