मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती वंदना गुप्तेची अ‍ॅड मॅक्स न्यू यॉर्क लाईफची आहे. त्यात त्या मुलाच्या चेहेर्‍यावरची एक्स्प्रेशन्स मस्त आहेत.

>>पण ह्यांच्याकडे इतके पैसे आहेत तर स्वयंपाकाला बाई का नाही ठेवत?

बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण पैसे आले म्हणून ते बायकोचं काम कमी करायला वापरावेत हे भारतात बर्‍याच पुरुषांना वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे Sad

मला नाही बाई आवडत 'बाईच्या' हातचा सैपाक ! या वाक्याबद्दल काय मत्त हाये तुम्चं स्वप्ना राज ?

>>मला नाही बाई आवडत 'बाईच्या' हातचा सैपाक ! या वाक्याबद्दल काय मत्त हाये तुम्चं स्वप्ना राज ?

"मला नाही बुवा आवडत 'बाईच्या' हातचा सैपाक" हे मत नवर्‍याचं असेल तर ह्यावर "मग स्वतःच्या हातांनी करून खावा" हे उत्तर आहे. पण घरच्या बाईचं हे मत असेल तर त्याला इलाज नाही. म्हणूनच मी वरच्या पोस्टमधे "बर्‍याच पुरुषांना" म्हटलंय, "सगळ्या पुरुषांना" नाही. अर्थात इतर वेळी बायकोचं म्हणणं न ऐकणारे नवरे ह्या वेळेला तिच्याशी पूर्ण सहमत असतात हे सुध्दा खरं आहे.

कॉम्प्ल्यान ची ती 'ए हाफ तिकिट ' त्या जाहिरातीत ती 'डॉक्टर कुमार ने सलाह दी' हे अश्या प्रकारे सांगते की या कुमार ला अख्खा महाराष्ट्र ओळखतो......डॉक्टर कुमार या शब्दावर एवढा जोर का?

>>बहुतेक जोडीने कॉन्ट्रॅक्ट केलेय

किंवा सलमान-सोहेल सारखे buy one get one free स्कीमवर असतील Wink

>>डॉक्टर कुमार या शब्दावर एवढा जोर का?

डॉक्टर कुमारने ती अ‍ॅड स्पॉन्सर केली असेल Wink कंपन्या प्रोग्राम्स स्पॉन्सर करतात आता लोक अ‍ॅडस स्पॉन्सर करतील.

काँप्लान की अस्ल्याच कुठल्यातरी प्रॉडक्टचा नवा शोध परवाच ऐकला -'बच्चे गर्मीयाँमें जादा बढते है' कायच्या काय!
या सगळ्याच हेल्थ ड्रींकच्या अ‍ॅडमधे मुलं एकाच वेळी अभ्यासात, मैदानी खेळात,बुद्धिबळात,क्विझमधे चँपियन दाखवतात.मुलांवर आणि त्यांच्या पालकांवर काय अपेक्षा लादतायत हे?

>>'बच्चे गर्मीयाँमें जादा बढते है

उष्णतेने प्रसरण पावतात म्हणजे मग थंडीत आकुंचन पावत असतील. Happy

ती हॅप्पीडेंटची जाहिरात मला फार आवडते. छान कल्पना!
सगळ्या मुलांच्या दातातून येणार्‍या प्रकाशावर सगळे व्यवहार चालतात. मस्त!!

उष्णतेने प्रसरण पावतात म्हणजे मग थंडीत आकुंचन पावत असतील. स्वप्ना Lol भारी कॉमेंट्स लिहितेस एकदम. Lol

मला ती एक कोणत्यातरी एनर्जी ड्रिंकची अ‍ॅड फार म्हणजे फारच आवडते. त्यात एक क्रिकेट खेळणारा मुलगा दाखवला आहे, जो उन्हातान्हात खेळत असतो आणि सूर्य त्याच्या शरीरातलं पाणी(ग्लुकोज) स्ट्रॉने चक्क शोषून घेतांना दाखवला आहे. काय भन्नाट कल्पना आहे. मी जाम फिदा आहे त्या अ‍ॅडवर आणि त्यातल्या गाण्यावर. मी ते आख्खं गाणंच लिहिणार आहे इथे. Happy

ऊन्हाळ्यात जेव्हा बघा ऊन रणरणते
बॉडी-ग्लुकोज शोषून घेते, ते खुश होते.
ऊन्हाळ्यात मुलांना त्रास होतो रोज
ऊन पीतच बसते बॉडी ग्लुकोज

