अमृततुल्य बासुंदी चहा :)
लोक वेगवेगळ्या प्रकारे चहा करतात. काही लोक वेगळ्याच पद्धतीने चहा करतात. म्हणजे पाण्यात साखर घालून उकळवून त्यात एक चमचा चहा घालून झाकण घालून गॅस बंद आणि कपात दूध आणि वरून तो कोरा चहा ओततात. तो म्हणे खरा चहा. माझ्या मते तो फळकवणी लागतो
मला तर चहा एकदम दाट, गोड आणि लाईट लागतो, स्ट्राँग चहा अजिबात आवडत नाही.
कोल्हापूरला 'लम्सा' नावाचा एक चहाचा स्पेशल मसाला मिळतो. बाकी चहाचे मसाले म्हणजे टिपिकल सुंठ, आलं, वेलदोडा असे माहित असलेले वास असलेले असतात. लम्सा मात्र निराळा आहे. तो वापरून मी चहा असा करते.
साहित्य (2 कप चहा) : एक कप दूध, एक कप पाणी, ६ चमचे साखर, १ सपाट चमचा लम्सा, २ सपाट चमचे सोसायटी चहा.
कृती :
प्रथम भांड्यात दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून त्यात लम्सा घाला.
मग २ सपाट छोटे चमचे चहा घाला. मी नेहमी सोसायटी वापरते. चविला एकदम लाईट आहे. स्ट्राँग नाही.
६ चमचे साखर. हे चमचे अतिशय छोटे आहेत आणि मला साखर कमी चालत नाही. त्यामुळे ६. आजकाल साखर अजिबात गोड नसते त्यामुळे ६ घातले तरिही गोड गिट्ट होत नाही चहा.
खरंतर कोणताही पदार्थ कोणत्याही क्रमाने घातला तरी चालतो, मी आपले फोटो टाकलेत त्याप्रमाणे लिहिलंय.
पण शेवटी झकास उकळायचा चहा नीट. नंतर नंतर तो उकळून छान दाटसर दिसतो.
मग काय, कपात ओता, दोन बिस्किटं घ्या, सोबतीला वर्तमानपत्र आणि होऊन जाऊदे तरतरीत सकाळ किंवा संध्याकाळ.
विशेष टिप : चहा करताना (सुरुवातीलाच) एक चमचा साय घातल्यास अजूनच मस्त लागतो चहा. (उकळल्यावर छान तुपकट होतो. ;))
तळटिप : लम्सा पुण्यात मिळत नसल्याने आपके कोपुचे माबोकर निपो यांनी मला वर्षभराचा लम्साचा स्टॉक भेट दिला आहे. अधून मधून काही माबो मैत्रिणी येऊन तो मसाला ढापून नेतात ही गोष्ट निराळी
आलोच!
आलोच!
रेसिपी भारीये. << माझ्या मते
रेसिपी भारीये.
<< माझ्या मते तो फळकवणी लागतो >>> +१००
<<६ चमचे साखर>>> हे मला लयी होइल, पण चहा असाच जबरी आवडतो अन ते वर साय प्रकरण बी मस्तच
जगात माणसांचे प्रकार दोनच
जगात माणसांचे प्रकार दोनच दोनच एक चहा चांगला न बनवता येणारे आणि दूसरा म्हणजे चहा चांगला करता येणारे..
पहिल्या प्रकारातील लोकांबद्दल काही अढ़ी नाही,पण दुसऱ्या प्रकारातील लोक मला कायम भले वाटत आले आहेत.
दक्षिणा चहा खरोखर अप्रतिम करते.ईश्वर तिचे कायम भले करो..
तर हां अप्रतिम चहा प्यायला मिळण्यासाठी पूर्वजन्मातील पुण्याच्या संचय किंवा दक्षिणा च्या गुड़बुकात नोंद ह्या पैकी किमान एक गोष्ट तुमच्या जमेस पाहिजे.
पहिल्या गोष्टीची फारशी खात्री नसल्याने मी दुसऱ्या पर्यायावर भर देतो. दक्षिणाला माझ्याकडून होणारा लमसा च्या पुरावठ्याचे मूळ तिच्या गुड़ बुकात राहण्याच्या धडपड़ित दडलेले आहे.
दुनियामे इक कप अच्छी चाय के लिए क्या क्या पापड बेलने पड़ते है
अविदादा
अविदादा
हायला...लाम्सा सगळ्या लोकांना
हायला...लाम्सा सगळ्या लोकांना माहीत नाही हे समजून अंमळ गंमत वाटली....कारण लहानपणापासून लामसा घरी येत असलेला पाहीलाय. बरं लहाणपणापासून कुठे? तर हडपसर, पुणे येथे. बरं आमचा ना कोल्हापूराशी काही संबंध ना कर्नाट्काशी ना आंध्राशी.
