गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
नंदिनी, लिंबू सरबत बनवून फोटो
नंदिनी, लिंबू सरबत बनवून फोटो टाक ईकडे.
एखाद्या अक्शराचे पदार्थ सुचत
एखाद्या अक्शराचे पदार्थ सुचत नसतील तर दुसऱ्या आयडीने आधीच्याच पदार्थाचा स्वत:कडील फोटो टाकला तरी चालेल.
उदा. अ ने आधी डोशाचा फोटो टाकला आहे. तर ब आपल्याकडील डोशाचा फोटो टाकू शकतील.
शिवाय, एखादे अक्षर तरीही अडल्यास वरील नियमाप्रमाणे त्याआधीचे अक्षर घेऊन खेळ सुरू ठेवायला हरकत नाही.
- संयोजक मंडळाच्या वतीने
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक
ल वरुन येत आहे. थांबा थोडा
ल वरुन येत आहे. थांबा थोडा वेळ.
माझ्या कडे २-३ आहेत
माझ्या कडे २-३ आहेत
लिंबू पाणी.
लिंबू पाणी.
नंदिनी, लिंबू सरबत बनवून फोटो
नंदिनी, लिंबू सरबत बनवून फोटो टाक ईकडे.>>>>>हे सह्हिए!!
धन्यवाद नंदिनी. नुडल्स
धन्यवाद नंदिनी.
नुडल्स
जिप्सी. हे कालपासून चालू आहे.
जिप्सी. हे कालपासून चालू आहे. जॅम. लाल मिरचीचा ठेचा आणि आता लिंबूपाणी.
प्राची ल राखून ठेव. आता स
प्राची ल राखून ठेव. आता स वरून टाका.
साबुदाणा वडा
साबुदाणा वडा
नंदिनी. लिंबू पाणी भारीच दिसत
नंदिनी. लिंबू पाणी भारीच दिसत आहे.
ड वरून माझा रूमाल.
ड वरून माझा रूमाल.
डाल बाटी
डाल बाटी
आईग्ग्ग _प्राची_, अमेयदा ,
आईग्ग्ग
_प्राची_, अमेयदा , मृण्मयी , जिप्सी , आरती , नंदिनीचे झब्बू कातिल आहेत
नंदिनी, भूक लागली. जाई
नंदिनी, भूक लागली. जाई धन्यवाद
त घ्या.
तांदळाचे घावन.
तांदळाचे घावन.
नारळ बर्फी
नारळ बर्फी
फिरनी
फिरनी
नारळाची चटणी
नारळाची चटणी
नीर डोसाचा फोटो नाही का???
नीर डोसाचा फोटो नाही का??? नारळी भात??? नारळाच दूध, रस, चटणी??????
प्राची, पुन्हा न
प्राची, पुन्हा न
जिप्सी. हे कालपासून चालू
जिप्सी. हे कालपासून चालू आहे>>>>:हाहा:
खूप मस्त चालू आहे खेळ. मी पण
खूप मस्त चालू आहे खेळ.
मी पण माझ्याकडे असलेल्या फोटोचे अक्षर यायची वाट बघते आहे!
mele thaar.. konitari aavaraa
mele thaar.. konitari aavaraa re yaa lokaannnnnnnnaaaa
kasale bhayaan kaatil foto taaktaahet......... potaat jaal uthalaa maajhyaa...........
साधना, नारळाच्या दूधाचा फोटो
साधना, नारळाच्या दूधाचा फोटो टाक लवकर म्हणजे तुझ्या पोटात जाल उठणार नाही.
sariva, वाट बघा. तुमचा नं. नक्की लागेल. काल मुग्धा आणि जिप्सी वाट बघत बसले होते.
नारळाच दूध. (आरती धन्यवाद! )
नारळाच दूध. (आरती धन्यवाद! )
धपाटे घाला आता कुणीतरी
धपाटे घाला आता कुणीतरी
फायनल्ली काहीतरी वेगळं अक्षर
फायनल्ली काहीतरी वेगळं अक्षर आलंय
ध वरून धिरडी, धपाटे, धोकर डालना वगिअरे टाका.
. potaat jaal uthalaa
. potaat jaal uthalaa maajhyaa........>>>>>..साधने, रिकामी कर ती वरची वाटी.
Pages