निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चातका मस्त फोटो Happy

हे बेल फळांनी डवरलेले झाड Happy

आणि हे बेलफळ

हे बुचाच्या फुलांनी बहरलेले झाड (आकाशमोगरा, गगनजाई :-))

चातक, या दिवसात सगळ्या गल्फ शहरात ही रंगीबेरंगी फुले असतात नाही !
ओमानचा राष्ट्रीय दिवस पण १९ ऑक्टोबरला असायचा, त्या दरम्यान सगळीकडे अशी रंगाची उधळण असायची.

हो गौरी, हे देश सिंगापूर / थायलंड / मलेशिया सारखी जोरदार जाहिरात करत नाहीत, पण इथले सृष्टीसौंदर्य अनोखेच आहे.

जिप्स्या, हे बेलफळाचे झाड कुठे दिसले ? आपल्याकडे एवढी मोठी सहसा दिसत नाहीत. (ठाणा स्टेशनजवळ एक मोठे बेलफळाचे झाड आहे, कळव्याच्या दिशेने )

चातका मस्त फोटो.. गुलाबी पिटुनिया आहेत बहुतेक. आधी एकाच रंगात यायची आणि सिंगल पाकळयांची असायची. आता त्यातही पांढरा रंग सोबत अ‍ॅड झालाय. काही जातीत पाकळयांना झालरीसारखा पांढरा असतो तर काही जातीत पाकळीच्या बाजुने पांढरा रंग असतो. माझ्या ऑफिसातही भरपुर आहेत पिटुनिया. मस्त गालिचा अंथरल्यासारखा दिसतो या फुलांचा.

बेलफळ म्हटले की , मला माझी चंद्रपूर ट्रीप आठवते. चंद्रपूर जवळचे विख्यात मार्कण्डा देवालय पाहुन झाल्या वर आम्ही एक धरण (नाव विसरलो बघा) पहायला गेलो. तिथे जे जंगल होते ते बहुसंख्य बेलाच्या झाडांचे होते. किती झाडे ? इतकी की,जमिनीवर दगडगोटे कमी अन पडलेली बेलफळे जास्त!! आम्ही सरबत करायला काही घेउन आलो.

जिप्सी - नावाप्रमाणेच सतत भटकत असतोस का रे तू? कुठून कुठून एवढे छान वृक्ष शोधतो - फोटो काढतो - ते येथे टाकतोस....... परत ते गड / किल्ले / इतर भटकंती वगैरे आहेच....अगदी "मूर्तिमंत एनर्जेटिक" आहेस बाबा....
चातक - कुठला फोटो आहे हा - पण मस्त फोटो आहे.
गौरी - जिम कॉर्बेट यांना खरंच वनविद्या अवगत होती, श्री चितमपल्लीही त्याच जात कुळीतले - या मंडळींनीच वर्णन केलेले इतर अनेक जण - उदा. कै. माधवराव पाटील, निरगू गोंड, दल्लू गोंड, वूड्ससाहेब इ. ही देखील थोर मंडळीच.... आपले गोनीदा काय, चाळीसगावचे डॉ. पूर्णपात्रे, डॉ. प्रकाश आमटे .... अशी किती किती मंडळी आणि किती किती थोर कामे करणारी - निसर्ग / प्राणी / पक्षी यांनाच सोयरी मानणारी......
आपल्यातल्या ज्यांनी यांच्या बद्दल खूप वाचलंय / संपर्कात आलेलं असतील त्यांनी खरंच इथं लिहावं - म्हणजे या मंडळीविषयी थोडी फार माहिती मिळू शकेल इतर सभासदांना... गप्पा अजून रंगतील......

जिप्स्या, हे बेलफळाचे झाड कुठे दिसले ? आपल्याकडे एवढी मोठी सहसा दिसत नाहीत.>>>>दिनेशदा हे झाड सौंदत्तीच्या पारसगडावर दिसले. Happy

इतकी की,जमिनीवर दगडगोटे कमी अन पडलेली बेलफळे जास्त!! आम्ही सरबत करायला काही घेउन आलो.>>>>अगदी अगदी. हुळी मंदिर (कर्नाटक) परीसरातही भरपूर ताजी फळे पडली होती. त्यातलेच प्रचि २ आहे. Happy पण याचे सरबत करतात हे ठावूक नव्हते नाहीतर उचलून आणली असती. Proud बेलफळाचा मुरांबा करतात एव्हढच ठावूक होतं. Sad

जिप्सी - नावाप्रमाणेच सतत भटकत असतोस का रे तू?>>>:फिदी: धन्यवाद शशांक Happy

माझ्या ऑफिसच्या परिसरात पण बुचाची खुप झाडं फुलली आहेत.>>>>>निकीता, कुठे आहेत हि झाडं??

