नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
आज सकाळी मी ह्यांनाच पाहिलं
आज सकाळी मी ह्यांनाच पाहिलं का? उंचावर वायरवर ३-४ बसले होते. पोपट वाटत होते आणि नव्हतेही. नीट दिसत नव्हते. पण मला पोपटांची "बाळं" वाटली.
पोपट पोपट आहे आणि राघु,
पोपट पोपट आहे आणि राघु, राघु... हाच तर फरक आहे.
आपल्याकडे पोपटाला पण राघू म्हटले जाते. साधारण हिरवा रंग म्हणजे तो पोपटच असे एक समिकरण डोक्यात फिट झालेले आहे आपल्या. म्हणुन या हिरव्या पक्ष्याला पण राघु म्हटले जाते आणि तो पोपट नाहीये तर कोणी दुसरा आहे हे कळावे म्हणुन मोठा शहाणपणा करुन आपण याचे बारसे वेडा राघु असे केलेय.. आपण भारी म्हणजे भारीच शहाणे आहोत.
आपल्याकडे अशी खुप समिकरणे आहेत. एका चांगल्याच वयस्क बाईने मला "झाडाला मोहोर आलेला म्हणजे ते आंब्याचेच झाड होते, पण त्याला नंतर जांभळे लागली" असे सांगितले. मी तिला मोहोर म्हणजे काय हे समजावण्याचा प्रयत्न केला पण ठार अपयश आले. आंब्याच्या झाडाला जांभळे याचेच कौतुक करण्यात ती मग्न राहिली.
आंब्याच्या झाडाला जांभळे
आंब्याच्या झाडाला जांभळे >>>>>:हहगलो:

