मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्शय कुमार आता डोक्यात जातो.
कुठली तरी mobile ची add करतोय.
साऱखा हिडिस हासत असतो.
ह्यात काय logic आहे कळत नही.

सलमान चक्क वॉशींग पावडरची अ‍ॅड करतोय काय पण वेळ एकेक.

त्याला प्रॉडक्ट देखील माहीत नसावे. पैसे मिळत असतील तर ते काय करणार नाहीत?

Jiraiya Sensei, मला वाटतं मायक्रोमॅक्सची अ‍ॅड आहे ती. आणि त्यात इथेतिथे लोळून तो अन्नाचा नास करतो ते वेगळंच.

>>सलमान चक्क वॉशींग पावडरची अ‍ॅड करतोय

आणि त्याच्याबरोबर "कसम्हसे" मधली बानी आहे. काय डेडली कॉम्बो आहे Biggrin

ही जी कोणी बानी आहे ना तीची एक ज्यूस ची जाहिरात आहे त्यात ती ते ज्यूस असं खाल्ल्यासारखा अभिनय करते, अत्यंत हिडिस.. Angry

>>त्याचे दोन तुकडे केल्यावर त्यातून धबधबा बाहेर आला नाही.>>> Lol >>>थोडा मार पडल्यावर>> बिचारा त्या खोट्या जाहिरातीपायी त्याला मार खावा लागला.
लक्स चे ते गाणे मला पण आवड्ते.:) आणि ते कतरीनाचे रसिया पण Happy
निरमा एकदम वाईट जाहिरात.

कोकची अ‍ॅड 'तुम जो मिल गए हो' एचडीएफसीस्टॅला. जुनी पण सह्ही होती

आयसीआयसीआयची - खयाल आपका ही अत्यंत (कॉर्पोरेट इमेजला) विसंगत आहे. तरी एकदा बॅन्केत जाऊन विचारायला पाहिजे अ‍ॅडमध्ये दाखवलंय असं करणार का ते Happy

' हम जब होंगे साठ साल के और तुम होगी पचपन की , बोलो प्रीत निभाओगी क्या फिर भी अपने बचपन की ' हे गाणं गाडीत सुरु असतं , पाऊस पडतो व तो तिला उद्देशून म्हणतो ' ..... तुमको लेके जाउंगा, तुम बैठोगी गाडी में और फिर मै आइसक्रीम खाउंगा' , ती अ‍ॅड कशाचीये आठवत नाही व तो ते गाणं बदलून काय म्हण्तो ते ही पूर्ण आठवत नाही. पण आवडती अ‍ॅड होती ती. Happy

>>तरी एकदा बॅन्केत जाऊन विचारायला पाहिजे अ‍ॅडमध्ये दाखवलंय असं करणार का ते

त्यासाठी पण टोकन घ्यावं लागेल आणि १५ मिनिटं बसावं लागेल हो Happy नेटबॅन्कींग वरून विचारता येतं का ते बघा Wink

ती बानी म्हणजे प्राची देसाई आहे. Happy
जेनेलिया सध्या हाती आलेल्या वृत्ता नुसार LG/Samsung Mobile, Garnier, Fanta आणि Spinz Deo च्या अ‍ॅडस मध्ये आहे ... Proud

ती ३डी टीव्हीची अ‍ॅड कुठली आहे? सॅमसन्ग ना? ती मला फार आवडते. आणि ती सीमकार्ड बदलल्यावर "जोधा अकबर" मधली पात्रं निघून जातात ती पण छान आहे. दुर्देवाने प्रॉडक्ट काय आहे तेच लक्षात नाही Sad

अग, म्हणजे मला म्हणायचं होतं की कुठल्या कंपनीची अ‍ॅड आहे ते आठवत नाही. Happy तशीच ती लिंबाच्या ड्रिंन्कची अ‍ॅड, त्या मुलाला आई बनवायची त्या लिंबू सरबताची आठवण येते ती. मस्त आहे. त्याचं जिन्गल पण छान वाटलं.

अग दक्षिणा, माझं असंच होतं, अ‍ॅड लक्षात रहाते आणि प्रॉडक्ट विसरून जाते Happy मला वाटतं माझ्यासारख्या लोकांवर उपाय म्हणजे प्रॉडक्टचं नाव जिंगलमध्ये असणे उदा. वॉशिंग पावडर निरमा :G.

शँकी, आज संध्याकाळी ती अ‍ॅड पहायला मिळाली तर इथे नक्की पोस्टते.

येस्स, ती अ‍ॅड स्पाईसचीच. अ‍ॅड लक्षात रहाते प्रॉडक्ट नाही. ती जेनेलिया का कोण ती, "हल्ली ही खूप अ‍ॅड मध्ये येतेय हिला पिक्चर मिळत नाहियेत की काय?" असंच लक्षात राहिलं पण एकही प्रॉडक्ट लक्षात राहिलं नाही.

व्होडाफोन च्या जुजु च्या आधि छोट्या पपीज ला घेउन केलेल्या सर्व अ‍ॅड्स मस्त होत्या ..त्यासाठि दोन सेम दिसणारी क्युट भुभु वापरली होती Happy

आयसीआयसीआयची - खयाल आपका ही अत्यंत (कॉर्पोरेट इमेजला) विसंगत आहे>> या बँकेत कोण कस्टमर नाय, काम नाय, सगळे फालतू गप्पा मारत बसतात असा मी लावलेला अर्थ!

ती आमिर खानची फोनची अ‍ॅड मस्त आहे. तो आईसाठी फर्माईशी गाणं लावतो ती. नेहेमीप्रमाणेच मी कंपनीचं नाव विसरलेय Sad

Pages