निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो लाल चाफा, गच्चीत कुलर च्या टाकीत लावलाय, आजुन १५ ते २० कळ्या आहेत आत्ता पर्यंत ९ फुलं येऊन गेलीत..
आणि सोनचाफा तर काही विचारुच नको, पोटच्या पोरासारखे सुख देतोय मला...:)

सायली हो ग कुंड्यावालेच आपण पण माझे ग्रीन फिंगर्स नाही तुझ्यासारखे आणि माझ्याकडून हल्ली दुर्लक्ष पण फार होतं ग Sad .

अन्जु ताई, भरपुर सुर्य प्रकाश आणि पाणी आणि अधन -मधन माती उकरणे, शेण खत घालणे,आणि हो भाज्यांची सालं,देठ वगैरे न चुकता घालते.. (हे सगळ ईथेच समजल बर्का)

रच्याकने ,जागु कुठे आहे?
जागु मेल चेक करणे...

नाही कब्बुतरे नाहित, पारवे आहेत, आणि चिमण्यानी माझ्या अख्खा गणेश वेल खाऊन टाकला, तरी बर मी रोज त्यांच्या साठी बाजरी, तांदळाचे दाणे आणी छोट्या मडक्यात पाणी ठेवते...

पारवेच ग :D, मी सगळ्यांना कबुतर म्हणते. हो चिमण्यापण माझी गोकर्ण पाने फुले खातात पण कबुतरे नाचत बसतात. मी गेले कि पळतात.

छान क्लीप. तेरड्याच्या बियांचा आम्ही पण खेळ खेळलोय. आणि ती गुंडाळी जराशी उघडून डूल म्हणून कानात अडकवायचे. मला तेरडा मोठ्या फुलांचा आणि गुलाबी रंगाचा फार आवडतो. पण कित्येक वर्षात त्याचं दर्शन, स्पर्श नाही. Uhoh त्याच्या पाकळ्या इतक्या तलम असतात, हात लावला की अगदी सुखद स्पर्श. Happy
कालच प्रज्ञाकडे "लाजाळू" चं रोप पाहिलं आणि बालपणात गेले. त्याच्या पानांना हात लावून, ती कशी मिटतात ते पहात बसणं आणि त्याच्या शेंगा फोडणं हा आवडता उद्योग होता आमचा. (गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.) Happy
DSCN0949.jpg

शोभे... आज तू दिलेले कुळथाचे पिठ संपवले. आज डब्यात पिठले आणले होते.
प्रज्ञाचे लिंबाचे लोणचे मात्र घरच्यांनीच हायजॅक केले होते.

शोभा लाजाळू मस्तच. बालपण आठवलं, जवळ असलेल्या एका बंगल्याच्या जागेत होते खुप. त्याच्याशी खेळायला जायचो कधीतरी.

अग्गोबाई !शोभाची ही आय्ड्या नाही बै कधी आली डोसक्यात!<<<<<< ती गुंडाळी जराशी उघडून डूल म्हणून कानात अडकवायचे. >>>>>>>>
हे भारीच्चे!

नलिनी व्वा!
तो पहिला, अबोली माझा आवडता..

लाजाळुच झाड, सुखद च्या शाळे बाहेर आहे, आम्ही दोघ पण खेळतो त्याच्याशी, ती उघड झाप बघायला खुप मजा येत..

नलिनी,किती सुंदर फोटो.. तेरड्याच्या पाना, बिया,कळ्या रंगीबेरंगी फुलांच्या प्रेमात हाय मी!!! Happy

नलिनी,सुंदर तेरडा कलर.

वर्षुताई कसल्या भारी मिरच्या (सिमला), डिश आणि पोपटपण मस्त. (एक चिमणी आहे का).

तेरड्याला आम्ही गुलछडी म्हणतो..
तो बीयांचा प्रकार मीपन करायची Wink
वर्षू मिरच्या खाणार्‍या चिमण्या मस्तच Wink Happy

हाय निसर्गकर्स ,

सुप्रभात!!

बरेच दिवस रोमात होते. हा धागा नियमित वाचतेय. छान वाटते. सकाळ प्रसन्न होते.
हे माझ्याकडून काही....
कैलाशपती ...झाड / फळ / फुले....

WP_20151103_007.jpgWP_20151103_010.jpgWP_20151103_003.jpgWP_20151103_004.jpg

शोभे... आज तू दिलेले कुळथाचे पिठ संपवले. आज डब्यात पिठले आणले होते.>>>>>>>>..धन्यवाद!
प्रज्ञाचे लिंबाचे लोणचे मात्र घरच्यांनीच हायजॅक केले होते.>>>>>>...तरी तुम्हाला सांगितलं होतं...... Proud

शोभा लाजाळू मस्तच. >>>>>>>>.पण हे लाजाळूच आहे? की त्या वर्गातल दुसरं काही? कारण याच्या शेंगा वेगळ्याच दिसतायत. काटेरी आवरणात बिया दिसल्या. फ़ोटो काढणार होते पण विसरले. Uhoh

धन्यवाद!

वर्षू, फोटो, डिश आणि मिरच्या, सगळंच लय भारी. मिरच्या वाहून वाहून अन भाराखाली दमलं की ते पाखरू. पाखरूबी लयी ग्वाड.

दादा, हा तेरडा श्रीरामपूरचा. इथे फक्त अबोली आहे, छान फुलली होती, पण फोटो काढायचे राहून गेले. आता नव्याने येणार्‍या सगळ्या कळ्या जळून जातायेत.
विनिता, मस्तच! एक झब्बू माझ्याकडून

kailashpatiPhul.jpg

Pages