Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
आजकल एक रिन पावडरची जाहिरात
आजकल एक रिन पावडरची जाहिरात खुप छान वाटते. छोटा मुलगा पहात असतो आपल्या आजीची दमछाक वाळवण सुकवतांना कावळ्यांना हाकवतानाची. तो पापाच शर्ट घेवुन त्यावर निळा रंग फासुन ते बुजगावण तयार करतो नि हे करतांना आजीला एक मिनीट म्हणतो.. अन वडिलांचा शर्ट मळला हे ध्यानात आल्यावर आजीला.. पपा म्हणुन शर्टकडे लक्ष वेधुन घेतो.. छान वाटलिये आजी नातवाची धडपड या जाहिरातीत
हो गं ! मस्तच हे ती अॅड!
हो गं ! मस्तच हे ती अॅड!
येस येस. ती आजी आणि नातू फारच
येस येस. ती आजी आणि नातू फारच गोड.
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू करण्यात आलेला आहे. शुल्क, नावनोंदणी इ.च्या माहितीसाठी खालील लिंक पहा...
http://www.maayboli.com/node/16976
ती निरमा वॉशिंग पावडरची बंडल
ती निरमा वॉशिंग पावडरची बंडल अॅड पाहिलिय का कुणी?
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू करण्यात आलेला आहे. शुल्क, नावनोंदणी इ.च्या माहितीसाठी खालील लिंक पहा...
>>
मला न आवडलेली जाहिरात..
एयरटेलची मोबाईलवर टीव्ही
एयरटेलची मोबाईलवर टीव्ही पहायची अॅड (शर्मन जोशी) मला फार आवडते. विशेषतः तो म्हणतो ना की "मेरा घर, मेरा टीव्ही, मांसे लढके कुछ फायदा नही". एकदम कहानी घरघरकी वाटते
ती ५स्टारची नवीन जाहिरात,
ती ५स्टारची नवीन जाहिरात, 'रमेश-सुरेश' वाली अगदी डोक्यात जाते. त्यात ती कधीकधी सलग २-३वेळा लावतात.
मला ती पकड पकड ची अॅड मुळीच
मला ती पकड पकड ची अॅड मुळीच आवडली नाही
फेव्हिकॉल च्या सगळ्या
फेव्हिकॉल च्या सगळ्या जाहिराती : न फुटणार्या अंड्याची, लटकणार्या नायक-नायिकेची आवडतात.
वाईल्ड स्टोन डीओ अॅड
वाईल्ड स्टोन डीओ अॅड ....लहान मुलं वाट्टेल ते प्रश्न विचारतात ती पाहून! त्यांना उत्तरं देताना अगदी नाईन कम टू नोज!
रविवारी दुपारी मस्त जेवण सुरू असताना अगदी नेमक्या वेळेवर ती हार्पिकची अॅड दाखवतात!
जेलात टाकले पाहिजे अश्या लोकास्नी!
>>ती ५स्टारची नवीन जाहिरात,
>>ती ५स्टारची नवीन जाहिरात, 'रमेश-सुरेश' वाली अगदी डोक्यात जाते. त्यात ती कधीकधी सलग २-३वेळा लावतात.
>>जेलात टाकले पाहिजे अश्या लोकास्नी!
अनुमोदन!
हो अशा जेलात जिथे टॉयलेट
हो अशा जेलात जिथे टॉयलेट स्वच्छ केले जाणार नाहीत.
जेनेलियाचया काजोलच्या सर्व
जेनेलियाचया काजोलच्या सर्व जाहिराती. पीळ. त्यादोघींना डिजिट्ली गोरी बनवले आहे.
जेनेलिया म्हणते ना सच बोलने वाले फेअर नेस क्रीम? कितने रेअर है वगैरे. खरेतर बोलने वाले क्रीम च खूप रेअर आहेत : )
जॉन्सन ची बेबी वाइप्स. सारखी बाळाची शी पुसताना दाखवतात.
मला ती ''ख्वाब थोडे ज्यादा
मला ती ''ख्वाब थोडे ज्यादा ''... वाली पण आवड्ली होती... खास करून शेवटी तो ज्या स्टाइलनी डोक्यावरून हात फिरवतो ना... सही....
जेनेलिया माझ्यापण टाळक्यात
जेनेलिया माझ्यापण टाळक्यात जाते
एकिकडे गार्नियर लाईट क्रिम ची जाहीरात करते, दुसरीकडे मार्गो ची..
नक्की गोरी कशाने झालिये म्हणे?
मुलगा म्हणतो 'बाबा, घोडा घोडा
मुलगा म्हणतो 'बाबा, घोडा घोडा खेळूयात ना'.. बाप म्हणतो, 'अरे, घोडा घोडा सगळेच खेळतात मी तुला मगरीवर बसवतो' आणि असं म्हणून तो झोपतो..
