Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
दस का दम ही चाललं नाहीच ( आणि
दस का दम ही चाललं नाहीच ( आणि बंद पडलं मग! :दिवा:)
आणि सोनाली नाही फिट होत तर आहेत ना बाकीच्या घरेलु वगैरे ( विद्या बालन - डिटर्जंट्च्या अॅडमध्ये सूट झालेली ).
बर आता तिने इतका प्रयत्न
बर आता तिने इतका प्रयत्न केलाय इमेज बदलायचा तर घ्या बरं 'प्रिल'
पण सलमानला व्हीलच्या अॅडमध्ये पाहून मात्र खरंच हहपुवा झाली होती हां!
करिश्माने कान्दा बटाट्याचे
करिश्माने कान्दा बटाट्याचे भाव सांगितले त्यावरून एक विनोद आठवला.
एकदा शाळातपासनीस शाळेत आले होते. त्यानी मुलाना गणित घातले.
''एक रुपयाला पाच आम्बे, तर दहा आम्ब्याना किती रुपये लागतील?"
त्यावेळी उत्तर लिहून पाट्या पालथ्या टाकायची पद्धत असे. गणित घातल्यानन्तर गुरुजीनी तपासनीस साहेबांच्या मागे उभे राहून, त्याना न दिसेल असे गुपचूप दोन बोटे दाखवून उत्तर मुलाना 'पोचविले'.
तपासनीस एकेकाच्या पाट्या तपासू लागले . जवळ जवळ सर्वानीच दोन रुपये असे बरोबर लिहिले होते.तपासनीस खूष होत पाट्या पहात चालले. शेवटी त्यानी महाद्याची पाटी पाहिली अन ते हतबुद्धच झाले. महाद्याने उत्तर लिहिले होते
"दोन बोटे !!!!"
यावरून करिष्माला क्यामेर्याच्या मागून कोणीतरी बोटे दाखवीत असले पाहिजे....
tonaga पॉइन्ट आहे. >>आपल्या
tonaga पॉइन्ट आहे.
>>आपल्या बाळबोध सोनाली ने काय घोडं मारलय
सोनाली आणि बाळबोध? ये कब हुआ?
विद्या बालनवरून आठवलं - त्या गुड नाईटच्या अॅडमध्ये ती फवारा मारते तो mosquito repellent चा का room freshner चा? mosquito repellent असेल तर त्याचा वास चांगला असेल तरी ते असं मारणं आपल्या आरोग्याच्या द्रृष्टीने हानीकारकच.
ही एफेम वर ऐकलेली ब्रिटानिया
ही एफेम वर ऐकलेली ब्रिटानिया सॉल्टी बिस्किटाची जाहिरात- एक गृहिणी आपल्या शेजारणीला हे गाणे डेडिकेट करते -'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है सब भिजवा दो मेरा वो सामान लौटा दो' कारण शेजारीण ऊठ सूट उधार मागायला येते.
स्वप्ना मॉस्क्विटो रिपेलंट
स्वप्ना मॉस्क्विटो रिपेलंट चा फवारा आणि तो हि मुलांच्या तोंडावर....
प्रिलची जाहीरात बघून वाटते ... अरेरे सोनालीवर भांडी घासायची वेळ आलीये.
तो mosquito repellent चा का
तो mosquito repellent चा का room freshner चा? >>> अगदी अगदी.
आणि Axis Bank ची नवी अॅड ( सुलभा देशपांडे किंवा याक वाली नव्हे) कसली विचित्र आहे! काहीही कल्पना!!
अरे त्या टोयलेट क्लीनरची अॅड
अरे त्या टोयलेट क्लीनरची अॅड आहे की.
त्यात टॉयलेट साफ करुन झाल्यावर खुश होउन, हुसेन मोठा श्वास घेवुन म्हणतो वाह!! क्या खुशबु है!!
माझ्या मनात येत त्याला त्या टॉयलेटमध्येच लॉक करुन टाकाव "खुशबु" घ्यायला.
दोन बोटे
ती कुठली जाहीरात आहे, त्यात
ती कुठली जाहीरात आहे, त्यात पुरुषाच्या आवाजात 'मला वेड लागलं आहेssss' अशी काहीतरी लाईन आहे.
काहीही आहे!
वर्षा, मी मागच्याच पानावर
वर्षा,
मी मागच्याच पानावर ह्या जाहिरातीविषयी लिहिलं आहे... ते गाणार्याच्या एक थोबाडीत ठेऊन द्यावीशी वाटते मला...दरवेळी त्याचा आवाज ऐकला की
अजून बर्याच अॅडस आहेत न आवडणार्या पण कशाच्या ते आठवत नाही.
अॅडस कितीची ब्रिलियंट असल्यातरी माझा पारा अगदी चढतो, जेव्हा त्या हिंदीतून विचित्र पद्धतीने डब करुन मराठीत येतात.
