निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अन्जु ताई खास तुझ्या साठी,..
शनिवारी एका मैत्रीणीकडे गेले होते.. तिच्याच कडुन मी याचे रोप आणले होते..पण अजुन फुलांच्या प्रतिक्षेत..

हेमा ताई धन्स.. मलाही माहिती नव्हते, हे झाड खुप आवडीचे, खाली पडलेली फुल वेचुन आणायचे...
फांदी दिसली तर सहज लावली..फुलं लागली त्यामुळे मलाही खुप आनंद झाला..

अशीच एक देव चाफ्याची पण फांदी एका माठात लावली आहे... बघु फुलतो का ते? Happy

आज पुजे ला ही पण मिळालीत...

अरे वा मस्त सायली. सोनटक्का आणि बकुळ दोन्ही. जास्वंदही.

मलापण रोज एक फुल मिळतंय. आधीच्या रोपाला ६ फुले आली होती, आता १२-१३ मिळणार एकूण. चार दसऱ्याच्या आदल्या दिवशीच मिळाली, त्यानंतर रोज एक दोन मिळतायेत.

जिप्स्या, अजून प्र्वान्गी चे भूत उतरले नाही का रे. बाटलीत भरून गाडून टाक त्या भूताला Happy

बाकी फोटो छानच !

अन्जू Rofl अगा हेल्दी हेल्दी वेजी Wink
सायली, फुलराणी झालीयेस अगदी.. किती सुंदर फुलं आहेत तुझ्या अंगणात.. ट्रूली ग्रीन थंब!!!
जागू,घरचाय पेरू?? वॉव..मस्तं पिकलाय..
मानुषी..मस्तं जमलंय गटग यांचंही..भुभू गोड ,हसतमुख दिस्तंय Happy

Pages