निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्‍याच पोस्ट झाल्यात आणि सुंदर सुंदर फोटोही जमा झालेत. माझ्या ऑफिसच्या कॉम्प्युटरची हार्ड डिस्क खराब झालेय त्यामुळे येता येत नाही.

मंडळी
४ दिवस दिल्लीला चालले. पुतणीच्या लग्नाला. नेटबुक आहेच बरोबर. पण वेळेअभावी गप्पा छाटता येणार नाहीत.
तर मज्जा करा! मी जमेल तेव्हा येईनच!

खूप सुंदर फुल असते ते.>>>>>>> +१
गेल्या वर्षी महाबळेश्वरला गेलो होतो तिथे बघितलं. अजुन ही काही फुलांचे फोटो आहेत सवडीने टाकेन.
गौरी, शांकली - धन्यवाद नावं सांगितल्या बद्द्ल.

माझं सद्ध्याचं हे लेटेस्ट वेड आहे ... घरी कुठलंही नवं झाड आणलं / नवं काही दिसलं, की पहिल्यांदा त्याचं शास्त्रीय नाव शोधायचं. एकदा का नाव सापडलं, की जालावर त्याच्याविषयीच्या माहितीची अलिबाबाची गुहाच उघडते.

नाव शोधण्याची पहिली जागा म्हणजे फ्लॉवर्स ऑफ इंडियाची साईट:
http://www.flowersofindia.net

दुसरी जागा म्हणजे श्री दिनेश वाळके यांचे फोटो:
http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/

खेरीज उत्साही फोटोग्राफर अनेक वेळा त्यांच्या फोटोबरोबर शास्त्रीय नावं देतात. त्यामुळे ती तिसरी शक्यता.

बागकामाच्या या ब्लॉग्जमधूनही भरपूर झाडांबद्दल माहिती मिळते:

http://www.maydreamsgardens.com/
http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
http://indigarden.blogspot.com/
http://gardenamateur.blogspot.com
http://the-urban-gardener.blogspot.com/
http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
http://lifeonthebalcony.com
http://balconygarden.wordpress.com/
http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
http://mrbrownthumb.blogspot.com/
http://the6x8garden.blogspot.com
http://theurbanbalcony.blogspot.com/

जागू, निसर्गाशी निगडित पुस्तकांची यादी वर केली आहे, तशी अश्या प्रकारच्या वेबसाईट्सची पण बनवता येईल का?

गौरी, मला पण असेच वेड आहे. आता ती सगळी माहिती मराठीत संकलीत करायचा घाट घातलाय आम्ही.

माधव, हळदीकुंकू तण म्हणून अनेक ठिकाणी वाढते. माझ्या आठवणीत कोल्हापूरच्या महावीर गार्डनमधे स्वच्छतागृहाजवळ, अंबोलीला नदीच्या पूलाजवळ आहेत.

आता ती सगळी माहिती मराठीत संकलीत करायचा घाट घातलाय आम्ही.>>>>अनुमोदन दिनेशदा. आता कामाला लागलेच पाहिजे.

काय रंगल्या आहेत गप्पा... मला आज खूप दिवसांनी येता आलं.... Happy

अनुमोदन दिनेशदा. आता कामाला लागलेच पाहिजे.>>> मलापण आवडेल यामध्ये सहभागी व्हायला Happy

इच्छाफळ Wink

जेराल्ड डरेलच्या 'marrying off my mother' मध्ये त्याची आई पॅशनफृटचा वेल लावते तेव्हा मुलांना 'आता आईचे लग्न लाऊन द्यायलाच पाहिजे, अजुन जास्त थांबण्यात अर्थ नाही' असे वाटायला लागते... Happy

<<<<हो मी आबासाहेब गरवारेचा विद्यार्थी -१९७७-८३ (सूक्ष्मजीवशास्त्र..... उगाचच व्हाईट एप्रन घालून शायनिंग करणारे..>>>>> Proud
शशांकजी आता माझा मुलगा त्याच कॉलेजमधे आहे . त्याला बायॉलॉजीमधे इंटरेस्ट आहे . (सध्यातरी). :स्मितः

गौरी - एवढी भरपूर यादी दिल्यामुळे अगदी भरून पावलो... नक्कीच असे सर्व ब्लॉग्ज, साईट्स मुख्य पानावर घेऊ यात.
आपल्या स्_सा उर्फ सचिनचाही रानफुले म्हणून ब्लॉग आहे, अजूनही कोणा कोणाचे असतील तर जरुर कळवा.

