लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

Sarika , you can now introduce him vegetable /fruit etc by boiling/cooking it in Pressure cooker n smash it fully..try with couple spoons first n see how he takes one thing at a time. A guideline is to wait for 4-5 days before introducing a new food option. I would avoid outside food like biscuit /crackers etc. Good luck Happy

तोषवी धन्यवाद आता मझ्या मूलीचि तब्यत सुधारत आहे.तिचे फ्लुइड इन्टेक वाढवले.दूध कमी करायचा प्रयत्न करत आहे.... भाज्यांच सूप चालू केलयं. डॉच पण औषध चालू आहे.काळ्या मनुकांच पाणी दिल्याने पण बराच फरक पडलाय....Thanks a lot dear....

सारीका, बाळाला सेरेलॅ़क अथवा फॅरेक्स चालू करू शकता.

अ‍ॅपल मिल्कशेक रोज देण्यापेक्षा केळी, चिकू, डाळींब, नासपती अशी इतर फळे देऊ शकता. दलिया खिचडी, शिरा, उप्पीट, लापशी, वरण, इडली, मिश्र डाळीची धिरडी, दूधपोहे असे पदार्थ देता येऊ शकतात.

गाजर्-टोमॅटो बीट-दुधी-लाल भोपळा-बीन्स-मटार-बटाटा अशा भाज्या सूप करून देऊ शकता. दुधात अथवा वरणात पोळी कुस्करून देता येऊ शकते.

ग्लुकोजची बिस्कीटे दुधातून द्यायला हरकत नाही. पण रोज रोज नको. आठवड्यातून एक दोनदा ठिक आहे. नीट बसत असेल तर हातात बिस्कीट देऊन बसवा. पण तो खात असताना कायम लक्ष ठेवणे आवश्यक.

लहान मुलाना शक्यतो घड्याळाच्या टाईमप्रमाणे त्यावेळेला तोच आहार देणे टाळणे. त्यामुळे मुलं खायला कंटाळतात. वेगवेगळ्या चवीचं जेवण शक्यतो द्यावे. थोडंथोडं समजायला लागलं की "तुला काय खायचं आहे ते सांग" हे विचारावे. फळे-भाज्यांचं सूप वगैरे देताना मीठ साखर न घालता द्यावे.

तोषवी, माझ्या लेकीला (२ वर्षे) थोडंसं कॉन्स्टिपेशन झालं आहे. केळी आणि मनुका देतेच आहे. अजून काही देता येऊ शकेल का?

नन्दिनि

डाळींबाच मिल्कशेक चालेल का? बियान्चा काहि त्रास होनार नाहि ना? दलिया खिचडी आनि दूधपोहे कसे बनवायचे ? शिरा, उप्पीट, thode thic aslyamule to khat nahi, patal karun dile tar furr karun rawa- rawa baher kadhto, . वर दिलेल्या सर्व भाज्या मी , त्याला दाल्-भातात मिक्स करुन देते.

Thanks

डाळींबाचं मिल्क्शेक नाही गं बाई.. Happy नुसत्या डाळींबाचा रस दे त्या पेक्षा. आणि बाळांचं असं खुप वेळा शी शी करणं फार कॉमन आहे. दिवसभरात १०-१२ वेळा केली तरीही... बाळाचं वजन घटत नाही म्हणजेच.. बाळाचं सगळं ठिक आहे..
बाकि इथे एक वर्षापर्यंतच्या मुलांचा आहार असा काही बाफ आहे तो बघ.

नंदिनी तोषवी सांगेलच तुला पण केळं जुलाब होत असताना देतात ना? कॉन्स्टिपेशन साठी नाही देत. ओट्स देऊ शकशील.

नंदिनी तोषवी सांगेलच तुला पण केळं जुलाब होत असताना देतात ना? कॉन्स्टिपेशन साठी नाही देत.>> नाही बहुदा कॉन्स्टिपेशनसाठीच देतात. तरी जाणकार सांगतील.
नंदिनी अजुन १ - दुधातुन तुप घालुन दे मधे मधे त्यानेही पोट साफ व्ह्यायला मदत होते.
ती रोज करत नाहि का शी? तसे असेल तर गॅसेस मुळे पण मग असा त्रास होतो. लिक्वीड वाढवुन पहा खाण्यात तिच्या.

