मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणखी एक किळसवाणी अ‍ॅड म्हणजे ibibo ची. तो चिखलात लोळणारा गाढव (त्याला माणूस म्हणणं जीवावर येतंय!) आणि त्या बाया वैताग आणतात.

सगळ्या डीओ/बॉडीस्प्रे च्या अ‍ॅड्स डोक्यात जातात.. आजुबाजुला वयस्कर माणसं असतील तर अजुनच embarrassing होतं.. Angry

इमामी साबणाची अ‍ॅड पाहीली काल, कमीत कमी कपडे घातलेली मुलगी आणि तिला २/३ मुल ओढत आहेत, पकडत आहेत आणि मग ती त्यांना पाण्यात ढकलते वगैरे... थर्ड क्लास.

>>इमामी साबणाची अ‍ॅड पाहीली काल

ही अ‍ॅड पहायचा योग अजून आलेला नाही. आजकाल जुन्या गाण्यांची मोडतोड करून जिंगल म्हणून वापरायचं जे फॅड आलंय त्या लाटेतल्या नव्या २ जाहिराती म्हणजे स्कूटी पेप (जाने दो ना) आणि यामाहा (रुक जाना नही तू कही हारके). एव्हढं कल्पनादारिद्र्य?

काल अखेर सुपिरिया साबणाची जाहिरात पाहिली....बाप मुलाला हवेत उडवतोय, आणि मुलगा हवेतच राहतो...मग बापाने सुपिरियाने आंघोळ केल्यावर परत खाली येतो...
धन्य..

सगळ्या डीओ/बॉडीस्प्रे च्या अ‍ॅड्स डोक्यात जातात.. आजुबाजुला वयस्कर माणसं असतील तर अजुनच embarrassing होतं.. >>>> अगदी अगदी... ती असीनची पण अशीच एक अ‍ॅड आहे. आधीच ती बाइ भयानक दिसते.. त्यात ती अ‍ॅड.... व्यॅक्क्क्क्क.........

इमामी साबणाची अ‍ॅड पाहीली काल>>>> डिट्टो धनश्री६. अगदीच थर्ड क्लास..... Sad

स्कुटीपेप जाने दो ना ची जाहिरात आचरटोत्तम आहे. विशिष्ट स्कुटरवर बसल्याने स्वतःची वृत्ती बदलते आणि आजुबाजुच्यांछे वागणे पण असे सुचवायचेय की 'तशी' वृत्ती असलेल्यांसाठी ती स्कुटी आहे?
जाहिरात वस्तूची करतात की आपल्या नसलेल्या क्रिएटीव्हिटीची?

मेक्स इन्श्युअरन्सची जाहिरात, तू किसका बेटा है असे बापाने विचारल्यावर त्याला 'मल्होत्रा अंकलका....कांच तोडा सिक्सर लगाके " ही अ‍ॅड हलकटच आहे.

माझा आता टिव्ही शी संबंधच नाही, पण ती मल्होत्रा अंकलवाली बघितली, मित्राकडे. अत्यंत हीन दर्जाची.
पुर्वी जाहिरांतीसाठी एक रेग्यूलेटरी ऑथॉरिटी होती. विविधभारतीवर त्या संस्थेची माहीती देत. (श्रोता किसी विग्यापन को गलत या उसे बढाचढा समझे तो, हमें इस पतेपर ...) आता नाही का ती ?

स्वप्ना,
या संस्थेपेक्षा, त्या उत्पादकाकडे तक्रार केली तर .. ? पण नकोच. जास्त प्रतिसाद मिळाला, असा दावा केला जाईल.

लहान मुलांसाठीच्या इंशुरंस स्कीम्स (स्कॉलरशिप, शिक्षणासाठी) म्हणजे पण युलिपचाच एक प्रकार्...त्या जाहिरातीं या योजनांइतक्याच निरर्थक.

प्राची, ती बाई चहापावडर मागायला येते ती. तो माणूस फेविक्विकचं गुणवर्णन करतो आणि तुम्हाला एव्हढं माहित नाही तर चांगला चहा काय करता येणार असं त्या बाईला सुनावून दार बंद करतो. दोन्हीचा काय संबंध? Uhoh

दिनेशदा, उत्पादकाकडे तक्रार करून काही फायदा होणार नाही. ते गेंड्याच्या कातड्याचे असतात (समस्त गेंड्यांची क्षमा इथे आधीच मागते!) Happy

हो स्वप्ना, गेंडे जास्त संवेदनशील असतात.
अशीच एक काल बघितलेली जाहिरात. तनिष्क ची ( किसीकी शान चुरानेसे तो अच्छा है ना ) खुप समजूतदार तरीही विचारपुर्वक. आवडलीच.