ते डब करणारे अमराठीच लोक असतात बहुतेकदा. एकच स्क्रिप्ट असली म्हणजे उच्चारपण एकच असतील, असं समजतात की काय?
त्यापेक्षा ती अॅड हिंदीतून ऐकलेली परवडेल. तसंही सगळ्यांना हिंदी येतंच ना? एकतर नीट डब करा नाहीतर हिंदीमधूनच दाखवा अशी मागणी करायला पाहिजे सगळ्यांनी...
>>माझ्या मनात येत त्याला त्या
>>माझ्या मनात येत त्याला त्या टॉयलेटमध्येच लॉक करुन टाकाव "खुशबु" घ्यायला
त्या अॅडच्या आधी खरं तर वॉर्निग द्यायला हवी की आम्ही टॉयलेट दाखवतोय.
आणखी एक अॅड आहे त्यात तो महेश ठाकूर टॉयलेटच्या बाहेर उभा राहून बायकोच्या नावाने ओरडत असतो. तेव्हढ्यात ती (साक्षी तन्वर) येते तर हा म्हणतो "तुम यहा हो तो अंदर कौन है". म्हणजे टॉयलेट बायकोनेच घासायचा का? तिने सांगायला पाहिजे "आत आहे ती मी, आणि हे तुमच्यासमोर आहे ते माझं भूत".
नंतर ती किंगफिशरची अॅड ज्यात मेन्स टॉयलेट्मध्ये उभे राहून ते दोघं ती ट्यून म्हणायची प्रॅक्टीस करत असतात. बघूनच कंटाळा येतो. दुसरी जागा नाही मिळाली ह्यांना?
सानी, १००% अनुमोदन!
उदाहरणादाखल एक जाहिरात
उदाहरणादाखल एक जाहिरात आठवतेय... त्यातले शब्द आहेत "आता जरा मनापासून.."
ती बाई अमराठीच असणार, कारण ती "आता जरा मनापासून.." मधल्या "ज" चा उच्चार जातीमधल्या "ज" सारखा न करता जीवनामधल्या "ज" सारखा करते...
आता म्हणून बघा पाहू तिच्यासारखं.... "आता जरा मनापासून.."
मला ह्यावर हसावं की रडावं तेच कळत नाही....
स्वप्ना खुशबूवाल्या
स्वप्ना
खुशबूवाल्या टॉयलेटमधे बसूनपण तो बावळट 'मला वेड लागलं आहेssss' असंच बोंबलायचा... मग काय करायचं आपण?
आणि अगं स्वप्ना, मी महेश
आणि अगं स्वप्ना, मी महेश ठाकूरची ती अॅड आत्ता लिहिणारंच होते, पण वेगळ्या दृष्टीकोनातून...
ही अॅड म्हणजे मठ्ठपणाची परिसीमा आहे एकदम...
विचार कर, बायको टॉयलेटमधे आहे असं कुठला 'गंध' आल्यावर मनात येईल? खुशबू की.....?
कॉमनसेन्सच्या आईचा घो S S S
अग त्याला ती आत आहे असं काही
अग त्याला ती आत आहे असं काही घासल्याचा आवाज येतो म्हणून वाटतं. :-
एफएम गोल्ड ह्या सरकारी
एफएम गोल्ड ह्या सरकारी चॅनेलवर एक अॅड लागायची. त्यात एका मुलीचा बाप आपल्या मुलीचं लग्न दुसर्या गावातल्या श्रीमंताच्या मुलाशी ठरवतो. आणि मग त्याला येऊन कोणीतरी सांगतं की त्यांच्या घरात टॉयलेट नाहिये. मग हा म्हणतो की ज्या घरात टॉयलेट नाही तिथे मी आपल्या मुलीला देणार नाही. त्याने बहुतेक ती महेश ठाकूरची अॅड पाहिली नसणार. नाहीतर त्याने "रिश्ता पक्का" केला असता. निदान लग्नानंतर मुलीला टॉयलेट तरी घासायला लागणार नाही
ए, हो? असंय का ते? पण मग तो
ए, हो? असंय का ते? पण मग तो आधी साक्षी, साक्षी असे तिला हाका मारत मारत येतो आणि टॉयलेटमधून सुंगंध आल्याने ती आत आहे असं त्याला वाटतं... पण तो सॅनीफ्रेशच्या एअर-फ्रेशनरचा सुगंध असतो, साक्षीच्या पर्फ्युमचा नाही....असं काहीतरी त्यांना सुचवायचं असावं, असं मला वाटतं...
सॅनीफ्रेशच्या नेमक्या कोणत्या प्रॉडक्टची अॅड आहे ती? टॉयलेट क्लिनर की फ्रेशनर?
