Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही बिल्वदल टिक छान आहे..
ही बिल्वदल टिक छान आहे.. मलाही बनवायची आहे, पण सो वर चां पॉ. एका कोल्हापुरच्या मैत्रिणीला सांगितलंय तिकडे मिळतेय का घेऊन ये म्हणून. आंजावर असाच एक सापडलेला फोटो खूपच आवडला म्हणून जतन करून ठेवलाय.
https://lh6.googleusercontent.com/-PFXVACuN9Rw/UWQ8JYZDAsI/AAAAAAAALuE/w...
यातले घुंगरू नसतील तर तितकीशी चांगली वाटणार नाही असं वाटतंय.
खूप छान आहे नेकलेस. यातले
खूप छान आहे नेकलेस.
यातले घुंगरू नसतील >>> त्यांना घुंगरु नाही " घागर्या" म्हणतात.
छाने बिल्वदल टिक... पण सो वर
छाने बिल्वदल टिक... पण सो वर चां पॉ?????
ऊप्स... चांदीवर सोन्याचं
ऊप्स... चांदीवर सोन्याचं पॉलिश..
ह्याला बिल्वदल टिक म्हणतात
ह्याला बिल्वदल टिक म्हणतात का? का ठुशी ?
मला पण खुप आवडलाय ... म्हणुन मी पण शोधतेय....
बिल्वदल टिक मस्तच!! मुंबईत
बिल्वदल टिक मस्तच!!
मुंबईत कुठे मिळेल?
मस्त कलंदर, फारच सुंदर आहे
मस्त कलंदर, फारच सुंदर आहे बिल्वल टिक.. नांव ही पहिल्यांदाच कळलं.. कोल्हापुर ला मिळतो का कु ठेही , ईझीली ????
बरेच ठिकाणी मिळते.. ही
बरेच ठिकाणी मिळते..
ही फोटोतली टिक गाडगीळांच्या फेसबुक पेजवरची आहे.. मी एकदा त्यांच्याकडे फेबुवरती चौकशी केली होती, तेव्हापोकळ-लाख भरलेल्या- टिकेला किमान ३० ग्रॅम्स लागतील असं कळालं होतं.. आताच्या बाजारभावाने आणि घडणावळ मिळून लाखभर सहजच लागावेत. म्हणून मग कोल्हापूरला खात्रीचे सोन्याचे पॉलिश दिलेले चांदीचे दागिने मिळतात म्हणून सध्या तिकडे चौकशी चालू केलीय मी.
३० ग्रॅमपेक्षा कमी सोन्यामध्ये होते की नाही याची काही कल्पना आहे का कुणाला इथे?
अशीच मोत्यातली पण काहीतरी
अशीच मोत्यातली पण काहीतरी व्हेरायटी मिळते, साधारण सेम डिझाईन. अप्रतीम दिसते!
ह्या बीबीवर भरपुर चर्चा
ह्या बीबीवर भरपुर चर्चा झालेल्या काळ्या नी सोनेरी अनारकलीसाठी मी काल कापड विकत घेतले. अर्बन हाटमध्ये भरलेल्या प्रदर्शनात अतिशय सुंदर कापड मिळाले, फक्त ३०० रु मीटर. टसर सिल्क आणि त्यात थोडे कॉटन मिक्स असे कापड आहे.
मूळ ड्रेससारखा कमरेभोवती चुन्या असलेला ड्रेस शिवणार नाही कारण मला तो प्रकार कधीच सुट झाला नाही. त्या ऐवजी ए-लाईन शिवुन घेईन, बाकी हात, गळा सेम मुळ ड्रेससारखेच. उंची मात्र एवढी नको (परत तेच, मला कदाचित सुट होणार नाही)
ड्रेससाठी टेलरच्या सल्ल्याने ७.५ मीटर कापड घेतले (४५" पन्ना) आणि सोनेरी कापड ३ मी. ड्रेसमधुन चुन्नीही काढुन देईन असे आश्वासन टेलरने दिलेय. चुन्नीवरच्या अॅप्लिकसाठी टेलरलाच साकडे घालेन, कुठुनतरी मिळव म्हणुन.
कापडासाठी तिनहजार दिलेत, शिवायला नक्कीच हजार जातील.
मुळ ड्रेस रु. ३५,००० चा होता पण प्युअर सिल्कचा होता. त्या तुलनेत हा चार हजाराचा ड्रेस कसा दिसेल ते इथे तुम्हालाही दिसेलच.
इथे तुम्हालाही
इथे तुम्हालाही दिसेलच.
>>
ताई, डरेस शिवुन आणल्याबर्बर लगेच फोटु काढुन टाकायची किरपा करा मंग.