बेलफळाचे सरबत औषधी असते. मोरंबाही कफावर देतात. बंगाल / आसाम भागात नुसती बेलफळे न्याहारीला खायची प्रथा आहे. बेलफळाचा गर, त्यात थोडी चिंच आणि लागलाच तर गूळ घालून सरबत करतात.
(घाटकोपर स्टेशनजवळ पण मोठ्या बेलफळाचे झाड आहे. चेंबूरला जैन देरासर जवळ एक झाड आहे, पण त्याची फळे लहान असतात.) मला स्वप्न पण या झाडांचीच पडतात.

असेच सरबत भोकराचे (हिंदित : लसोडा) पण करतात.

आपल्यातल्या ज्यांनी यांच्या बद्दल खूप वाचलंय / संपर्कात आलेलं असतील त्यांनी खरंच इथं लिहावं - म्हणजे या मंडळीविषयी थोडी फार माहिती मिळू शकेल इतर सभासदांना... गप्पा अजून रंगतील......

Sad मला तरी माहिती नाहीय, ज्यांना आहे त्यांनी लिहा. खरेच मजा येईल वाचायला.

दिनेश, आंबोलीला हिरण्यकेशीच्या वाटेवर जिथे केवड्याचे बन आहे तिथेही बेलाची झाडे आहेत. मी बेलफळे पाहिली तिथे पण स्रबताचे माहित नव्हते. पुढच्या वेळेस बघेन.

मस्त स्पायसी वास येतो संध्याकाळी

स्पायसी वास?? शेफ्लेरा असेल Happy बुचाला मंदसा वास येतो, स्पायसी नक्कीच नाही.

बेलफळाचा मुरांबा - आयुर्वेदात आव /रक्तीआवेकरता खूप गुणकारी सांगीतला आहे.
आमच्याकडेही बेलाचे झाड आहे - पण गेल्या कित्येक वर्षात त्याला एकही फळ लागलेले नाही - अर्थात घराशेजारी फार जागा नसल्याने हे झाड छाटावेच लागते नियमितपणे - चैत्रात जेव्हा नवीन पालवी फुटते तेव्हा इतके छान दिसते हे झाड - बुलबुल ही कोवळसर पालवी खातात...एकदा पाह्यलंय मी......

मी परवा म्हणालो होतो ते माझ्या गच्चीतून दिसणारे चाफ्याचे झाड. या कोनातून आपण चाफ्याकडे बघत नाही सहसा.

सुगंधाच्या कुप्या उघडायला हवामान गरम व्हावे लागते. त्याचाच इथे अभाव असल्याने फुलांचा सुगंध कमी असतो. रात्रीच्या वेळी मात्र चाफा, झकरांदा सुगंधी होतात.

बेलफळ गोल असतं ना? जिप्स्याच्या फोटोत ते थोडं लांबट दिसतंय.

जिप्सी मी सध्या सीप्झ मध्ये आहे

साधना, मंद स्पायसी वास. आसमंत भरुन राहतो , पण जाणीवपुर्वक घेतला तर येणारा. संध्याकाळी छान वास येतो.
जिस्पीच्या फोटोत झुडपा सारख वाटतं, पण इथे वृक्ष आहेत. मोठाले. :-). आणि संध्याकाळी सगळी फुल खाली झुकलेली असतात. खाली वाकुन काहितरी बघत आहे असं वाटतं Happy

स्पायसी वास?? शेफ्लेरा असेल>> खरच येतो का तसा वास त्याला...?
मध्ये इथली चर्चा वाचली होती शेफ्लोरा बद्द्ल... २ झाडं दिसली मला तशी रोजच्या वाटेवर..पुण्यात
शिवाजीनगरला एक अन एफ. सी. रोड्वर एक..
त्याला फळं पण लागतात का..?

ओह्ह, मला वाटलं पवईलाच आहे, म्हणुन विचारले Happy
जिस्पीच्या फोटोत झुडपा सारख वाटतं, पण इथे वृक्ष आहेत. >>>>मोठा वृक्षच आहे तो, पारसगडाच्या तटबंदीवरून खाली वाकुन काढलाय तो फोटो Proud

आणि संध्याकाळी सगळी फुल खाली झुकलेली असतात. खाली वाकुन काहितरी बघत आहे असं वाटतं

खाली झुकलेली फुले म्हणजे तो आकाशमोगराच. फुले निशिगंधाच्या फुलासारखी दिसतात.

स्पायसी वास?? शेफ्लेरा असेल>> खरच येतो का तसा वास त्याला...?

शेफ्लेराला खरेच मसाल्यासारखा वास येतो Happy

जागू, साधना. इथे वाचाल म्हणून इथेच लिहितो. फोटो काढताना, अनोळखी फूलांना हाताळू नका. काहि खाजरी असू शकतात तर काहींमुळे अ‍ॅलर्जी येते. हवे तर काडीने ते बाजूला करुन फोटो घ्या. मला चांगलाच अनुभव आहे.