दक्षिणा, लामसा खरंच इतका दूर्मिळ नाही पूण्यात. मोठ्या किराणा दूकानांत हमखास मिळून जातो. मला आजवर तरी लामसा मिळाला नाही असं कधीच झालं नाही. तुम्हाला किंवा आणखी कुणाला हवा असल्यास दुकानांचे पत्तेही देईन.
लामसाला त्याचा स्वतःचा असा वेगळा सुगंध आणि स्वाद असतो. पण निव्वळ त्या चहापत्तीचा चहा भयानक सुगंधी वाटू शकतो म्हणून थोड्या प्रमाणात चहात मिसळला जातो.
आमच्याकडे रेड लेबल (आजकाल नॅचरल) येतो. आणि आळीपाळीने वेगवेगळ्या फ्लेवरचा चहा बनवला जातो. ईलायची, सुंठ, आले, लामसा..ई.
आणखी एक गंमत म्हणजे, मी चहाच पीत नाही! (घरात अक्कड चहाबाज असल्यामूळे ही सारी माहीती!)
हे लम्सा प्रकरण काय फ्लेवरचे
हे लम्सा प्रकरण काय फ्लेवरचे असते नक्की?
मला वेलची, लवंग वगैरे घालून केलेला मसाला चाय डोक्यात जातो. अजिबात आवडत नाही.
चहात पडायची लायकी फक्त आले, गवती चहा आणि पुदिना(तिन्ही फ्रेश. सुकवलेले नाही) यांचीच आहे अशी माझी प्रामाणिक धारणा आहे.
तर असे असताना लम्सा प्रकरण आवडू शकेल का?
नी, लम्सा थोडी चॉकलेट सारखी
नी, लम्सा थोडी चॉकलेट सारखी असते + मसाला चव. चहामध्ये चांगली लागते. तुला जर करून पाहायचं असेल तर तयार चहाच्या कपात पाव लहान चमचा बोर्न्विटा घालून पाहा. चॉकलेटी चव छान लागते.
<< लम्सा थोडी चॉकलेट सारखी
<< लम्सा थोडी चॉकलेट सारखी असते >>
त्यापेक्षा सरळ चहा भुकटीत किंचित प्रमाणात कॉफी भुकटी किंवा चॉकलेट भुकटी मिसळून चहा बनविला तर?
आता जर का कुणी मला
आता जर का कुणी मला साखरेविषयी विचारलं तर मी धागाच डिलिट मारीन. अरे नीट वाचा की २ कपाला ६ चमचे. म्हणजे एका कपाला ३ चमचे. मला चहा गोडच आवडतो..
मला वेलची, लवंग वगैरे घालून केलेला मसाला चाय डोक्यात जातो. अजिबात आवडत नाही. >> नी यावर वाट्टेल तेव्हढे मोदक घे. मला तर आलं सुद्धा आवडत नाही चहात.
अविदादा तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. लम्साचा पुरवठा असाच सुरू राहू दे
अविकुमार कदाचित माझ्या एरियात मिळत नसेल म्हणून आपलं मी कोल्हापूरातून मागवते.
हो ना दक्षिणा. चहापेक्षा
हो ना दक्षिणा. चहापेक्षा साखरेवरच चर्चा जास्त! अहो, साखरेचे खाणार त्याला देव देणार. ह. घ्या.
मला लमसा चहा माहितच नव्हता आत्तापर्यंत
अरे नीट वाचा की २ कपाला ६
अरे नीट वाचा की २ कपाला ६ चमचे. म्हणजे एका कपाला ३ चमचे. मला चहा गोडच आवडतो..>>>>> हे बोल्ड केलेल हेडरमध्ये टाक बर आधी.:फिदी:
तू लिहीलेली साखरेची क्वान्टिटी वाचुन बर्याच जणाना घाम फुटलाय. ते पाणी आणी दूधाकडे त्यामुळे दुर्लक्ष होतेय.:दिवा:
तुम्हाला थंड चटका अनुभवायचा
तुम्हाला थंड चटका अनुभवायचा असेल तर मेंथॉलची गोळी तोंडात ठेवून तिच्यावरून गरमागरम चहा प्या.
