Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.
या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.
अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295
अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229
अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बोकलत तुमची गफ्रे का??
बोकलत, फोटुतली "ती" तुमची गफ्रे का??

बोकलत, फोटुतली "ती" तुमची
बोकलत, फोटुतली "ती" तुमची गफ्रे का?? Wink >>> ओहो!! आमची Ex Gf हाय ती फोटूतली!
ओहो!! आमची Ex Gf हाय ती
ओहो!! आमची Ex Gf हाय ती फोटूतली!>> भारीच शोधली होतीत.
कोणी कोणाला एक्स केलं नक्की ?
कोणी कोणाला एक्स केलं नक्की ? हड़ळीने हा आ ला की हा आ नी हडळीला
पाच एक वर्षे झाली असतील. मी
पाच एक वर्षे झाली असतील. मी पुण्याला भाड्याच्या खोलीत राहायला होतो. रात्री झोपलो होतो तेव्हा साधारण 3 वाजले असतील. स्वयंपाकघरात कोणीतरी बास्केटबॉल अपटण्याचा आवाज यायला लागला. मागे महिन्यांपूर्वी मी बास्केटबॉल घेतला होता पण मला चांगलं आठवतंय की झोपण्यापूर्वी तो हॉलमध्ये होता. मी दुर्लक्ष करून झोपण्याचा प्रयत्न केला पण आवाज जरा जास्तच येत होता. मला तहान पण लागली असल्याने मी स्वयंपाकघरात पाणी प्यायला गेलो तेव्हा आवाज बंद झाला. आणि चेंडू खरोखर स्वयंपाकघरात होता. मी सकाळी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा समजलं मी राहत होतो तिथे एक मुलगा राहायचा तो बास्केटबॉल खेळायचा आणि त्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता.
अज्ञानी
अज्ञानी
ही गोष्ट ज्यावेळी घडली तेव्हा
ही गोष्ट ज्यावेळी घडली तेव्हा बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. रात्रीचे दोन वाजले होते. पावसामुळे दहा फुटांपलीकडे दिसत न्हवते. मला शेतावर जायचे होते. मी तसाच निघालो. रस्ता निर्मनुष्य होता. आता वाऱ्यानेही जोर पकडला होता. मी शेतावर जाऊन मस्त बंधांवरून इकडे तिकडे फिरलो. पाणी पिऊन एके ठिकाणी बसलो असताना समोरच्या शेतात कोणीतरी काम करत असल्याचा भास झाला. मी त्या शेताजवळ गेलो तर तिथे कोणीही न्हवते परत मागे फिरणार इतक्यात शेतातून आवाज आला ' जा घरी जा कशाला आलास एव्हड्या रात्री' मी वळून पाहिलं तर कोणीही न्हवतं. पण त्यानंतर घरी जाईपर्यंत कोणीतरी अदृश्य शक्ती माझ्या भोवताली वावरत होती.
भर पावसात रात्री २:०० वाजता
भर पावसात रात्री २:०० वाजता शेतात काय काम काढलं होतं.
पिकांना पाणी द्यायला गेलो
पिकांना पाणी द्यायला गेलो होतो.
पिकांना पाणी द्यायला गेलो
पिकांना पाणी द्यायला गेलो होतो>>> पण बाहेर मुसळधार पाऊस पडत होता तो फक्त विहिरीत पडत होता का
Lol
Lol
भर पावसात पिकांना पाणी
भर पावसात पिकांना पाणी

पण हे घडू शकतं हां, आमचे शेजारी भर पावसात एका हातात छत्री घेऊन आणि दुसऱ्या हातात पाईप घेऊन (पाण्याचा) झाडांना पाणी घालायचे
आमचे शेजारी भर पावसात एका
आमचे शेजारी भर पावसात एका हातात छत्री घेऊन आणि दुसऱ्या हातात पाईप घेऊन (पाण्याचा) झाडांना पाणी घालायचे >> तेच
बोकलत असावेत.