नाही गं मोनाली. antibiotics मुळे थोडा त्रास होतोय.

फुपा. केळं कॉन्स्टिपेशनसाठीच देतात.

वर दिलेल्या सर्व भाज्या मी , त्याला दाल्-भातात मिक्स करुन देते.>>त्यापेक्षा एक मील भाज्याचे करा. म्हणजे त्याला भाज्यांच्या चवी समजतील.

भरडी पण करून द्या. त्याची कृती इथे कुठल्यातरी बीबीवर आहे. नाही मिळाली तर विपुमधे देइन.

दूधपोहे: दुधात पोहे घाला. थोडे भिजले की चमच्याने स्मॅश करून भरवा. चवीला वाटलं तर थोडी साखर घाला.

शिरा किंवा उप्पीट बनवताना साजुक तुपातून मऊ बनवा म्हणजे पातळ करायची गरज भासणार नाही. अगदी छोट्या चमच्याने भरवा. त्याला चव आवडत नसेल तर गोड कमी जास्त करून बघा, एकावेळेला दोन तीन चमचे खाल्ली तरी पुरेसे आहे.

मिल्कशेकपेक्षा फळेच दिलेली उत्तम.

भरवताना त्याचे लक्ष विचलित जरूर करा. पण टीव्ही अजिबात नको. त्यापेक्षा गाणी म्हणणे अथवा गोष्ट सांगणे हे चालू करा. पिल्लाचे लक्ष आपल्या चेहर्‍यावरच्या हावभावाकडे असताना चमचा भरवायचा. तो खाऊन होइपर्यंत आपला एन्टरटेनमेंट शो चालू.

माझ्या ८ महिन्यांचा मुलगा गेल्या ३-४ दिवसांपासुन फक्त दूध प्यायला मागातोय. दाल भात, खीर काहिच खात नाहि. त्याला जरा सर्दि झाली आहे. काय करू? तो अजुनपन रात्रि ३-४ वेला उथतो

फुपा. केळं कॉन्स्टिपेशनसाठीच देतात. >>>>> नाहि.केळं जुलाब झाल्यावरहि देतात. बेसिकली पोट नॉर्मल व्हावं याकरीता केळं आणि दहि उपयोगी आहे.
सारिका सर्दीमुळे त्याला भूक नसेल लागत. थोड्या दिवसात पुन्हा जेऊ लागेल.
आणि झोपेचा माझ्या मुलाचा अनुभव म्हणजे तो सव्वा वर्षाचा झाल्यावर बर्‍यापैकि नीट झोपु लागला. मी एवढं शिकलेय कि मुलं त्यांच्या नेमानेच नवीन गोष्टी शिकतात. आपण फक्त प्रयत्न करत रहायचं.आणि संयम ठेवायचा. तुमचा मुलगा दूधाकरीता उठतो का?माझा मुलगा तसं करायचा आणि त्याला फक्त आईच लागायची.मग एक दिवस रात्री तो उठल्यावर मी दुसरीकडे लपले,नवर्‍याने त्याला बॉटलने दूध पाजायचा प्रयत्न केला,आधी तो रडला पण आई दिसतच नाहि म्हणल्यावर गपचूप दूध पिऊन झोपून गेला. असं दोन तीन दिवस केल्यानंतर दूधाची पण गरज लागली नाहि.बर्‍यापैकि झोपायला लागला.
हा उपाय मला माबोवरच मिळाला.

नंदिनी मी केळ्याबाबत आता कन्फ्यूस झाले आहे. मला चांगलं आठवतय स्टमक फ्लू झाला की डॉ. मुलांना केळं द्या सांगतात. मी दिलय निलय ला लहानपणी. माहीत नाही. तोषवी ला विचारलच पाहिजे आता. कदाचित भान म्हणते तसं असेल मग त्याने पोट नॉर्मल होत असेल.