>>>
कल्पना आहे थोडीफार,
कॉलेजला अड्ड्यावर मुले सिगारेट फुकत चहा प्यायचे. तेव्हा मी सिगारेट ओढणारा नसलो तरी मिंटॉसची गोळी मात्र खायचो. त्यावर थोड्याच वेळात चहा प्यायले की काय होते कल्पना आहे थोडीफार... अर्थात यात मजा नाहीच.
असो, बरेचदा गोड खाल्ले की त्यावर चहा गोड लागत नाही.
पण मला पुरणपोळी सोबत चहा खूप आवडते. बुडवून नाही खायची तर एक पुरणपोळीचा घास तोंडात घेत त्याचे चर्वण चालू असतानाच चहाचा घोट मारायचा ..
कुरकुरीत कांदा भजी अमृततुल्य
कुरकुरीत कांदा भजी अमृततुल्य कटींग चहामधे बुडवून खाणे याच्यात जी गंमत आहे ती इतर कशात नाही.
हे जनरली पावसाळ्याच्या दरम्यान कोकणातल्या छोट्या गावातल्या हाटेलात केल्यास अजून मजा येते.
कुरकुरीत कांदा भजी अमृततुल्य
कुरकुरीत कांदा भजी अमृततुल्य कटींग चहामधे बुडवून खाणे >> नी खरंच, चवीची कल्पना पण येत नाहीये. "एक पुरणपोळीचा घास तोंडात घेत त्याचे चर्वण चालू असतानाच चहाचा घोट मारायचा" या चवीची एकवेळ कल्पना तरी करु शकतो आहे पण भजी बरोबर?... बिलकूलच इमॅजीन होत नाहीये. आता या चवीसाठीच एकदा हा प्रयोग करणे आले!
या चवीची एकवेळ कल्पना तरी करु
या चवीची एकवेळ कल्पना तरी करु शकतो आहे >>> ओये, एकवेळ म्हणजे काय.. काय असलंतसल खाणं आहे का ते
बाकी भजी बुडवून ऐकायला नवीनच आहे, पण कांदाभजी विथ पाव चर्वण करत असतानाच चहाचा घोट मारणे बेस्ट.. मागच्या एका पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे सोबत मिरची चावायला असल्यास आणखी उत्तम.
तसेच घावणे सुद्धा चहात बुडवून मस्त लागतात.. त्याबरोबर हिरवी तिखट चटणी घ्यायची आणि घावण्याला लावत तो घावणा चहात बुडवायचा.. जेणेकरून प्रत्येक वेळी थोडी थोडी चटणी विरघळत चहात सरकते आणि चहा हळूहळू मस्त तिखट होत जातो..
चहा-बिस्कीट हा तर मला जगात बोअर प्रकार वाटतो.. एकवेळ ते चहात बुडवलेले बिस्किट खायला बरे वाटते पण त्यानंतर चहाची सारी चव निघून जाते.. त्यातही बिस्किट विरघळून चहात पडले तर एवढी चीडचीड होते की संतापाने थयाथया नाचावेसे वाटते.. फायर्ब्रिगेड वा अॅम्बुलन्सला कॉल करून बोलवावे तसे चमचा दे चमचा दे करत आईला हाक मारावी लागते.. आणि जर चुकून असे नाही केले व अनवधानाने चहाच्या शेवटच्या घोटात ते विरघळलेले बिस्किट तोंडात आले तर तोंडाची जी चव जाते ती काही केल्या, कितीही चूळा मारल्या परत येत नाही..
त्यापेक्षा खारी-टोस्ट-बटरला प्राधान्य.. चहाची चव बरेपैकी शाबूत राहते.. तसेच हे खाऊन झाल्यावर थोडीसी तिखट शेव, फरसाण, चकली तोंडात टाकायची (जे आमच्या घरात सदैव उपलब्ध असतेच असते) आणि मग वर चहा प्यायचा..
विषय भरकटतोय एखादा तिखट
विषय भरकटतोय
एखादा तिखट पदार्थ आणि चहाचा घोट हे काँबिनेशन जबरी आहे. त्याने चहाची चव बदलत नाही. पुरणपोळी आणि चहा मी कल्पनाच करू शकत नाही. चहात बुडवून भजी लईवेळा परवडली.
दक्षिणा वहीच तो.. पुरणपोळी
दक्षिणा वहीच तो.. पुरणपोळी हाच या जगातील एकमेव गोड पदार्थ आहे ज्याचा आस्वाद मी चहाबरोबर घेऊ शकतो.. म्हणून विशेष उल्लेख केला..
