लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

Some issue of marathi font on my mobile so typing in English.

My son is of 4 months now and having Lactose intolerance since he was 2 months old.
Doc said this is common issue in infants and asked to switch to Soya based Lactose free formula. No breast feeding.
Is there any side effects of long term feeding of Soya based formula ?
Is there any milk based Lactose free formula available in India ?
Have anybody came across this issue for their child?
I am worried.

Please help.

माझा भाचा ४ वर्षाचा आहे, त्याला डास चावल्यावर मोठ मोठया गाठी येतात. doctor करुन झाले पण doctor च म्हनण आहे की १०-११ वर्षाचा होइ पर्यत येतीलच ...पण त्याला खूप त्रास होतो....खाज पण सूटते अगाला..
खाजवल्यावर जखमा होतात व डागही राहात खुप दिवस..
यावर कुणाला ऊपाय माहिती आहे का?

mani_mani, माझ्या मुलालाही सेम प्रॉब्लेम होता!! ज्यांची पचनशक्ती कमकुवत असते त्या मुलांना साधारण हा त्रास असतो असे सांगितले गेले... गाईचे (पथमेडा) दूध, अर्धे पाणी अर्धे दूध, फॉर्म्युला दूध, वावडिंग-ओवा-शोपा टाकून उकळवलेले दूध सगळं ट्राय करून झालं!! पण चार दिवसांच्या वर गेलं की उलट्या, जुलाब, ताप!! सोयाचं ऑप्शन ट्राय केलं. सध्याच्या पेडीने सांगितलं दुध न घेतल्याने काहीच नुकसान नाही. डाळी वै. मधून प्रोटीन्स मिळतील. अगदीच द्यायचंय तर अगदी थोडं पाव वाटी पासून सुरू करावं. मग हळू हळू प्रमाण वाढवायचं... त्रास होतोय वाटलं की थांबवायचं. वय वाढतं तसं पचनशक्ती सुधारते हा प्रॉब्लेम कमी होतो.

सोया मिल्क ट्राय करून बघा. दोनच महीन्यांचा प्रश्न आहे. नंतर हळू हळू इतर पदार्थ देता येतील.

पाखरू, व्हॅसलिन किंवा इतर कुठले जरा थिक मॉइश्चर लावून बघा. बेबी क्रीम (वास/रंग/इ नसलेले) पण लावायला हरकत नाही. डायपर रॅश क्रीम सुद्धा लावून बघितलं तर चालेल असं मला वाटतंय. लहान मुलांच्या सेन्सिटिव्ह स्किनला झेपेलसं असल्यानं. मात्र डॉ.ला विचारून खात्री करून घ्या.

टियाला [३.९]फक्त संध्याकाळी बाईक वरुन बेलापुर ला गेलो तर
९ ला ताप आला
रात्र भर कन कन होत होती आज सकाळी दुध आणि १/२ चपाती खाली तरी मला मांडी वर घेऊन बस चाललेंलं

एक महि ना पण नाही झाला मागचा ताप संपुन Sad

<< मला अडीच वर्षांच्या जुळ्या मुली आहेत ,त्यांना सध्या शु पिवळी होते आहे ....काही उपाय सुचवा>>

खुप ऊन आणि पाणी कमी पिणे यामुळे पण असे होऊ शकते.

तरी पण..

प्राची, त्यांचे डोळे / त्वचा पिवळी दिसते आहे का ते लगेच बघा...
तसे असेल तर डॉक्टर गाठा ...

घाबरवत नाही तुम्हाला, पण मी २.५ वर्षाची असताना मला कावीळ झाली होती, म्हणुन एक शंका आली...

माझा मुलगा आत्ता दिड वर्षांचा आहे पण अजुनही रात्री झोपेत दुध पितो. त्याच्या डॉक्टरला विचारलं पण त्या म्हणतात जेव्हा मागेल तेव्हा दे.... त्याची ही सवय कशी मोडु कळत नाहीये... मला प्लिज मदत कराल का ??? Sad

