निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
साधना नाही ते झाड नाही ग. मी
साधना नाही ते झाड नाही ग. मी शोधून टाकते फोटो.
उसाच्या बाबतीत साधना म्हणते तेच बरोबर. आपण सहज उसाच्या पातीवरून आपल बोट जरी जोरात सरकल तरी लगेच कापत. स्वानुभव आहे. बर्याच वेळा असे कापले आहे माझे बोट.
म्हणजे काचेचा शोध झाडांनी आधी
म्हणजे काचेचा शोध झाडांनी आधी लावला हा दिनेशचा शोध १००% खरा आहे तर....
दिनेश, हल्ली इथले कावळेही पिंडबिंडच्या भानगडीत पडत नाहीत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या एका मित्राने फेबुवर
माझ्या एका मित्राने फेबुवर टाकलेला फोटो व प्रतिक्रिया.
![Common Maina.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u8598/Common%20Maina.jpg)
"साळुंखी, खरे तर ही दिसायला एवढी पण कुरुप नाही, पण हा पक्षी एवढ्या मुबलक पणे आढळतो की त्या पक्ष्याचे सौंदर्य कदाचित आपल्या लक्षात येत नाही."
शाळेत असताना मैत्रीणींमधे एक
शाळेत असताना मैत्रीणींमधे एक गोष्ट जाम फेमस होती, एक साळूंकी दिसली तर मार खावा लागणार, दोन साळूंक्या दिसल्या तर गोड खायला मिळणार..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
एकदा मैत्रीणीच्या शेतात गेले होते, अतिउत्साहाने ऊस खायला घेतला अन असा काही हात कापला की, डॉक्टर हे मानायलाच तयार नव्हते की मला ऊसामुळे कापलेय..
साळुंखीची जोडी तर आमच्या
साळुंखीची जोडी तर आमच्या लहानपणी पण पापिलर होती.
साळुंखी साळुंखी, तूझी माझी पालकी, रामाची जानकी... असे एक बडबडगीत होते आमचे.
मी वर ब्रिटल लिहिलेय ते कदाचित नेटल पण असू शकेल.
चातका, काही जणांची स्किन जास्त सेन्सिटीव्ह असते हे खरे. माझ्या ओळखीत एक बाई आहेत, त्यांच्या जवळपास जरी बिब्बा असला तर त्यांच्या अंगावर उठतो.
---
एल मिल्कवीड म्हणून झाड असते. त्याचाही चिक विषारी असतो. पण काही फुलपाखरांच्या अळ्या त्याच्यावरच पोसतात. पण त्यांच्याकडे एक अनोखी शक्ती असते. ते विषारी घटक त्यांच्या शरीरात मिसळत नाहीत, तर वेगळे साठवले जातात. मग त्याचे फुलपाखरु झाले कि ते घटक केवळ पंखात उतरतात. पक्ष्यांनाही हे बरोबर माहित असते. ते या पाखरांच्या वाटेला जात नाहीत, आणि गेले तरी पंख खात नाहीत.
आमच्या वाडीत अगदी मुबलक
आमच्या वाडीत अगदी मुबलक प्रमाणात आहेत साळूंख्या. पण मला काही त्या कुरुप वाटत नाहीत. ह्या खुप शुर असतात. साप दिसला रे दिसला की लगेच त्याला टोचायला मागे धावतात. त्यांच्या बरोबर एखाद दूसरा कावळाही असतो. सापही ह्या साळूंख्यांना घाबरून गवातात, बिळात जाऊन लपतो. आम्ही हे दृश्य महिन्यातून एकदा तरी पाहतो. पुढच्या वेळी मी शुटींग करणार आहे.
१. शोभा मस्त फोटो आहे गं!
१. शोभा मस्त फोटो आहे गं! कुठला आहे?
