लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

ondem होत घरी, पन नेमकी त्याची expiry date होउन गेलि होती गेल्याच महिन्यात, म्हनुन ते दिल नाही.

फार उलट्या होत असल्या अन पोटात काही रहात नाहि असे झाले की इथल्या आजीबाईचा बटव्यानुसार फ्लॅट कोक थोडा थोडा द्यावा म्हणतात. ताजा कॅन उघडून २०-२५ वेळा एका कपातून दुसर्‍यात करावा व थोडा थोडा देत रहावा. डिहायड्रेशन होत नाही व उलट्या पण थांबतात. माझा तरी अनुभव चांगला आहे

सर्वांना नमस्कार.

माझी लेक आशिता एक वर्षाची आहे. तिचे केस विरळ असल्याकारणाने सगळ्यांच्या सांगण्यावरून दोन आठवड्यापूर्वी तिचे जावळ केले आहे. दुसऱ्या दिवसापासूनच इथे मुंबईत पावसाला सुरुवात झाली आणि तिला ताप, सर्दी आणि खोकला सुरु झाला. तिच्या डॉक्टरना दाखवून औषधे चालू केली आणि चार दिवसांनी तिला बरे वाटले. एका आठवड्याच्या फरकाने आता परत तिला हा त्रास चालू झाला आहे. रविवारी संध्याकाळपासून ताप होता. डॉक्टरांनी तिला ताप असेल तर दर सहा तासांनी pacimol आणि खोकल्यासाठी सुदिन कीड नावाचे कफ सिरप द्यायला सांगितले आहे.तसेच ताप आला कि तिचं डोकं खूप गरम होतं. आता तिला ताप नाही पण खोकला आहे. ती खूप चिडचिड करते आणि काही खात नाही आहे. रात्री पण नीट झोपत नाही घाबरल्यासारखी मधेच उठून रडत बसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती औषध घेण्यासाठी अजिबात तोंड उघडत नाही. जबरदस्तीने पाजले तर खूप रडते आणि लगेच खोकला काढून उलटी करते. तसेच रात्री अंगावर चादर किंवा रजई टाकली तरी उडवून लावते त्यामुळे तिला थंडी बाधत असेल का?
लहान मुलांच्या या कॉमन समस्यांवर काही उपाय असतील तर सांगाल का? आम्ही दोघं नवराबायको यामुळे घाबरून जातो आणि काय करावे ते रात्री - अपरात्री सुचत नाही. कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

माझा मुलगा २.८ वर्शाच आहे. काल त्याल जुलाब झाले २ वेळा, मग डॉ. नेउन आणले, पण तो रात्रि पासुन काहि जेवत नाहिये. सकाळी ३-४ बिस्किट खाले, त्यानन्तर अजुन काही खाले नाहिये. काहिहि देउ का विचारल तरी नको म्हणतोय. लस्सी आणि मॅगी दिली तर खाईल कदचित, पण आजारपणात हे द्यायला ही नको वाटतय.
तर आता त्याला काय देउ?

११ महिन्याच्या बाळाला सर्दी, कफ साठी सितोपलादी चुर्ण दिले तर चालेल का? चालत असेल तर किती द्यावे? अजुन त्याला मध कधीच दिलं नाहीय, आता हळद्+मध दिले तर चालेल का? दुध तो आवडीने घेतोय पण दुधाने कफ वाढतो म्हणतात ना? सर्दी कफ कमी करण्यासाठी काय करता येइल? सिरप्स चालु आहेत डॉ. सल्ल्यांनी पण ३ दिवस झाले तरी काही फरक नाही. पिल्लु हैराण झालंय.

इथे अमेरिकेततरी मध आणि दूध एक वर्ष पूर्ण होईस्तोवर नको म्हणतात.
शेकून पाहिलंत का? थोड्या खोबरेलात विक्स मिसळून ते छातीपाठीला लावून पहा. उशापाशी नीलगिरीचे थेंब टाकलेला टॉवेल ठेवा. नाक चोंदलं असेल तर नेजल स्प्रे वगैरेंनी तात्पुरता आराम वाटतो. बाकी सर्दी ४-५ दिवस काढतेच. ताप नाही ना हे महत्त्वाचं.

धन्यवाद, स्वाती_आंबोळे,
तुम्ही सांगितलेले उपाय करुन पाहते, ताप गेले २ दिवस सकाळचा यायचा आज नाही आला. नेजल स्प्रे ने ही तात्पुरतच बरं वाटतंय. सर्दीचा काही इतका त्रास नाहीय पण कफामुळे खाणं कमी झालंय. त्याला तो बाहेर टाकायलाही जमत/कळत नाहीय. खुप खोकतोय. शी तुन कफ जाईल असे काही तरी घरगुती औषध असते ना?