नंदिनी ,antibiotics मुळे थोडा त्रास होतोय.>> असं असेल तर ह्या प्रकारच्या औषधा मुळे इंटेस्टाईन मधेले चांगले बॅक्टेरीया पण मरतात असतातआणि त्यामूळे जुलाब किवा भसरट शी होते.जर बरेच चांगले बॅक्टे. मेले तर मग आतडयाचा अतले स्तर (इन्टेस्ताईन) कोरडी होतात.त्यामुळे कधी कधी कॉन्स्टीपेशन चा ही त्रास होउ शकतो.
तिला खूप पाणी शक्यतो कोमट देउ शकतेस
काळ्या मनुका , apricots, prunes, pears, plums , peaches देउ शकतेस.
केळ देउ शकतेस पण ते पूर्ण पिकलेले (थोडे काळे ठीपके अस्लेल्या सालीचे) दे.
दूधात तूप घालून दे.
,antibiotics चा कोर्स संपे पर्यंत तिला विटॅमीन बी कॉम्प्लेक्स द्यायला हवे.
प्रोबायोटीक स्प्लीमेन्ट्स मिळतात मुलांसाठीचे किवा घरच्या गोड ताजे दही दे.

माझ्या ८ महिन्यांचा मुलाला viral infection झालय, सर्दि, ताप, खोकला. कफ झाला होता. doctorani formulla milk बन्द करायला सान्गितलय. आता सर्दि, ताप, नाहिय. पन काहिच खात नाहि. त्याला गायीचे दूध दिले तर चालेल का? त्याने कफ होतो का ? त्याला काय खायला देउ ? तान्दलाचि पेज तो पितोय थोदि थोदि , पन बाकि काहिच खात नाहिये. आज ३-४ दिवस झाले.

दूधात तूप घालून दे.>>> हे वरचेवर दिले तर चालते ना? मध्यंतरी मुलाला उष्णतेने त्रास होत होता म्हणुन सुरु केले तर त्याला तेच आवडतेय. रोजच दुध तुप मागतो / नाहितर कॉफी Uhoh
मला दुध तुपाचा ऑप्शन जास्त चांगला वाटतो हे योग्य आहे का?

मी चुकिच्या ठीकणी प्रश्न विचारते आहे पण कोणितरी मदत करा.मी (folvita 5mg)च्या गोळ्या घेते आहे गर्भधारणेसाठी त्या योग्य आहेत का?
5mgचा डोस जास्त strong आहे असे मला वाटते मी कुठेतरि वाचले आहे कि ४०० मायक्रो ग्रमच्या गोल्या घ्यायच्या असतात.यामुळे गर्भधारणेसाठी काहि प्रोब्लेम होइल का? कोणीतरि मार्ग्दर्शन करावे प्लिज...............

mazi mulgi 8 mahinyachi hoil ata....tari pan ratri te sarkhi uthate feed sathi....dr ni tila night time feed band karayla sangitale ahe...te neat zopavi mahnun me kay karu?tasch tila bottle ne fakat dudh haav asat...baki khayla kahi nako....tich he savay janaysathi me kay karu...tasch tich routine kas set karu?

.mazya mulila fallots tetrology ahe …dr ni open heart surgery suggest keli ahe tari mala as vicharaych hoat ki ayurvedic madhe kahi upay ahe ka?tasch tich weight kami ahe…me tila…sakali 9 vajata dryfruit dudhat barik karun dete…tyannater 11 vajata dudh deun zopi jate …..mag 1 -1.30 vajata vegetable soup dete(cauliflowr+potato+tomato+carrot+jeera powder+ghee) tyannter te thod dudh piun zopate 3 vajata…….5 vajata ekdade fruit-7 vajata biscuit dudh kiva rice cereal-9 vajata khichdi dete…haa ticha ahar barobar ahe ka?ki ajun kai deu?tasach tila nehmi julab vomiting chalu asat…te band honyasathi kay karu?

maza mulga 4 mahinyacha aahe.tyala satat sardi aani khoklacha tras hoto.to satat dole aani kan khajwat asto.tyala doc ne sardisathi ambrodil syp aani khoklasathi codistar cough syp dile aahe pan tyacha kahi upyog hotana disat nahi plz mala lavkarat lavkar konitari upay sanga.plzzzzzz

मनिशा_२८ | 9 November, 2012 - 15:37
maza mulga 4 mahinyacha aahe...................

