निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या स्कार्लेट कार्डीया ला मोदकासारखी फळे पण लागतात. यात वेगवेगळे रंग नाहीत पण जरा गडद रंग बघितलाय मी.

काल आमच्या कडे धो धो पाऊस झाला...
आज सोनचाफ्याची दोन फुलं उमललीत...:)
या वेळेला आकारात खुप फरक जाणवतोय...:)

ज्यांच्या घरी अशी सुगंधी फुले उमलतात त्यांनी छानसं घरगुती अत्तर करुन ठेवा.

शुद्ध खोबरेल तेल घेवून त्यात एकाच प्रकारची फुलं बरेच दिवस बुडवून मुरवत ठेवायची.

त्या फुलपाखरा च्या झाडाचा फोटो... >>>>> सायली - ते बहुतेक हे असावे ----
Blackberry Lily, Scientific name: Iris domestica
कृपया गुगलून पहाणे .... Happy

हे अस होऊ शकत का ? >>> होऊ शकते, आपल्याला निसर्गातील चमत्कारांची फारच थोडी माहिती आहे -- म्हणजेच एक अब्जांशही माहिती नाहीये - तरी पण आव असा आणतो की मी तर सर्वज्ञच .... Happy Wink

म्यूटेशन असे त्याचे शास्त्रीय कारण - याला अनेक घटक कारणीभूत असतात - उदा. - आजूबाजूचे तापमान....

--------- /\----------- दंडवत शशांकजी.. ही तीच आहे.. ब्लयाक बेरी लीली..:)
आभार..

आजुबाजुचे तापमान..
पण शशांक, माझ्या शेजारच्या घरच झाड आहे ते .. मला पांढर्‍या पेक्षा गुलाबी चाफाच जास्त भावतो.. आता परत एक कलम आणुन लावणारे मी .. देव करो निदान त्याला गुलाबी फुल येवो.. मग एक पांढरा चाफा न एक गुलाबी चाफा होईल घरी ...

देव करो निदान त्याला गुलाबी फुल येवो. >>>>> हा हा हा ...

सायली - मागेच दिनेशदांनी लिहिलंय - हरबर्‍याचे झाड फार नाजूक असते - आणि वरच्याच कमेंटमधे मी लिहिलंय की - आपल्याला काय काय अन किती किती माहिती असते ते .... Happy Wink

शशांक कमाल आहे.

अश्विनी असं करतात होय चाफ्याचं अत्तर? करुन बघायला पाहिजे. गावाला खूप असतात आमच्याकडे.

टीना गुलाबी, चाफा मला ही खूप आवडतो पण जाऊ दे पांढरा ही छान दिसतो

म्युटेशन - नैसर्गिक असतेच व झाडांबाबत बघितले तर हवामान, तापमान, माती, पाणी-खते यांचे प्रमाण - ते देण्याची वारंवारिता असे अनेक घटक असतात.

प्राणी असो वा झाडे - यांच्यात जी गूणसूत्रे (डी एन ए) असतात त्यांच्यात जे खूप कमी बदल होतात ते बाह्य आकार, वर्ण, इ. स्वरुपात दिसू लागतात तेव्हा त्याला म्युटेशन म्हणतात.

कधी कधी हे म्युटेशन आपल्याला लागलीच लक्षात येते तर कधी कधी खूप काळाने तो बदल झालेला दिसतो.

माबो वर नविन आहे. aatta paryant nusti vaachak hote. dhahyavril sunder photo ani upyukt maahiti mule sadsyatv ghyaycha moh aavarala naahi.

http://www.maayboli.com/node/43351 >>>> या लेखावरील माझा प्रतिसाद -

सेफ जेनेटिक मॉडिफिकेशन असं काही असू शकतं का? >>>> हे पहा -सेल्फ जेनेटिक मॉडिफिकेशन - नॅचरल म्युटेशन ....

संशोधक शेतकरी - श्री. दादाजी खोब्रागडे.

रोजच्या निरीक्षणातून काहीतरी वेगळं घडत असल्याचं लक्षात येण्याची आणि यांतून चांगल्या गोष्टींचा दीर्घकाळ पाठपुरावा करण्याची क्षमता फार थोड्या लोकांना लाभलेली असते. अशी निरीक्षणक्षमता लाभलेले दादाजी खोब्रागडे हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड गावचे कष्टाळू शेतकरी. त्यांनी नेहमीप्रमाणे पटेल-३ ही भाताची जात आपल्या शेतात १९८३ साली लावली. भाताच्या लोंब्या जेव्हा निसवायला लागल्या तेव्हा दादाजींची नजर वेगळ्या दिसणार्‍या तीन लोंब्यांवर गेली. शेतातील इतर लोंब्यांपेक्षा या तीनच लोंब्या इतक्या वेगळ्या का आणि कशा ?