साधना,
अग अगदी मसाल्या सारखा वास नाही. दालचीनीला कसा गोड वास येतो तसा. पण दालचीनी सारखा वास नाही :-)..किती छान गोंधळात टाकणारं लिहिते ना मी Happy

दिनेशदा,
पुर्वी आमच्याकडे १-२ बेलाची अशीच बहरलेली (गोल फळ असलेली) झाडे होती,ती कुणीतरी बहुतेक कर्नाटकातुन (घरापासुन कर्नाटक हद्द फक्त ८ किमी) आणुन लावलेली होती अस ऐकलं होतं.

जिप्स्या, हे बेलफळाचे झाड कुठे दिसले ? आपल्याकडे एवढी मोठी सहसा दिसत नाहीत.>>>>दिनेशदा हे झाड सौंदत्तीच्या पारसगडावर दिसले>> सध्या याच सौंदत्तीच्या यात्रेची लगबग गावा-गावातुन सर्वत्र दिसुन येत आहे

अश्विनी, आपल्याकडे गोलच असतात. हा कर्नाटकी ढंग आहे, म्हणायचा.

आता वरील सर्व संदर्भावरुन मला अस म्हणता येईल का ? कि कर्नाटकात अशा जुन्या ऑषधी झाडांची जोपासना/जपणुक जास्त केलेली दिसुन येते (?)
एक मात्र खरं आहे, कि तिकडे आपल्यासारखे मोठ्या प्रमाणात ऑद्योगीकरण झालेल नाही, होताना दिसुन येत नाही,त्यामुळे झाडांची/जंगलांची बेसुमार तोड झालेली नसेलही.
Happy

साधनातै, ते 'पेटुनियाच' आहे....याच्या पाकळ्या नेहमीपेक्षा जरा जास्तच जाड-भरीव आणि टवटवित वाटल्या..... (खाद्यान्न मुबलक मिळत असावे...) ही फुले बरेच दिवस याच अवस्थेत राहतात रोपावर.

शश्या, तो दुबई एअरपोर्ट फ्रि झोन एरिआ आहे.

दिनेशदा बरोबर आहे....इथे बागेत.... रस्त्याच्या कडेला....रस्त्यांवर असलेल्या डिवाईडरवर.... बरंगबेरंगी गालिच्यांची सुरुवात झाली आहे.... म्हणुन पाहताक्षणीच फोटो घ्यायला हात शिवशिवतात.

हे महाशय लहान आहेत पण यांच्यामुळे बागेला, रस्त्याच्या कड्यांना 'एकरंगी झालरी'चे रुप येते....

चातका ऑफिस टाईम आहेत ते.

दिनेशदा सुचनेबद्दल धन्यवाद. खबरदारी घेईन.

माझ्या काकीला पिकलेले बेलफळ खुप आवडते. तिला मिळाले की फोडून त्यातला गर खाते.

मुंबईत, दादरच्या फुलबाजाराजवळ बेलफळे (सोबत धोत्र्याची फळे, फुले ) वगैरे विकायला असतात. खास करुन रविवारी आणि सोमवारी. पण ती नेहमीच कच्ची आणि कोवळी असतात.

जागू, एकदा असेच एक अनोळखी फुल हाताळले आणि अंगठ्यात कुसं जाऊन तो सूजला. दोन दिवस ठणकत होता. फार प्रयत्नाने कुस काढावे लागले. काहि फुले / झाडे प्राण्यांना बीजप्रसारासाठी असे वेठीस धरतात. गायीच्या / कुत्र्यांच्या शेपट्या अश्या कुसांनी भरतात. मग हे प्राणी हरप्रकारे त्या झटकायचा प्रयत्न करतात.

आपल्याकडे उंबर, बेलफळ, वड, पिंपळ वगैरे झाडांची देवाधर्माशी सांगड घातलीत ये चांगलेच झालेय. या झाडांवर सहसा कुर्‍हाड चालवली जात नाही. आता लोक त्याला जुमानत नाहीत, तो भाग वेगळा.

जागू, एकदा असेच एक अनोळखी फुल हाताळले आणि अंगठ्यात कुसं जाऊन तो सूजला. दोन दिवस ठणकत होता. फार प्रयत्नाने कुस काढावे लागले.>>>>>
दिनेशदा, मला आठवतंय - लहानपणी हातात, पायात असं काही जाउन सूज आली, ठणका लागला की आई किंवा आजी "पोटिस" बांधायच्या - ते निचरुन जावं म्हणून - कुठलंस (बहुतेक कणीक असावी) पीठ गरम करुन गुलबक्षीच्या पानाबरोबर त्या दुखर्‍या भागावर बांधले जायचे - एका रात्रीतून तो सुजलेला भाग निचरायला लागायचा व एकदा का तो "पस" निघून गेला की एकदम आराम पडायचा - विदाउट डॉक्टर्स, विदाउट अँटिबायॉटिक्स .........

एका रात्रीतून तो सुजलेला भाग निचरायला लागायचा व एकदा का तो "पस" निघून गेला की एकदम आराम पडायचा - विदाउट डॉक्टर्स, विदाउट अँटिबायॉटिक्स .........>> अगदी अगदी.

Pages