मी तिला मोहोर म्हणजे काय हे
मी तिला मोहोर म्हणजे काय हे समजावण्याचा प्रयत्न केला पण ठार अपयश आले. आंब्याच्या झाडाला जांभळे याचेच कौतुक करण्यात ती मग्न राहिली.
साधना.. ऐ मेर्कू ताना मारते
साधना..
ऐ मेर्कू ताना मारते क्या .. आँ,, 
या बाबतीत इंग्रज सुद्धा मागे
या बाबतीत इंग्रज सुद्धा मागे नाहीयेत बरं का.. ढळढळीत निळ्याशार रंगाचा गोड पक्षी असेल आणि त्याच्या मानेखाली एक छोटासा पिवळा ठिपका असेल. आता याचे नाव निळ्या रंगावरुन ठेवावे की पिवळ्या????? तर हे लोक त्याचे नाव चक्क पिवळ्या मानेचा अमुक तमुक म्हणुन जाहीर करतील. मग आमच्या सारखे शहाणे तो अमुक तमुक पिवळ्या रंगाचा पक्षी कुठाय कुठाय म्हणुन शोधत जंगलभर हिंडतील पण आम्हला काही तो सापडत नाही, कारण तो तर असतो निळा. अशी गंमत करायला या नावे ठेवणाअ-या लोकांना भारी आवडते.
हे इंग्रज म्हणजे यात भारत सोडुन बाहेरचे सगळे आले बरं का,.. म्हणजे मदासी म्हटले की चेन्नाईसकट सगळे साउथी आले तसेच....
पोपट पोपट आहे आणि राघु,
पोपट पोपट आहे आणि राघु, राघु... हाच तर फरक आहे. >>>>>...साधने, हे पण भारी सांगितलस.
काल म्हटलं होतं ना........एक
काल म्हटलं होतं ना........एक गंमत आहे...........इथे पहा
http://www.maayboli.com/node/56072
जागुली ला वाढदिवसाच्या
जागुली ला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!!!!!!!
जागुली ला वाढदिवसाच्या
जागुली ला वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा !!!!!!!
साधनाचे नेहेमीचे षटकार पाहून
साधनाचे नेहेमीचे षटकार पाहून मस्त वाटले ...
पण त्या पक्ष्यांच्या नावासंबंधीचे उद्गार अगदी खरे आहेत ....
जागुला वाढदिवसाच्या अनेकानेक
जागुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
जागूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जागूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मूळात पोपटातही अनेक रंग आणि
मूळात पोपटातही अनेक रंग आणि आकार असतात.. सिंगापूरला ११० प्रकारचे पोपट ( पॅरट / पॅराकिट ) बघितले होते मी. पण ते बंदीस्त.. ऑस्ट्रेलियात तर निसर्गतःच अनेक प्रकारचे पोपट उच्छाद मांडत असतात.. अगदी रस्त्यावरची खडी पण उचकटून टाकतात.
वर्षूताई, शशांकदा, सकुरा,
वर्षूताई, शशांकदा, सकुरा, मानुषीताई धन्यवाद.
आपल्याला किटक दिसत नाही
आपल्याला किटक दिसत नाही त्याचे वेडेवाकडे उडणेच दिसते, म्हणून हे नाव.>>>>>>>>>
दिनेश..........हे आज प्रत्यक्षिकच पाहिलं. सध्या खूप वेगळी फुलपाखरं उडाताहेत सगळीकडे.
नेहेमीप्रमाणे वे.रा. चा थवा आला कडुलिंबावर. मी जवळून निरीक्षण करत. कडुलिंबातून पिवळी छोटी फुलपाखरं उडत होती. त्यांच्यासाठी वे.रा. खूपच वेड्या वाकड्या डाइव्ह मारत होते हवेत.
जागु वाढदिवसाच्या खुप खुप
जागु वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !!!!!!!
सिंगापूरला ११० प्रकारचे पोपट ( पॅरट / पॅराकिट ) बघितले होते मी. पण ते बंदीस्त.. बापरे
जागूताई, वाढदिवसाच्या हार्दिक
जागूताई,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....
जागु वादिच्या हार्दिक
जागु वादिच्या हार्दिक शुभेच्छा!
https://www.youtube.com/watch?v=uW4fqz-iLxM
http://thankindia.org/knowledge/organic-farmers-network/van-vadi/
इथे कोणी भेट दिलीये का? जाणून घ्यायला आवडेल ....
जागू, वाढदिवसाच्या हार्दिक
जागू,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....
सायु, निरू, मंजूताई, साधना
सायु, निरू, मंजूताई, साधना धन्यवाद.
कुणी सांगेल का मला? दरवर्षी
कुणी सांगेल का मला?
दरवर्षी नवरात्रीच्या दिवसात कोल्हापूरच्या महालक्ष्मीची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते. त्यात देवीच्या मागे एक हिरव्या-पांढर्या गवताची प्रभावळ कायम असते.
हे कसलं गवत असतं? खरं असतं की कृत्रिम??
-अश्विनी
Happy birthday जागू.
Happy birthday जागू.
जागू वाढदिवसाच्या
जागू वाढदिवसाच्या शुभेच्छा!

हे आमच्या घरचे कालचे पाहुणे...

वरची वन वाडीची विडीयो बघताना "अग्निहोत्र शेती" कडे भरकटले... नवीनच एकेक... कृषी संशोधन संस्थामध्ये ह्यावर संशोधन होत नाही का?
https://www.youtube.com/watch?v=lT_D39eqiYc
जागू, वाढदिवसाच्या हार्दिक
जागू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

जागू, वाढदिवसाच्या अनेकानेक
जागू,
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
अदीजो, ती वेणी स्पायडर लिलीची
अदीजो, ती वेणी स्पायडर लिलीची असावी असे वाटतेय.
देवीच्या वेणी बद्दलचा वाचनात आलेला लेखः http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4764202456524331007&Se...
आज शांतता. सर्व फोटो
आज शांतता.
सर्व फोटो मस्तच.
सर्व नि.ग. फ्रेंड्सना सांगायला आनंद होतोय की त्याच कुंडीतल्या दुसऱ्या सोनटक्कयाला कळ्या आल्यात. दिनेशदा म्हणाले होते येतील अजून फुले. तसंच झालं
.
बहुतेक उद्या संध्याकाळी फुलतील काही. दसऱ्याला देवीला घरची फुले. कसलं भारी वाटतंय मला.
सायली, रिया, हेमाताई ऐकताय ना.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
अरे वा, अन्जू.. घरच्या
अरे वा, अन्जू.. घरच्या फुलाचे रुप, गंध आकार सगळे वेगळेच असते नाही !
Pages