सानी आणि सगळे, ती अॅड बहुतेक
सानी आणि सगळे, ती अॅड बहुतेक 'साक्षी'फ्रेश ची असावी
तो माणूस टीव्ही पहात असतो आणि
तो माणूस टीव्ही पहात असतो आणि त्याची बायको २ ड्रेसेस घेऊन कोणता घालायचा ते त्याला विचारायला येते ती.>>ती "you don't love me anymore ना " म्हणते तेंव्हा त्याचे expressions priceless आहेत
http://www.youtube.com/v/HdoW
http://www.youtube.com/v/HdoWI2Asz4o
वर्जीन मोबाईल च्या आयपीएल स्पेशल जाहिराती!. आयपीएल सुरु असताना बघीतल असतं तर आणखीन मजा आली असती!
असामी, अनुमोदन. एक स्त्री
असामी, अनुमोदन. एक स्त्री असून पण त्या बाईच्या मठ्ठपणाची मला चीड आली
सानी, नंतर साक्षी टॉयलेटचं दार उघडते तेव्हा आत एकदम चकचकाट असतो त्यावरून टॉयलेट क्लिनरची अॅड असावी असं वाटतंय. कधी लागली तर खात्री करून घेईन.
लिमका कोल्ड्रिंक्सची सध्याची
लिमका कोल्ड्रिंक्सची सध्याची जाहीरात सुपरचं, संगिताची पुन्हा एकदा जादू.
खरच, लिमका पिऊन वाटेल ना
खरच, लिमका पिऊन वाटेल ना वाटेल पण ती जाहीरात पाहून नक्कीच फ्रेश वाटत.
टॉयलेटमध्ये प्रकाश बघून
टॉयलेटमध्ये प्रकाश बघून त्याला वाटतं की साक्षी आत आहे, पण ती येते आणि त्याला टॉयलेट उघडून दाखवते तर आत कोणीच नसतं. टॉयलेट सॅनीफ्रेशने धुतल्याने चकाकत असतं, त्या चकाकीचा तो प्रकाश असतो....
हुश्श... मला तरी ती जाहिरात अशी कळली आहे.
टॉयलेटमध्ये प्रकाश बघून
टॉयलेटमध्ये प्रकाश बघून त्याला वाटतं की साक्षी आत आहे
अरे देवा! (माझ्यासकट) कोणाकोणाला काय काय अर्थ लागतायत ह्या जाहितातीचे
ही साक्षी म्हणजे काय आहे का, तिचा प्रकाश पडायला?
जाउ द्या स्वप्ना, शँकी, प्राची...ही जाहीरात समजणे आपल्यासारख्या सामान्य लोकांचे काम नाहीये...:अओ:
मला दोकोमोची ट्यून फार बोअर
मला दोकोमोची ट्यून फार बोअर होते.. तरी हल्ली जास्त दाखवत नाहीत.
>>आणि Axis Bank ची नवी अॅड (
>>आणि Axis Bank ची नवी अॅड ( सुलभा देशपांडे किंवा याक वाली नव्हे) कसली विचित्र आहे! काहीही कल्पना!!
अनीशा, मी ती काल पाहिली पहिल्यांदा. तो माणूस बॅकेत जायला निघतो आणि त्याच्या पोटात दुखतं तीच ना? मला तर काही कळलीच नाही. मधेच त्याची बायको काय येते आणि मग शेवटी तो नोकर दरवाजा उघडून "बॅक" असं काय ओरडतो? आता फोन आणि नेट्बॅकिंग USP ठरायचे दिवस गेले. का आता Axis Bank चे लोक घरी येऊन सर्व्हिस देतात? खरच काहीही दाखवतात.
का आता Axis Bank चे लोक घरी
का आता Axis Bank चे लोक घरी येऊन सर्व्हिस देतात? खरच काहीही दाखवतात.
prioirty प्रायॉरिटी अकाऊंट वाल्याना देतात घरपोच सर्व्हिस. मी axis bank चा खातेधारक म्हणून सांगू शकतो.(फक्त तुमचे खाते वजनदार हवे)
बहुधा हॉर्लिक्स च्या
बहुधा हॉर्लिक्स च्या जाहिरातीत, (मुलगा टिंगूचा लंबू होतो, त्या)...ती आई म्हणते, कुछ दिनो पहले बाकी बच्चे मेरे बेटे को छोटु बुलाते थे. हे they 'called' him shorty..चे बिनडोक भाषांतर. call म्हणजे बोलायचे/चिडवायचे असे हवे. मराठीत पण हिंदीतून बोलवायचे का हाक मारायचे असे केले आहे.
कोणत्यातरी जाहिरातीत 'मेरे साथ ऐसा हुआ' हे माझ्या बरोबर असे झाले ! मराठी 'बरोबर', मराठीच्या 'बाबत' असे का होते.
ही साक्षी म्हणजे काय आहे का,
ही साक्षी म्हणजे काय आहे का, तिचा प्रकाश पडायला?
>>> तसं नाही ग, त्याला वाटतं की दिवा लावलेला आहे आतला आणि साक्षी आत आहे.
Pages