Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.
या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.
अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295
अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229
अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अशी जळालेली भुतं दिसली की मी
अशी जळालेली भुतं दिसली की मी त्यांचा शेकोटीसारखा उपयोग करून मोबाईलवर वेब सिरीज बघतो.
बरोब्बर अमावस्येला धागा वर
बरोब्बर अमावस्येला धागा वर निघाला. >>>>>>>> तो धागा मीच वरती काढला, बोकलत.
असं आपल्याला वाटतं की आपण
असं आपल्याला वाटतं की आपण धागा वर काढला पण खरं तर तो धागा आपल्याला बोलवत असतो. आपल्या मनाशी खेळतो हा धागा.
बोकलत, जोरात. लिहा अजून.
बोकलत, जोरात. लिहा अजून.
खरं तर तो धागा आपल्याला बोलवत
खरं तर तो धागा आपल्याला बोलवत असतो. आपल्या मनाशी खेळतो हा धागा.>> पुर्वीचे धागे खरोखर बोलवायचे पण नंतरचे धागे भरकटले. मजा राहिली नाही या धाग्यात.
अमानवीयचे खरे धागे मला कुठे
अमानवीयचे खरे धागे मला कुठे मिळतील? खुप इण्टरेस्टिन्ग वाटत वाचायला असे किस्से.
अमानवियची वाट लागलीये. जोकर
अमानवियची वाट लागलीये. जोकर धागे झालेत.
हाच खरा धागा आहे. बाकीच्या
हाच खरा धागा आहे. बाकीच्या धाग्यांवर पुड्या सोडल्यात.
पूर्वी भूताखेतांची स्वप्नं
पूर्वी भूताखेतांची स्वप्नं पडायची, भीती वाटायची. एकट्याने कुठे जाताना नाही नाही ते मनात शंका यायच्या. रात्री भूताच्या भीतीने दचकून जागे व्हायचो. अनोळखी ठिकाणी मुक्काम केल्यावर रात्री विचित्र आवाजाने झोपमोड व्हायची...
नंतर लग्न झाले.
हाहाहा
हाहाहा. र आ _/\_
अमानवीयचे खरे धागे मला कुठे
अमानवीयचे खरे धागे मला कुठे मिळतील? खुप इण्टरेस्टिन्ग वाटत वाचायला असे किस्से.>> या धाग्याच्या शेवटी लिंक आहेत बघा.
त्यात "अमानवीय...?" आणि "अमानवीय..१" वाचण्यासारखे आहेत.
नंतर सगळी कॉमेडी सर्कस आहे.
काल पौर्णिमा होती आणि midc
.
बोकलत वेलकम.
धन्यवाद बोकलत.
येत रहा. तेव्हढाच विनोदाचा शिडकावा.
मला कसा दिसेना विनोदाचा
मला कसा दिसेना विनोदाचा शिडकावा?
अमानवीय होता
अमानवीय होता
अमावस्या येईस्तोवर थांबा वाईच
पौर्णिमेला हा धागा वर काढायचं
पौर्णिमेला हा धागा वर काढायचं प्रयोजन कळेना का लोकहो..
आता थेट अमावस्या
आमच्या गावची गोष्ट.https:/
आमच्या गावची गोष्ट.
https://youtu.be/Stbd0bESqX4?si=DINieLgmLoOrKVW9
बोकलत फॅन्स , तुमचा लाडका दु
बोकलत फॅन्स , तुमचा लाडका दु:खद घटना धाग्यावर ही विनोद करतोय. आणखी जोजवा त्याला.