तूर्तास प्रत्येकाने आपल्या घराच्या आसपासच्या मोठ्या झाडांचे फोटो, स्थळवर्णन असे सुरु केले तर त्या त्या भागातील मंडळी ते पाहू शकतील असे वाटते. विशेष किंवा दुर्मिळ झाड असल्यास त्या शहरातील मंडळी जाऊन पाहू शकतील. झाड / पान / फूल /फळ अशा फोटोमुळे आपल्या घराच्या आसपास / परिसरात असे झाड आहे का हे बघायची सवय लागेल व आपल्या माहितीत भर पडत राहील - हे अर्थात वैयक्तिक मत - यात अजून काही सुधारणा करता आली तर चांगलेच.
उदा. सहकारनगर नं २ (पुणे) भागात शेवटच्या बसस्टॉपच्या अलिकडे अगदी रस्त्यावर "शेव्हिंग ब्रश" चा मोठा वृक्ष आहे - मागील वर्षी दै. सकाळमधे त्याचा फोटो व स्थळनिर्देश आला होता - त्यावरुन मी व शांकली तिथे जाऊन पाहू शकलो. साधारण फुलण्याचा हंगाम कळला तर अजून सोपे जाते झाड ओळखायला.

तूर्तास प्रत्येकाने आपल्या घराच्या आसपासच्या मोठ्या झाडांचे फोटो, स्थळवर्णन असे सुरु केले तर त्या त्या भागातील मंडळी ते पाहू शकतील असे वाटते. विशेष किंवा दुर्मिळ झाड असल्यास त्या शहरातील मंडळी जाऊन पाहू शकतील. झाड / पान / फूल /फळ अशा फोटोमुळे आपल्या घराच्या आसपास / परिसरात असे झाड आहे का हे बघायची सवय लागेल व आपल्या माहितीत भर पडत राहील - >>>> १००%अनुमोदन

गौरी खुप चांगल काम केलस. मी मुख्य पानावर टाकते सगळ.

अजून कॉम्यूटर रिपेअर झाला नाही ऑफिसचा. आणि आज बॉस नव्हती मग लायब्ररीत जाऊन पुस्तके बदलून आणली. आमच्या लायब्ररीत निवडक कमी पुस्तके आहेत. नेमकी चाळताना मारुती चित्तमपल्लींची दोन पुस्तके आणली. एक चैत्रपालवी आणि दुसरे चकचांदवा. त्यातल चैत्रपालवी मी वाचायला घेतल आणि अर्ध्या पेक्षा जास्त वाचुन काढल. हातातून ठेवावसच नाही वाटल. वर लिस्ट मध्ये अ‍ॅड करतेय.

Tropicana नावाचं एक पुस्तक आहे. त्यात पानाफुलांचे रंगीत फोटो दिले आहेत. ह्या पुस्तकाचे पब्लिकेशन बाहेरचे आहे बहुधा! आणि किंमत पण जास्त आहे. पण एकदा अवश्य बघावे/चाळावे असंच आहे हे पुस्तक. बॉटनी डिपा. ची लायब्ररी असते; त्यात कदाचित बघायला मिळेल.

शोभा अगदी या धाग्याला समर्पक फोटो हं!!

माझं सद्ध्याचं हे लेटेस्ट वेड आहे ... घरी कुठलंही नवं झाड आणलं / नवं काही दिसलं, की पहिल्यांदा त्याचं शास्त्रीय नाव शोधायचं. एकदा का नाव सापडलं, की जालावर त्याच्याविषयीच्या माहितीची अलिबाबाची गुहाच उघडते.>>>>>>>>>>>> (माझंही हेच वेड आहे!)

शांकली, माझ्याकडे तशी काही पुस्तके आहेत. नुसते ऑर्किड्स या विषयाला वाहिलेले पण पुस्तक आहे.
गार्डन अर्थ नावाचे सर्व पृथ्वीवरच्या प्रत्येक विभागातल्या फुलांचा मागोवा घेणारे पुस्तक आहे. कुठलेही पान उघडून वाचायला सुरवात करता येते.
पूर्व आफ्रिका, रिफ्ट व्हॅली, सहारा वाळवंट यावरही उत्तम पुस्तके इथे उपलब्द्ध आहेत. पण सगळी साहेबांच्या भाषेत !!

