निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणाकडे आत्ता पिकासा चालू असेल तर प्लिज वरचा फोटो कॉपी करून मला त्याची पिकासा लिंक द्या. म्हणजे तो फोटो मोठा दिसेल.

जो-एस कविता, फोटो, मनोगत सगळे छान.

अरे वा. नविन भाग आला की... माझ्याकडे पिकासा चालते ऑफिसात पण फक्त पाहता येते, त्यामुळे जागु तुला मदत करता येणार नाही.

अभिनंदन..
छानच मनोगत जो एस...

जागु कॉपी करुन पिकासा वर लोड केला तरी त्याची मॅक्झिमम ओरिजीनल साईझ तर इथ दिलीय तेवढीच राहिल ना ? आणि साईझ मोठी जर केली तर फोटो ब्लर होतोय..

अरे छान.. जो एस मनोगत आणी फोटो खूप सुरेख
नव्या भागाबद्दल अभिनंद्न!!!

भाजी ओळखण्यापासून सुरुवात करा Proud

जो एस...... एकाच वेळी विषण्ण करणारे आणि त्याचवेळी आशाही दाखवणारे मनोगत.....
छान....
जागूताई आणि सर्व निसर्गप्रेमींचे नव्या भागाबद्दल अभिनंदन......

तो चिंचेच्या पाल्यासारखा कवळा असावा.
शेपू दिसला.
ते कंद नाही समजत कसले आहेत त्या पात्यांचेच आहेत का? ती जरा चहापातीसारखी पण वाटताहेत मला.

अभिनंदन. मनोगत वाचते सावकाश.

पातीच्या कांद्यासारखे काहीतरी दिसतंय. दिनेशदानी मागे कसलातरी पराठा केला होता, ते आहे का.

प्लिज मला अभिनंदन नका करू पर्सनली. आपण सगळ्यांचे अभिनंदन. आपण सगळेच ह्या भागांचे प्रेमळ हिस्सेदार आहोत.

मनोगत खुपच सुरेख लिहिलेय जो_एस !
निरु म्हणतात त्या नुसार एकाच वेळी आशा दाखवणारे अन त्याच वेळी धोक्याची किनार दाखवणारा आगामी काळ याचे संतुलित मनोगत !

<<आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ..>>

ही चारोळी वाचुन तर आणखी उदास व्हायला झालं.
>>>>>>

जागुतै अन सर्व सहभागींचे मनापासुन अभिनंदन !

असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. >>> +१

देवाच झाड, मसुरे

जागू पिकासा आहे माझ्या कडे.. तो फोटो मेल कर मला

हाय निगकर्स.... मदत हवीय.. गुलाबाचे झाड सुकुनच जातयं माझ्या घरी.. २ रोप आणुन लावली होती..
पाने पिवळी होवुन पडली.. पाणी रोज नि खत रविवारी टाकते थोडंसं .. काय चुकतयं?
पण बाकीची शेवंती, कडिपत्ता, जास्वंद वाढतायत नीट... मोगरा पण आणुन लावलाय पण तो वाढतोय असं वाटत नाहीयं.. रोप कुंडीत लावताना मुळांना थोडा धक्का बसला होता .. त्यालाही २ आठवडे झालेत Sad

जो एस (सुधीर) - सुरेख मनोगत .... Happy

सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छाही ... Happy

गुलाबाचे झाड सुकुनच जातयं माझ्या घरी.. २ रोप आणुन लावली होती..
पाने पिवळी होवुन पडली.. पाणी रोज नि खत रविवारी टाकते थोडंसं .. काय चुकतयं? >>>>>
उन किती मिळतंय ??? किमान ३- ४ तास तरी कडक उन मिळाले पाहिजे - पाणी एक दिवसाआड घालणे - मुळांपासली माती अलगद उकरणे (मुळांना धक्का न लावता) - असेच थोडे ट्रायल -एरर करीत रहा - आसपासच्या बी-बियाणेवाल्याकडून काही टिप्स मिळतात का ते पहा ... ऑल दि बेस्ट ...

टिना खुप सुंदर फुले आहेत.

इंद्रा मला तुझा मेल आयडी दे.

चनस दर आठवड्याला खत घालायची गरज नसते. महिन्यातून एकदा ठिक आहे.

चनस, गुलाबाला खत जास्त होतय असं वाटतंय. दोन महिन्यातून एकदा बास झालं. दर महिन्याला गुलाबाचं कटिंग कर आणि पाणी एक दिवसाआड (कुंडीबाहेर येणार नाही इतकंच) घाल. खताऐवजी झाडांची कट केलेली पानं, डहाळ्या, वापरलेली चहा पावडर वगैरे घालून कुंडीतली माती झाकून ठेव म्हणजे पाणी लवकर उडून जाणार नाही आणि गुलाबाचे रंग छान उठून दिसतील. दर रविवारी माती हलवणं मस्ट!

Pages