मी काही डॉक्टर नाही. पण अनुभवावरून थोडेफार सांगू शकेन.
ताप नाही पण सतत सरदी असेल तर ती साधारणपणे ऍलर्जीक स्वरूपाची सरदी असते. लहान वयात प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे सरदीचा वारंवार त्रास होते. तीन वर्षानंतर हा त्रास कमी कमी होत जातो. पण तोपर्यंत दम काढावा लागतो. सरदी जेव्हा होते तेव्हा त्यावेळच्या परिस्थितीचे निरिक्षण करावयास हवे. पाळीव प्राण्याचे केस, लोकरीच्या कपड्याचे धागे, पराग व पुंकेसर, कोंबडी किंवा तत्सम प्राण्याची पिसे अशा काही कारणांमुळे ऍलर्जीस्वरूपाची सरदी होते. बाहेर दमट हवा पडली किंवा जास्त थंडी पडली की काही मुलांना त्रास सुरू होतो. आपण निरिक्षण करत राहावे व ती-ती कारणे टाळावीत. कधी कधी एखादे कारण ट्रिगर सारखे ऍक्ट होते, असे कारण टाळावे.
घर, मुलाचा बिछाना व पांघरूण व्हॅक्यूम क्लिनरने साफ करावे. बाळाचे कपडे, अंथरूण, पांंघरूण कडक उन्हात वाळवावेत. घरात घेण्यापूर्वी ते भरपूर झाडून घ्यावेत.
औषधे माहित आहेत पण मी अधिकारी नसल्यामुळे सांगता येणार नाही. एवढेच सांगेन बाळ जसजसे मोठे होत जाईल तसतशी प्रतिकारशक्ती वाढत जाते व हा त्रास कमीकमी होत जातो. दरम्यान कुमारीआसव सारखी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने द्यावीत. मात्र अशा औषधामध्ये सातत्य असावे. सरदी कमी झाली की बंद असे नको. छाती भरली असता तेलामध्ये घालून छातीला लावण्यासाठी अगोम सूक्ष्माषौधि, रत्नागिरी ह्यांचे "कफना' हे सूक्ष्माषौधि पण उपलब्ध आहे.
महत्त्वाचे म्हणजे बिस्कीटे (बेकरी प्रॉडक्ट), हल्ली उपलब्ध असणारे कुरकुरीत पाकिटबंद ("No Added MSG - पदार्थांच्या मसाल्यात आहे पण वरून टाकलेले नाही" अशी दिशाभूल केलेले) पदार्थ कटाक्षाने टाळावेत. अर्थात आपले बाळ लहान आहे त्यामुळे सध्या प्रश्न नाही पण तुम्ही खात असाल तर तुम्हीदेखील सध्या टाळणे उत्तम. कारण त्यामधील वनस्पती तूप व एम्‌. एस्‌. जी. (मोनोसोडीयम ग्लूटामेट) हे पदार्थ मुलाच्या दृष्टीने नक्कीच अहितकारक आहेत. पुढे बाळ मोठा झाल्यावर त्याला असल्या पदार्थांची सवय लागू देऊ नका. बाळ जेवू लागल्यावर वरण-भात-(शक्यतो देशी गायीचे) तूप-लिंबू-मीठ(शक्यतो उपवासाचे मीठ अर्थात सैंधव) आहारात ठेवा. त्यातील लिंबामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते तसेच वरणाचे पचन सुलभ होते.