तसा चहात बुडवायला आवडणारा आणखी एक गोड पदार्थ म्हणजे केक-टोस्ट (शक्यतो अंड्याचा नसल्यास उत्तम) .. पण त्यानंतर चहा प्यायची मजा जाते.. तरीही हा पदार्थ आवडीचा असल्याने चहाच्या तल्लफीशी कॉम्प्रोमाईज करतो..
बाकी भजीबद्दल मी विचार करतोय की ती चहा शोषून घेणारी नसेल तर चहात बुडवण्यात पॉईंट आहे का निव्वळ मनाचे समाधान होते.
चहा शोषून घेणारी असेल तर चहात
चहा शोषून घेणारी असेल
तर चहात बुडवण्यात अर्थ आहे.
भजी कुरकुरीत नसेल तर
बासुंदी चहाही व्यर्थ आहे.
- चारोळी.
विकु, तुम्ही शेवटी '-चारोळी'
विकु, तुम्ही शेवटी '-चारोळी' असं लिहिलंत ते बरं केलंत!
चहा न कधी ढोसताच
करतात चहावरंच चारोळी
पहा ना कसे कोसतात
मारून जोरदार आरोळी
आ.न.,
-गा.पै.
चहात भजी बुडवल्याने भज्याचे
चहात भजी बुडवल्याने भज्याचे नाही तर चहाचे भले होते. आधी चहात लवंग दालचिनी असतेच त्यात कांदा, तेल, डाळीचे पीठ. चहाचे कटाची आमटी म्हणून अपग्रेड होते
आधी चहात लवंग दालचिनी असतेच
आधी चहात लवंग दालचिनी असतेच <<<
सी, भारतात-कोकणातल्या छोट्या खेड्यात रिअॅलिटी चेकसाठी जरा चक्कर मार बरे.
अश्या ठिकाणच्या चहामधे लवंग दालचिनी? नाही नाही.. (मै तो मूंह भी ना लगाऊ ऐसी चाय को!)
चहात भजी बुडवल्यावर आपल्या जिभेचे भले होते. चहाचे आणि भज्याचे वेगळे काही होत नाही..
दक्षे, साखरेच्या प्रमाणावर गाडी अडकण्यापेक्षा बरे की नाही विषय भरकटलेला?
कुरकुरीत कांदा भजी अमृततुल्य
कुरकुरीत कांदा भजी अमृततुल्य कटींग चहामधे बुडवून खाणे याच्यात जी गंमत आहे ती इतर कशात नाही.>> +१००. हेच आकडे कडबोळं आणि चकलीला लागू. चिवड्याची फक्की मारून त्यावर चहाचा घोट अप्रतिम लागतो. त्या फक्कीत मिरचीचा तुकडा हवा. आणि अमूल बटर चोपडलेला ब्रेडचा स्लाईस चहात बुडवून खाणं स्वर्ग आहे स्वर्ग!
लम्सा मुम्बई मध्ये मिळतो का
लम्सा मुम्बई मध्ये मिळतो का कुठे?
अमूल बटर चोपडलेला ब्रेडचा
अमूल बटर चोपडलेला ब्रेडचा स्लाईस चहात बुडवून खाणं स्वर्ग आहे स्वर्ग! <<<
अहाहा....
नको पण विचार पण नको.. विचारानेही वजन वाढेल!
दक्षिणा ..मस्त लिहिलय्स
दक्षिणा ..मस्त लिहिलय्स हे....मी ईतक्या दिवसात कसं काय मिसलं...
मला पण लम्सा नवीनच आहे...येतेच आत तुझ्याकडे प्यायला हा चहा...
>>आजकाल साखर अजिबात गोड नसते >> या वाक्यामुळे खुप हसले मी
दक्षिणा मला पन हवा लम्सा
दक्षिणा मला पन हवा लम्सा ....
चहा आहाहा... चहाची वेळ नसते
चहा आहाहा... चहाची वेळ नसते पण वेळेला चहा लागतोच
लम्सा आणून बघते इंग्रो मधे मिळाला तर इथे एवढी तारीफ झालीये तर आता टेस्ट करायलाच हवा.
दक्षिणा फोटो मस्त
येतेच आत तुझ्याकडे प्यायला हा
येतेच आत तुझ्याकडे प्यायला हा चहा...
>> स्मिता तु एक दुसरी थापाडी. घराजवळ राहतेस पण कधी आली नाहिस. गुलाबाची फुलं सुद्धा तुझी वाट पाहून थकली.
दक्षिणे...मी आता तुझ्या
दक्षिणे...मी आता तुझ्या घराजवळ नाही गं राहात....
बदलली मी जागा कधीच.....
करते तुला मेसेज प्रायवेट मधे
(No subject)
Pages