निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकुरा, इतकी भरगच्च फुलं लागालेला कैलासपती कधीच पाहीला नाही..सुं>>>दर
सायु, सुगंधित फुलं आहेत ..
नलिनी,मस्त फोटू.. Happy
गोड मिर्च्यांना लांबूनच पाहा.. Wink

सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


हल्ली माझ्या कडच्या गोकर्णाला खुप भरभरुन फुलं येतायत... अगदी ६० , ७० फुलं
आज बाळकृष्णा साठी केलेला हार..

नलिनी खुप छान शुभेच्छा!!

सायली ग्रेट ग. माझ्याकडे १०-१२ येतात. निळी जास्त, पांढरी क्वचित.

आज मला सोनटक्याच्या शेवटच्या छोट्या कळीचा शोध लागला. दिवाळीत एक फुल मिळेल :).

खुप दिवसांनी बॅकलॉग भरुन काढला.
सोनटक्का :*
सोनटक्याचा वास मला खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउप (म्हणजे ४-५ वर्ष ) मागे घेऊन जातो.
काही स्पेशल आठवणी Happy
रच्याकने काही वासांशी (सुवासांशी/दुर्गंधाशी) आपल्या आठवणी जोडलेल्या असतात हे नोटीस केलंय का कोणी कधी?

तेरड्याचा खेळ मला नाही बुवा माहीत. आबोलीच्या बीयांशी मात्र मी खेळलेय (माझी ८ वर्षांनी लहान असेल्या बहिणीला मात्र हा प्रकार माहीत नाही Happy )
शोभातै, लाजाळूच्या बीया का फोडायचीस तू? (मुळात लाजाळूच्या बीया हेच पहिल्यांदा ऐकतेय मी. कधी पाहिल्या नाहीत)

कवठीचाफा मी फक्त 'ऐकलाय' आजपर्यंत. पाहिला फक्त फोटोज मधे पण सुवासाशी अगदीच अपरिचित मी त्याच्या.

आमच्या घरातल्या झाडांच्या कुंडीत शंखाचे किडे झालेत. मागे नि.ग.वर त्यांबद्दल वाचलेलं म्हणुन ते किडे आहेत हे कळालं तरी किमान Proud
आमची मावशी शंकराची कृपा, श्रावणी सोमवारचा आशिर्वाद वगैरे म्हणत होती. मग एक किडा उचलून तिला अचानक उगवलेल्याआणि चालणार्‍या शंखांवर कोणाची कृपा आहे ते दाखवलं Proud

त्यांना घालवायचं कसं ते मात्र माहीत नव्हतं मला Uhoh
मग प्रयोग म्हणून त्यांच्यावर गोमुत्र टाकून पाहिलं. नाहिशे झाले शंख ते Uhoh

अन्जु ताई, व्वा , सोनटक्का जाम खुष आहे तुझ्यावर..

आमची मावशी शंकराची कृपा, श्रावणी सोमवारचा आशिर्वाद वगैरे म्हणत होती. मग एक किडा उचलून तिला अचानक उगवलेल्याआणि चालणार्‍या शंखांवर कोणाची कृपा आहे ते दाखवलं +++ Lol Lol Lol

इथ्ल्या प्रतिसादांवरुन मी आम्च्या गुलाबाच्या झाडाला थोडं उन्हात आणुन ठेवलयं...पाणी रोज घालणे नि माती हलकी करणे इतकच केलं.. नवीन पाल्वी येतेय Happy
शेवंतीला कळ्या आल्यात पण उमलायला वेळ आहे अजुन.. जास्वंदीला फक्त पानचं पान! Happy

चक्क अजुन ५ कळ्या आल्या सोनटक्याला, कालपासून फुले मिळायला लागली, लक्ष्मीला वाहिले काल फुल. सरप्राईज मला सोनटक्याने दिले. धन्यवाद.

एकुण २५ फुले मिळणार. नवरात्र संपताना मिळायला सुरुवात झाली.

हे काही शेतावरचे फोटो, काही महिन्यांनी इथे लोड करण्याचा योग आला.घरट्यांचे फोटो मे-जुन मध्ये काढलेत.
DSCN1993.jpgDSCN2009.jpgDSCN2010.jpgDSCN2013.jpgDSCN2016.jpgDSCN2021.jpgDSCN2026.jpgDSCN2027.jpgDSCN2018.jpgDSCN2068.jpgDSCN2077.jpgDSCN2078.jpg

घरा समोर हळद आहे, त्यात आंतरपीक म्हणुन मका लावला आहे.
DSCN2080.jpgDSCN2080.jpgDSCN2083.jpgDSCN2087.jpgDSCN2089.jpgDSCN2126.jpgDSCN2128.JPGIntex_A426.jpgIntex_A605.jpgJun2015 004.jpgJun2015 007.jpg
हे छोटे टोमटो दर वर्षी शेतात कुठे तरी वेली येतात.
Jun2015 025.jpgJun2015 029.jpg

वॉव्,अनिल, किती सुंदर आहे तुझं शेत.. आणी घरटं, पक्षी, वा वा...
चेरी टोमॅटो ,लाल चुटुक. सुरेख, एकसारखे गोलू, चमकदार .. स्लर्प!!!!!!!!!!!!

मी विसरले तुझ्या गावाचं नांव.. कधीतरी यायचंय, बघायचंय खरंखुरं शेत्,गाव.. Happy

Pages