सध्या एफ़ेम गोल्ड वर वाजणारी एक जाहिरात.
कॊफ़ीशॊप मधे एका तरुणाला एक लहान मुलगी : 'हलो भैया'
तरुण :'हलो'
’भैया मै आपको थॆंक्यु कहना चाहती हूं’
(हसू दाबित) ’वो किसलिए’
’भैया मुझे थॆलिसिमिया है और हर महिने कई भैयादीदी मुझे खून देकर मेरी मदत करते हैं’
’ओह!’
’पर मुझे तो नही पता वो कौन है, इसलिए मै सबको थॆंक्यु कह्ती हूं’
’पर मैने तो अभी तक रक्तदान नही किया’
’कोई बात नही. अगली बार के लिए?’
’ हॊं जरूर!’

भरत ही जाहिरात DD1 वर रोज नियमितपणे दाखवतात चित्रीकरण ही सुंदर आहे नी ती मुलगी ही खूप गोंडस आहे.

मी पण ती रक्तदानाची जाहिरात फक्त ऐकली आहे. दिनेशदा, तनिष्कच्या अ‍ॅडमध्ये "शान चुरानेसे' आहे होय? मी "शाम चुरानेसे" असं ऐकत होते आत्तापर्यत. Cadbury celebrations ची एक अ‍ॅड छान आहे - सुमित राघवन शेजार्‍याची बेल वाजवून त्याला चॉकलेटसचा बॉक्स देतो ती. दुसरी जाहिरात - बॉस असिस्टन्टला देतो ती थोडी politically incorrect वाटते.

घ्या, कोकच्या नव्या जिंगलमध्ये पण हिंदी गाण्याची तोडफोड केली आहे. दुसरी अ‍ॅड त्या Uninor ची. बॉफ्रे च्या फोनवरून अर्धा तास आपल्या जिजाजीशी बोलणारी गफ्रे पण धन्य आणि तिचा बॉफ्रे तर महान!

जॉनसन बेबी प्रॉडक्ट्सने १०० वर्ष पूर्ण केली म्हणून एक अती गोड अ‍ॅड केली आहे, पाहिली? Happy
ते लपाछपी खेळणारं बाळ तर फार गोड Happy

अरे अमिताभ गुजरातचा ब्र्यान्ड अम्ब्यासिडर झालाय. त्याच्या रेडिओवरच्या (मिरचीवर बहुधा)गुजरातला पर्यटनाला या अशा अर्थाच्या जाहिराती ऐकल्यात का? काय जबरी आहेत. हा माणूस नुस्त्या व्हॉईस कल्चरवर काय खेळवतो ऐकणाराना.

सलाम अमिताभ....

कुठली तरी पुरुषांच्या फेअरनेस क्रीम्ची अ‍ॅड पण फार मठ्ठ आहे..
तो मुलगा हे क्रीम लाऊन नोकरीच्या इंटरव्ह्युला जातो आणि स्वतःच पॅनल ला प्रश्न विचारत सुटतो, शेवटी सिलेक्ट ही होतो..का तर म्हणे त्या क्रीम मुळे त्याला तितका आत्मविश्वास येतो Sad काय पण माठ पणा Angry

ती कुठली इंशुरंसची जाहिरात्...माणूस फोनवर बोलत चालतोय आणि खिडकीतून खाली पडतो. अ‍ॅड एजन्सी आणि कंपनी दोघांना त्या खिडकीतून खाली फेकले पाहिजे.
उषा नाडकर्णींची इंशुरंस कंपनीवाली एलायसी वर नकारात्मक जाहिरात आहे का?

अमिताभ च्या गुजरातच्या जाहिराती टीव्ही वरही आहेत आणि त्या 'तू नळी' वरही आहेत

फारच झकास..

अमिताभ त्या जाहिरातीत "गुजारिये" मधल्या "ज" चा उच्चार "जमाना" मधल्या 'ज' सारखा न करता "जनम" मधल्या "ज" सारखा का करतो ते कळत नाही. Sad

व्हिडिओकॉनच्या mobile services ची अ‍ॅड (रितेश देशमुख) मस्तच आहे! मनप्पुरम गोल्डच्या रेडिओवरच्या अ‍ॅड मात्र वैताग आणतात - जर घरात आहे सोनं तर कशाला आहे रडणं.....छ्या!

Pages