मालिकांच्या गप्पांच्या पानावरच्या निवडक पोस्टस साठवण्यासाठी हा धागा उघडलाय.
वि.सू. १- झी मराठी/हिंदी चॅनेल किंवा चॅनेलशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेशी माझं कोणतंही वैयक्तिक वैर नाही. मराठी/हिंदी चॅनेल्स दर्जेदार प्रोग्राम्स दाखवू शकतात पण दाखवत नाहीत ह्याबद्दलचं दु:ख आणि राग व्यक्त करायचं हे एक माध्यम आहे. हे चॅनेल कोणतंही चॅनेल असू शकतं. आमच्या घरी झी मराठी आणि हिंदी पाहिलं जातं त्यामुळे सर्व उल्लेख त्यावरील प्रोग्राम्सबद्दल आहेत.
वि.सू. २ - कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर कसल्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास माफी असावी.
वि.सू. ३ - मी ह्या मालिका स्वखुशीने पहात नाही. घरात पाहिल्या जातात.
-----
गौतम बुध्द प्रवचनाला बसले होते. लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं कानात साठवून घेत होते. एव्हढ्यात एक स्त्री धडपडत तिथे आली. दु:खाने आणि वेदनेने तिचा चेहेरा पिळवटला होता. डोळ्यांतून सारखे अश्रू वहात होते. "महाराज, मला मदत करा, मला मदत करा. मला माझा मुलगा परत द्या. हा चमत्कार तुम्हीच करू शकता."
"बाई, शांत व्हा, काय झालंय?" बुध्दांनी विचारले.
"महाराज, मी कृशा गौतमी. माझा एकुलता एक मुलगा अचानक वारला. नवर्याच्या मागे मी त्याला तळहातावरच्या फ़ोडाप्रमाणे वाढवत होते. त्याच्याशिवाय कशी जगू? माझ्या मुलाला जिवंत करा महाराज"
"बाई, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. गावात जाऊन ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही अश्या घरातून मूठभर मोहोरा आणा."
बाई गावात घरोघर फ़िरली. पण तिला असं एकही घर मिळालं नाही. निराश होऊन ती बुध्दांकडे परतली. "महाराज, मला माझी चूक कळली. मृत्यू सर्वांनाच येतो आणि त्यावर कोणाकडेही उत्तर नाही"
कृशा गौतमी अश्या जड पावलांनी घरी परत जात असताना वाटेत तिला एक कपाळभर टिळा लावलेली बाई दिसली. तिने कृशा गौतमीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. कृशा गौतमीने सगळी हकिकत सांगितली. बाई मंद हसली आणि म्हणाली "आज रात्री ८ वाजता झी मराठीवर माप्रिप्रिकचा एपिसोड बघ. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल"
कृशा गौतमीने ८ वाजेतो कसातरी धीर धरला. माप्रिप्रिक सुरू होताच ती सावरून बसली.
"शमिका इज नो मोअर" असं डॊक्टरांनी सांगताच अभिने देवासमोर धरणं धरलं. प्रार्थना करताना तो चेहेरा एव्हढा वेडावाकडा करत होता की त्या मोटारीचं चाक ह्याच्याही पोटावरून गेलंय की काय अशी प्रेक्षकांना शंका यावी. एव्हढ्यात कुठूनशी एक परकर-पोलक्यातली मुलगी (तीसुध्दा मुंबई सारख्या शहरात!) आली. अभिने "माझी शमिका मला दे" अशी लहान मुलं रस्त्यात बैठा सत्याग्रह करताना ओरडतात तशी आरोळी ठोकली. त्या मुलीने प्रार्थना केली, मग अभिच्या पापणीचा केस उपटून त्याच्याच तळहातावर ठेऊन त्याला (म्हणजे केसाला!) फ़ुंकर मारली आणि तुझी बाहुली तुला परत मिळेल असं म्हणून ती निघून गेली. लगेच अभिला त्याच्या आईचा फ़ोन आला की शमिका शुध्दीवर आली.
इथे कृशा गौतमीने टीव्ही बंद केला आणि मुलाला जिवंत करायला ती निघून गेली.
