निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं.........जिप्सीचा ब्लॉग बनतोय ना! मस्त सुचवायला पाहिजे.
मंडळी ..माझ्या लेकाने काढलेला एक फोटो नॅशनल जॉग्रफिकच्या या आठवड्याच्या "डेली डझन्स" मधे सिलेक्ट झाला.

मानुषी, लेकाला आम्हा सर्वांकडुन हार्दिक अभिनंदन सांग Happy

गौरी, दिनेशदा मलाही काल पाहताना तेच वाटले की इतक्या लवकर कुठला बहावा ? >>>>>मी गेल्यावर्षी रत्नागिरीला डिसेंबर महिन्यात बहावा फुललेला पाहिलांय. मायबोलीवर फोटो दिला होता त्याचा. लिंक सापडली तर करतो इथे पोस्ट Happy

मानुषी, लेकाचे अभिनंदन.
ब्लॉगच्या नावाचे वाचल्यावर एकदम 'निसर्गायण' डोळ्यासमोर आले. पण हे नाव मी आधी कश्याच्यातरी संदर्भात वाचले आहे . काय ते लक्षातच येत नाही आहे.
बाकी ईथे मस्त गप्पा चालु आहेत. माझा तर ईथे आल्यावर वाचनातच इतका वेळ जातो की टाईपायला वेळच होत नाही.
बाकी मला एक शंका आहे. लसुणवेलीचा नक्की फुलण्याचा हंगाम काय असतो? माझ्या ऑफिसजवळच्या सोसायटीमधे खुप जणांच्या अंगणात आहे. साधारण महिन्यातुन १ दा फुलोरा येतो. पण सगळ्यांकडॅ एकदम येतो.

मानुषी, लेकाचं हार्दिक अभिनंदन ! जमलंच तर तो सिलेक्ट झालेला फोटो डकव ना इथे..... आम्हाला सगळ्यांना पहाता येईल......

जागू, हादग्याच्या फुलांची भाजी मी मुगाची डाळ वापरून नाहीतर पीठ पेरून झुनका करते.. Happy

मानुषीच्या पिल्लाचं अभिनंदन...!

मानुषी लेकाचे अभिनंदन..
त्या गोगलगायींचा बंदोबस्त करावा लागेल. सगळ्या झाडांवर चढून नाश करतात. (आशा आहे कि तूमच्याकडच्या उन्हाळ्यात तग नाही धरणार त्या.)

नायजेरियात आणि फ्रान्समधे आवडीने खातात त्या. भयंकर चिकट असतात आत, तुरटीने धुवाव्या लागतात. म्हणजे माझ्या म्हणण्याचा हेतू हा, कि ते खात असल्याने आपोआप त्यांच्या संख्येवर नियंत्रण राहते.

स्नेल सूप हि नायजेरियातली डेलिकसी आहे !!!!

२७ ते २९ डिसेंबरला वेंगुर्ल्यातील वायंगणी गावाच्या समुद्र किनार्‍यावर 'कासव जत्रा' हा उपक्रम आहे.

ब्लॉगच्या नावाचे वाचल्यावर एकदम 'निसर्गायण' डोळ्यासमोर आले. पण हे नाव मी आधी कश्याच्यातरी संदर्भात वाचले आहे . काय ते लक्षातच येत नाही आहे.>>>>>आस अगदी हेच नाव माझ्याही मनात आहे. Happy गेल्यावर्षीच्या मायबोली दिवाळी अंकाची थीम होती "निसर्गायण" Happy

माहित नाही गं. कासवांच्या पिल्लांचा जन्मसोहळा पर्यटकांसोबत साजरा होतो. डॉल्फिन सफर, मासेमारी, प्राणी पक्षी निरिक्षण, फिल्म शो, प्राणीतज्ञांशी गप्पा/चर्चा, संध्याकाळी कासव अवतारांचे दशावतारी नाटक, कोकणच्या गाण्यांची मैफिल असं काही स्थानिक कलाकार सादर करणार आहेत.

कासवीण काही स्वतः अंडी उबवत नाही. काही ठराविक काळात ती पिल्ले रेतीतून वर येतात. मी स्वतः हे मस्कतला बघितलेले आहे.

जिप्स्या, काहिच नाही सुचलं तर निसर्गाच्या गप्पा, हेच नाव ठेव !

डॉल्फिन सफर, मासेमारी, प्राणी पक्षी निरिक्षण, फिल्म शो, प्राणीतज्ञांशी गप्पा/चर्चा, संध्याकाळी कासव अवतारांचे दशावतारी नाटक, कोकणच्या गाण्यांची मैफिल असं काही स्थानिक कलाकार सादर करणार आहेत.>>>>>>हे नक्कीच धम्माल असणार Happy

नक्की दिनेशदा Happy

जिप्स्या, काहिच नाही सुचलं तर निसर्गाच्या गप्पा, हेच नाव ठेव ! >> निसर्ग गप्पा, निसर्ग भेट, निसर्गाच्या कुशीत.....

जिप्सु.....

