गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
_प्राची_, मी थक्क झालेय
_प्राची_, मी थक्क झालेय तुझ्याकडच्या सुंदर पदार्थांच्या फोटोंचा संग्रह पाहून. इतके सुंदर पदार्थ करतेस म्हणजे सुगरणच असली पाहिजेस.
असा गणपती तसा गणपती सुरेख बाई
मायबोलीवर उत्सव तो करावा..
असा उत्सव सुरेख बाई नैवेद्य रांधावा..
अस्से पदार्थ सुरेख बाई फोटो ते काढावे..
अस्से फोटो सुरेख बाई झब्बूवर टाकावे!
संयोजक .. उपक्रम मस्तच पण
संयोजक .. उपक्रम मस्तच पण पदार्थ लगेच खाता येतील असं काहितरी करा ब्वॉ!
सगळे फोटो बघुन आता भुक लागली आहे!
आशुडी +१
वरई अर्थात वर्याचे तांदूळ
वरई अर्थात वर्याचे तांदूळ (मधली मूद)
धन्यवाद आशूडी आणि इतर
धन्यवाद आशूडी आणि इतर सर्वांचे ज्यांना माझ्या फोटो आवडले.
माझा छंदच आहे तो.
प्राची तुस्सी ग्रेट हो
प्राची तुस्सी ग्रेट हो
वर्याचे तांदूळ घेऊन 'ल' घेते
वर्याचे तांदूळ घेऊन 'ल' घेते आहे.
केव्हापासून संधीच्या प्रतीक्षेत होते!
लसूण खोबऱ्याची चटणी.
ओ आम्हाला बी घ्या की गाडीत ,
ओ आम्हाला बी घ्या की गाडीत , फारच फास्ट मारता राव .
माझ्या कडे ज आहे क आहे न आहे
मग न टाका आता. ण म्हणजे न.
मग न टाका आता. ण म्हणजे न.
झंपी, रंगीत मोदक, उकडीचे
झंपी, रंगीत मोदक, उकडीचे आहेत.
इन्ना, लवकर न टाक!!!!
इन्ना, लवकर न टाक!!!!
न टाका ना मग आता
न टाका ना मग आता
नानखटाई
नानखटाई
आज मद्रासमध्ये शिफ्ट होऊन दोन
आज मद्रासमध्ये शिफ्ट होऊन दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ही इडली!!!
लसूण ठेचा
लसूण ठेचा
फ़्राईड चिकन
फ़्राईड चिकन
आता कोणतं अक्षर घ्यायच ?
आता कोणतं अक्षर घ्यायच ? फाईव्ह !
म्हणूनच नाव बदललं तसंही ६५
म्हणूनच नाव बदललं तसंही ६५ आहे यावर मी नक्की नव्हते.
निंबू पानी
निंबू पानी
सगळे फोटो बघुन काय वाईट
सगळे फोटो बघुन काय वाईट अवस्था झालि आहे... आताच जेवावे वाटत आहे..
कातील फोटो..
नॅचोज
नॅचोज
इन्ना ---- ज आहे खास
इन्ना ---- ज आहे खास तुमच्या साठी ...टाका लवकर ....
जिरा राइस नाहि का
जिरा राइस नाहि का कुणाकडे......... अमेय
जेली
जेली
जेली घ्या आता ल
जेली
घ्या आता ल
आशुडी, +१. प्राची सगळेच फोटो
आशुडी, +१. प्राची सगळेच फोटो मस्त.
मानुषीताई, वरचा जेलीचा फोटो आवडला
वरती दोन्ही जेलीचेच फोटो आहे. दोन्हीही राहु द्या. डिलीट नका करू.
जेवण झाल्यावरही तितकीच जोरदार
जेवण झाल्यावरही तितकीच जोरदार भुक लागलीय परत.. यम्मी जेल्या
लोणचं पुढिल अक्षर "च"
लोणचं
पुढिल अक्षर "च"
चिरोटे ट
चिरोटे
ट
मानुषीताई, वरचा जेलीचा फोटो
मानुषीताई, वरचा जेलीचा फोटो आवडला स्मित>>>>>>>>
धन्यवाद गुर्जी!
ट्कीला.....
ट्कीला.....
Pages