गार्डन अर्थ बघायला मिळाले पाहिजे! दिनेशदा, तुम्ही भारत भेटीवर यायच्या वेळी आधी इथे कळवा म्हणजे तुम्हाला एक लिस्टच देईन म्हणते मी! कोणती कोणती पुस्तके आम्हाला बघायला/वाचायला आणायची ते! (डॉ.शरदिनी डहाणूकरांचं 'फुलवा' हे पहिल्या क्र. वर बरका!)
अर्थात तुमच्याकडच्या पुस्तकांची आधी सर्व माहिती इथे द्या बरं............ (अलिबाबाच्या गुहेत आपलं दिनेशदांच्या कपाटात {आणि जादूई पोतडीत} काय काय खजिना आहे ते आधी आम्हाला कळूंद्या!)
आत्ताच शशांक म्हणत होता की तुमच्याकडे बंदिशींचा पण खजिना आहे.
दिनेशदा म्हणजे १०/१२ च काय, १५/२० व्यक्ती मिळून एक व्यक्ती आहे हे खरंय कि नै! आणि त्याही निरनिराळ्या कला आत्मसात केलेल्या व्यक्ती हं!

शाकंली, नुसता रस आहे गति नाही..
एखाद्या विषयावरचे सचित्र पुस्त्क नक्कीच घेऊन येईन.
इथे आफ्रिकेत अनेक जागा अशा आहेत कि अजूनही तिथल्या प्राणी आणि वनस्पतिंचा अभ्यास झालेला नाही.
http://www.udzungwa.org/default.asp?pagesID=44

वरच्या लिंकवर फार त्रोटक माहिती आहे पण या जागेचे मी बघितलेले फोटो अफाट आहेत. मालावी सारख्या अपरिचित देशातल्या, लेक मालावी मधले अनेक मासे, ते लेक सोडून जगात कुठेच सापडत नाहीत.
आमच्याकडे डेस्टीनेशन्स नावाचे मासिक मिळते, त्यात अश्या अनोख्या जागांची माहिती असते.

कुठे कुठे जायचे आहे !! काय काय बघायचे आहे !!

बंदीशी नाहीत, हिंदी गाण्यांचे संकलन करतोय, राग आणि तालासकट. मला ईमेल केली तर पाठवीन (रिकाम्या जागा भरायच्या आहेत.)

कुठे कुठे जायचे आहे !! काय काय बघायचे आहे !!>>>>>>>>> खरंय दिनेशदा........

कधी कधी वाटतं की हे एवढुस्सं आयुष्य पुरे पडणार का? एखाद्-दुसर्‍या वृक्षाचा पूर्ण अभ्यास करायचा झाला तर एखादं तप सहज निघून जाईल! आणि मग दिसलेलं एखादं गवतफूल, खुणावणारी हिरवी पानं,कानावर पडणारी एखाद्या पक्ष्याची मंजूळ लकेर, आकाशात दिसणारे आणि कागदावर न उतरवता येणारे रंग.......... यादी वाढत जाईल!! यातल्या प्रत्येक गोष्टीबद्द्ल वाटणारं आणि मनात न मावणारं कुतुहल कधी शमेल?

जागू, मारुती चितमपल्लींचं चकवाचांदण सुद्धा सुंदर आहे. माझ्या ब्लॉगवर मागे मी त्याविषयी एक पोस्ट लिहिली होती.
http://mokale-aakash.blogspot.com/2011/03/blog-post_26.html

कुठे कुठे जायचे आहे !! काय काय बघायचे आहे !!>>>>>>>>> अगदी!

दिनेशदा, माझी आई लहानपण केनिया - टांझानियामध्ये राहिली आहे. तिच्याकडून इतकी सुंदर वर्णनं ऐकली आहेत, की आयुष्यात एकदा तरी निवांत केनिया आणि टांझानिया बघायचेत. तुम्ही दिलेली लिंक बघून याची पुन्हा आठवण झाली.


DAFZA.

Pages