Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
बबुल ची गोर्या ची जाहिरात
बबुल ची गोर्या ची जाहिरात एकदम पकाऊ
कमोड मधला हिरवट्ट किडा अगदि अगदि तोंडा जवळ येवुन त्या बाईशी बोलतो , खातांना हा प्रकार बघण कठीण होत
लहान मुलाला 'शी' करत बसण्यास मोटिवेट करणार्या Air Freshner ची जाहिरात पण बोर आणी ई ई ई!!! (Negative Promotion of Product जाहिरातीत सांगतात मुल Air Freshner चा वास घेत बसतील बाहेर येणारच नाही म्हणुन ... म्हणजे शी करतच बसेल .. कोण घेणार असल प्रॉडक्ट!!!!)
काजोलची "डिंगि पिंकी" वाली Detergent ची जाहिरात पण बोरच!
जॉन ची बाईक वाली जाहिरात त्या बाईकच निगेटिव्ह प्रमोशन करते अस वाटत, जाहिरातीच्या शेवटी जॉन मान पाठ दुखतेय अस करतो म्हणजे त्या बाईकला राईड केल्याने मान पाठ दुखण सुरु होत अस वाटत बघतांना
>>लहान मुलाला 'शी' करत
>>लहान मुलाला 'शी' करत बसण्यास मोटिवेट करणार्या Air Freshner ची जाहिरात पण बोर आणी ई ई ई!!!
अनुमोदन!
तसंच ती पुरुषांच्या फेअरनेस क्रीमची अॅड. मुलाखत द्यायला आलेला माणूस मुलाखत घेणार्याला प्रश्न विचारत असतो आणि तो आत्मविश्वास म्हणे त्याला ते क्रीम देतं. कैच्या कै.
मला पण ती 'आज तुम्हे मगरमच्छ
मला पण ती 'आज तुम्हे मगरमच्छ सैर कराता हूं' सॉल्लीड आवडली
आजची बातमी -मुलांना दोन इंच उंच करणार्या कॉप्लानविरुद्ध तक्रार दाखल
http://timesofindia.indiatimes.com/India/Maharashtra-FDA-takes-Complan-t...
सोन्याहून सोनसळी लक्सच्या
सोन्याहून सोनसळी लक्सच्या जाहिरातीतला आवाज अमेय दातेचा आहे का?
ववि नावनोंदणीचे शेवटचे २ दिवस
ववि नावनोंदणीचे शेवटचे २ दिवस उरले आहेत. तुम्ही आपले नाव नोंदवलेत का?
http://www.maayboli.com/node/16976
centre mint की freshची अॅड
centre mint की freshची अॅड पाहिलिय का कुणी? तोंडाने एक माणूस वेगवेगळे आवाज काढत असतो आणि तबल्यावर दुसरा माणूस तसाच आवाज काढून दाखवत असतो सॉलिड मस्त आहे कल्पना ....(आयडियेची कल्पना)
मला ती लाईफबॉय हँडवॉशची
मला ती लाईफबॉय हँडवॉशची जाहिरात आवडते, शाळेतल्या मुलांची. जानते हो तुम सब क्या खा रहे हो? किटाणू किटाणू वाली.....तो मुलगा सहीच.
आणि मायक्रोमॅक्स मोबाईलच्या पण अॅड मस्त आहेत.
DHL ची अॅड आवडली. तसंच
DHL ची अॅड आवडली. तसंच Monster ची.
'नवनीत'ची सायलेन्ट अॅड
'नवनीत'ची सायलेन्ट अॅड आवडली.. काही सेकंद आवाजच येत नाही, आपोआप लक्ष जातं अॅडकडे. एकदम प्रभावी!
सुपीरियाची अॅड मस्त आहे
सुपीरियाची अॅड मस्त आहे
ती माऊ वाली HIT च्या Ratkill
ती माऊ वाली HIT च्या Ratkill ची जाहीरात आवडली. मनी माऊचे expression छान अहेत.
