लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

माझी मुलगी रविवारी जिन्यावरून पडली. जास्त नाही पण एकच पायरी सटकून खाली आली. तेव्हापासून तिच्या उजव्या साईडचे कॉलर्बोन दुखत आहे. डॉक्टरला दाखवले तर ते म्हणे काही सीरीयस नाही. पेनकिलर लिहून दिलंय. पण चार दिवस झाले तरी हात दुकह्तोच आहे. जरा जरी धक्का लागला तरी खूप रडातेय. हाताला धक्का लावला नाही तर खेळ्णे बडबड इत्यादि सर्व व्यवस्थित चालू. हात वर खाली वगैरे करता येतोय. ऑर्थोपेडिक डॉक्टरला दाखवून घ्यावं का एकदा?

जरा वेगळी मोठी माणसं आली/दिसली तरी मुलांना बरं वाटतं. सतत आपल्यासोबत राहून तीही कंटाळतात.>>>>> हो हे अगदी खरंय.

माझा ३ आठवड्याचा ं मुलगा अन्गावर पाजाय्ला घेतल ़ कि २ घोट पियुन झोप्तो. खाली ठेवल कि २ मिनिटात रडाय्ला लागतो. मन्डिवर पाजत असताना जाम ऊठत नाही. रात्री पण असेच करतो. शेव्टी मी दमुन फोर्मुला देते तर सटासट पितो. काय करावे?

आर्चना,
माझ्या मते त्याला बाटलीतुन प्यायची सवय लागली आहे कारण बाटलीतुन दूध लवकर बाहेर येते व बाळांना पटकन पिता येते. अंगावर पिताना बाळाला बराच व्यायाम करावा लागतो. आता त्याला सोप्या पद्धतीने सवय झाली असणार म्हणुन अंगावर पित नसणार.
आंगावर पाजायचा आता बहुतेक बराच प्रयत्न करावा लागेल. "स्लोव फ्लो' बाटलीतुन फॉर्म्युला द्यायला सुरू करा. त्यातुन दूघ हळुहळु बाहेर येते. बाटलीतुन पिऊ लागला की लगेच तोंडातुन बाटली काढुन अंगावर पाजायला घ्या. कधीकधी बाळांना बदल समजायच्या आधी ती अंगावर पिऊपण लागतात. keep trying.
मदतीला घ्या कोणी असेल तर. latching नीट होतय का? नेटवर माहिती मिळेल latching कसे व्हायला हवे.
शुभेच्छा.
झोपला तर कसे उठवावे ती पण माहिती नेटवर मिळेल, मला आता आठवत नाही.

माझा मुलगा सव्वा वर्षाचा झालाय आणि त्याचं अंगावर पिणं बंद करायचं आहे.
प्लीजच काही उपाय सुचवा.

अर्चना रात्री तु पण झोपुन त्याला पाज म्हण्जे तुला सोप्पे होईल
मी १.८ वर्शे झोपुन्च पाजले फक्त बाहेर असताना मांडी वर ठेउ न

अंगावर सोडायचे असेल तर
१ पोट भार खाउ घाला अन झोपवा
२ जवळच कुणाक डे २ रात्र राहुद्या [ आपण डोळ्या समोर दिसले नाही तर सवय सुटेल, आपाल्याला थोडे अवघड जाईल पण तुम्हि पण थकुन जा मग त्या २ रात्री निट जातील
३ रात्री खांद्या वर झोपवा

----केसात पहा.काही पाहुणे आले असतील.मुलाला सांभाळण्यासाठी बाई/मुलगी असेल तर होऊ शकते.-----
त्याच डोक स्वछ: आहे. तरीपण खाजवतो. आतातर कानही खाजवायला लागलाय...

आतातर कानही खाजवायला लागलाय...>>>>>> सर्दी होत असेल तर कान खाजतो.पण डॉ.कडे न्या.त्यांच्या
सल्ल्यानुसार उपाय करा.

लहान मुलांच्या डॉ़क्टरांचे नाव हवे.
५ वर्षाचा मुलगा आहे. त्याला राहून राहून ताप येतोय. आमच्या इथल्या डॉ. दाखवल पण २ महिने झाले तरी काही फरक नाही. प्लिज इथे भायखळा ते दादर मधील अनुभवी डॉक्टर सुचवा.

लहान मुलांच्या डॉ़क्टरांचे नाव हवे.
५ वर्षाचा मुलगा आहे. त्याला राहून राहून ताप येतोय. आमच्या इथल्या डॉ. दाखवल पण २ महिने झाले तरी काही फरक नाही. प्लिज इथे भायखळा ते दादर मधील अनुभवी डॉक्टर सुचवा. ...

डॉ़क्टर : प्रफुल : ०२२ - २४१४६१७७

परेल

हसरी....
डॉ. किर्तने.... दादर ( पश्चिम) , कबूतरखान्याजवळ.. ०२२-२४२२९२९४

डॉ. सुरेश शहा... दादर ( पुर्व ), चित्रा सिनेमासमोर... ०२२-२४१७२४५५
मी माझ्या मुलाला यांच्याकडे न्यायची... यांच कॉटनग्रीन कि त्यासाईडलाच कुठेतरी अजून क्लिनिक आहे, हॉस्पीटल माटुंगा सर्कलजवळ आहे. त्यांच्या आता क्लिनिकच्या वेळा बदल्यात बहूतेक ...फोन करू चौकशी करू शकतेस...

नाहितर सरळ वाडिया लहान मुलांचे हॉस्पिटल...