या तीन लोंब्यांवर सतत नजर ठेवून कापणीच्या वेळेस वेगळ्या काढून, सुकवून निघालेलं धान्य जपून ठेवलं. पुढील पाच वर्षं कुणाला काहीही न सांगता दादाजींनी भाताचं हे बीजगुणन चालू ठेवलं. १९८३ मध्ये तीन लोंब्यांपासून प्रारंभ झालेला प्रवास १९८९मध्ये तीन क्विंटल उत्पादनापर्यंत पोहोचला आणि अनेक वर्षांच्या चुकांपासून शिकत शिकत अखेर एक नवीन वाण्(जात) निर्माण झालं. या वाणातील तांदूळ प्रचलित वाणापेक्षा वेगळ्या प्रकारचा, दिसायला आकर्षक, अत्यंत बारीक दाणे असलेला आणि चवदार होता. हातावरील मनगटी घड्याळाच्या हिंदुस्तान मशीन टूल्स नावावरुन या वाणाचं एच. एम. टी. असं नामकरण झालं.

घरच्या गरिबीमुळे त्यांना खूप अडचणी आल्या. पण त्यातूनही त्यांनी भाताच्या नऊ जाती शोधल्या. अशा या दादाजींना ५ जाने. २००५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या सोहळ्यात भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या हस्ते ५० हजार रु., स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
अहोरात्र राबून उपेक्षित जीवन जगणारा एक अल्पभूधारक शेतकरी, ज्याच्यामुळे देशातील अनेक लोकांचे जीवन पालटले -अशा या व्यक्तिची दखल अमेरिकेतील फोर्ब्स या मासिकाने घेतली व २०१० साली त्याला प्रसिद्धी दिली.
महाराष्ट्र शासनाने त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेतली व त्यांना २५हजार रु. व ५० ग्रॅ सोन्याचे पदक देऊन सत्कार केला.
-साभार दै. लोकसत्ता पुणे आवृत्ती (४ जून २०१३, लेखिका- शुभदा वक्टे, मराठी विज्ञान परिषद, मुंबई २२)

आमच्याकडे गेली अनेक वर्षे दोन प्रकारची जास्वंदी आहेत - एक पूर्ण लाल भडक तर दुसरी पूर्ण पांढरी.

गेले काही आठवडे पांढर्‍या जास्वंदीला एकच पाकळी गुलाबी किंवा अर्धी पाकळी गुलाबी अशी फुले येताहेत. मध्यंतरी तर एक पूर्ण फूल गुलाबी झाले होते. पण आता परत सगळी पांढरी फुले येताहेत.

निसर्गात अशा अनेक गमती जमती घडत असतात - गूगलून पाहिल्यास कळेल की पृथ्वीवर आतापर्यंत झालेला जीवसृष्टीतील बदल - बायो डायव्हर्सिटी - म्यूटेशनमुळेच ... तो पुढेही होत राहणारच ...

झाडांत, किटकात अजून सुधारणा होत आहेत पण मानवात आता यापुढे होणे जरा कठीणच आहे..

हे माझे मत नाही, पण वाचले कुठेतरी.. कि आपल्या मेंदूची संदेशवहन व्यवस्था सुधारण्यासाठी न्यूरॉन्स मधे मोठे बदल व्हावे लागतील, आणि ते व्हायला भौतिकशास्त्राचे मूळ नियमच बदलावे लागतील आणि ते आपल्या हातात नाही.

मग आपल्या हातात काय आहे तर आपल्या क्षमतेचा, योग्य तर्‍हेने आणि जास्त प्रभावीपणे वापर करणे..

इति.. दिनूबाबा !!!!

खूप मस्त बहरला हा धागा.. माझ्याकडे फक्त फोटो साचून साचून राहतात Happy किती फोटो साचले आहेत.. कधी मी टाकू शकेन इतके फोटो Happy

शशांकजी,श्री. दादाजी खोब्रागडे यांना सलाम, खुप छान पोस्ट, धन्यवाद ईथे शेयर केल्या बद्द्ल्ल...
अनघा, स्वागत आहे तुमच..
बी वेळ काढुन फोटो टाकत जा..
शशांक जी आभार, दिनेश दां चा लेख शेयर केल्या बद्द्ल, घरी जाऊन वाचते..:)

सायु, सोनचाफ्याचा असा म्हणजेया अँगलने फोटो क्वचितच काढला जातो !

शशांक, कुणा योगी महाराजांची क्लीप बघितली होती. त्यात ते असे म्हणाले आहेत.

Pages