Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
अशक्य आहेत इथल्या जाहिराती नि
अशक्य आहेत इथल्या जाहिराती नि त्यावरचे रीप्लाय!
पूर्वी आम्ही अमच्या आई वडलांना जाहिरातींचे अर्थ समजावून देत असू.
आता तर आपल्यालाच कळेनासे झाले आहेत
मला एक कळत नाही की जाहिरात आवडली पण ते प्रोडक्ट कुठले हेच कळ्ले नाही तरी ती जाहिरात अपयशीच. ह्याचा हे जाहिरातदार विचार करत नाहीत का?
>>मला एक कळत नाही की जाहिरात
>>मला एक कळत नाही की जाहिरात आवडली पण ते प्रोडक्ट कुठले हेच कळ्ले नाही तरी ती जाहिरात अपयशीच. ह्याचा हे जाहिरातदार विचार करत नाहीत का?
आणि एकाच ब्रेकमध्ये लागोपाठ २-३ वेळा एकच जाहिरात लावतात तेव्हा आपण लोकांना वैताग आणतोय हेही त्यांच्या लक्षात येत नाही. स्वतः घरी टीव्ही बघतात की नाही देवाला ठाऊक. नाहीतर ब्रेकच्या वेळेस उठून जात असतील.
मायक्रोमॅक्स मोबाईल आणि
मायक्रोमॅक्स मोबाईल आणि त्याची जाहिरात दोन्हीवर बंदी हवी..आधी तो राहुल महाजन सारखा हसणारा अक्षयकुमार आणि आता सगळ्यांना पाडणारा तो तरुण.
माझ्या काही जुन्या आवडत्या
माझ्या काही जुन्या आवडत्या जाहिराती-
"हमारा कल.. हमाराआज..
बुलंद भारत की बुलंद तसवीर--- हमारा बजाज"
व्हीआयपी बॅग्ज- "कल भी आज भी.. आज भी कल भी.."
बजाज कॅलीबर बाईक- "ए चनलेवाले राही, रुकना न हारके, है तेरे इंतजारमे, साये बहार के.."(शंकर महादेवन)
नव्यांपैकी झू-झू च्या सगळ्या जाहिराती आवडतात.
ज्याची उपयोगिता सामान्य
ज्याची उपयोगिता सामान्य दर्जाची ,व खीसा रिकामा करणारी अशी कोणतीही जाहीरत ही आम्हाला मूर्ख
बनवते त्या सर्व जहीराती बकवास. उदा, सर्व साबण जाहिराती.... कोणतेही साबण निग्रोंना गोरे करत नाही.ज्या जाहीरती हीरो-हिरोईन्स, क्रिकेटर्सचे खीसे भरतात त्या सर्व जहीराती मला सामान्य माणसांसाठी लुटारुसारख्या वाटतात..जाहीरात ही एक कला राहिली नसुन ती काळ्या पैशांचा नंगा नाच
वाटते.
>>> तसं नाही ग, त्याला वाटतं
>>> तसं नाही ग, त्याला वाटतं की दिवा लावलेला आहे आतला आणि साक्षी आत आहे.
अच्छा! असं म्हणायचं होतं का प्राची तुला? मग ठिके गं
किरण, स्वप्ना-१००% अनुमोदन तुम्हा दोघांना
ज्याच्यासाठी जाहिरात केली, ते प्रॉडक्टच समजलं नाही, आणि त्याच त्याच जाहिरातींचा सतत मारा करत राहिले, तर लोक ह्या गोष्टी कशा घेणार? हे साधं समजत नाही का ह्या जाहिरातदारांना?
ज्ञानेश, मला पण त्या जाहीराती
ज्ञानेश, मला पण त्या जाहीराती खुप आवडायच्या.
अजुन काही चांगल्या अॅड्स
कॅडबरी: यादों मे उन बातोंमे जीवन के रंग निखरते है, कुछ बात है हम सभी मे, मैं खुश हूं आज खामखां
रिलायन्स मोबाईलः शहनाईकी अंगडाई, मेहंदी की खुशबू लायी
अमूल च्या सगळ्या जाहिराती.
कॅडबरी वरून आठवले, अमक्या
कॅडबरी वरून आठवले, अमक्या गोष्टीसाठी फूप लहान, तमक्यसाठी खुप मोठा, पण या चॉकलेट साठी योग्य वय्....कोणते चॉकलेट होते ते..आणि काय काय जाहिराती होत्या? कोणाला आठवतेय?
हमारा बजाजची जाहिरात खरंच
हमारा बजाजची जाहिरात खरंच मस्त होती.