कुणाला रात्री भर पावसात २
कुणाला रात्री भर पावसात २ वाजता तू शेतात काय करायला गेला होतास हेच सुज्ञ माणसाने विचारू नये.
18+ उत्तर अथवा PJ ऐकायला मिळण्याची दाट शक्यता असते.
मी एकदा फिरायला बाहेरगावी
मी एकदा फिरायला बाहेरगावी गेलो होतो. म्हणजे मामाच्या गावी गेलो होतो. रात्री मस्त मटन खाल्यावर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलो. मामा पण सोबत आला. चालत चालत खूप लांबवर गेलो. ते एक माळरान होतं. आणि त्या माळरानावर एक ओस पडलेला बंगला होता. तो बंगला बघितल्यावर मामा खूप घाबरला आणि म्हणाला चल लवकर घरी. मी विचारलं का? तर म्हणाला त्या बंगल्यात हडळ वास करते. जो जातो तो परत येत नाही. मी बोललो अरे काय नसतं सगळी अंधश्रद्धा आहे, चल दाखवतो. असं म्हणून मी त्याचा हात पकडला आणि जबरदस्ती करून बंगल्यात नेऊ लागलो. तो जोरात ओरडत होता. नको सोड सोड मला, देवा कुठे अक्कल गहाण टाकली आणि याला इकडे घेऊन आलो. तो पळून जाण्याचा खूप प्रयत्न करत होता परंतु त्याला घसपटत त्या बंगल्यात घेऊन गेलोच. मामा सारखा देवाचं नाव घेत होता. आतमध्ये बंगल्यात खूपच धूळ साचली होती. सगळी महागडी फर्निचर धुळीत पडलेली पाहून दुःख झालं. इकडे तिकडे फिरत असताना जोरात हसण्याचा आवाज आला. एक बाई उडत उडत हवेत आमच्या दिशेने येऊ लागली. मामाची त्या बाईला बघून मामाची बोबडीच वळली. तो जोरात देवाचं नाव घेऊ लागला. तुम्हाला समजलं असेलच ती बाई हडळ होती. हडळ बोलली बरं झालं आलात मला खूप भूक लागली आहे. असं म्हणून आमच्याकडे झेपावत आली. मी घाबरून झटकन मामाला तिच्या अंगावर ढकलून दिलं. बोललो त्याला खा आणि बंगल्याबाहेर धूम ठोकली. मागे वळून न बघता सरळ मामाच घर गाठलं आणि झोपून गेलो. सकाळी उठलो तर मामा घरी होता. भरपूर तापाने फणफणला होता. रागाने माझ्याकडे पाहत होता. त्यानंतर मामा माझ्याशी कधीच बोलला नाही.
बोकलात कुठे तरी हे थांबायला
बोकलात कुठे तरी हे थांबायला हवं असा नाही वाटत का तुम्हाला? भय रस म्हणून कित्येक लोक हा धागा वाचायचे पण तुम्ही धागा तर संपवलाच आणि अजूनही थांबत नाही. तुमचे इतर ठिकाणच्या प्रतिक्रिया पाहून तुम्ही सेन्सिबल आहात असे वाटले>
माझा पण आवडता धागा होता हा. इतरांच्या विनंतीला मन देऊन जर इथे लिहिणे बंद करत असाल तर मीही विनंती करते.
खरच या धाग्याची वाट लावू नका. सिन्सिअर प्रतिसाद च इथे लिहा.
मी लिहिलेली घटना सत्य आहे.
मी लिहिलेली घटना सत्य आहे.
बोकालत दुसरा आयडी का घेऊन
बोकालत दुसरा आयडी का घेऊन राहिले? पहिला अजून उडाला नाहीय ना...
माझा स्वत:चा भुताचा अनुभव.
माझा स्वत:चा भुताचा अनुभव.