तात्पर्य: गौतम बुध्दांना जे जमलं नाही ते केकतेने करून दाखवलंय. तस्मात केकताम शरणं गच्छामि.
रच्याकने, ज्या डॊक्टरला माणसाची शुध्द गेली आहे का जीव हे कळत नाही तो शमिकावर उपचार करतोय आणि वर अभिला सांगतोय की काळजी करण्याचं काही कारण नाही? ये बात कुछ हजम नही हुई. दवा आणि दुवा जिवंत माणसावर परिणाम करतात हो, मेलेल्या माणसावर नाssssssही.
मस्त....
मस्त....
ऑन पब्लिक डिमांड कुंकू वर
ऑन पब्लिक डिमांड
कुंकू वर प्रहसन
प्लीईईईईईईईईईईईईईईईईईईईईज
अखी धन्स रेव्यु, काही सुचलं
अखी धन्स रेव्यु, काही सुचलं तर नक्की टाकेन.
स्वप्ना .. तुझ्या सगळ्या
स्वप्ना .. तुझ्या सगळ्या पोस्ट्स एकत्र वाचल्या ..
हसुन फुटले ...
कहर आहेस ग बै तु
__/\__ याचा स्वीकार व्हावा ... आपल्या फ्यानलिश्टात आम्चे नाव जोडले जावे अशी इनंती
धन्स प्रीतमोहर स्थळः एकता
धन्स प्रीतमोहर
स्थळः एकता कपूरच्या ऑफिसमधलं कास्टींग डिपार्टमेन्ट. एक असिस्टन्ट दुसर्याशी बोलतोय.
"अरे बाबा, ते अभि-शमिकाच्या हॉटेलमधल्या स्पर्धेच्या शूटींगसाठी ४-५ यंग कपल्स पाहिजेत. आणलीस का शोधून?"
"ओह्,साफ विसरून गेलो बघ ह्या सगळ्या गडबडीत"
"आता आज संध्याकाळी आहे शूटींग. एव्हढ्या कमी वेळेत कुठून आणणार कोणाला?"
"कुठूनतरी धरून आणू रे. यंग लोकांत सॉल्लीड क्रेझ आहे ह्या सिरियलची."
संध्याकाळी शूटींग सुरु होतं तेव्हा कबूल केलेल्या कपल्सपैकी एक जोडपं आलेलं नसतं. दोघेही असिस्टन्टस टरकतात.
"अरे, एकतामॅडमला कळलं तर आपली धडगत नाही बघ. तू आणखी एक कपल इमर्जन्सीसाठी आणुन ठेवायचं ना."
"मला काय स्वप्न पडलं होतं ते दोघं ऐनवेळी टांग मारतील म्हणून? म्हणे इमर्जन्सीसाठी आणुन ठेवायचं"
"चल, बॉसला विचारू"
दोघे त्यांच्या बॉसकडे जातात. तो सगळी भानगड ऐकून घेतो.
"तुम्ही ती कपल्स कशी निवडलीत?"
"आम्ही आधी एखाद्या कॉलेजमध्ये जाणार होतो. पण मग तिथे झुंबड उडाली असती म्हणून ह्या पक्याने एक आयडिया काढली. आम्ही स्टेशनजवळ एके ठिकाणी उभे राहिलो. ५-५ मिनिटांनी गर्दीत छोटे छोटे खडे मारायचो. जे खडे लागल्यावर मागे बघायचे त्यांना धरून आणलं. अशी ५ कपल्स आणली होती बरोब्बर. ऐनवेळी त्या लुकड्याने आणि त्याच्या आयटमने दगा दिला"
'बरं, ते दगड आहेत?"
"हो आहेत" पकया खिशात हात घालून २-४ खडे बॉससमोर धरतो. बॉस त्यातल्या त्यात २ मोठे खडे उचलतो आणि परत पक्याच्या हातात देतो. "हे घे तुझं कपल"
"हे? हे तर दगड आहेत. हे कशी अॅक्टींग करणार?"
-----
तुम्ही कालचा माप्रिप्रिकचा एपिसोड पाहिलात? त्यात अभि-शमिकाच्या आधी डान्स करणारं ते जोडपं पाहिलंत? आता कळलं दगड कशी अॅक्टींग करतात ते?