(ता. क. - एका माहितगाराने मला सांगीतलेले होते की, आदल्या दिवशी पाण्यात भिजवलेली केशराची काडी मुलाला दररोज दूधामध्ये घालून किंवा उगाळून दिली तर त्याची प्रतिकारशक्ती वाढते व कफाचा त्रास होत नाही. तथापि तथापि या संदर्भात तञ्ज्ञाचा सल्ला घ्यावा किंवा माबोवरील तञ्ज्ञांनी मार्गदर्शन करावे.)

Thanks Harihar,
me tumhi sagitalele medicine nakki suru karen pan mala ajun sangayche aahe,to ratricha kupach radat asto .aaj tar divasbhar kirkir karat hota nakki samjat nahi to ka radat hota aata shant aahe pan mala khup kalji vatat aahe.me tyala ajun baherche kahi khayla det nahi breastfeedingch karat aahe. docla vicharle tar tyani gas mule to radat asto aani tyala kharch gasescha problem aahe pan medicine ghetle tari rahat nahi.To jast radayla lagla ki tyala Doc ne PHENARGAN SYP sangitale aahe .mala ya medicine sathi jara doubt aahe ,me tyala te medicine deu ka? mhnje kahi side effect nastil na,aadich tyala sardi khokla ,gasche aani 2 tonic(mcalvit aani visyneral drop)det aahe .tyachyvar khup medicinecha dabav yetoy mhn tension yetey.tyala sitopladi churn dile tar chalel ka?

tyala sitopladi churn dile tar chalel ka? >>>>>>>> मनिषा, तुम्हाला अ‍ॅलोपॅथीची औषधे द्यायला नको वाटत असेल आणि आयुर्वेदिक औषधे द्यावी वाटत असतील तर एखाद्या उत्तम वैद्याचा सल्ला घ्या, एवढया लहान मुलांना कोणत चाटण द्यायच आणि त्याची मात्रा किती द्यावी हे तेच व्यवस्थित सांगु शकतात.
मी स्वतः माझ्या मुलीला पहिल्यापासुन आयुर्वेद औषधे देते. (तिच्या पेडी कडे रेग्युरल चेकअप आणि लस देण्यासाठीच फक्त जात होते. त्यांना मी सांगितल होत की शक्य तेवढी आयुर्वेदिक औषधे देणार आहे. )

मनिशा_२८ | 9 November, 2012 - 20:50
Thanks Harihar,
me tumhi sagitalele.......................