मला हा कोन्सेप्ट भयानक आवडला.. (एकूणात जाहिरात फारशी नाही आवडली)
हेहे नानबा, मला तर तुझा
हेहे नानबा, मला तर तुझा अॅनाकोंडा आठवतो ती जाहिरात बघितल्यावर
प्राची उगाच नाही मला जाहिरात
प्राची
उगाच नाही मला जाहिरात आवडली
ती ताझा चहाची अॅड आहे त्यात
ती ताझा चहाची अॅड आहे त्यात ती सासू सुनेच्या घरी आलेल्या मैत्रिणीकडे ती सामोसे खाताना मारक्या म्हशीसारखी बघत असते. आणि नंतर ती मैत्रिण तिच्या बॅकेचा चेक द्यायला येते तेव्हा अगदी हसून सुनेला "कॅटरिंग मॅनेजर" म्हण वगैरे सांगते. त्या सुनेला सांगायला पाहिजे की तो चेक लपवून ठेव
मास्टरकार्डची सचिनची 'चलो भाग
मास्टरकार्डची सचिनची 'चलो भाग चलें' मस्त आहे. शेवटी ते लहान मुल 'हाउझ दॅटssss' म्हणतें ते तर क्युटच
आज काल IBN लोकमत वर नसका Aqua
आज काल IBN लोकमत वर नसका Aqua ची जाहीरात येते..ती पहा....खालील प्रमाणे :
असणारे हे जीवन हे......नसणारे हे जीवन हे......
असेही हे जीवन हे.......तसेही हे जीवन हे...ह्याल जीवन ऐसे नाव......नसका Aqua ....
अरे काय सुर.....ताल....शब्द आहेत कि नाही ?????
असणारे हे जीवन हे......नसणारे
असणारे हे जीवन हे......नसणारे हे जीवन हे......
असेही हे जीवन हे.......तसेही हे जीवन हे
हे ऐकून काय वाटलं माहित आहे? जीवन काय, आत्ता आहे, मग नाही. त्यामुळे कुठलंही पाणी प्या. काहीही फरक पडत नाही. शेवटी सगळ्यांना एक दिवस मरायचंच आहे
असणारे हे प्रेक्षक हे......नसणारे हे प्रेक्षक हे......
असेही हे प्रेक्षक हे.......तसेही हे प्रेक्षक हे
तस्मात. जाहिराती लागल्या की म्यूट करणे हाच उपाय
मला ती फूटबॉलची गोल झाल्यावर
मला ती फूटबॉलची गोल झाल्यावर डोक्यावर टीशर्ट घेऊन धावणार्या पोराची अॅड आवडते. मस्त केलेय.
(कशाची अॅड आहे ती?)
विको टर्मरीक वाले एक नं. चे
विको टर्मरीक वाले एक नं. चे हलकट,
प्रोड. च्या किमती सतत वाढतायत, पण जाहीरात तिच भिकार.
वीट येतो बघताना.(कुल़कर्णी बाईंना पाहुनही)
खालील प्रतिक्रीया सानुनासिक
खालील प्रतिक्रीया सानुनासिक वाचावी.
अंहॉ ते मॅराठी उद्योजक आहेत. उगीच जाहिरातीवर खर्च कशाला करतील. रील घासून जै परेन्त तीच अॅड तुमच्या नशीबी.
मॅराठी उद्योजक
मॅराठी उद्योजक आहेत.>>>>
मामी, थन्स, ह्यातच काय ते जाणले हो.
ए नवी अॅड आहे की विकोची.. २०
ए नवी अॅड आहे की विकोची.. २० रू. सूट आहे चक्क टूथपेस्टवर. सिनेमागृहात मात्र मृणालच आहे अजूनही
मन्नपुरम गोल्डची डोक्यावर चष्मा ठेवून चष्मा शोधणार्या बाईची अॅड मस्त झालीये
ती ५*ची अॅड लागली की ती कधी
ती ५*ची अॅड लागली की ती कधी संपेल अस वाटत. रमेश सुरेश वाली तेच तेच डायलॉग बघुन कंटाळा येतो.
मला खरं तर सैफ आणि करीना हे
मला खरं तर सैफ आणि करीना हे दोघेही अजिबात आवडत नाहीत. पण त्यांची एयरटेलची हाय डेफिनिशन टीव्हीची अॅड मस्त आहे. तसंच ओडोनिलची ती एयर फ्रेशनरची अॅड - बायको पराठा करपवते ती - छान आहे. पण पान विलास म्हणून गुटक्याची अॅड आहे ती टुकार नं १ आहे. त्याच्यात संवाद काय आहेत हे मी अजून ऐकलं नाहिये पण व्हिज्युअल्स जाम हास्यास्पद आहेत. .
Pages