अरेरे... मी बघयला मिसले....
अरेरे... मी बघयला मिसले.... दगड कसे नाच करतात ते...
तुम्ही कालचा माप्रिप्रिकचा
तुम्ही कालचा माप्रिप्रिकचा एपिसोड पाहिलात? त्यात अभि-शमिकाच्या आधी डान्स करणारं ते जोडपं पाहिलंत? आता कळलं दगड कशी अॅक्टींग करतात ते?
>>>
हे हे हे मस्तच स्वप्ना....
धन्स अखी, सायली वटपौर्णिमा
धन्स अखी, सायली
वटपौर्णिमा जवळ आली तरी वत्सलाबाईंनी काहीच तयारी केली नव्हती. वसंतरावांना आश्चर्यच वाटलं.
’काय ग, ह्या वर्षी वटसावित्रीची पूजा नाही वाटतं?"
’कशाला? पुढच्या जन्मी पुन्हा तुम्ही माझ्या बोकांडी बसायला?" वत्सलाबाई तणतणल्या.
त्यांचा रौद्रावतार पाहून वसंतराव चपापले. मनातल्या मनात त्यांनी वत्सलाबाईंचा वाढदिवस, वत्सलाबाईंच्या आईचा वाढदिवस, आपल्या लग्नाचा वाढदिवस सगळ्याच्या तारखा आठवून पाहिल्या. काही टोटल लागेना.
’काय झालंय?’ त्यांनी चाचरत विचारलं.
’काय व्हायचंय आता? ह्या जन्मी तरी काही होणार नाही. पुढच्या जन्मी मात्र मला संजयसारखा नवरा पाहिजे’
’संजय?’ वसंतराव नव्या दुग्ध्यात पडले.
"हो, भाग्यलक्ष्मीतला काशीचा नवरा संजय"
"अरे तो लल्लू? ज्याला आपली बायको ओळखता येत नाही तो?’
’हॆहॆहॆ, एव्हढे दात नकोत काढायला. उद्या माझ्यासारखी दुसरी आली तर तुम्हाला तरी ओळखता येईल का?’
"तुझ्यासारखी दुसरी? शक्यच नाही. तुला बनवल्यावर देवाने पश्चात्ताप होऊन तो साचा मोडला असेल"
"तर तर, डोळे फ़ुटले होते बघायला आला होतात तेव्हा? चांगले तीन वेळा आला होतात की फ़ुकटचे पोहे खायला. तो संजय बिच्चारा कसा बायकोला फ़ळं स्वत:च्या हाताने खायला घालाय्चा. तुमच्या समोर ताट ठेवलं वाढून तरी माझ्यावर उपकार केल्यासारखे गिळता एकदाचं"
’तू बनवलेलं जेवायचं म्हणजे तुझ्यावर अनंत उपकारच आहेत’. वसंतराव पुटपुटले.
’काय म्हणालात?’
’काही नाही, काही नाही. तू आजारी पडलीस की मी पण भरवेन असं म्हणत होतो मी. आता तू आजारी पडत नाहीस तो काय माझा दोष?"
"उगाच नजर लावू नका. माहेरचं खाणंपिणं जबरदस्त म्हणून अशी धडधाकट आहोत आम्ही सर्व. नाहीतर तुमच्याकडची मंडळी. सगळी नुस्ती पाप्याची पितरं."
"ते जाऊ देत, तू काय फ़क्त त्या संजयच्या फ़ळं भरवण्यावर लट्टू झालीस एव्हढी?"
"नुस्ता फ़ळं भरव्त नाही काही. व्हायोलिन वाजवून तिला गाणं म्हणून दाखवतो"
"व्हायोलिन? अग, गिटार असेल. ते काय मी पण शिकू शकतो."
"तोंड बघा आरश्यात. गणपतीच्या आरतीला झांजा वाजवताना तोंडाला फ़ेस येतो तुमच्या आणि म्हणे गिटार शिकतो" वत्सलाबाईंनी नाक मुरडलं.