मुलाला फिडींग देत असताना आईने देखील खाण्यापिण्याची पथ्ये पाळली पाहिजेत असे जुनी माणसे सांगतात. आधुनिक वैद्यकशास्त्र असे मानत नाही. आहार-विहारासंदर्भातील आयुर्वेदाचे नियम आदर्श आहेत. त्यामुळे आहार-विहाराचे नियम मातेने पाळावेत असे मला वाटते. त्यासाठी हरभरा, वांगे, कांदा यासारखे वातूळ पदार्थ टाळावेत. आपला आहार सात्त्विक ठेवावा.
फेनार्गान (प्रोमेथॉझिन) व बेनाड्रील (डायफेनहैड्रामाइन ) ही प्रभावी ऍन्टीहिस्टॅमीन्स आहेत. त्यामुळे चांगलीच सुस्ती येते. शक्यतो ऍलर्जीवरती (खाज, अंगावर पुरळ उठणे, गांधी उठणे, ), बस वा विमान लागू नये किंवा सुस्ती यावी म्हणून हे औषध वापरतात. पण हे औषध दोन वर्षाच्या खालील मुलाला देऊ नये असा प्रवाद आहे. त्यामुळे या संदर्भात अन्य डॉक्टरचादेखील सल्ला घ्यावा असे मला वाटते. ओला खोकला असताना (विशेषकरून दम्याच्या आजारात) ऍन्टीहिस्टॅमीन्स वापरले तर श्वासनलिकेच्या आतील चिकटा घट्ट होतो व श्वास घेण्यास त्रास होतो.
घरी वाफेचे मशीन (ओमरॉनचे नेब्यूलायझर) ठेवले व नॉर्मल सलाईनची वाफ दिली असता सलाईन वॉटरमुळे (मिठाच्या पाण्यामुळे) नाकातील स्राव पातळ होतो व नाक मोकळे होते. या मशीनचा मोठ्यांना देखील खूप उपयोग होतो.
रात्री झोपताना नाकात घालायचे लहान बाळासाठीचे (नेझोमिस्टसारखे) नेझल्‌ ड्रॉपदेखील हल्ली उपलब्ध आहेत. डॉक्टरी सल्ल्याने ते वापरावेत. त्यांचा उपयोग होत.
मुख्य म्हणजे बाळ का रडते आहे याचा शोध घ्यावा. निरीक्षण करावे. बाळाच्या पोटात दुखत असल्यास पोटाला हात लावू देत नाही. मातेचे स्तन चावते. मल साफ होत नाही. हिमालयाचे "बोनिसान' औषध छान आहे. मूलही ते आवडीने घेते.
बाळाला खांद्यावर उभे धरून झोपल्यानंतर अंथरुणावर आडवे झोपवल्यावर नंतर काही वेळाने रडत असेल तर नाकातील स्राव घशात उतरतो व बाळाला श्र्वास घ्यायला त्रास होतो अशावेळी ते रडते. पुनश्र्च खांद्यावर घेतल्यानंतर शांत होत असेल, अशावेळी खांदे व मस्तक एका उशीवर ठेवून थोड्या कललेल्या पोझ मध्ये बाळाला झोपवावे. किरकिर करणारी मुले झोळीमध्ये शांत झोपतात असा अनुभव आहे. (झोळीमध्ये बाळाला जणू काही मातेच्या पोटातच आहोत असे वाटून आश्वस्त वाटत असावे.)
कधी कधी अगदीच काही सुचेनासे झाले असता श्रद्धावंताने "अच्युतानन्त-गोविंद-नामोच्चारण-भेषजात्‌। नश्यंति सकला रोगाः सत्यं सत्यं वदाम्यहम्‌।।' पठन केले असता मन शांत होते व काहीतरी प्रेरणा मिळून मार्ग सुचतो असा अनुभव आहे.
ता.क. (1) मुलांचे रडणे हा देखील बाळाच्या दृष्टीने एकप्रकारचा व्यायामच आहे. त्याने फुप्फुसांचा व्यायाम होतो व ती कार्यक्षम होत जातात. हे अगदी नॉर्मल आहे असे मला वाटते. त्यामुळे फार काळजी करू नका पण दक्ष राहा. (2) केवळ नेट वर वाचून कोणत्याही औषधाविषयीचा निर्णय घेऊ नका. तुमचा डॉक्टर जर एम्‌. डी (पेडी) असेल तर त्याच्यावर पूर्ण विश्र्वास ठेवा. त्याला आपल्या लाख शंका विचारा परंतु डॉक्टर शक्यतो बदलू नका. कारण त्याला आपल्या बाळाची प्रकृति माहीत झालेली असते. पण लगोलग अँटीबायोटिक देणे किंवा स्टेरॉइडयुक्त औषधे देणे असे काही घडत असेल तर मात्र अन्य डॉक्टरचा जरूर सल्ला घ्या.

माझंही बाळ ६ महिन्याचे आहे. सध्या त्यालाही सतत कफाचा त्रास होतोय. छातीतून सतत घरघर ऐकू येते. त्याला सुंठ लावली तर चालेल का पाण्यात कालवून?
इथल्या डॉ. ना काही औषधे विचारली की काही द्यायचे नाही सांगतात. Sad

अंजली_१२ | ..........छातीतून सतत घरघर ऐकू येते. त्याला सुंठ लावली तर चालेल का पाण्यात कालवून?