झालं होतं असं की रात्री साडेआठ-पावणेनऊ झाले असतील. आम्ही २-४ मित्र उगीचच बाहेर निघालो. होस्टेलचा रस्ता सुनसान असे. जवळ ५ मिनिटांच्या अंतरावर रस्त्याच्या काठाला कॉलेजचं जिम होतं. तिकडं निघालो. पुढं गेलो आणि अंधुक प्रकाशात अचानक आम्हाला जिमच्या कोप-यात काही तरी चोरटी हालचाल दिसली. आम्ही थांबून निरखू लागलो. हो. काही तरी होतं तिथं. आम्हाला वाटलं चोर असणार. त्याला कुटायला आम्ही पांगून तिथं पोहोचलो. तो जिमसमोरच्या दोन-अडीच फुट ओट्यामागं जनावरासारखा चार पायावर लपून बसला होता. आम्ही गुपचूप तिथं पोहोचलो. आता बस त्याला घ्यायचंच होतं रिंगणात. चाहूल लागताच त्यानं वळून पाहिलं आणि आमच्याकडं धावला..............................
तो आमच्याच कॉलेजचा पोरगा होता. घामाघूम. तोंडातून शब्द फुटेना. इतक्यात समोरून अजून चार जणं आले सायकलवर. तेही येऊन बघू लागले. हा काही बोलेना. त्याची चेष्टा करून ते चौघं मागं होस्टेलला निघून गेले. पण याची अवस्था आम्ही स्वत: पाहिल्यामुळं त्याला धीर दिला, बसवलं. तोवर पिक्चरला जाणारे अजून ५-७ जण मागून होस्टेलवरून आले. डोकावले आणि पिक्चरला उशीर होतो म्हणून समोर निघून गेले. २-५ मिनिटांनी तो बोलू लागला.
'तो एकटाच रात्री पिक्चरला निघाला होता. जिमपाशी आल्यावर त्याला जे दिसलं ते भयानक होतं. समोरच्या रस्त्यावरून ३-४ भुतं नाचत येत होती. भुतं म्हणजे काय? निव्वळ मुंडकी नाचत होती जमिनीपासून १०-१२ फुट उंचीवर. तो हादरला. होस्टेलकडं पळण्याची हिंमत झालीच नाही. आपण उलटं फिरलो आणि भुतांनी गपकन मागून धरलं म्हणजे? मग तो ओट्यामागं दडला; भुतं इथं आपल्याला पाहू शकणार नाहीत या भोळ्या आशेनं.'
इतक्यात आम्ही पोहोचलो. त्याचा अनुभव ऐकून जिथून त्याला भुतं दिसली त्या ठिकाणी आम्ही उभे राहिलो आणि खाडकन डोक्यात उजेड पडला. समोर रस्ता होता चढाचा. समोर अर्ध्या-पाऊण किलोमीटरवर रस्त्याकडेला एकच स्ट्रीटलाईट. आताच डोकावून ‘पिक्चरला उशीर होतो’ म्हणून निघून गेलेली ती पोरं दिसत होती दूर. पोरं म्हणजे काय, नुसती बाह्याकृती. तीसुद्धा पूर्ण नाही. पुढं सारा रस्ता चढाचा असल्यानं खांद्याच्या वर फक्त मुंडकी हालताना दिसत होती. वर-खाली, वर-खाली. आम्ही पटकन त्याला तिथं उभं करून दाखवलं. “अशीच होती का रे ती नाचणारी भुतं?” त्यालाही हसू फुटलं. त्यानं पाहिलेली चार नाचणारी मुंडकी मघाशीच येऊन होस्टेलला निघून गेली होती.
तीन मुंडेवाली चुडेल आठवली.
तीन मुंडेवाली चुडेल आठवली. खूप उच्छाद मांडला होता आमच्या गावी तिने.
हहपुवा!
हहपुवा!
