गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
शोभा, आता लोक ही आयडीया
शोभा, आता लोक ही आयडीया वापरतील. >>>>>>>>>>.डबा उघडला की सगळे, पहिला फ़ोटो काढणार. इथे कळेलच म्हणा.
डिंकाचे लाडू नाहीयेत का
डिंकाचे लाडू नाहीयेत का कुणाकडे? डाळं? डेअरी मिल्कही नाही? डाळवांगं? डिस्को पापड?
मी आज सकाळी भक्तीभावानं
मी आज सकाळी भक्तीभावानं ऑम्लेटचा फोटो काढला, नवर्याने "अगदीच कामातून गेली" असा तु,क. दिला.
डेअरी मिल्कही
डेअरी मिल्कही नाही?>>>>....चालेल का?
बरोबरे ना, ऑ अक्षर येईल असं
बरोबरे ना, ऑ अक्षर येईल असं वाटलंच कसं तुला, ऑ?
डाल ढोकळी, डाल पकवान, डाल
डाल ढोकळी, डाल पकवान, डाल तडका, डाल फ्राय, डाल वडा नको कारण पुन्हा ड येईल.
डांगर
डांगर
डेअरी मिल्कही
डेअरी मिल्कही नाही?>>>>....चालेल का?>> चालेल हो. 'घरी केलेले पदार्थ' तिकडे स्पर्धेत. इथे फक्त 'खाद्ययात्रा' आहे.
चॉकलेट, गोळी खाऊच. ड वरून डालडा टाकू नका.
- संयोजक मंडळाच्या वतीने.
आशूडी, आमलेट असं नाव लिहिलं
आशूडी, आमलेट असं नाव लिहिलं असतं की. नाहीतर "कवठाचं धिरडं" असं ग्रामीण बाजाचं नाव दिलं अस्तं.
या ड ने पिच्छा पुरवलाय पण.
ऑ एग ऑम्लेट किंवा अंडा ऑमलेट
ऑ
एग ऑम्लेट किंवा अंडा ऑमलेट ला उपयोगी पडेल ब्रेफा 
"कवठाचं धिरडं" >>>>>
"कवठाचं धिरडं" >>>>>:हहगलो:
ड वरून डालडा टाकू नका.>>>>> ड
ड वरून डालडा टाकू नका.>>>>> ड परत येइल म्हणुन का?
ह्या घ्या डेरिमिल्क.
ह्या घ्या डेरिमिल्क.

कानवले
कानवले

(No subject)
पुढचं अक्षर ’क’ घ्या.
पुढचं अक्षर ’क’ घ्या. माझ्याकडे आहे. पण मी लगेच नाही ना देऊ शकत.
शोभा लेट... ल सुद्धा आल आणि क
शोभा लेट... ल सुद्धा आल आणि क घ्या काय करत आहेस.
लोणी. :
लोणी. :

आता "न"
आता "न"
न आला
न आला
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र, कवठाचं धिरडं टाकायचं होतं ना
ईमेज मोठी आहे म्हणुन upload
ईमेज मोठी आहे म्हणुन upload होत नाही. काय करु?
नान कटाई टाका. माझ्याकडे
नान कटाई टाका. माझ्याकडे पुढचा फोटो आहे
न वरुन माझ्याकडे मस्त फोटो
न वरुन माझ्याकडे मस्त फोटो आहे. थांबा जरा.
ईमेज मोठी आहे म्हणुन upload
ईमेज मोठी आहे म्हणुन upload होत नाही. काय करु?>>>>>>>>>.फ़ोटो ’मायक्रोसॊफ़्ट ऒफ़िस मॆनेजमेंट " मधे उघडून , तिथे "रिसाईज़" मधे जाऊन फ़ोटो साइज लहान कर.
नान
नान
नाचणिचा मोदक
नाचणिचा मोदक

कचोरी
कचोरी
रंगीत मोदक
रंगीत मोदक

कोकम सरबतः
कोकम सरबतः
Pages