"हे तर काहीच नाही. सगळ्यात कळस म्हणजे मोहित्यांची कोट्यांची इस्टेट काशीच्या नावावर करायला निघाला तो. आणि तुम्ही ह्या फ़्लॆटवर माझं नाव घालायचं तर एक लाख द्यायला लागतात म्हणून गप्प बसलात."
"देवा रे! आमच्या वेळी ’स्वयंवर’ नावाचा प्रकार नव्हता आणि ह्या सिरियल्सही नव्हत्या ते किती बरं होतं. नाहीतर ह्या सिरियल्समधल्या सद्गुणाच्या पुतळ्यांनी माझ्यासारख्या पामराला एकपण बायको मिळू दिली नसती"
अमेरिकेतले समस्त एफ़बीआय एजन्ट
अमेरिकेतले समस्त एफ़बीआय एजन्ट सध्या बुचकळ्यात पडलेत. का म्हणून विचारताय? अहो, त्यांच्या देशातल्या पर्यटनस्थळांचं काहीतरी बिनसलंय. म्हणजे बघा हं, गेल्या काही दिवसांपासून स्टॅच्यू ऑफ़ लिबर्टीच्या हातातली ती ज्योत जास्तच तेजाने तळपतेय. आता तर अवकाशातूनसुध्दा स्पष्ट दिसते म्हणे. नायगारा धबधबा अधिक वेगाने कोसळतोय. त्याच्या शुभ्रतेत इतकी झळाळी आली आहे की टूरिस्टांना काळे चष्मे लावून तिथे जायला लागतंय. तर दुसरीकडे ग्रॅन्ड कॅन्यॉनला शेकडो भेगा पडल्या आहेत - एखाद्याचं हृदय भग्न व्हावं तश्या. आणि माऊन्ट रशमोअरमधल्या सगळ्या प्रेसिडेन्टसचे चेहेरे एरंडेल प्यायल्यासारखे वाकडे झालेत. आता सांगा, तपास करायचा म्हटलं तरी एफ़बीआयवाल्यांनी कुठून सुरुवात करायची हो?
पण आपल्याला माहित आहे हं हे का होतंय ते. अहो, नायगारा आणि स्टॅच्यू ऑफ़ लिबर्टी खूष झालेत कारण गण्याने अमृता आर्य़न सरतापेला तिच्या उसगावाच्या भेटीबद्दल विचारताना फ़क्त त्यांचा उल्लेख केला. तिनेही त्यांच्याबद्दलच सांगितलं. त्यामुळे बिच्चारे बाकीचे ’पटेल पॉइन्टस’ दु:खी झालेत. उगी उगी. अमृता सासूचं शेपूट धरून येईल हो परत अमेरिकेला, दोघींना नाहीतरी दुसरं काय काम आहे? आणि तिची सासू पॉलिटिशियन असल्याने चिक्कार पैसा आहे. मग सांगेल हो ती किल्लेदारांना तुमच्याबद्दल. आणि आपल्या गण्या शिकायला येणारच आहे म्हणे तिथे मोठा झाल्यावर - नरसिंह किल्लेदारांच्या (पर्यायाने जनतेच्या!) पैश्यावर
तेव्हा आता हसा पाहू कसे. से चिझ!
वत्सलाबाईंचे वाचायचे राहुन
वत्सलाबाईंचे वाचायचे राहुन गेलेले....:)
खरेच ही पाने म्हणजे एक रिलिफ आहे. स्वप्ना धन्स गं...
वत्सलाबाईं खूप झकास झालयं....
वत्सलाबाईं खूप झकास झालयं....
वत्सलाबाईं खूप झकास
वत्सलाबाईं खूप झकास झालयं...>>>> खुप खुप अनुमोदन
अरे मस्त आईला देणार आहे हे
अरे मस्त
आईला देणार आहे हे वाचायला एकदा. बघु काही फरक पडतो का?
फु बाई फू चा विनोद खरच मोठा
फु बाई फू चा विनोद खरच मोठा झालाय का ?