साक्षीमी, सितोपलादी चुर्ण सुद्धा दोन वर्षाचा झाल्याशिवाय द्यायचं नाही असं अश्विनीने सांगितल्याचं आठवतं आहे.

शी तुन कफ जाईल असे काही तरी घरगुती औषध असते ना?>>>
यवक्षार (जवक्षार) नावाचे एकप्रकारचे भस्म आहे. पाण्यात ते चिमुटभर टाकून दिवसातून दाोन/तीन वेळा पाजले असता कफ सुटताो खाोकला हाोऊन ताो पाोटात जाताो आणि नंतर ताो शी वाटे पडताो असा अनुभव आहे.

अळशीचा काढा देतात कफासाठी. भारतात असाल तर तयार अडुळसा वगैरे देऊ शकता कदाचित. पण डॉक्टरला विचारा देण्याआधी.

हरिहर
अळशी,पांढरा कांदा,तुळस, २-३ मिरी दाणे,आले व खडीसाखर यांचा काढा कफासाठी उत्तम असतो.लहानमुलांना
देताना मिरी दाणे,आले कमी घालावे. पांढरा कांदा सारक असल्याने उलटी किंवा शी वाटे कफ पडतो.अर्थात कमी
सर्दी असेल तर हा घरगुती उपाय ठीक आहे.

शी तून कफ कसा जाईल? त्या दोन वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. श्वसनाची आणि पचनाची. प्रॉपर पेडीचा सल्ला घ्या.

माझी लेक[२.५ ] अजिबात जीभ घासु देत नाही ,जबरदस्तीने घासलीकी खुप जोरात चावते
तिला खुप समजवुन पण झालय की जर्मस येतात , डॉ टुच करतात ई. पण काही उपयोग नाही त्यामुळे
माझ्या लेकी च्या तोंडाचा खुप वास येतो,
काय करु?

अमा, अगदीच gross वाटतंय लिहायला, दोन वेगळ्या सिस्टीम्स असल्या तरी मिळतात ना कुठेतरी.. चहा/पाणी/सोडा येतो की (लोकांच्या) नाकातून बाहेर. मग कफ गिळू नाही शकत?
[yukk..yukk..yukk.. ]

धन्यवाद सर्वांना... अमा मलाही नक्की माहित नव्हतं.. ऐकीव माहिती होती म्हणुनच इथे विचारलं अनुभवी लोकांना.. पेडी/ अ‍ॅलोपथी वाले कधीच घरगुती किंवा आयुर्वेदिक उपचारांना संमती देत नाहीत. पण औषधांनी फरक पडत नाहीय म्हणुन थोड्या प्रमाणात घरगुती उपचार करायचे ठरवलेय. बाळ लहान आहे त्यामुळे जास्त काही करु शकत नाहीय्. डॉ. नी वेळ लागेल सांगितलंय, पण एवढंस पिल्लु किती सहन करेल ना..

पिंपळी ,सुंठ , वेखंड , कायफळ, बेहडा उगाळुन (पाच फेरे) मधाबरोबर चाटवावे.[बालाजी तांबे]
ज्येष्ट्मध उगाळुन मधाबरोबर द्यावे.
हळद मध तुप (मध तुप समप्रमाणात नको) द्यावे
आल्याचा रस/सुंठ व खडीसाखर द्यावे.
पण कफ शी मधुन जातो. शी मधुन चिकट दिसायचे तो कफच असावा असे मला तरी वाटते.
माझ्या मुलीला १ महिन्याची असताना पासुन नियमीत मध दिले.

दुध तो आवडीने घेतोय पण दुधाने कफ वाढतो म्हणतात ना?
दुधात किंचीत सुंठ व हळद टाकुन कोमट शक्यतो द्यावे.

खोकला खुप जास्त असेल तर अधुन मधुन खडीसाखर द्यावी.

http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/106477.html बघ अश्वीनीने लिहिलेय. साधारण थोडी सर्दी होते असे वाटताc ज्येष्टमध, सुंठ(अगदी किंcईंत), वेखंड(ते ही अगदी किंcईंत) मधातून देणे. - अश्विनी

माझ्या मुलाला (वय २.७ वर्षे) १३ तारखेपासून ताप येत आहे. म्हणजे इतरवेळी ठीक असतो, सकाळी आणि दुपारी झोपून उठल्यावर ताप असतो, आता पर्यंत ३ डॉक्टरांना दाखवून झालाय, सर्वांच हेच म्हणन आहे कि वायरल इन्फेक्शन आहे, antibiotic च्या दोन बाटल्या देऊन झाल्या, काल पासून थोडा खोकला हि सुरु झाला आहे. जेवण व्यवस्थित घेतो आहे.

