अमृततुल्य बासुंदी चहा :)

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

लोक वेगवेगळ्या प्रकारे चहा करतात. काही लोक वेगळ्याच पद्धतीने चहा करतात. म्हणजे पाण्यात साखर घालून उकळवून त्यात एक चमचा चहा घालून झाकण घालून गॅस बंद Uhoh आणि कपात दूध आणि वरून तो कोरा चहा ओततात. तो म्हणे खरा चहा. माझ्या मते तो फळकवणी लागतो Sad

मला तर चहा एकदम दाट, गोड आणि लाईट लागतो, स्ट्राँग चहा अजिबात आवडत नाही. Sad

कोल्हापूरला 'लम्सा' नावाचा एक चहाचा स्पेशल मसाला मिळतो. बाकी चहाचे मसाले म्हणजे टिपिकल सुंठ, आलं, वेलदोडा असे माहित असलेले वास असलेले असतात. लम्सा मात्र निराळा आहे. तो वापरून मी चहा असा करते.

साहित्य (2 कप चहा) : एक कप दूध, एक कप पाणी, ६ चमचे साखर, १ सपाट चमचा लम्सा, २ सपाट चमचे सोसायटी चहा.

कृती :

प्रथम भांड्यात दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून त्यात लम्सा घाला.
1Lamasa.jpg

मग २ सपाट छोटे चमचे चहा घाला. मी नेहमी सोसायटी वापरते. चविला एकदम लाईट आहे. स्ट्राँग नाही.
2Chaha.jpg

६ चमचे साखर. हे चमचे अतिशय छोटे आहेत आणि मला साखर कमी चालत नाही. त्यामुळे ६. आजकाल साखर अजिबात गोड नसते त्यामुळे ६ घातले तरिही गोड गिट्ट होत नाही चहा.
3Sakhar.jpg

खरंतर कोणताही पदार्थ कोणत्याही क्रमाने घातला तरी चालतो, मी आपले फोटो टाकलेत त्याप्रमाणे लिहिलंय.
पण शेवटी झकास उकळायचा चहा नीट. नंतर नंतर तो उकळून छान दाटसर दिसतो.
4Ukal.jpg

मग काय, कपात ओता, दोन बिस्किटं घ्या, सोबतीला वर्तमानपत्र आणि होऊन जाऊदे तरतरीत सकाळ किंवा संध्याकाळ.
Final.jpg

विशेष टिप : चहा करताना (सुरुवातीलाच) एक चमचा साय घातल्यास अजूनच मस्त लागतो चहा. (उकळल्यावर छान तुपकट होतो. ;))

तळटिप : लम्सा पुण्यात मिळत नसल्याने आपके कोपुचे माबोकर निपो यांनी मला वर्षभराचा लम्साचा स्टॉक भेट दिला आहे. अधून मधून काही माबो मैत्रिणी येऊन तो मसाला ढापून नेतात ही गोष्ट निराळी Proud

विषय: 
प्रकार: 

दक्षु राणी कित्त्त्त्त्त्त्तीईईई चिडशील.... म्हणूनशान दोन्दोन वेळला मेसेज टाकायचा????

थांब तू आता ... तुझ्याकडे एखाद्या वीकेंड ला राहायलाच येते... तसंही मला कोल्लापुरी झणझणीत रेस्टोरेंट मधे तू घेऊन जायचं प्रॉमिस केलंयसच Proud

इकडे हिमाचली चहा , थंड वातावरणात प्यायला मज्जा येतीये... ओवा, लवंगा, वेलदोडे घालून गाई च्या दुधातला

नो पाणी मिक्स!!!

पण साखरे च्या बाबतीत सर्व हिमाचली , दक्षी चे भाईबंद आहेत... खडी चम्मच की चाय ... Uhoh

मला मसाला चहा आवडत नाही. फक्त आले गवतीचहा घातलेला आवडतो. वेलदोडा तर अजिबातच नाही. पण लम्सा आवडला. एक दिवस ब्रेक म्हणून आवडू शकतो. रोज माहीत नाही. कमी साखरेचाही चांगला लागतो हा.

वर उल्लेखलेले अमुल बटर-ब्रेड-चहा, तेलात मस्त शेकलेली गरम पोळी-चहा, पिळाचे टोस्ट-चहा याची आठवण येऊन फार वेदना होत आहेत. या सर्वाकरता चहा जरा जास्त गोड हवाच तरच मजा घेता येते. भजी बुडवुन खाणार नाही पण भजी-चहा हे पण मस्ताड आहे, खास करुन थंड हवेत... धुंदीच आलीये असे सर्व विचार करुन.

एक राहिलं, अमुल बटर सारखी चव जगात कोणत्याच बटरला नाही असे आमचे मत आहे.

सुनिधी, +१!
चहात बिस्कीट बुडवून खाण्यापेक्षा बशीत ४/५ बिस्कीट/खारी ठेवून त्यावर चहा ओतून ते चहा बिस्कीट कॉम्बीनेशन जिथे तुम्ही न लाजता कसेही खाऊ शकता ते तुमचे घर Happy हे असले उद्योग दुसऱ्याच्या घरी करता येत नाहीत! आणि हो असा चहा हा दोन कप प्यायचा असतो..एक कप बिस्कीट/खारी साठी आणि मग एक कप नुसता आलं घातलेला गरम गरम चहा! स्वर्गसुख!

एक कप बिस्कीट/खारी साठी >>> !!!!! अरे काय हे जि Biggrin केवढी पातळ तर असते खारी. एक कप मध्ये १०-१२ खार्‍या तर नक्की मावतील. तुझी बशीत ठेवून वाली कृती तीन वेळा केली तर एक कप चहा संपेल !

सी, घरी असताना दोन कप चहा झाला की "आता चहा संपला अजून हवा असेल तर स्वतः करून पी! किंवा एका बैठकीत सगळं पाकीट संपवणार आहात की काय?" अशी वाक्यं ऐकावी लागतात म्हणून (केवळ म्हणून) ही दोन कपांची मर्यादा Lol

Pages