कधी कधी शंका येते आपल्यालाच हसायला येत नाही कि आता विनोद कळणंच बंद झालय म्हणून. प्रत्येक वेळी पात्रांची गाणं म्हणत एण्ट्री आणि इनोदी नृत्य आणि त्यावर निर्मिती सावंतचं (बळंच) हसणं ..कॉपीच मारायची तर थेट अर्चना पुरणसिंगलाच आणायचं ना ! तिला काय कानडी, तेलगू, मराठी, आफ्रिकाना, चिली या कुठल्याही भाषेतून जोक सांगितला तरी अशीच हसेल ..
साधना, अखी, श्वेतांबरी, गुगु,
साधना, अखी, श्वेतांबरी, गुगु, किरण्यके - मनापासून आभार! साधना, आभार कसले? ये तो मेरा फर्ज है
.
.
स्वप्ना खुप दिवसांनी
स्वप्ना खुप दिवसांनी माय्बोलीवर आलेय आणी तुझ्या कमेंट वाचून खुप छान वाटतय
धन्स नुतनजे
धन्स नुतनजे
सावित्रीला चुकवण्यासाठी
सावित्रीला चुकवण्यासाठी केलेल्या पायपिटीमुळे यमाचे दोनच काय पण त्याच्या रेड्याचे चार पायसुध्दा दुखायला लागलेले असतात.
"कशाला उगाच त्रास करून घेतेय्स पोरी. मी तुझ्या नवयाचा आत्मा देऊ नाही शकत परत" तो काकुळतीने तिला म्हणतो.
"माहित आहे ते मला. पण एक सांगा, तुम्ही नक्की कोणाचे आत्मे घेऊन जाता?"
"कोणाचे म्हणजे काय? ज्यांचा काळही आलाय आणि वेळही आली आहे त्यांचे" यम आश्चर्याने उद्गारतो. त्याच्या एव्हढ्या वर्षांचा करियरमध्ये हा प्रश्न त्याला कधी कोणीच विचारलेला नसतो.
"अस्सं. पण ज्यांचा काळ आणि वेळ आली नसेल त्यांचं काय?" सावित्री विचारते.
"मी नाही समजलो पोरी"
"तुम्हाला संजय मोहिते माहित आहे?"
"नाही बुवा"
"मग अभिजित पेंडसे?"
"अंहं"
"बरं, मानव देशमुख?"
"नाही, मला माहित नाहीत हे कोण आहेत ते. आणि जाणूनही घ्यायचं नाहिये. तू जा बघू आता परत. मी सत्यवानाचा आत्मा नाही देऊ शकत तुला." यम थोडासा वैतागून म्हणतो.
"अहो चिडताय काय असे? आणि सत्यवानाचा आत्मा कोण मागतंय परत? ह्या तिघांपैकी कोणाचा आत्मा आणून देऊ शकता का ते सांगा. ते सगळे आदर्श नवरे आहेत."
"नाही आणू शकत. आणि समजा आणला असता तर तो घेऊन तू काय करणार होतीस? तो आत्मा सत्यवानाच्या शरीरात तूही घालू शकणार नाहीस आणि मीही"
"माझं जाऊ द्या हो, पण तुम्हालाही हे करता येत नाही म्हणजे नवल आहे. छ्या!" असं म्हणून सावित्री परतीच्या मार्गाने तरातरा चालायला लागते.
"आता कुठे चाललीस?" यम राग विसरून आश्चर्याने विचारतो.
"बिराई देवीकडे. ती ह्या कामात एक्स्पर्ट आहे" सावित्री मान झटकत म्हणते.
टीपः कोणाच्या धार्मिक भावना दुखावयाचा उद्देश नाही. दुखावल्या गेल्या असल्यास माफ करावे ही विनंती.
स्वप्ना, तुला _/\__ , खुप छान
स्वप्ना, तुला _/\__ , खुप छान
गार्गि, धन्स पवित्र रिश्ता ४
गार्गि, धन्स पवित्र रिश्ता ४ वर्षांनी पुढे जाणार असं ऐकलंय.....त्यावरची टिप्पणी
"नारायण, नारायण" नारदमुनी प्रसन्न चेहेर्याने इंद्राच्या दरबारात प्रवेश करते झाले. बघतात तर काय? साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश बसलेले.