स्कूटी पेपची नवी अॅड काय
स्कूटी पेपची नवी अॅड काय फालतू आहे. मला तर प्रथम वाटलं की ती लिपस्टिकची अॅड आहे म्हणून. पॉन्डसच्या फेसवॉशच्या अॅडमधल्या त्या सगळ्या मुली "मंद" वाटतात तोंडावरून
हो हो मी पण त्या रॅटकिलच्या
हो हो मी पण त्या रॅटकिलच्या अॅडबद्दलच लिहिणार होते. ती मनीमाऊ इतकी गोड आहे. आणि ती बाई चिडचिड करून बोलल्यावर ती मस्त मियॉंव करून पोझ बदलून मस्त झोपते.
आई म्हणायची तुम्ही करा वटवट आम्ही आहोत निगरगट्ट...त्याची आठवण होते.
>>आई म्हणायची तुम्ही करा वटवट
>>आई म्हणायची तुम्ही करा वटवट आम्ही आहोत निगरगट्ट
रॅलिगेर इंश्युरन्सची नवी अॅड
रॅलिगेर इंश्युरन्सची नवी अॅड एकदम जबरी, एक माणूस ऑफिसात मोबाईलवर बोलत चाललाय, अगदी जपून काळजी घेत, एका ठिकाणि तो थांबतो आणि खिडकीला रेलायला जातो, नेमकी तिथलीच काच काढलेली असते आणि तो धाडकन खाली पडतो- एकदम पोचतोच मेसेज!
अरे आगाऊ, (असं कसं म्हणायचं
अरे आगाऊ, (असं कसं म्हणायचं ओळख नसताना ;)) मी पण याच अॅड बद्दल लिहायला आलेले.. भारी अॅड आहे, पुर्ण अॅड मध्ये कुठेही इन्शुरन्सच्या गरजेबद्दल काहीही नाही तरी शेवटी गरज अधोरेखित होतेच..
McVities ची नवी अॅड तद्दन
McVities ची नवी अॅड तद्दन फालतू आहे. जिंगल करायला जमलं नाही की जुन्या गाण्याची चिरफाड करुन वापरतात.
यस नवनीत ची पाहिली अॅड खरच
यस नवनीत ची पाहिली अॅड खरच एफेक्टीव्ह आहे. पहिल्यांदा मला वाटलेले की टीव्ही म्युट झाला किंवा ट्रांसमिशन मधे प्रॉब्लेम आहे, नन्तर कळले.
अभ्यासासाठी शांतता हवी हाही मेसेज द्यायचा प्रयत्न केला असेल का?
Aegon Religare ची नवी अॅड
Aegon Religare ची नवी अॅड मस्त आहे, ते लोक प्राण्यांचा कॉस्च्यूम घालून बसलेले असतात ती. क्लोरमिन्टची अॅड बघवत नाही अगदी. तसंच ती Anchor Toothpaste ची अॅड पण बकवास आहे.
अँकर टुथपेस्टची अॅड पाहीली
अँकर टुथपेस्टची अॅड पाहीली का कुणी केकवाली?? सहीच आहे एकदम.
बादवे हल्ली जुनी गाणी अॅडच्या जिंगल्सला वापरायची फॅशन आलीय का??
अँकर टुथपेस्टची अॅड एकदम
अँकर टुथपेस्टची अॅड एकदम बकवास
>>बादवे हल्ली जुनी गाणी
>>बादवे हल्ली जुनी गाणी अॅडच्या जिंगल्सला वापरायची फॅशन आलीय का??
त्यांना जिन्गल्स सुचली नाहित की तसं करतात. त्या एका जाहिरातित मुडमुडके ना देख वापरलंय आणि McVities च्या अॅडमध्ये पण एक वापरलंय. वर जाहिरात आणि गाणी ह्यांचा संबध नाहीये.