मी एकदा पाहुणा म्हणून
मी एकदा पाहुणा म्हणून मित्राच्या लग्नाला गेलो होतो. गावीच लग्न होतं. आम्ही चार जण होतो. उटण्याचा कार्यक्रम झाला आणि आम्ही आमच्या रूमवर आलो. आमची रुम मित्राच्या घराशेजारी होती. रूमच्या मुख्य दरवाजासमोर एक पाच फूट भिंत होती त्याच्या समोर लागूनच नारळाचं झाड होतं. सगळे दमले असल्याने लगेच झोपी गेले. मला कसल्याशा आवाजाने रात्री जाग आली. घड्याळात दोन वाजले होते. बाहेर कोणीतरी दादा दादा म्हणून हाक मारत होतं. लग्नघर म्हणजे बाहेर लोकं अजून जागी असतील आणि कोणीतरी लहान मुलगी हाक मारत असेल म्हणून दार उघडलं तर बाहेर मिट्ट काळोख होता. दार लावणार इतक्यात पुन्हा दादा दादा आवाज आला. बाहेर पाहिलं तर एक लहान मुलीने झपकन त्या भिंतीवर उडी मारली आणि माझ्याकडे भुतं माणसांना पाहिल्यावर हसतात तशी हसत होती . मी काही करणार इक्क्यात ती झरझर नारळाच्या झाडावर चढली. एव्हडी जलद चढली की 2 सेकंदात ती शेंड्याला पोहचली असेल. नन्तर बाहेर जाऊन वर बघतोय तर कुठेच दिसेना. मी तसाच येऊन पुन्हा झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी मित्राकडे चौकशी केल्यावर कळले की नारळाच्या झाडासमोर पूर्वी स्मशान होतं आणि अमावस्या पौर्णिमेला असे प्रकार इथे सर्रास घडतात.
बोकलात तुमचा प्रो pic पाहून
बोकलात तुमचा प्रो pic पाहून वाटत नाही की भुते तुम्हाला घाबरत असतील

किल्लीताई शक्तिमान गंगाधर
किल्लीताई शक्तिमान गंगाधर बनल्यावर साधा भोळा दिसतो.
Ok गंगाधर गीता विश्वास ची
Ok गंगाधर
गीता विश्वास ची मते जाणून घ्यायला आवडेल
she knows everything 
(No subject)
वर आणतोय.कोणाचा काही थरारक
धागा वर आणतोय.कोणाचा काही थरारक अनुभव असेल तर लिहा.
मलाही थोडे अमानवीय नाही पण
मलाही थोडे अमानवीय नाही पण अनाकलनीय अनुभव आले आहेत.
पहिला माझा स्वतः चा ...
माझ्या आईची आई जिला मी मोठ्याई म्हणायचे. तिचा पाच अपत्ये आणि तेरा नातवंडांवर सारखाच जीव होता. पण मी तिला तिच्यासारखी असे वाटायचे. असे घरातील इतर जणांना ही वाटायचे. ती गेली तेव्हा मी तिला भेटणे शक्य नव्हते. एक चार महिन्याच्या तान्ह्या आजारी बाळाला घेऊन भारतात जाणे शक्य नव्हते. मी तिला पोस्टाने फोटो पाठवले व फोनवर बोलले. तेव्हाही ती मलाच धीर देत होती .बाळ एक्स्ट्रीमली प्रिमच्यूर होते. (28 weeks)...नंतर ती तीन दिवसात गेली
.
नंतर काही महिन्यानी माझ्या स्वप्नात आली . माझ्या घराच्या दरवाजात उभी आहे. मी आत ये म्हणाले तर मी आता नाही येऊ शकत , तू खूशाल रहा असे म्हणून गेली. दोनच महिन्यानी तिचे वर्ष श्राद्ध होते. त्याच्या नंतरच्या महिन्यात आम्ही काळजी घेऊन सुद्धा मी प्रेग्नंट राहिले. मला खूप गोड मुलगी झाली. तिची बघण्याची पद्धत, डोळे, स्वभाव , अतिस्पष्टवक्तेपणा हुबेहूब मोठी आई...अर्थात हे जिनेटीकही असू शकते. पण वर्षश्राद्धविधी नंतर दहा महिन्यात झालेली ही एकटीच आहे कुटुंबात...पपांकडे कुठलेही लहान मूल पाच मिनीटात जाते... ही कधीच गेली नाही.
