निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, कांडोळ ला किरमिजी रंगाचे चांदणीच्या आकाराचे पाचधारी फळ येते. ते दिसायला छान असले अरी त्याला खुप कुसे असतात. ते भाजून त्यातल्या बिया खाता येतात. या झाडाचा गोंद (कराया गम) औषधी गोळ्यांत वापरतात.

अश्विनी, साधारण कासवांची पिल्ले बाहेर आली कि ती खाण्यासाठी कोल्हे, पक्षी जमा होतात. माणसांची गर्दी असली तर बरेच, त्यामूळे यांना थोडा वचक बसतो. तसेच काहि पिल्ले वाट भरकटतात. आणि समुद्राच्या दिशेने न जाता, उलट दिशेने जाऊ लागतात. त्यांना गोळा करुन, समुद्रात सोडावे लागते.

पण हे केवळ आपल्या समाधानासाठी, जन्माला आलेल्यांपैकी अगदी मोजकी पिल्लेच जगतात. निसर्गाचे नियम, आपल्या आकलनशक्तीच्या बाहेरचे असतात.

जागू, आता थंडी पडेल त्यामुळे एवढ्यात वृक्षारोपण नाही गं.

साधना, त्या दिवशी मी विनासायास नवी मुंबईतल्या इच्छित ठिकाणी पोहोचले. तिकडलं ऊन पाहून वाटलं तिकडे जरा झाडं वाढवली पाहिजेत Happy

ह्या रविवारी सगळ आवरून, गॅस वर कुकर ठेवून, खिडकीपाशी उभी राहून माझ्या मित्राना पहात होते, कोण कोण आलय ते, तर एक कोकिळा, उडत येऊन समोरच बसली. इतका आनंद झाला, खूप दिवस तिचा फोटो काढायच मनात होतं. म्हणुन पळतच जाऊन कॅमेरा घेऊन आले. तर या बाईसाहेब, पानाआड जाऊन बसल्या. मग त्या बाहेर येण्याची वाट पहात बसले तर, एक कोकिळ दिसला, आणि दुधाची तहान ताकावर, अस मनात म्हणून हा फोटो घेतला.

कोकिळाबाई काही बाहेर येईनात म्हणून, एक फोटो तसाच काढला.

शोभा, कोकिळेचा कारभार लपून छपूनच चालतो. पण ज्यावेळी कावळा कावळीण तिची चोरी पकडतात आणि मागे लागतात, त्यावेळी भन्नाट बोंब मारते ती. (जणु काही आपण काही केलंच नाही..)

गौरी जानेवारीत येणार आहे तारीख नंतर सांगेन.

अरे ते भुताचे झाड आहे ? ह्याचे तर मी आधीपण फोटो काढले आहेत. माझ्या सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या दिशेने ह्या धाग्यात त्याचे फुल पण आहे. पण तेंव्हा पाने नव्हती म्हणून आत्ता ओळखता नाही आल.

जागू, पुण्याला येण्यापुर्वी आम्हाला कळव ग! आम्हाला पण तुला भेटण्याची खूप ईच्छा आहे.
कासवांची पिल्ले जगावीत म्हणून बरेच पर्यावरणप्रेमी प्रयत्न करतात. हजारोंनी छोटी छोटी पिल्ले रेतीतून वर येऊन समुद्राच्या दिशेने जाऊ लागतात. त्यांना भूचर प्राण्याचे फारच भय असते. एकदा का ते पाण्यात गेले की आपल्या-आपण तरंगू लागतात. हा सोहळा खरंच बघण्यासारखा असतो. निसर्गाची किमया! दुसरे काय?

सर्वांना धन्यवाद! बघते...इथे फोटो डकवता आला तर.
आणि सारिका "पिल्ला"चे अभिनंदन वाचून हसू आलं. तरी धन्यवाद!
असो .....आईला आपलं लेकरू नेहेमीच पिल्लू असते.

वरील लिंकमधील नोव्हेंबर ३रा आठवडा पहा --यातला सलील गुर्जर नावाने टाकलेला...एक लाल रुमाल घेतलेला इसम आणि त्याच्या मागे पळणारी म्हैस...म्हशीचं फक्त "मुखकमल" दिस्तय. असा फोटो आहे.

मानुषी,
छानच आहे फोटो.
इतर फोटो पण आम्हाला बघायला मिळतील का ?
पूर्व आफ्रिकेत डेस्टीनेशन्स, नावचे मासिक निघते. त्यांची पण स्पर्धा असते. आफ्रिका खंडाच्या बाहेरचे फोटोही एका विभागात चालतात.
हवे तर बाकिचे डिटेल्स देईन.

कोकीळ काळा असतो तसा पांढरे काळे ठिपकेवालाही असतो ना?
माझ्या खिडकी समोर उंबराच्या झाडावर सारखे येतात तिथेच एका वेलाला जांभळी बारीक मिरी एवढी फळं लागली आहेत ती खात असतात.

जो, मिस्टर कोकिळ काळे असतात मिसेस कोकिळा, प्रिटवाल्या ड्रेसमधे असतात !

पण हा घोळ ऐतिहासिक आहे, अनेक जून्या कवनात मिसेस गातात असा उल्लेख असतो.