२. शोभा, फोटोबद्दल चार शब्द ?!!!>>>>>हा मनालीतील फोटो आहे. (हुश्श! झाले चार शब्द. :फिदी:)
मागील पानावरच काकपुराण वाचून
मागील पानावरच काकपुराण वाचून मजा आला. त्या कावळ्यांची कावकाव म्हणजे लग्नाची बोलणी असावीत अस दिनेशदांना वाटलं हे वाचल्यावर लातूर भागात लग्न ठरवण्याच्या बोलण्यांना "बोलाचाली " असा शब्द वापरतात अशी मजेदार आठवण आली. अन पिंडाबिंडाच वाचल्यावर पुलंच्या पाळीव पक्षी मध लं " एक चिनीमातीची बरणी अन दोन जर्मन ची मोठी पातेली आल्याशिवाय तुमची पैठणी मी बोहारणीला देणार नाही हो सासूबाई........ अन पिंडाला कावळा शिवला!! "
इथे सौदी मधे कावळा फार म्हणजे फार दुर्मिळ. काळा रंग असल्याने ते इथल ऊन सहन करु शकत नाहीत, मरुन जातात बिचारे, त्यातही वाचले तर फिलिपिनो वगैरे सर्वभक्षी मंडळी आहेतच. पण जिथे झाडे आहेत तिथे कधितरी दिसतो कावळा.
काल सकाळी सकाळी आयुष्यात कधीच पाहिले नव्हते इतके प्रवासी पक्षी पाहिले, कोणते तरी लांब मानेचे पक्षी होते. जवळून नाही पहाता आले कारण आकाशात त्यांचे व्ही आकाराचे भले मोठे थवे एका मागो माग बराच वेळ उडत जात होते उगवत्या सूर्याच्या पार्श्वभूमी वर मोठ मनोहर दृष्य होतं. पक्ष्यांचे फोटो काढण किती कठीण आहे ते लगेच समजलं.
श्रीकांत, ते फ्लेमिंगोज
श्रीकांत, ते फ्लेमिंगोज असतील. हे स्थलांतराचे दिवस ना त्यांचे.
पुण्या जवळ पाषाण तलाव, थेउर
पुण्या जवळ पाषाण तलाव, थेउर जवळचे कवडीपाट गाव आणि उजनी धरण (भिगवण) हे स्थलांतरीत पक्ष्यांचे मुक्कामाचे / विसाव्याचे ठिकण.
माझे आजोळ पुणे सोलापूर रोडवर
माझे आजोळ पुणे सोलापूर रोडवर चौफुल्यापासुन ३ किमी पुढे वरवंडमधे एक तलाव आहे, व्हिक्टोरीया तलाव तिथेही खुप पक्षी येतात, मी मामाकडे गेले की जायचे कधी तरी पक्षी निरीक्षणाला...
पक्षांच्या बाबतीत म्हणात तर
पक्षांच्या बाबतीत म्हणात तर माझ्याकडेही भरपूर पक्षी येतात. काहींचे फोटो काढले आहेत. काही फोटो काढूनच घेत नाहीत. लाजतात नुसते नी पळतात. दोन दिवसांत टाकते.
खूप वर्ष आधी हरिहरेश्वर ला
खूप वर्ष आधी हरिहरेश्वर ला जातांना फ्लेमिंगो ( अग्नीपंख!! काय सार्थ नाव !! दोन्ही भाषांत !! ) बघितले होते. दुर्दैवाने रस्ता घाटाचा अन मीच कारचा चक्रधर होतो. पण ते पंख उघडमिट होतांनाचे क्षणात पांढरे, क्षणात लाल भडक !! आठवणीत अगदी कोरले गेले आहे.
हा आहे अस्मादिकानी गेल्या
हा आहे अस्मादिकानी गेल्या रविवारी केलेला उद्योग. (कित्ती आळशी आहे ना मी?
सगळ्यांच्या मनातील प्रतिक्रियेला मीच मूर्त स्वरूप देते.
(नि.स.सु.)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![](https://lh4.googleusercontent.com/-9nWcwRuiwZU/TsdP2r0C4DI/AAAAAAAAAS4/3Y9JUvzyfPc/s640/RSCN1344.jpg)
![](https://lh5.googleusercontent.com/-H9FuHn2jBlE/TsdMFGwJJMI/AAAAAAAAASQ/T0we6ZYe3hs/s640/RSCN1339.jpg)
![](https://lh3.googleusercontent.com/-vyl7qSy78QE/TsdMmualvgI/AAAAAAAAASo/FNDevg23dTM/s640/RSCN1338.jpg)
![](https://lh5.googleusercontent.com/-21Nl2CYATrA/TsdL52aarzI/AAAAAAAAASI/Fa61kHseiRc/s640/RSCN1343.jpg)
![](https://lh6.googleusercontent.com/-rDC05qmsg54/TsdMbdiRBeI/AAAAAAAAASg/SHIRgO9aVNU/s640/RSCN1357.jpg)
माझ्या स्वयंपाक घरासमोर, औंदुंबर, व तुतीच झाड आहे. त्यामुळे आता बरेच पक्षी बघायला मिळणार आहेत.