कुठलेही लेकरू माझ्याकडे आल्याशिवाय राहूच शकत नाही हा पपांचा आयुष्यभराचा आत्मविश्वास हिने क्षणात घालवला.
हिचा आईवरच जीव !! तिच्या बाबा पेक्षा दादा जीव की प्राण
. माझ्या मामेभावंडाना सुद्धा फोटो बघीतल्यावर हेच वाटले होते. मी हे विसरले होते आता आठवले.
अजूनही दोन तीन अनाकलनीय अनुभव आहेत. पन्नास वर्षा पूर्वीची गोष्ट आहे.
आईच्या नात्यातील एक तरुण ..खूप हुशार अत्यंत प्रेमळ असलेला त्यांना आलेला. ते बायोलॉजी एमएसी करत होते. ते एकदा असेच सहलीला गेले होते जंगलात. तिथे एक पडकी विहीर होती. तित त्यांनी वाकून पाहिले असताना त्यांच्याशी काहीतरी बोलले म्हणे आणि दिसले सुद्धा . ते काही अंधश्रद्धाळू नव्हते. पण दोन दिवसांत त्यांना चित्र विचीत्र भास व्हायला लागले. आणि झोपेतून ओरडत उठायचे. तब्येत हळूहळू खालावत गेली आणि वर्ष भरात ते टायफॉईड ने गेले.
हे आईने सांगितले आहे. ते आज असले असते तर पंचेहात्तरी उलटलेले असते.
. पण आई टायफॉईड नेच गेले असतील असे म्हणून ती चर्चा वाढवू देत नसे.
अजून एक म्हणजे आमच्या घरात जेव्हा मला आणि माझ्या भावाला /भावजयीला बाळं झाली. त्याकाळात माझ्या आईच्या घराबाहेर अंगणात ( बर्याच वेळेला) सापाचे दर्शन होते. एरवी कधीच नाही. फक्त प्रेग्नन्सी आणि बाळ खूप तान्हे असताना. घरात नाही , बाहेरच. माझी बाळंतपण भारतात झाली नाही पण त्यावेळी सुद्धा हे झाले. असे तीनदा झाले , चौथ्या वेळेला (माझे दोन आणि भावाचे दोन )आई-वडीलच तिथे नव्हते..त्यामुळे माहिती नाही. मी बाळ एक वर्षाचे झाल्यावर जाऊन आले. त्यानंतर लगेचच सुद्धा एक साप निघाला होता. ते कधीही घरात आले नाहीत म्हणून तितकी भिती वाटली नाही. (आईला काळजी वाटली होती. कारण भाचा तान्हा होता एकदा आणि तिथे आला होता. ) दोन वेळेला संत पाचलेगावकर महाराज यांच्या आश्रमातुन सर्पमित्र आले आणि सापांना घेऊन गेले. एकदा तो खूप शोधून सुद्धा सापडला नाही. ( दिसला होता मात्र) हे सगळे वेगवेगळ्या ऋतू मध्ये झाले आहे. याचे उत्तर मिळाले नाही. आम्ही सगळे हे random समजतो तरी कधी कधी काय कारण असेल असे वाटते.
आदिश्री अनाकल्नीय आहेत खरे
आदिश्री अनाकल्नीय आहेत खरे अनुभव! कधी कधी काही प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत हेच खरं.
@आदिश्री: हे सगळे मला पूर्वी
@आदिश्री: हे सगळे मला पूर्वी कुठेतरी वाचल्यासारखे का वाटते आहे? डेजा वू कि तुम्ही आधी पण कुठे पोस्ट केलेय?
Pages