"काय, इंद्रदेवा,स्वर्गात भ्रष्टाचार वगैरे चाललाय की काय? त्रिस्तरीय चौकशी समिती असल्यासारखे बसलेत आपले ब्रह्मा, विष्णू, महेश" त्यांनी हसत हसत विचारलं.
"नाही मुनिवर, एक वेळ भ्रष्टाचार परवडला. पण ही आणीबाणीची स्थिती आलीय अगदी" इन्द्र सुस्कारा सोडून म्हणाला.
'आणीबाणी' म्हटल्यावर नारदमुनींनी कान टवकारले. "काय झालं देवराज?"
"तुम्हाला माहितच आहे की चार युगातलं शेवटचं युग, कलियुग, चालू आहे आता"
"होय तर"
इन्द्राने सूचकपणे ब्रह्मदेवाकडे पाहिलं. ब्रह्मदेवाने हातातला लॅपटॉप उघडून मुनींना दाखवला.
"अरे वा! नवा वॉलपेपर! छान आहे हं"
"मुनीवर, अहो वॉलपेपर काय पहाताय? मी कॅलक्युलेशन दाखवतोय तुम्हाला. त्याप्रमाणे आता २ दिवसात जगाचा अंत करायचा आहे"
"अरेरे! हे मात्र वाईट आहे. गेल्या अनेक वर्षाच्या पृथ्वीवरच्या फेर्यांत नाही म्हटलं तरी मानवजातीबद्दल मला प्रेम वाटू लागलं होतं. पण विधिलिखीत कोणाला टाळता आलंय."
"तेच टळायची वेळ आली आहे आता" विष्णूने वैतागून म्हटलं.
"काय म्हणता काय?" नारदमुनी अवाक झाले.
"मुनिवर, अहो, ह्या जगबुडीला घरातून सक्त विरोध आहे"
"घरातून?" नारदमुनीना काही कळेना.
"अहो म्हणजे लक्ष्मी, पार्वती, सरस्वती आणि इन्द्राणी सगळ्या विरुध्द आहेत ह्या विधिलिखीताच्या"
"आं? पण का?"
"अहो का काय? ती 'पवित्र रिश्ता' चालू आहे ना अजून. त्याचा शेवट झाल्याखेरीज जगाचा शेवट होऊ देणार नाही म्हणतात"
"अरे बापरे! मग आता?"
"आता काय? काही नाही. ती मालिका संपेस्तोवर वाट पहायची."
"ही मानवजात हुशार निघाली म्हणायची. जगाचा विनाश टाळलाच त्यांनी शेवटी. नारायण, नारायण" मुनी कौतुकाने म्हणाले.
"सध्या मराठी सीरीयल्स मध्ये
"सध्या मराठी सीरीयल्स मध्ये लंगडत चालण्याचं फॅड आलंय का? तिकडे ८ वाजता अभिजीतची आजी लंगडायला लागते. साडे आठ झाले की आभास मधल्या मावशीबाई लंगडू लागतात आणि परवा पिंजरा मध्ये गिरिश ओक सुद्धा लंगडत होता" ह्या निंबुडाच्या पोस्टवरूनः
तो होतकरू लेखक कॆफ़ेत शिरला तेव्हा जवळजवळ सगळी टेबलं रिकामी होती. फ़क्त अगदी एका टोकाला एका टेबलाजवळ एक माणूस बसला होता. त्याने लेखकाला बघून हात केला. होतकरू लेखक लगेच टेबलाकडे गेला.
"काय रे? आज एकटाच बसलायस?" होतकरू लेखकाने विचारलं.
"हो रे. वैताग आला होता त्या सेटवरच्या आरडाओरडीचा. ते जाऊ देत. तुझ्या सिरियलचं कसं चाललंय?"