पनू, कॅडबरीच्या जाहिरातीचं हे गाणं मला पण आवडतं फार, पण विचित्र हालचाली करत नाचत क्रिकेटच्या मैदानात उतरणारी ती मुलगी मात्र अजिबात आवडत नाही. हल्ली दाखवत नाहीत ना ती जाहिरात?
भरत, मला ती जाहिरात आठवत नाहीये, पण दुसरी एक आठवतेय, ज्यात मुलं एका झेरॉक्सच्या दुकानात कैरीचे झेरॉक्स काढायला घेऊन जातात. झेरॉक्स काढणारा अविश्वासाने ती कैरी झेरॉक्स-मशीनमधे घालतो आणि बटण दाबताच मुलं सांगतील तितक्या टॉफीज त्यातून बाहेर पडतात...त्या टॉफी-कंपनीचं नाव काय बरं? मस्त जाहिरात आहे ती...एकदम कल्पक!
मला ती मारुतीची "घर आ गया
मला ती मारुतीची "घर आ गया हिंदुस्तान" अॅड पण फार आवडते. ती बस बंद पडलेली असते आणि तो मुलगा "दिवाळीला घरी जायचंय"म्हणून बोर्ड हातात घेऊन उभा असतो. मग त्याला बघून एक गाडी थांबते ती. जिगलमध्ये हिंदुस्तान, भारत वगैरे आलं की इमोशनल होणार्यातले आम्ही
बाय द वे, मॅक्स न्यू यॉर्कची ती आवारागर्दीची अॅड परत लावताहेत सध्या. तो रिटायर्ड झालेला नवरा कोणाच्या तरी गाडीतून लखनऊ ते कानपूर फेरफटका मारायला जातो म्हणून वंदना गुप्ते बोंबाबोंब करते ती. तिचा मुलगा हसून मागून बघत असतो त्याचे एक्स्प्रेशन्स मस्त आहेत
सुहाना स्मार्ट मसाल्याच्या
सुहाना स्मार्ट मसाल्याच्या अॅड अशाच पाचकळ आहेत...विशेष करुन ती नवरा बायको आणि मुलाची...तो नवरा किती कमाल बावळट चेहरा करुन म्हणतो कि माझ्या आईला सांगायला पाहिजे..आणि त्यांचीच बॉस आणि एक एम्प्लॉयी यांचीहि फार यडपट आहे..
MDH मसाल्याच्या सगळ्या अॅड्स
MDH मसाल्याच्या सगळ्या अॅड्स मधे दिसणारा फेटा बांधलेला म्हातारा माणुस म्हणजे त्या कंपनीचा मालक आहे का?
बहुदा हो. नाहीतर त्याला कोण
बहुदा हो. नाहीतर त्याला कोण घेईल? एका अॅड मधे तो इतक्या जोरात पाठ थोपटतो की मारतोय वाटावे.
अजुन एक जूनी एशियन पेंट्स ची जाहीरात होती. सपनोंके रंग. वास्तुशांत असते आणि गृहिणी घरासाठी कसे पैसे वाचवते वगैरे दाखवले होते. ती पण छान होती.
लिमकाच्या नव्या जाहिरातीतली
लिमकाच्या नव्या जाहिरातीतली ती मॉडेल कोण आहे?
फार मस्त हसते ती
व्हर्जिन मोबाइलची ती अॅड
व्हर्जिन मोबाइलची ती अॅड भारी आहे ना..... कझिन इन द सिटी
>>MDH मसाल्याच्या सगळ्या
>>MDH मसाल्याच्या सगळ्या अॅड्स मधे दिसणारा फेटा बांधलेला म्हातारा माणुस म्हणजे त्या कंपनीचा मालक आहे का?
हो, तो मालकच आहे त्या कंपनीचा. MDH चा फुल फॉर्म म्हणे महाशियान दी हट्टी असा आहे. हा हट्टी मी इंग्लिश्मध्ये Hatti असल्याने हत्ती असा वाचला. संदर्भ लागेना. मग कळलं की ह्ट्टी म्हणजे हिंदीत दुकान.
>>लिमकाच्या नव्या जाहिरातीतली ती मॉडेल कोण आहे?
तो मुलगा तिच्या घराबाहेर बाईकवर बसून लिम्का पित असतो ती अॅड का? मला वाटतं ती ह्रषिता भट्ट आहे.
>>मला वाटतं ती ह्रषिता भट्ट
>>मला वाटतं ती ह्रषिता भट्ट आहे
येस्स... मी पैज जिंकलो.... माझ्या एक मित्राला ती अमृता खानविलकर वाटत होती!
