फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हैला , भारी आहे की हा धागा.
वर्षू , काय उत्साह आहे तुझा! Happy
फॅब ची मी पण फॅन, तसच W स्ध्या माझ्या लिस्ट मधे वर आहे.

W स्ध्या माझ्या लिस्ट मधे वर आहे.>>>>>> गेल्या महिन्यातच घेतलेत तीन टॉप्स....
वर्षु ताई जबराट आहे.... पब मधे जाताना घातला तर ऑसम दिसेल......;)

कालच बिबा मधे जाउन आले....पण अपेक्षाभंग झाला....कापडाच्या डिझाईन च्या मानाने किंमती कै च्या कै.. Sad आपले फॅब, W, बरे... कधीतरी तर बिग बझार मधे पण बरा मटका लागतो...

W स्ध्या माझ्या लिस्ट मधे वर आहे>> सेम हिअर Happy
वर्षु, तो ड्रेस कस्टममेड आहे की काय? आयडिया भारीच आहे.

नताशा इथे बघ..तसाच वाटतोय..अर्थात इथून कुठे शिप होतो आणि तू कुठे आहेस हा अभ्यास तूच कर Happy

वर्षुचं कलेक्शन छान आहे...मागे दक्षिणाने टाकलेल्यासारखं एक फक्त नेकलेस इ. लटकवाय्चं घेतलंय..फार उत्साह आला की फोटो टाकेन Proud

दक्षु.. भारीये तुझी आयडिया.. पण डेंजरसे.. असा प्लास्टिकी डरेस घालायची कुणाला हिम्मते???? Proud
इथे एका मॉल मधे सहज हिंडताना हा लिटल ब्लॅक ड्रेस दिसला.. त्याची उपयोगिता लक्षात आल्यावर लगेच घेऊन ही टाकला..

साध्या पण स्टर्डी काळ्या प्लास्टिक ला ड्रेस चा शेप देऊन समोर लहान मोठे ट्रांसपरंट प्लास्टिक चे पॉकेट्स शिवून टाकलेले आहेत.
आता वॉर्डरोब मधून टॉप निवडताना मॅचिंग ईअरिंग्स शोधायला बास्केट मधे खुडबुड करावी लागत नाही.. आपोआपच डोळ्यासमोर येतात.. ( वॉर्डरोब मधे हँगर वर लटकावला असल्याने धूळ बसत नाही.. मुंबईकर लक्षात घ्या.. Happy )
ज्याला कुणाला ही मस्त आयडिया सुचलीये याला सलाम..

कस्टममेड >>> नाही तसे मिळतात सगळीकडे. युएस मधे तरी पाहीले आहेत.
माझ्या लेकींची जंक ज्वेलरी, क्लीप्स, बो, रबर्बँड्स इ. ठेवायला मी घेतलं होतं इथे मागच्याच वर्षी. Happy
सापडली तर लिंक शोधून देते.
http://www.containerstore.com/shop?productId=10030180&N=&Ns=p_sort_defau...
माझा कंटेनर स्टोर मधूनच घेतलेलाय. पण जरा नाजूकपणे वापरायला हवा. मुलींनी ओढाओढी करुन एखादा एखादा कप्पा फाडलाय. Wink

हे पण बघा. http://www.containerstore.com/shop/jewelryStorage/hanging
http://www.containerstore.com/shop/jewelryStorage/countertopVanity

तो ब्लॅक ड्रेसवालाच जास्त स्मार्ट वाटतोय!!

कालच बिबा मधे जाउन आले....पण अपेक्षाभंग झाला....कापडाच्या डिझाईन च्या मानाने किंमती कै च्या कै..>> अगदी अगदी! मागे डिस्काऊंट ऑफर्स होत्या तेव्हा घेतलेले १-२ कुर्ते पण तेवढे क्लीक नाहीच झाले!!!

मी पण जाते हावरटा सारखी कधी कधी पण स्वताचा पोपट करुन घेउन बाहेर पडते.....कस काय लोक बिबा मधुन कपडे घेतात काय माहित.??? असते एखद्याची चॉइस...मला तर बाबा जमत नाही ते.. Sad

माझ्या एका मैत्रिणीला बिबा मधेच फार भारी कपडे मिळतात. मी बघायला गेले की तसले सापडत नाहीत. एकेकाचं नशीब असतं.

मलापण ते बिबा अज्जिब्बात आवडत नाही. बिग बझारमधे कपड्याला क्वालिटी नसते. माझ्या सर्वात भारी पोपट रीलायन्स ट्रेंड्मधे झाला होता. एक मरून कलरचा छानसा ब्राईट दिसणारा कुर्ता घेतला. फर्स्ट वॉश ड्रायक्लिन करून आणला तेव्हा ठिक होता. कुर्त्यावर हँड वॉश असं लिहिलं होतं म्हणून नेक्स्ट टाईम घरामधे पाण्यात घातल्यावर त्या कपड्याची शाईनच गेली. अगदी जुना फरशी पुसायचा फडका असतो तसा दिसायला लागला. नवरा म्हणे, फेकून दे आता.... पाचसहावेळा पावसाळ्यात वगैरे घालून पिदडला तो कुर्ता आणी मग खरंच फेकून दिला. Sad

6.jpg बिबा कुर्ता.,....असला कुर्ता पाहिला...रंग लाल होता...नवरा बोल्ला हे बाहेर घालुन गेलिस तर लोकं मागुन बिगुन नेतील........नको घेउस असलं काही.....

विंटेज नेकलेस कोणाला आवडतात???? सिंपल प्लेन कुर्त्यावर छान दिसतात...

इतका छान ( ? )कुर्ता बघुन लोकं मागतील वगैरे... Happy तो असले जोक मारण्यात पटाईत आहे......

1.jpg2.jpg3.JPG4.jpg5.jpg

हे विंटेज नेकलेस आहेत?>>>>>>>>>> नी दी माहित नाही मला तरी दुकानात हेच सांगितलं दुकानदाराने....मला अस्ले प्रकार आवडतात...... पण हे विंटेज नसतील तर मग कसे असतात??? मला या बाबतीत जास्त माहिती नाही..... पिक्स असतील तर वेळ मिळेल तेव्हा टाका नं...म्हणजे तसे शोधता येतिल....:)

http://en.wikipedia.org/wiki/Vintage_clothing

विंटेजचा अर्थ फॅशनच्या संदर्भात जुनाट, जुने, गेलेल्या काळातले, सेकंडहॅण्ड, जुन्या स्टाइलचे असा होतो.

पण मग विंटेज आणि रेट्रो मधे काय फरक आहे???? सॉरी मला हल्ली जुनाट दागिने आवडु लागलेत आणि त्याबदाल जास्त माहित नाही म्हणुन तुला विचारुन त्रास देतेय....

Pages