अमृततुल्य बासुंदी चहा :)
लोक वेगवेगळ्या प्रकारे चहा करतात. काही लोक वेगळ्याच पद्धतीने चहा करतात. म्हणजे पाण्यात साखर घालून उकळवून त्यात एक चमचा चहा घालून झाकण घालून गॅस बंद आणि कपात दूध आणि वरून तो कोरा चहा ओततात. तो म्हणे खरा चहा. माझ्या मते तो फळकवणी लागतो
मला तर चहा एकदम दाट, गोड आणि लाईट लागतो, स्ट्राँग चहा अजिबात आवडत नाही.
कोल्हापूरला 'लम्सा' नावाचा एक चहाचा स्पेशल मसाला मिळतो. बाकी चहाचे मसाले म्हणजे टिपिकल सुंठ, आलं, वेलदोडा असे माहित असलेले वास असलेले असतात. लम्सा मात्र निराळा आहे. तो वापरून मी चहा असा करते.
साहित्य (2 कप चहा) : एक कप दूध, एक कप पाणी, ६ चमचे साखर, १ सपाट चमचा लम्सा, २ सपाट चमचे सोसायटी चहा.
कृती :
प्रथम भांड्यात दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून त्यात लम्सा घाला.
मग २ सपाट छोटे चमचे चहा घाला. मी नेहमी सोसायटी वापरते. चविला एकदम लाईट आहे. स्ट्राँग नाही.
६ चमचे साखर. हे चमचे अतिशय छोटे आहेत आणि मला साखर कमी चालत नाही. त्यामुळे ६. आजकाल साखर अजिबात गोड नसते त्यामुळे ६ घातले तरिही गोड गिट्ट होत नाही चहा.
खरंतर कोणताही पदार्थ कोणत्याही क्रमाने घातला तरी चालतो, मी आपले फोटो टाकलेत त्याप्रमाणे लिहिलंय.
पण शेवटी झकास उकळायचा चहा नीट. नंतर नंतर तो उकळून छान दाटसर दिसतो.
मग काय, कपात ओता, दोन बिस्किटं घ्या, सोबतीला वर्तमानपत्र आणि होऊन जाऊदे तरतरीत सकाळ किंवा संध्याकाळ.
विशेष टिप : चहा करताना (सुरुवातीलाच) एक चमचा साय घातल्यास अजूनच मस्त लागतो चहा. (उकळल्यावर छान तुपकट होतो. ;))
तळटिप : लम्सा पुण्यात मिळत नसल्याने आपके कोपुचे माबोकर निपो यांनी मला वर्षभराचा लम्साचा स्टॉक भेट दिला आहे. अधून मधून काही माबो मैत्रिणी येऊन तो मसाला ढापून नेतात ही गोष्ट निराळी
कसली क्यूट कपबशी आहे )
कसली क्यूट कपबशी आहे :))
दक्षु राणी
दक्षु राणी कित्त्त्त्त्त्त्तीईईई चिडशील.... म्हणूनशान दोन्दोन वेळला मेसेज टाकायचा????
थांब तू आता ... तुझ्याकडे एखाद्या वीकेंड ला राहायलाच येते... तसंही मला कोल्लापुरी झणझणीत रेस्टोरेंट मधे तू घेऊन जायचं प्रॉमिस केलंयसच
इकडे हिमाचली चहा , थंड वातावरणात प्यायला मज्जा येतीये... ओवा, लवंगा, वेलदोडे घालून गाई च्या दुधातला
नो पाणी मिक्स!!!
पण साखरे च्या बाबतीत सर्व हिमाचली , दक्षी चे भाईबंद आहेत... खडी चम्मच की चाय ...
मला मसाला चहा आवडत नाही. फक्त
मला मसाला चहा आवडत नाही. फक्त आले गवतीचहा घातलेला आवडतो. वेलदोडा तर अजिबातच नाही. पण लम्सा आवडला. एक दिवस ब्रेक म्हणून आवडू शकतो. रोज माहीत नाही. कमी साखरेचाही चांगला लागतो हा.
काही ही असले तरी ६ चमचे साखर
काही ही असले तरी ६ चमचे साखर ये बात कुछ हजम नाही हुई...::अओ:
लम्सा कोई प्यारा कोई मासूम
लम्सा कोई प्यारा कोई मासूम नही है
हे गाणं आठवलं.
वर उल्लेखलेले अमुल
वर उल्लेखलेले अमुल बटर-ब्रेड-चहा, तेलात मस्त शेकलेली गरम पोळी-चहा, पिळाचे टोस्ट-चहा याची आठवण येऊन फार वेदना होत आहेत. या सर्वाकरता चहा जरा जास्त गोड हवाच तरच मजा घेता येते. भजी बुडवुन खाणार नाही पण भजी-चहा हे पण मस्ताड आहे, खास करुन थंड हवेत... धुंदीच आलीये असे सर्व विचार करुन.
एक राहिलं, अमुल बटर सारखी चव जगात कोणत्याच बटरला नाही असे आमचे मत आहे.
सुनिधी, +१! चहात बिस्कीट
सुनिधी, +१!
चहात बिस्कीट बुडवून खाण्यापेक्षा बशीत ४/५ बिस्कीट/खारी ठेवून त्यावर चहा ओतून ते चहा बिस्कीट कॉम्बीनेशन जिथे तुम्ही न लाजता कसेही खाऊ शकता ते तुमचे घर हे असले उद्योग दुसऱ्याच्या घरी करता येत नाहीत! आणि हो असा चहा हा दोन कप प्यायचा असतो..एक कप बिस्कीट/खारी साठी आणि मग एक कप नुसता आलं घातलेला गरम गरम चहा! स्वर्गसुख!
Chaha bhji ani sobat pavasali
Chaha bhji ani sobat pavasali vatavaran
Yapeksha best combo dusar nahi
एक कप बिस्कीट/खारी साठी >>>
एक कप बिस्कीट/खारी साठी >>> !!!!! अरे काय हे जि केवढी पातळ तर असते खारी. एक कप मध्ये १०-१२ खार्या तर नक्की मावतील. तुझी बशीत ठेवून वाली कृती तीन वेळा केली तर एक कप चहा संपेल !
सी, घरी असताना दोन कप चहा
सी, घरी असताना दोन कप चहा झाला की "आता चहा संपला अजून हवा असेल तर स्वतः करून पी! किंवा एका बैठकीत सगळं पाकीट संपवणार आहात की काय?" अशी वाक्यं ऐकावी लागतात म्हणून (केवळ म्हणून) ही दोन कपांची मर्यादा
अरे बापरे ! सहा चमचे साखर ?
अरे बापरे ! सहा चमचे साखर ? मग गुलाबजामूनच्या उरलेल्या पाकातच चहा केलेला काय वाईट?
अरे ६ चमचे साखरेतून बाहेर या
अरे ६ चमचे साखरेतून बाहेर या बरं
Pages