गेल्या आठवड्यात मलेरिया ची टेस्ट पण करून झाली, ती पण नॉर्मल आहे, मलेरिया नाही दाखवत आहे.

मग हे रोजच्या तापाच काय कारण असेल, आणि त्यासाठी काय द्यायला हव?

माझ्या ही मुलीला ताप्[झोपेतुन उठल्यावर येतोय डॉ ने एक antibiotic
जेवण + मस्ती व्यवश्तीत चालु आहे
खुप१ का डोळ्यातुन खुप घाण येत आहे

मग हे रोजच्या तापाच काय कारण असेल, आणि त्यासाठी काय द्यायला हव?..................माझ्या कलीगच्या
२वर्षे वयाच्या मुलीला अशीच लक्षणे होती.तिलाही वायरल इन्फेक्शन म्हणूनच सांगितले.नंतर अंडर ऑब्सरवेशनखाली तिला ३ दिवस हॉस्पिटलमधे ठेवले होते.तेच निदान होते. तुम्ही तीन डॉक्टरांना
दाखवले म्हणता ते पहिल्या डॉ.ला विचारून दाखवले होते का? बर्‍याचवेळी डॉ.चा गुण नाही आला की स्पेशॅलीस्ट
कडे जातात.पण आधीच्या डॉ.ला पेशंट्ची हिस्टरी माहीत असते.(मी एकदा केले होते तेव्हा आधीच्या डॉ.नी हे
सांगून कान पिळले होते)

तुम्ही तीन डॉक्टरांना दाखवले म्हणता ते पहिल्या डॉ.ला विचारून दाखवले होते का? >> नाही

पण प्रत्येक वेळी नवीन डॉक्टर कडे जाताना, आधीच्या डॉक्टरने दिलेली औषधे दाखवली होती, आणि त्यांना सांगितलं होत कि आधी या डॉक्टरांकडे जाऊन आलो होतो, पण गुण आला नाही म्हणून इथे आणल आहे.

२ दिवसा पासुन माझ्या मुलीने २.७ रडुन रडुन मला हैराण केलय
कोणतीही छोटी गोस्ट नाही पटली की लगेच भ्या
तीला बरे नव्हते २ दिवस तेव्हा बरी होती आता अचानक आशी वगत आहे कि जिव नकोसा होतोय
सर्दी खोकला होता ताप होता पण आता खोकला आहे अजुन पण उगीच चिडचिड करत आहे
प्लिज काही तरी उपाय सांगा

प्रिती, आजारपणामुळे बाळं होतात गं जरा चिडचिडी. त्यांना काय होतय ते नीट सांगताही येत नाही. त्यामुळे काहीतरी कारण काढून रडतात. लेकीला काय आवडते? तिचे मन रमेल असे काहीतरी करायचे. गाणी, गोष्टी वगैरे. येइल गाडी हळूहळू रुळावर. Happy

लेकीला काय आवडते>>> तिला यु ट्युब वरच्या ए बी सी डी ट्रेन आवडते ,,, आता बाबा घेउन जातो ईनटरनेट डोंगल रोज तर तिला काय दाखवु ?
गाणी, गोष्टी >> सगळं चालु आहे ... तिने काही मागितले तर भिती वाटाते नको म्हणायची...:(
सकाळ पासुन नुसता भात खाउन झोपलयं आता

प्रितीभुषण, या वयात मुलं असं वागतातच! त्यात आजारपण झालं असेल तर जास्तच!
तिला जे काय आवडत असेल (उदा. नुसता भात/फळं/दही) ते खाऊ दे सध्या. थोडी बरी झाली की खाण्यापिण्याचे, खेळण्याचे रुटिन बसव परत.
इंटरनेट नसेल तर तिला थोडा वेळ टीव्ही बघु दे, गाणी लाव, खेळ, पुस्तके वाचुन दाखव, चित्रं काढायला दे, छोटीशी चक्कर मारुन ये तिला घेऊन, शेजारी घेऊन जा, शेजार्‍यांना बोलाव. जरा वेगळी मोठी माणसं आली/दिसली तरी मुलांना बरं वाटतं. सतत आपल्यासोबत राहून तीही कंटाळतात.

अगं असं करतात मुलं आजारपणातून उठल्यावर. माझ्या मुलाने असं एकदा फक्त फळांवर दिवस काढलेत. नो प्रोटीन्स..पण दोन तीन दिवसानंतर थोडं मऊ वरण भाताने सुरू करून मग केलं रूटीन सुरू. गुड लक.

Pages