१. हा पक्षी एवढा छोटा आहे, चिमणीच्या निम्मेच आकार असेल. पण इतका चंचल, की मी कॅमेरा हातात घेऊन, खिडकीतून कितीतरी वेळ हात हलवत होते. सूर पण इतका छान मारत होता. वरच्या फांदीवर दिसला म्हणून मी कॅमेरा डोळ्याला लावला तर, जोराच्या वार्याने एखाद पान खाली याव, तसा हा सूळकन खाली पसार झाला. त्याची खूप विनंती करून हा फोटो काढला.
२. दिनेशदा...........................नाव सांगा ना. (कितीवेळा सांगितलत तरी लक्षात रहाण मुश्किलच)
३. हा कोकिळ फांदीच्या टोकावर असलेली तुतीची फळ खाण्याच्या प्रयत्नात होता.
४. या साळूंकी ताई. (साळूंकीच आहे ना? :अओ:)
५. आणि हा आहे आमच्या पक्षांचा खाऊ.
आमच्याकडे एक खुप छोटासा पक्षी
आमच्याकडे एक खुप छोटासा पक्षी कोरांटीच्या झाडाची पाने दुमडून घरटे तयार करतो, वाटतही नाही घरटे आहे म्हणून झाडाला थोडीही इजा झालेली नाही.. यावेळी फोटो काढेन, ते घाबरतील परत येणार नाहीत म्हणून मी फोटो काढायचे टाळतेय, पण गेल्यावर्षी ते पक्षी उडून गेल्यावर फोटो काढू म्हटले तर त्यांनीच घरटे मोडले होते..
मी कावळ्यांचे वेगवेगळे आवाज
मी कावळ्यांचे वेगवेगळे आवाज ऐकलेत हल्ली. >>>>साधने, अगदी खर. अग मी आत्ता मनालीला तर कावळा 'ऑव, ऑव ' असा ओरडताना ऐकला. आधी वाटलं आपलच ऐकायला चुकत असेल, पण नंतर भाऊही म्हणाला, तेव्हा खात्रीच पटली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सारीका, काढच फोटो. फक्त
सारीका, काढच फोटो. फक्त त्याना त्रास न होऊ देता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![](https://lh3.googleusercontent.com/-XH5fsvNAO94/TsdXPBH_7rI/AAAAAAAAATI/cWEOn2i7Pqs/s640/RSCN1358.jpg)
शांकली, मी तुम्हाला, एस. एन. डी. टी. च्या इथला एक फोटो काढायला सांगितला होता, काढलाय का? मी एक काढला, पण मला ज्या झाडाचा हवा होता, तो नाही मिळाला. पण त्या झाडाला आता शेंगा लागल्यात.
शोभा १२३ - प्र चि २ मधला
शोभा १२३ - प्र चि २ मधला पक्षी - टेलर बर्ड (शिंपी) - गुगलून बघणे - हाच आहे का ते.
सारिका - तो टेलरच असणार बहुधा - गुगलून कन्फर्म करणे........
ही गुगलकृपा (टेलर बर्ड) - असाच होता ना तो पक्षी ?
नक्की यावेळी काढेनच..
नक्की यावेळी काढेनच..
शशांक हा नाही तो पक्षी. प्रची
शशांक हा नाही तो पक्षी. प्रची १ आणि २ एकाच पक्ष्याची आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो हाच असावा बहुदा, इतके
हो हाच असावा बहुदा, इतके सुंदर अन बेमालुम घरटे बनविले होते, मनीमाऊ हजार वेळा तिथून जाते, पण तिला मुळीच दिसले नाही..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनीमाऊ हजार वेळा तिथून जाते,
मनीमाऊ हजार वेळा तिथून जाते, पण तिला मुळीच दिसले नाही.. >>>>कोणती मनीमाऊ? दोन पायांची की चार पायांची?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मनीमाऊ हजार वेळा तिथून जाते,
मनीमाऊ हजार वेळा तिथून जाते, पण तिला मुळीच दिसले नाही.. >>>>कोणती मनीमाऊ? दोन पायांची की चार पायांची?>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मने ये आता माझ्याकडे..
