"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियमः
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
टीपः
गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.
आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय ५: "अकेला हुं मै..."
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहे ऑड वन आऊट...सगळ्यांपेक्षा वेगळा.. जरा हटके...एकटा...निराळा...उठुन दिसणारा...
उदा. तिखट पदार्थांनी सजलेल्या ताटामधली एकमेव गोडाची वाटी, बर्याच मोटरबाईक्सच्या मधे पार्क केलेली एकटी सायकल, सगळ्यांपासुन दूर जाऊन बसलेला एकटा/एकटी, माळरानावर उगवलेले एकटे रोपटे, बैठ्या घरांच्या रांगेत एकच दुमजली घर, मेंढ्यांच्या कळपामधे एकटाच कुत्रा, गृपमधे टोपी घातलेला एकच मित्र, जीन्स घातलेल्या मैत्रिणींच्या घोळक्यात एकच पंजाबी ड्रेस घातलेली मैत्रिण, आकाशात दिसणारा एकमेव ढगं...इ इ अशी प्रकाशचित्रे.
गाणे - कळीचे शब्द: वेगळा, निराळा, हटेला, अलग, जुदा, अकेला, एकटा इ इ उदा. "...हा माझा मार्ग एकला..."
अनारशांमध्ये एकटा दिवा
अनारशांमध्ये एकटा दिवा
मै जब भी अकेली होती हूं ..
मै जब भी अकेली होती हूं ..
आज हृदय मम विशाल झाले त्यास
आज हृदय मम विशाल झाले
त्यास पाहुनी गगन लाजले...
विल्यम पेन, फिलाडेल्फिया सिटी हॉलच्या घुमटावर.
पेन साहेबांनी पेनसिल्विनिया राज्याची स्थापना केली. या पुतळ्याची एक मजेशीर आख्यायिका आहे. वरील गाण्याचे बोल त्या घटनेशी संबंधीत आहेत. त्याची फोड नंतर कधितरी...
मी आहेच असा जरा एकटा एकटा
मी आहेच असा जरा एकटा एकटा रहाणारा
वाळक पानसुद्धा गळताना तन्मयतेने पहाणारा!
सिंडरेला ---- अप्रतिम!!!
सिंडरेला ---- अप्रतिम!!!
गार गार या हवेत, घेऊनी मला
गार गार या हवेत, घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक, एकवार अंतरंग
ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग
गाल गोबरे गोरे गोरे, लबाड
गाल गोबरे गोरे गोरे, लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी या चन्द्रमुखाचा, उदास का दिसला
राग तुझा कसला....?
परीस? असा मिळावा परीस
परीस?
असा मिळावा परीस ज्याने सुवर्ण व्हाव्यात वेदना
क्रांति यांची गझल येथे पहा
http://www.maayboli.com/node/26990
झब्बु संपला नसेल तर हा एक
झब्बु संपला नसेल तर हा एक फोटो.
९/११ च्या हल्ल्यात आयुष्य गमावणार्यांना श्रध्दांजली म्हणून पेपरडाइन युनिव्हरसिटी (मालिबु, कॅलिफोर्निया) च्या भल्या मोठ्या कँपस मधे साधारण ३००० अमेरिकन आणि इतर ७८ देशांचे झेंडे लावले आहेत, आयुष्य गमावणार्या प्रत्येकासाठी एक .
झेंड्यांच्या गर्दीत एक (ऑलमोस्ट) पूर्ण चन्द्रही आपली श्रध्दांजली वहाताना..
कभी तनहाईयोमे यूं हमारी याद आयेगी
अंधेरे छा रहे होंगे.......
सशल, ९ तारखेचे प्रचि आणि
सशल, ९ तारखेचे प्रचि आणि त्याचे गाणे मस्त
सशल, ९ तारखेचे प्रचि आणि
सशल, ९ तारखेचे प्रचि आणि त्याचे गाणे मस्त <<< मी पण हेच लिहायला आलो.
बाकीच्यांचे पण झक्कास आहेत झब्बू.
अजुन चालत असेल तर.... एक
अजुन चालत असेल तर....
एक अकेला इस शहेरमे... रातमे या दोपेहेरमे... आबुदाना ढुंडता हू.... आशियाना ढुंडता हू....
मंडळी, 'मायबोली गणेशोत्सव
मंडळी, 'मायबोली गणेशोत्सव २०११' मधील स्पर्धांकरता मतदान केलंत का?
Pages