पण विचित्र हालचाली करत नाचत
पण विचित्र हालचाली करत नाचत क्रिकेटच्या मैदानात उतरणारी ती मुलगी मात्र अजिबात आवडत नाही.
>>
ती त्या अॅड ची कोरिओग्राफर का डायरेक्टर स्वतःच होती...
मॉडेल ला प्रॉपर एक्सप्रेशन्स द्यायला जमेनात, म्हणून मग शेवटी सेटवरच्या लोकांनी हिलाच करायला लावली अॅड...
अरे अरे काय तुम्ही
अरे अरे काय तुम्ही लोक्स....
ती काय सुंदर जाहीरात होती (मॉडेल सुद्धा). मला जाम म्हणजे जाम आवडायची..
कितीही विचित्र वाटू देत कोणाला पण काय मनापासून एक्प्रेशन दिले आहेत तिने..
मलाही भयंकर आवडायची ती जाहि.
मलाही भयंकर आवडायची ती जाहि.
हो खुप लोकांना आवडायची ती
हो खुप लोकांना आवडायची ती जाहिरात...आणि खुप लोक होते माझ्यासारखे- ज्यांना नाही आवडायची अज्जिबात... आम्ही चर्चा करायचो ना त्यावर, तर नेहमी टोकाच्या प्रतिक्रिया यायच्या. ती जाहिरात प्रचंड आवडणार्या आणि अजिबात न आवडणार्या, दोन्ही प्रकारच्या!! अशी एखादीच असावी...जाहिरात आणि मॉडेल दोन्ही. नाही का?
मला प्रचंड आवडायची! तिचा
मला प्रचंड आवडायची! तिचा फुलाफुलांचा फ्रॉकही मस्त होता!
>> पण या चॉकलेट साठी योग्य
>> पण या चॉकलेट साठी योग्य वय्....कोणते चॉकलेट होते ते..आणि काय काय जाहिराती होत्या?
अमूल. अ गिफ्ट फॉर समवन यू लव.
कपडे धुण्यासाठी सगळे येऊन
कपडे धुण्यासाठी सगळे येऊन गेलेत, त्या किरण बेदीचीच काय ती कमी होती. काsssही कोणालाही घेतात अॅड्स मध्ये.
ति डेरीमिल्क ची जाहीरात होति
ति डेरीमिल्क ची जाहीरात होति ना?
मस्तच. मला पण फार आवडायची.
आऊटडोअर्स, अनुमोदन. तिला बघून
आऊटडोअर्स, अनुमोदन. तिला बघून मलाही आश्चर्य वाटलं. व्हॅनिशच्या अॅडमध्ये श्रीदेवी दिसतेय आजकाल. आम्ही बर्याचदा जाहिराती म्यूट करून पहातो त्यामुळे संवाद ऐकले नाहीत अजून. बाकी फिगर चांगली मेन्टेन केलेय तिने
मलाही ती अॅड खूप आवडायची
मलाही ती अॅड खूप आवडायची कॅडबरीची!
कुठल्यातरी पेंशन प्लॅनची अॅड आहे. वंदना गुप्ते स्वयंपाकघरात कामात आहे आणि नवरा म्हणतो कुणाच्या तरी दुरच्या नातेवाईक (की शेजार्याच्या) मुलाच्या लग्नासाठी कलकत्त्याला जातो कारण भरपूर पैसे आणि वेळ आहे. मेसेज आणि अॅड छान आहे पण ह्यांच्याकडे इतके पैसे आहेत तर स्वयंपाकाला बाई का नाही ठेवत?
नवरा ज्याच्याबरोबर जॉगिंगला
नवरा ज्याच्याबरोबर जॉगिंगला जातो त्याच्या शेजार्याच्या बिझिनेस पार्टनरच्या मुलाचे लग्न. उडवायला एवढे पैसे आहेत, हे बायकोला माहित नाही ना. आणि हातात लाटणे असताना दम द्यायला आणखी जोर येत असेल. याच जाहिरातीच्या पहिल्या व्ह्र्शन मधे नवरा सकाळी फिरायला म्हणून कानपूरहून लखनौला जातो. तेव्हा तर बायको नवर्याला जिन्यातच झापते, आणि मुलगा बघत असतो...तेव्हा शेवटचा सीन आणि ही लाटणे वाली जाहिरात पाहिली नव्हती तेव्हा वाटायचे, बायको अगदी शेजार्यांसमोर बिनपाण्याने करतेय.
(No subject)
मला प्रचंड आवडायची! तिचा
मला प्रचंड आवडायची! तिचा फुलाफुलांचा फ्रॉकही मस्त होता! स्मित -----
मोदक
Pages