ह्या पिवळ्या रंगाची इतकी फुले
ह्या पिवळ्या रंगाची इतकी फुले आहेत आणि त्यात इतके साधर्म्य आहे की मला तर गोंधळून जायला होते. टिकोमा, टॅबेबुया, ट्रुंपेट.. किती आहेत. वरचे टिकोमा असावे
मी आत्ता घरी असायला हवे होते.
मी आत्ता घरी असायला हवे होते. कारण पक्षांचे सगळे फोटो घरच्या पिसीत आहेत. ते छोटूकले पक्षीही येतात माझ्याकडे पण फोटोच काढायला थांबत नाहीत.
साधना माझाही त्या पिवळ्या
साधना माझाही त्या पिवळ्या फुलांच्या नावाबाबत तोच गोंधळ होतो.
साधना माझाही त्या पिवळ्या
साधना माझाही त्या पिवळ्या फुलांच्या नावाबाबत तोच गोंधळ होतो.
ते छोटूकले पक्षीही येतात
ते छोटूकले पक्षीही येतात माझ्याकडे पण फोटोच काढायला थांबत नाहीत.>>>हो ना जागू. मला तर वाटलं होत एकही फोटो आपल्याला काढता येणात नाही. हे दोन फोटो सुद्धा खूप फोटो काढल्यावर मिळाले. बाकीच्या फोटोत झाडेच आलीत.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी आधी पण लिहिले होते बहुदा..
मी आधी पण लिहिले होते बहुदा.. फुलांच्या रंगांच्या बाबतीत तांबडा ते जांभळा असा वर्णपण डोळ्यासमोर आणायचा.
पक्ष्यांना लाल रंग जास्त आवडतो (किंवा कळतो म्हणा हवे तर ) त्यामूळे पक्ष्यांकडून परागीभवन अपेक्षित असेल तर ती फुले लाल असतात. उदा. पांगारा, पळस, सावर..
जांभळ्या रंगाचे आकर्षण असते किटकांना.. म्हणून त्यांची फुले जांभळी.. (कोरांटी, गायत्री, वांगीवृक्ष)
सुंगधी फुलेही किटकांचीच, कारण पक्ष्यांना नाक नसते किंवा त्यांचे गंधज्ञान पुरेसे नसते. पांढरी फुले रात्री उडणार्या किटकांची. मधुमालती सारखी काही फुले रंग बदलून दोन्ही कडचा फायदा उठवतात.
(याबाबतीत मला नक्की माहित नाही, पण हा कदाचित स्वपरागीकरण टाळण्याचा उपाय असेल. पांढर्या रंगाच्या वेळी पुंकेसर आणि लाल रंगाच्या वेळी स्त्रीकेसर प्रभावी होत असतील. एका कमळाच्या बाबतीत असे होते.)
मासाच्या रंगाची आणि उग्र वास येणारी फुले वटवाघळांची ( ब्रम्हदंड, केळफुल)
पिवळ्या रंगाचेहि किटकांनाच आकर्षण असते. पण आपल्याला पिवळी दिसणारी फुले त्यांना जांभळी दिसत असतील, गुलाबी / केशरी रंगाची फुले पण तशीच.
आपल्या नेहमीच्या परिचयातील कित्येक फुलांना फळे धरत नाहीत.. तगर, मधुमालती, संक्रांतवेल.. मग ती एवढा आटापिटा का करतात फुलायचा ?
कि आपल्या हातून त्यांचा होणारा प्रसार त्यांना पुरेसा वाटतोय ?
मग ती केवळ आपल्यासाठीच फुलतात का ?
ऑफिसमधून घरी आल्यावर नि ग
ऑफिसमधून घरी आल्यावर नि ग उघडल्या की कित्ती गप्पा झालेल्या असतात!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मनीमाऊ, ही ड्वार्फ कर्दळ आहे ना? (शाणी आणि गोडू!!) मस्त रंग आहे आणि फोटो पण सुंदर आलाय.
ऊसच काय पण आपला गवतीचहा - त्याच्या पातीने पण बोट कापू शकतं.
(पिंडाचे वगैरे काम करावे लागत नसेल)>>>>
Pages