प्रिती व सुनिधी, धन्यवाद. तुम्च्या सल्ल्याचा उपयोग झाला. मला दुध वाढ्ण्यासाथी का य करताञ्येइल?

आर्चना, उपयोग झाला का? छान.
दूध जास्त यायला मी तरी काही खास असे केले नव्हते. रोजचाच सकस आहार घेतला होता (पोळी-भाजी,आमटी,कोशिंबीर,उसळ,दूध वगैरे). मोड आलेली मेथी (रोज चमचाभर) खावी असे ऐकले आहे.
बाळाने एकाच बाजुने घेतले तर दुसरी बाजुपण थोडीतरी रिकामी करावी, नाहीतर आटते. पंप ठेवावा जवळ.

तांदूळ - मेथीची गूळ घालून त्यात नारळाचे दूध घातलेली खीर खा.निश्चितच दूध जास्त यायला लागेल.तसेच मेथी गूळ यामधे लोह असते.

माझ्या मुलीला [वय २ वर्षे, १० महिने] अपचन झालयं
ताप येतोय काल पसुन आज २.३० ची डो अपॉन्मेट आहे
सारखी झोपत आहे
काल ३ दा उलटी झालेये Sad

आर्चना, पुरेसा घरचा सकस ताजा आहार, पुरेशी झोप, भरपूर (उकळवून थंड केलेलं पाणी) आणि मुख्य टेंशनफ्री राहा. कसलंही टेंशन घेऊ नकोस. घरातही आनंदी वाताव्रण ठेवलं जाण्याचा आग्रह कर. पाजण्याआधी थोडं कोमट पाणी ग्लासभर प्यावं अधिक माहीतीसाठी वंशवेल वाच.

प्रितीभुषण खाण्यात काही चुकीचं बाहेरचा पदार्थ वगैरे आला होता का? माझ्या मुलाने हॉटेलमधली इडली खाल्ली होती तेव्हा त्याला मोशन्स, उलट्या आणि ताप आलेला. पण सध्या वायरल फिवरची साथ आहे. ग्लानी येतेय म्हणजे लवकरात लवकर डॉ. कडे नेणे उत्तम. सतत मीठसाखर पाणी पाजत राहणे नाहीतर डिहायड्रेशन होइल. बाहेरचे पदार्थ नकोच. घरीच मूगाच्या डाळीचं पाणी, भाताची पेज, वेज सूप असा हलका आहार द्यावा.

Mazi Mulgi 2 years 2 months chi aahe active aahe but hight normal peksha kami watte aahe mazi swatachi hight 4.9 aani vadilanchi 5.8 but khup tention yetay ki tichi hight anuvanshiktepramane kami tar rahnar nahi na yavar konte upay karavet konte sports /outdoor game kontya age pasun suru karavet?

aga ruhi, tension gheun unchi vadhat nahi. ti genetically jevhaa kashi vadhayachi tashich vaadhate. aattaapaasun tichyavar kuthalihi jabardasti karu nakos. ti jashi khelate tashich tila khelu de. maazyaa maahitit don udaharane ashi aahet ki dorivarachya udyaa marun kinva cycling karunsuddha unchi vadhali nahi. tyatala ek mulaga aahe 8th madhe aahe pan tyachi unchi ajun 4 ft aahe fakt.
tu ek gosht karu shakates, ratri mulila zopavtana positive talk kar. mhanje "vayachya 21vya varshi tuzi unchi 5ft 3inch aahe." itarahi goshtit karu shakates pan positive aani present tense mahatvacha.

maza mulga 16 mahinyacha aahe.to khanyasathi khupch tras deto.varche dudh pan ghet nahi. tyamule tyachi tabyet pan khup najuk aahe.mala tychi tabyet sudhrnyasathi kahi upay sagal ka.gaiche dudh pinyasathi me tyat bournvita,horliks pan takun pahile pan ajibat pit nahi.tyala dudhachi godi kashi lau?mhn tyache weight pan vadat nahi?konitari plz upay sanga.
.

मनिशा_२८
आपलं मूल आनंदाने देईल ते सर्व खायचा/खातो असं १% सोडल्यास इतर ९९% आया तुमच्यासारखेच म्हणतील.इतक्या लहानपणापासून bournvita,horliks शक्यतो देऊ नका.
तुम्हाला त्रास होत नसेल तर अंगावरचे दूध देणे चालू ठेवा.मुलाचे वजन ही बाब दुय्यम ठेवा.त्याआधी तो भरपूर अ‍ॅक्टिव आहे की नाही तसेच वारंवार आजारी पडत नसेल तर ती गोष्ट छान आहे.बदाम+खारीक पावडर दुधात /पाण्यात ४ तास भिजवून (सहाणेवर उगाळून दिले तरी चालेल.) दोन्ही मिळून पाव -अर्धा चमचा , त्याला द्या.डाळीचे पाणी,सूप, नाचणीसत्व वगैरे द्या.

माझा मुलगा २.३ वर्षांचा आहे. त्याला वरचेवर सर्दी कफ होतो. जवळजवळ दर महीन्याला. डॉक्टर म्हणतात allergic सर्दी आहे. पण antibiotics दिल्याशिवाय त्याची सर्दी बरी होत नहि. मी होमेओपथ्यए
treatment घ्यायचा विचार करते आहे. नवी मुंबईत कोणी चांगले होमेओपथे dr. aahet ka? मी अजून काय उपाय करू शकते ? dr. म्हणतात त्याला dust ची allergy आहे. कारण त्यामुळे त्याचे खाणे affect होते.

--

Pages