कोयलीया बोले अंबवा डारपर.. हि बंदीश काय किंवा, मीराबाईच्या रचनेतल्या (संतो करम कि गति न्यारी)

उज्वल वरण दिनी बगलन को, कोयल करदिनी काली..

मराठीतल्या, लताच्या एका गाण्यात मात्र ( कोकिळ कुहु कुहु बोले, तू माझा तुझी मी झाले) असा बरोबर उल्लेख आहे.

सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, मला पिटुकला सापडला. मी त्याची वाट बघत असताना, अचानक पानांची हालचाल जाणवली. मी एकटक पहात होते. तो दिसला. आणि मी कॅमेरा, डोळ्याना लावेपर्यंत अदृष्य झाला. पण आज मी ठरवलच होत, पिटुलक्याचे फोटो काढायचेच. म्हणून मी डोळ्याला कॅमेरा लावून, त्याच्यावर लक्ष ठेवून बसले. तो क्षणात इथे, क्षणात तिथे. खूप वेळ झाला, तरी मला एकही फोटो काढता आला नाही. आणि नंतर तो दिसेनासा झाला. Sad गेला वाटत. अस म्हणून मी पण शांत बसून होते. आणि कोकिळा कुठे दिसते का? हे पहात होते. आणि.......आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. पिटुकला माझ्या समोर झाडावर शांतपणे बसला होता. मी परत परत बघीतलं. तर तोच होता. मग मात्र मी पटापट फोटो घेतले.
१.
2.
3.
4.
येवढे फोटो काढल्यावरही तो उडाला नाही म्हणून मला शंका आली, याला उडता येत नाही की काय? कारण चांगला ५-७ मिनिटं तो एका जाग्यावर होता. मी तस वडीलाना म्हणालेही. तेही त्याला बघण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना लांबच दिसत नाही. आणि एकदम ते म्हणाले अग तो काय उडतोय. दमल्यामुळे जरा विश्रांती घेत असेल. पहाते तर काय? दोन उड्या मारून तो परत अदृश्य झाला.
खर तर तो विश्रांती घेत नव्हता. काय झाल ते फक्त त्याला आणि मलाच माहित आहे. (माझी दया येऊन तो एका जागी थांबला होता. :फिदी:)

जागू,,,,,,,,,,,,,,,,,,,कधी येतेयस पुण्यात. आधी सांग बर का. नाहीतर ................:राग: Angry Angry Proud

नको बाई भेटते मी तुला आल्यावर. एकाची तारीख तुला उद्या कळवते. दुसर्‍या दिवसाची नक्की नाही अजुन. ती ठरली की सांगेन.

नको बाई भेटते मी तुला आल्यावर.>>>हा अत्ता कसं? (मला घाबरली :डोमा:)
शोभा, तो पण फोटो काढत होता !>>>>:हाहा: कुणाचे???????????

मानुषी, तुझ्या लेकाचे खुप खुप अभिनंदन..:)
जागु, पुण्यात तुला भेटायला भरपुर जण उत्सुक आहेत. तेव्हा खुप खुप वेळ काढुन ये. म्हणजे
भरपुर गप्पा होतील.:)

प्रिती प्रॉब्लेम तोच तर आहे की जास्त वेळ नाही मिळणार. एक दिवस इनरव्हिलच्या कॉन्फरन्स साठी यायचय.

स्तोत्रे, प्रार्थना वगैरे धाग्यात टाकावयाच्या ऐवजी चुकुन इथे हे पडले की काय असे कोणाला वाटेल, पण मुद्दामच इथे देत आहे - आपल्या ऋषि-मुनींनाही निसर्ग, पृथ्वी यांच्याबद्दल किती प्रेम, आदर वाटत होता हे खालील स्तोत्रावरुन लक्षात येईल...........

निसर्ग स्तोत्रम् - नारायणोपनिषत् (महानारायणोपनिषत्)

सहस्रपरमा देवी शतमूला शताङ्कुरा ।

सर्वँहरतु मे पापं दूर्वा दुःस्वप्ननाशिनी ॥
सहस्त्र देवतांहून श्रेष्ठ ही देवी तिला शेकडो मुळे आहेत, शेकडो अंकुर आहेत. ती माझे सर्व पाप हरण करो! दूर्वादेवी दुष्ट स्वप्नांचा नाश करणारी आहे.

काण्डात् काण्डात् प्ररोहन्ती परुषः परुषः परि ।

एवा नो दूर्वे प्रतनु सहस्रेण शतेन च ॥
हे दुर्वे! कांडा-पेरांनी वाढणारी अशी तू माझ्यासाठी पसर. शेकडो कांडांनी, हजारो पेरांनी !

अश्वक्रान्ते रथक्रान्ते विष्णुक्रान्ते वसुन्धरा ।

शिरसा धारयिष्यामि रक्षस्व मां पदे पदे ॥
तुझ्या अंकावर घोडे चालतात, रथ चालतात, विष्णुहि तुझ्या अंकावर चालतो! हे वसुंधरे, देवी! मी तुला मस्तकावर धरतो. (तू) मला पदोपदी सांभाळ.

गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ।

ईश्वरीँ सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥
गंधगुणवती, अजिंक्य, नित्यपुष्ट होणारी, पृथ्वीरुप लक्ष्मी, सर्व भूतांची स्वमिनी! तिचे (मी) इथे आवाहन करतो.

Pages