बाळाची त्वचा खूपच नाजूक असते. त्यामुळे सुंठेचा जर लेप दिला तर बाळाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तो नको. त्याऐवजी थोडे फार शेकले तर एकवेळ चालेल. आमच्या इकडे बाळाला अंघोळ घातल्यानंतर त्याच्या तळपायांना व छातीला वेखंडाचा हलकासा हात फिरवतात. त्याचा रिझल्ट चांगला आहे. पण वेखंड डोळ्याला लागले तर मात्र खूपच आग आग होते.
कफाचा चिकटा असेल तर छातीतून घर्र्‌ घर्र्‌ असा आवाज येत राहतो. बाळाच्या पोटात भरपूर लिक्विड गेले की कफ पातळ होऊन तो सुटण्यास मदत होते. मोठ्यांनी देखील कफ पातळ होण्याचे औषध घेण्यापेक्षा भरपूर कोमट पाणी पिणे, गरम पाण्याच्या वाफेचा फवारा घेणे हे केव्हाही चांगले. पण लहान बाळांना गरम पाण्याचा वाफारा देता येत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी सलाईन वॉटरचे नेब्यूलायझेशन हे उत्तम. तुमच्या डॉक्टरांना विचारा की बाळाला कफाचा त्रास होतो आहे तर मी नेब्यूलायझर घेऊ का? माझा अनुभव आहे की आमच्या येथील डॉक्टर पेशंटला शक्यतो नेब्यूलायझर घ्यावयास सांगत नाहीत तर त्यासाठी त्यांच्या दवाखान्यात यावयास सांगतात. एखाद्या वेळेस पेशंट वर एकदम आर्थिक ताण पडू नये हा सद्‌हेतू असेल. पण रात्री अपरात्री बाळाला नेब्यूलायझर देण्यासाठी डॉक्टरकडे जावे लागणे हा एक हॉरिबल अनुभव असतो. त्यापेक्षा आपली आर्थिक कुवत असेल नेब्यूलायझर घेणे हे केव्हाही उत्तम. सलाईन वॉटरच्या नेब्यूलायझेशनचा माझ्या माहितीत तर कोणताही साइड इफेक्ट नाही.
आणखीन एक - जेव्हा आपण भरपूर गरम पाण्याने अंघोळ करतो तेव्हा वाफ कोंडली गेल्यामुळे बाथरूममधील हवा दमट झालेली असते. अशा दमट बाथरूममध्ये बाळाला दररोज थोड्यावेळ खेळवल्यासारखे करावे. म्हणजे त्या निमित्ताने थोडीफार वाफ त्याच्या छातीमध्ये जाते व त्यामुळे कफ पातळ होण्यास मदत होते.

हरिहर छान माहिती सांगितलीत तुम्ही. सुंठ नाही लावणार मग.
सलाईन स्प्रे आहे डॉ. मोस्टली तोच वापरायला सांगतात आणि हो नेब्यूलायजर पण आहे घरी.
तेवढ्यापुरता कमी होतो असं वाटतं पण बंद केला की परत येरे माझ्या मागल्या Sad
आळ्शीचा काढा द्यावा का इतक्या लहान मुलांना?

तेवढ्यापुरता कमी होतो असं वाटतं पण बंद केला की परत येरे माझ्या मागल्या >>> डॉक्टरांनी दिवसातून किती वेळा वापरायला सांगितलाय नेब्युलायझर ? तितक्या वेळा वापरुन औषधाचा कोर्स नक्की पूर्ण करा.

तुमच्या बाळाला बाळदमा असल्यास किंवा एकूणातच सर्दी-पडसेवाली प्रकृती असल्यास पहिली २-३ वर्ष तरी त्रास होइल. हळुहळु कमी होतो त्रास. एकूणात श्वसनाचे विकार असतील तर घरगुती औषधोपचारांपेक्षा डॉक्टराने सांगितलेल्या उपचारांवर जास्त विश्वास ठेवावा असं मी म्हणेन.

सिंड्रेला त्याला ३ वेळा द्यायला सांगितलं आहे नेब्यू.
हे त्याचं ६ महिन्यात सारखं होतंय आता भारतात गेले कि दाखवीनच दुसर्‍या डॉकला.
तोपर्यंत त्याची घुरघुर ऐकवत नाही रोज. Sad

Pages