गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
पिवळा गाजराचा रस, लाल बिटाचा
पिवळा गाजराचा रस, लाल बिटाचा रस घालून बनवले आहेत. नो फूड कलर.
तळणीचे मोदक
तळणीचे मोदक
एकदम तोंपासु!!! भारी झब्बू
एकदम तोंपासु!!! भारी झब्बू आहेत सगळे..
संयोजक, झब्बूची नवीन थीम आल्यावर आधीच्या थीमचा धागा बंद करायचा असतो ना? की १० ही दिवस सर्व थीम्सचे धागे चालू ठेवायचे ठरवलेय यावेळी?
नलिनी आली . लवकर फोटो टाक.
नलिनी आली .
लवकर फोटो टाक.
किडयो मध्ये तळलेले जे
किडयो
मध्ये तळलेले जे किड्यासारखे पदार्थ दिसत आहेत त्याचंनाव किडयो. पूर्ण ताट मंगलोरी कॅथलोक ख्रिसमसला "कुसवर" म्हणून करतात त्याचं आहे.
नको. क चालेल.
नको. क चालेल.
नंदिनी किड्यासारख काय म्हणतेस
नंदिनी किड्यासारख काय म्हणतेस माझ्या आवडीचा पदार्थ आहे.
गोव्यातही फेमस आहे.
ड घ्या आता.
ड घ्या आता.
फळं चालणार आहेत क?
फळं चालणार आहेत क?
आरती नाही, "य" अक्षर आलं कि ड
आरती नाही, "य" अक्षर आलं
कि ड यो असं नाव आहे त्याचं (शिवाय परत ड नको.
)
कुलकुल्स म्हणतात गोव्यात.
कुलकुल्स म्हणतात गोव्यात.
@सानी, यंदा मंडळाने सर्व
@सानी,
यंदा मंडळाने सर्व झब्बू
दहाही दिवस सुरू
ठेवायचा निर्णय घेतला आहे,
जेणेकरून अधिकाधिक
मायबोलीकर सहभागी होऊ
शकतील.
@ नलिनी ,
फळं, भाज्या, धान्य
स्वरूपातील पदार्थ चालणार
नाहीत
कोणत अक्षर???
कोणत अक्षर???
योगर्ट
योगर्ट
नलिनी मस्त.
नलिनी मस्त.
आता शोधा "ट ’ वरून.
आता शोधा "ट ’ वरून.
शोभा, टोमॅटो सॉस आरती,
शोभा, टोमॅटो सॉस
आरती, धन्यवाद!
नलिनी धन्यवाद टोमॅटो सॉस.
नलिनी धन्यवाद

टोमॅटो सॉस.
राहुदे माझा.
राहुदे माझा.
टरबूजाचे रसायन, टाकळ्याची
टरबूजाचे रसायन, टाकळ्याची भाजी
सुरती बटर
सुरती बटर
दिनेशदादा, तू फक्त नावं सुचवू
दिनेशदादा, तू फक्त नावं सुचवू नकोस. फोटो टाक.
दिनेशदा, इथे भाग घ्या. य
दिनेशदा, इथे भाग घ्या.
य वरून पदार्थ सुचवा.
आरती ’य’ वरून कसं? ’र’ वरून
आरती ’य’ वरून कसं? ’र’ वरून ना?
र वरून टाका. रव्याची खीर,
र वरून टाका. रव्याची खीर, लाडू, बर्फी, रंगीत पदार्थ :).
अग य आला की सगळे अडकतात
अग य आला की सगळे अडकतात म्हणून दिनेशदांना म्हणाली की 'य' च्या पदार्थांची नाव सांगा.
अच्छा!
अच्छा!
रस्सा
रस्सा

(No subject)
स घ्या.
स घ्या.
Pages