(आणि मग तो मुलगा त्या विशिष्ठ ब्रँडचं एनर्जी ड्रिंक पितो आणि एकदम ताजातवाना होतो. मग पुढचे गाण्याचे शब्द... )
एनर्जीने भरलेली मुले मारतात सिक्स, मारतात सिक्स
ऊन्हाची होते टाय टाय फिस, टाय टाय फिस
Happy

सुपिरीया नावाच्या साबणाची अ‍ॅड देखिल डोक्यात जाते. ते जोडप आपल्या बाळाला घेऊन हवेत झेलत असतात. तर पप्पांच्या घामाचा वास येतो म्हणुन ते बाळ हवेतच राहतो. काहीच्या काही दाखवीतात. यांनी जर मायबोलीवर चक्कर मारली तर त्यांना चांगली script नक्कीच मिळेल.

निरमाची जाहिरात एकदम बकवास आहे. मला सांगा जर त्या बाईच्या धाकाने?? उड्णारा चिखल थांबणार असेल तर साबण पावडरची गरजच काय ?

अरे असं कसं ? प्रत्येक जाहिरात ही एक कविता असते. त्याचा कीस काढून कसे चालेल ? जरा पोएटिक लिबर्टी घेऊ द्या. Happy

>>पप्पांच्या घामाचा वास येतो म्हणुन ते बाळ हवेतच राहतो.
आईला नाही वाटत येत तो घामाचा वास? का तिला बिचारीला उडता येत नाही म्हणून हा जाच? 'म्हातारी उडता नयेची तिजला माता मदिया अशी' Wink

आईला नाही वाटत येत तो घामाचा वास?
>>
पूर्वरंगम्मध्ये याचे उत्तर आहे. 'गाईड पुलंना विचारतो ' शुड आय टेल यू ,सर? "

नक्की कुठे ते टण्याला विचारले पाहिजे.. Happy

ती गार्निअरची एक अ‍ॅड आहे त्यात तर "सच बोलनेवाले फेअरनेस क्रीम्स कितने रेअर ना?" अश्या तर्‍हेने हिंदी-इंग्लीश काला करत ती मुलगी बोलते. जेनेलिया आहे का ती? अरे, एक तर हिंदीत बोला नाहीतर इंग्लिशमध्ये. हे काय धेडगुजरी Sad

ती क्लोव्हमिन्ट का कसली नवी अ‍ॅड आली आहे त्यात तो नवरा लॅपटॉप उघडून बसलाय आणि ती बयो ओले केस हलवतेय जवळच. ४ थेंब जरी पडले तरी लॅपटॉप राम म्हणेल. मग बसा क्लोव्हमिन्ट खात!

अरे ती नवीन Rat killer चि अ‍ॅड पाहीलीत का? एक बाई जेवन बनवत असताना कोणालातरी शिव्या घलत असते ..काम्चुकार म्हणुन आणि शेवटी कळतं ती आपल्या मांजराला ओरडतेय..:D
मस्त, झकास अ‍ॅड. Happy

जेनेलिया स्पिन्झच्या जाहिरातीत डोक्यात जाते. ती जेव्हा नाचत मुलांना "a square plus b square together form that c square!" शिकवते तेव्हा 'देव पायथॅगोरसच्या आत्म्याला शांती देवो' एवढंच म्हणावंसं वाटतं!

त्या क्लोव्हमिंटला लवमिंट करायचा किती तो अट्टाहास? Happy
ती फोक्स्वॅगनची Curves are back ची concept मस्त. ती बाई फारच वचावचा खाते Happy

>>जेनेलिया स्पिन्झच्या जाहिरातीत डोक्यात जाते

अनुमोदन. माझ्या तर ती सगळयाच जाहिरातीत डोक्यात जाते. त्यातून तिच्या २ अ‍ॅड्स एकामागोमाग एक लागल्या की बघायलाच नको Sad

माझ्या तर ती सगळयाच जाहिरातीत डोक्यात जाते.
>>
प्रचंड मोदक...
ती सिनेमांमधेही हेच्च करते.. त्यामुळे ती कधीही कुठेही डॉक्यातच जाते...

टीप: डोल्यात जाणे ची परमोच्च डिग्री म्हणजे डॉक्यात जाणे...

Pages