अम्रुता, २-३ गोश्टी आहेत, त्या तुम्ही करु शकता. या टीप्स वापरुन मुलाचे फिडीग मी बन्द केले.
१.दिवसा मुलाला जर सवय असेल तर काहीही झाले तरी फिडीग देउ नका. मुल जरी किरकिरे झाले तरिहि. जेवणाची सवय लावा, जेवताना त्याचे मन गुन्तुन राहील असे करा
२.रात्री फिडीग देत झोपउ नका. त्यापेक्शा मान्डीवर, गाणे म्हणत झोपवण्याचा प्रयन्त करा.
३. रात्री मुल फिडीग साटी रडले तर कितीही त्रास झाला तरीही उटुन वाटी किन्वा ग्लासानेच दुध पाजा.
४.याने कितिही त्रास झाला तरी सवय सुट्तेच.
आजुन एक ट्रीक, मी मुलाला सान्गायचे कि मम्माला बाउ झाला आहे. ह्ळुह्ळु त्याने ते स्वीकारले. दिवसा देखील वाटी किन्वा ग्लासानेच दुध पाजा.

हे फक्त उपाय आहेत, शेवटी प्रत्येक मुल वेगळे. मी माझी प्रत्यक रात्रीची झोप मोडुन, बाट्ली न लावता हि सवय मोड्ली.

हा आजार नाहि पण तरी विचारते. माझा मुलगा परवाच ४ वर्षाचा झाला. तो शू स्व्तः बाथरूममधे जाऊन करून येतो. पण पॉटी अजिब्बात करत नाही. पुलअप्स डायपर मधेच करतो फक्त. खूप वेळा मी धरून बसवलंय अगदी अर्धा तास रडारड करेल पण कमोड नो नो. काय करावे?

पुलप्स फेकून द्या. रेग्युलर कापडाच्या अन्डरवेयर आणा त्याच्यासाठी. त्या एजग्रूपसाठी छान चित्र-बित्र असलेल्या मिळतात. पर्याय नाही हे कळलं की आपोआप सवय लागेल.

तुम्हाला शु पिवळी होते का कधी? काय करता? शरिरातील पाण्याचं प्रमाण वाढवा.
ब्रेस्ट मिल्क मिळालं नाही आणि भूक लागली आणि दुसरं दूध मिळालं आणि पोट भरलं की झोपतात पोरं. रडली तर बापाकडे झोपयला सोपवुन आईने दूर रहायचं. बाप फिरवतो, मग कंटाळा आला की झोपाळा, कार सीट, स्ट्रोलर मध्ये घालुन आणखी फिरवतो. शेवटी ते मूल पण कंटाळतं (बापाला) आणि झोपतं. यात मुल वीन आउट होतचं आणि ब्रेस्ट मिल्क सप्लाय पण कमी होतो. रात्री झोपण्यापुर्वी पोट भरलेलं असेल (मुलाचं) येवढ मात्र बघा.

ज्युसपेक्षा सुप चांगले ना. क्लिअर सुप (वेज/चिकन). लहान मुलांसाठी स्टिमर मिळतो. आधी स्टिम देवुन मग सुप किंवा दुसरे गरम पेय दिले तर फायदा होतो. मी तर सर्दीखोकला असताना मुलाला आल्याचा चहा द्यायचे. अजुनही देते कधीमधी. उलटीमध्ये कफ पडुन जातो बराच. लिक्विड डाएट्च चांगले सर्दीखोकल्यावर (सुप, पिडिअ‍ॅट्रिक वॉटर, चहा, हळदीचे दुध,वरणाचं पाणी आलटुन पालटुन हे देवु शकता)

अळशीचा काढा: चमचाभर अळशी गरम पातेल्यात टाकुन वर झाकण ठेवा. तड्तडली की दोन कप पाणी घालुन साधारण एक कप होईपर्यंत आटवा. सुंठपावडर व चवीपुरता गुळ घालुन प्यायला द्या. चांगला लागतो हा काढा.

माझी मुलगी २. ५ वर्षाची आहे तिला शी ला खूप कडक होते व त्यामुळे ती खूप रडते खूप त्रास होतो
ती गाईचे दूध बाटलीने पिते काहीच खायला बघत नाही खाण्यासाठी खूप प्रयत्न केले कृपया सांगा मी काय करू

माझा मुलगा बावीस दिवसांचा आहे आणि गेले २ दिवस त्याच्या शी ला खुप फेस येत आहे.बाकि फीडिंग वगैरे ओके आहे .नक्की काय प्रॉब्लम असू शकेल

धन्यवाद वावे
हो फक्त ब्रेस्टफीडिंग वर आहे.बाकी काहीच त्रास नाहिये म्हणजे सतत रडने न झोपणे असेही काही नाही फक्त खुप फेसाळ शी होतेय

Pages