सत्या पॉल चे तीन हजारचे
सत्या पॉल चे तीन हजारचे वावचर्स मिळाले म्हणून गेले आणि एक शिफॉन साडी आणि एक क्लच असा पर्स हलकि करण्याचा उद्योग झाला. But I am not complaining
फोटो प्लिज
फोटो प्लिज
मागच्या ३८ नंबर पानावर वर्षू
मागच्या ३८ नंबर पानावर वर्षू नील ने जो फोटो टाकलाय hanging earing होल्डरचा तसा काल मिळाला पुण्यात एका mall मध्ये, पण छोटा size , १३०/- ला.
अरे व्वा.. चैत्राली... तू पण
अरे व्वा.. चैत्राली... तू पण फोटो डकव इकडे तुझ्या ईअरिंग होल्डर चा
नक्की वर्षू ताई..
नक्की वर्षू ताई..
माझ्या इयर रिंग होल्डरचा फोटो
माझ्या इयर रिंग होल्डरचा फोटो ही टाकेन काढला की नक्की.
कोणत्या मॉल मध्ये ते ही
कोणत्या मॉल मध्ये ते ही सांगण्याचे करावे
तुळशीबागेतल्या "तुलसी"मध्ये
तुळशीबागेतल्या "तुलसी"मध्ये मिळते इयरिंग होल्डर.... ड्रेसटाईपचे नाही पण तसे कप्पे असलेले.
वर्षू, मी पण घेतला तसला
वर्षू, मी पण घेतला तसला ड्रेसवाला होल्डर खुपच छान आहे.
वॉव.. अनु३ , टाक तू ही होल्डर
वॉव.. अनु३ , टाक तू ही होल्डर चे फोटो पटकन
खूप दिवसात इथे बाजारांतून नुस्तंच भटकायला गेले नाहीये .. काय काय नवीन आलंय ते पाहायला जायला पाहिजेय...
थंडी,पाऊस कमी झाला कि जाईनच ..
साधना, पारिजाता फोटो
साधना, पारिजाता फोटो टाका......:)
नेटवरुन साभार
नेटवरुन साभार
रिया, मी easyday mall
रिया,
मी easyday mall (अभिरूची), सिंहगड रोड मधून घेतला. माझा पण ड्रेस type नाहीये. फक्त तसे कप्पे आहेत.
ह्यात बांगड्या ठेवायची सोय नाही. मग मी earings बरोबर saree पिन्स, safety पिन्स, hair क्लिप्स वगैरे ठेवलं त्यात. bangle होल्डर वेगळा होता १५०/- ला.
हे असच पाहील मी भुलेश्वरला
हे असच पाहील मी भुलेश्वरला आणि ठाण्यात गडकरीसमोरच्या प्रदर्शनात.
मस्त आहे लवकरच घेणे होईल आणि
मस्त आहे
लवकरच घेणे होईल
आणि स्वस्त पण वाटतय...
लोक्स पीएनजी ने वारली डिझाईन्स मध्ये दागिने आणलेत
पाहीले का कोणी?
(मला नाही आवडले.. पण बर्याच जणांना आवडत होते )
वर सगळ्यांनी फोटो टाकलेत तसे
वर सगळ्यांनी फोटो टाकलेत तसे माझ्याकडे आहेत वेगवेगळ्या साइझ चे पाउच स्टाइल हँगर वाले ईअर रिंग होल्डर , तुळशीबाग वाले आणि यु एस मधलेही काही .
वर्षु नी फोटो टाकलाय तसा स्सेम लिट्ल ब्लॅक ड्रेस शेप्ड पण आहे (बेड बाथ बियाँड मधून घेतलेला )पण समहाउ माझ्या कडे असलेल्या इअर रिंग्स साइझ -पॅटर्न्स ला अजिबात नाहीच जमत त्यातला एकही होल्डर :(.
उगीच गर्दी जमवली मी होल्डर्स ची !
फक्त वारली डिझाइन्स नाही
फक्त वारली डिझाइन्स नाही दिसली मला. आदिवासी , नॉर्थ-इस्ट भागातल्या जमाती यांचे ट्रॅडिशनल दागिने सोन्यामध्ये आहेत.
मला डिझाइन्स आवडली त्यांची. पण सोन्यात घ्यायला नाही आवडणार. बरीच डिझाइन्स कॉपर किंवा चांदीमध्ये जास्त छान वाटली असती असं वाटलं मला.
बरीच डिझाइन्स कॉपर किंवा
बरीच डिझाइन्स कॉपर किंवा चांदीमध्ये जास्त छान वाटली असती असं वाटलं मला.
+१
मला डिझाइन्स आवडली त्यांची.
मला डिझाइन्स आवडली त्यांची. पण सोन्यात घ्यायला नाही आवडणार. बरीच डिझाइन्स कॉपर किंवा चांदीमध्ये जास्त छान वाटली असती असं वाटलं मला.
>>>
अगदी अगदी!
हेच म्हणूनच मला नाही आवडली ती डिझाईन्स!
Pages