आता एक सत्य घटना सांगतो. ही
आता एक सत्य घटना सांगतो. ही घटना आमच्या कंपनीतल्या एका कलिगसोबत घडली. मागे आम्ही सगळे एका रीसोर्टला जाणार होतो. बस केली होती. सकाळी सात वाजता बस निघणार होती आणि सगळ्यांनी त्याप्रमाणे कंपनीत पोहचणे अपेक्षित होतं. मी ती ट्रीप मॅनेज करणार होतो आणि मला उशीर नको पाहिजे होता. प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा होता आणि सगळे पैसे वसूल करायचे होते. मी सगळ्यांना बोललो रात्री जेऊ नका उपाशी झोपा म्हणजे तिकडे जास्त खाल आणि पैसे वसूल होतील. आणि सगळ्यांना बजावून सांगितलं की जर उशीर कराल यायला तर इथेच सोडून जाईन अजिबात दयामाया दाखवणार नाही. ठरल्याप्रमाणे दुसरा दिवस उजाडला. सगळे वेळेत आले होते पण एक दोघे माती खाणारे असतातच. एकाला उशीर झाला. त्याला बोललो मर तिकडं कसा, यायचं ते तू बघ. मग तो रडत रडत ओला करत यायला तयार झाला. कसाबसा तास दोन तास लेट आला. मग तिकडे त्याने फुल्ल एन्जॉय केला. पाण्यात उड्या मारल्या, रायफल शूटिंग केली, क्रिकेट खेळला. फुल्ल टू मज्जा मस्त फोटो वैगरे काढले. दुसऱ्या दिवशी ऑफिसात आला आणि आमच्यासोबत ट्रिपचे किस्से डिस्कस करायला लागला. आम्ही सगळे वेड्यासारखे त्याला बघत होतो कारण आम्ही जेव्हा बसमधून रिसॉर्टला जायला निघालो तेव्हा थोड्याच वेळात आमची बस बिघडली आणि नाईलाजाने आम्ही पुन्हा सगळे घरी आलो होतो. आता हा कधी कुठल्या रिसॉर्टला जाऊन आला आणि आम्ही कसे भेटलो अने अनेक प्रश्न आमच्या डोक्यात यायला लागले. शेवटी त्याला बोललो की अरे बाबा आम्ही त्या रीसॉर्टला न्हवतो आलो. यावर तो विश्र्वासच ठेवत न्हवता. शेवटी त्याने एन्जॉय करतानाचे फोटो दाखवतो म्हणून फोटो दाखवायला सुरवात केली. बघतो तर फोटोत तो कुठल्या रिसॉर्ट मध्ये नसून एका माळरानावर होता. जिथे स्विमिंग पुल समजून उड्या मारत होता ते चिखल होतं. रायफल शूटिंग समजत होता ती झाडाची फांदी होती, क्रिकेट ज्यांच्यासोबत खेळत होता तिथे माणसं न्हवतीच हा एकटाच होता. बॉल आपोआप हवेत उडत होता. ते बघून याला भयंकर ताप भरला. आम्ही सगळ्यांनी त्याला ऍडमिट केलं आणि आम्ही पण आपापल्या घरी गेलो.
बोडकिणीचा माळ
बोडकिणीचा माळ
आमच्या गावात घडलेली गोष्ट
आमच्या गावात घडलेली गोष्ट
गावातलं एक जुने, पडकं घर होतं. तिथे पूर्वी गणपा काका राहत होते, पण एके दिवशी अचानक गेले आणि ते घर भुताटकीचं झालं, अशी वदंता पसरली. कुणी तिथे जायचं धाडस करायचं नाही.
एका शनिवारी, सुजाता आईसह बाजारातून आली, तेव्हा तिला वाटलं की कुणीतरी तिला वाईट नजरेनं पाहिलंय. म्हणून आईने तातडीने एक लिंबू मुलीवरून उतरवला आणि ते पडक्या घरासमोर फेकून दिलं.
रात्र झाली. सगळं गाव झोपलं, पण बाराच्या ठोक्याला अचानक त्यांच्या घराच्या दारावर धप् धप् अशी थाप पडली. आई घाबरून उठली. दार उघडून पाहते, तर काय! दिवसा उतरवलेला तोच लिंबू दारासमोर लोळत होता.
आईने मागे पाहिलं, तर सगळी भूतं दारात उभी! पण त्या भुतांनी भेसूर हसत एक मोठा स्पीकर उचलला आणि DJ लावला! गणपा काकाचं भूत माइकवर ओरडलं, "भाऊ, आवाज वाढव!" आणि मग सगळी भूते "झिंगाट" गाण्यावर थरथर कापू लागली.
कुणी कंबरेवर हात ठेवून गरबा खेळत होतं, कुणी नागिन डान्स करत होतं, आणि एक भूत चक्क बॅकफ्लिप मारत होतं! आई आणि सुजाता अवाक् झाल्या.
तितक्यात एक जाडसर भूत आईकडे आलं आणि म्हणालं, "ताई, तो लिंबू का टाकला? आम्हाला लिंबूपाणी प्यायचं होतं!"
आईला काय बोलावं सुचेना. ती पटकन किचनमध्ये जाऊन लिंबूपाणी करून आणली. सगळी भूतं खूश झाली आणि DJ पार्टी आणखी रंगली.
रात्रीचा एक वाजला, तेव्हा गणपा काकांनी हात वर करून ओरडले, "भाऊ, शेवटचं गाणं, मग झोपायला जाऊ!" आणि "तुम तो ठहरे परदेसी" गाणं सुरू झालं.
सकाळी गावकऱ्यांनी विचारलं, "काल रात्री आवाज कसला येत होता?"
आई आणि सुजाता एकमेकींकडे पाहत राहिल्या आणि हसत म्हणाल्या, "काही नाही, गणपा काकांची पार्टी होती!"
Pages