01} www.nisargagappaa.blogspot.com
02} www.nisargabhet.blogspot.com
03} www.nisargachyakushit.blogspot.com
04} www.nisargafule.blogspot.com
05} www.nisargasumane.blogspot.com
06} www.nisargaolakh.blogspot.com
07} www.nisargamazaa.blogspot.com
08} www.nisargasavangadi.blogspot.com
09} www.avadnisargachi.blogspot.com
10} www.prakrutikfule..blogspot.com
11} www.olakhfulanchi.blogspot.com
12} www.nisargachyapremaat.blogspot.com
13} www.nisargachyagappaa.blogspot.com

वरील नावे कुणाची कॉपी नाही (क्र.१३ सोडुन :स्मित:). असल्यास योगायोग समजावा.

साधना अग किल्यावरुन पामबिचला घुसले की राईटला पहीलीच कॉलनी अक्षरची आहे. तिथे पेट्रोलपंपाच्या पुढे
७-८ बहाव्याची झाडे एकदाच फुलतात.

मानुषी लेकाचे अभिनंदन.

जिप्स्या तुला सवडीने मी काही फोटो मेल करते.

अश्विनी पहिलांदाच ऐकल हे कासव जत्रा. तु जाणार आहेस का ?

सारीका मी तुला मेल केलाय ग.

नेरूळच्या गावदेवीच्या देवळाच्या बाजूला हे झाड होते. कुठले आहे हे?

त्याचे खोड असे साल निघालेले होते.

फुलोराही आला आहे.

जागू हे कहांडळ/करू/पांढरुख....... Sterculia urens

जागु, पुण्याहुन कोणी येणार असेल तर कळव. मी नक्की पाठवेन तुला ते रोप. तुझ्या सुंदर बागेत ते छानच फुलेल आणि entrance जवळ वगैरे दोन्हीबाजुला bed करुन लावलंस तर मस्त दिसेल.

गौरी, रोपाचं नाव सांगितल्याबद्दल धन्यवाद. तसाही माझा संकल्प आहेच कि यापुढे झाडांची नावं माहित करुन घ्यायची. आणि अगं ते डासांचं औषध सांगुन ठेव. आमचा गप्पी मासे ठेवायचा प्लॅन होता, पण ती कुंडी लिक होते आहे त्यामुळे कमळं काही ठेवणार नाही आम्ही. जरा बागेचा व्याप कमीच करायचा आहे आम्हाला. तुझी लिंक वाचुन तर मला डंब केनची अजुनच भीती वाटते आहे. कशी सुटका करु त्यापासुन? पाणी न घालता मारणं मला फारच दुष्टपणाचं वाटतं आहे.

मानुषी, किती गोड तो झब्बु. फारच सुरेख. तुझ्या मुलाचं आणि ओघानेच तुझंही अभिनंदन !

जिप्सी, 'निसर्गभान' ( भान - awareness या अर्थी. बरोबर ना? )

शांकली त्या पांढरुखला फळे वगैरे लागतात का ?

मनिमाऊ मी जानेवारीत पुण्याला येणार आहे बघते जमल तर.

योगेश मी मागिल वर्षापासून माबोवर टाकण्यासाठी काही फळझाडांच्या फुलांचे फोटो जमा केले आहेत. मला त्याची सविस्तर माहीती टाकायची आहे. अजुन माझे कलेक्शन चालू आहे. तुला ब्लॉगला फोटो मिळण्यासाठी मी माझी माहीती लवकरात लवकर लिहून माबोवर प्रकाशीत करते मग ते फोटो तू घेतलेस तर चालेल का ? तोपर्यंत तुला मागच्या माझ्या धाग्यांवरचे फोटो मेल करते. भाज्यांचे वगैरे.

बापरे केवढ्या गप्पा झाल्यात इथे.

निरफणसाबद्द्ल बरिच चर्चा झाली. आमच्याकडे निरफणस खुप म्हणजे खुप आवडतो. सावंतवाडी, मालवण, गोव्याला भरपुर झाड आहेत. कापांचा प्लान असेल की एका वेळी दोन मोठे कापावेच लागतात. मासे तळतात तसे तिखट मिठ हळद रवा लावुन तळतात. आमच्या लाहान पणी आई माझ्या भावाला व्हेज वाराच्या दिवशी सुरमई म्हणुन हे काप भरवायची. शिवाय याची बेसन मध्ये घोळुन भजी बनवली जाते, मिरचिची फोडणी टकुन भाजी पण बनवली जाते.

कासवीण काही स्वतः अंडी उबवत नाही. काही ठराविक काळात ती पिल्ले रेतीतून वर येतात. >>> हो. त्या २-३ दिवसांतच ती पिल्लं बाहेर येतील असा अंदाज आहे त्या लोकांचा.

जागू, मी नाही गं जाणार. मला कळलं म्हणून इथे सांगितलं Happy

जागु, पुण्यात येण्याचं नक्की झालं कि कळव. मग तुला माझा सेल नंबरही देते. मला तुला भेटायला नक्कीच आवडेल. तुझ्यासाठी रोपही तयार करुन ठेवते तोपर्यंत. Happy

Pages