Pears च्या अॅडमध्ये आई मुलीला आंघोळ घालते आणि ते मांजर तिच्या हातात देते. त्या मांजरावर जर्म्स नाहीत वाटतं.
ती जीनेलीना आजकाल फेअर एंड
ती जीनेलीना आजकाल फेअर एंड लवली सोडून गार्नीअर का लावतेय?? मग आजपर्यंत लोकानां चुना लावत होती का??
दुसरी एक बकवास एड म्हणजे.. फाय-स्टार चोकलेट ची, सब भूल जाओगे, इतकेवेळ ऐकवतात की त्या एड मधला तो दुकानदार देखील कंटाळतो
कॅडबरीची शुभारंभ - बस
कॅडबरीची शुभारंभ - बस स्टॉपवरील मुलामुलीची अॅड खूप छान आहे.
अँकर टुथपेस्टची अॅड मला तरी
अँकर टुथपेस्टची अॅड मला तरी आवाडली.
कॅडबरीची शुभारंभ आणि रक्षाबंधन दोन्हीही अॅडस आवडल्या.
स्कुटी पेप्च्या अॅडाचय बबतीत गोंधळ होतोय खरा..
Aegon Religare ची नवी अॅड मस्त आहे ..
नवनीतची अॅड नाही बघितली अजुन..
ह्रतिक रोशन आणि शर्वाणीची
ह्रतिक रोशन आणि शर्वाणीची हाईड अँड सीकची अॅड मला खूप आवडते. मध्यंतरी लावत नव्हते. आता परत लावायला लागलेत. दोघेही नाचतात मस्त. आणि तेही त्या हाईड अँड सीकसाठी. म्यूझिकही मस्त आहे. मधेच थोडं थांबून आपण बेसावध असताना एक रफ अँड टफ पुरुषी आवाज येतो '' one more time''
की परत ते बिस्किटासाठी चेसिंग सुरू करतात.
शेवटी ती त्याला विचारते, '' wanna dance?'' त्यावर तो म्हणतो, '' I can't''
ह्रतिक रोशन आणि शर्वाणी दोघेही मस्त दिसतात आणि अगदी सही एक्सप्रेशन देतात. आणि डान्स तर?
Pears च्या अॅडमध्ये आई
Pears च्या अॅडमध्ये आई मुलीला आंघोळ घालते आणि ते मांजर तिच्या हातात देते. त्या मांजरावर जर्म्स नाहीत वाटतं.<< Jerms daakhavaayalaa kaay tee lifebuoy kinva supiriyachee ad aahe? aaj maratheet kaa liitaa yet nahiye?
कॅडबरीची शुभारंभ - बस
कॅडबरीची शुभारंभ - बस स्टॉपवरील मुलामुलीची अॅड खूप छान आहे.>>>> अगदी. मलाही खूप आवडते.
अॅंकर टूठपेस्ठ ही जाहेरात
अॅंकर टूठपेस्ठ ही जाहेरात बहुतेक.. तीच.. बायको हाफ चड्डीत किचन मध्ये राडा करून (दगडी) केक बनवते, मग त्याने (चुकुन)जागा सोडल्याने फ्रिजला पोचा येतो आणि फरशीची शंभरी भरते... तो असा केक उचलून तिने पुन्हा टेबलावर का ठेवावा?
नवरा (महामुर्ख) येऊन बूट्-बिट न काढता... फ्रेश न होता, थेट स्वयंपाक घरात
घुसून केकवर तावमारतो? (मेलं काही वळण? ) वाह्यात कुठला...
आणि तोंडावरून तर इतका गाढव दिसतो त्याची बायको असली
त्या जाहीरातीत कशाचाच कशाला मेळ नाही..
दक्षे सुपीरिया साबनाची "पहले
दक्षे
सुपीरिया साबनाची "पहले आप" वाली जाहिरात माझ्या डोक्यात जाते.
Pages