"बरंच चाललंय म्हणायचं. मधे ३-४ दिवस सर्दीने बेजार झालो होतो अगदी. काहीच सुचत नव्हतं. मग डोक्यात आलं की वटपौर्णिमा जवळच आहे. मग काय? दिग्दर्शकाला सांगून मालिकेतल्या स्त्री पात्रांना त्यांचे संवाद स्वत:च लिहायला सांगितलं. आहे काय त्यात? एखाद-दुसरा सत्यवान-सावित्रीचा उल्लेख, पतीचं प्रेम, लग्नाचं पावित्र्य, पतीचं दीर्घायुष्य....वर आपल्याला संवाद लिहायला मिळताहेत म्हणून तमाम बाया खुष. अरे हो, तुला एक विचारायचं होतं. तुझ्या सिरियलमधली ती आजी एव्हढी लंगडते का रे?"
"कुठल्या सिरियलमधली आजी रे? च्यायला, ४ सिरियलचं दळण दळतोय एका वेळेस. चारी सिरियलमध्ये आज्या आहेत."
"अरे ती रे....अं....काय बरं नाव? हा....माझिया ठोंब्याला काहीही कळेना....त्यातल्या त्या ठॊंब्याची आजी"
"ओहो, ती होय?"
"तीच. वय झालंय म्हणून लंगडतेय का?"
"हॆट...तिच्या लंगडण्याला ’वजन’दार कारणं आहेत बरं. तू नवा आहेस अजून म्हणून तुला माहित नाही"
"असं? मग मला ऐकू तरी देत. २ मोका आण रे....." शेवटलं वाक्य वेटरला उद्देशून.
"असं बघ. ती लंगडतेय म्हणजे एकदा एका पायावर भार तर एकदा दुसया. मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर हे द्योतक आहे तिच्या चंचल मनोवृत्तीचं. आता बघ ना. आजीचे कायदे नातींसाठी वेगळे आणि नातसुनेसाठी वेगळे. परत ती एका एपिसोडमध्ये नातसुनेच्या बाजूने बोलते तर दुसया दिवशीच्या एपिसोडमध्ये तिच्या विरुध्द. तू ठॊंब्याच्या आईला लंगडताना पाहिलं आहेस का? नाही ना? कारण ती ठामपणे सुनेच्या बाजूने उभी आहे. आणि सगळ्यांना एकच कायदा लागू करते."
"ओहो....." होतकरू लेखक शब्दन शब्द एव्हढ्या एकाग्रतेने टिपून घेत असतो की टीपकागदालाही स्वत:च्या इनएफ़िशियन्सीची लाज वाटावी.
"आणि ऐक....तिच्या लंगडण्यामुळे तिचं कॆरेक्टर ठसठशीत झालंय. कालच मी आमच्या सोसायटीत एका सुनेला तिच्या मैत्रिणीला सांगताना ऐकलं. ’आजेसासूबाईंना किनई त्या ठोंब्याच्या आजीचं कॆरेक्टर भारी आवडतं. उठसूठ मला बोलत असतात. आजकाल तिच्यासारख्याच लंगडून चालायला लागल्यात. माझे आजेसासरे मात्र जाम टरकलेत. त्या ठॊंब्याचे आजोबा वर गेलेत ना’. बघितलंस? अश्याने सिरियल लक्षात रहातात रे लोकांच्या. मग आपलीही वट वाढतेच की."
"हो रे" एखादा स्वस्तातला कलप डोक्यावरून आंघोळ करताच तोंडावर ओघळून यावा तसा होतकरू लेखकाच्या तोंडावरून आदर ओघळत असतो.
"तुला एक आतली बातमी सांगतो. ती ठोंब्याची बायको आहे ना तिला मी लवकरच बाबा रामदेवकडे एक कोर्स करायला लावणार आहे. मग ती आज्जीवर उपचार करून तिला नीट चालायला लावणार आहे."
"आयला, बाबा रामदेव मराठी सिरियलमध्ये? सॊल्लीड."
"तस्मात तात्पर्य काय? तर मालिका दणकून चालायची असेल तर त्यात एक वेडा, एक पुनर्जन्म, एक अपघात, एक स्मृतिभ्रंश आणि एक लंगडणारं कॆरेक्टर हे हवंच"
होतकरू लेखक प्रेरित होऊन कॆफ़ेबाहेर पडला. काही दिवसांनी त्याच्या एका सिरियलमधलं एक स्त्रीपात्र स्वयंपाकघरात भाताच्या पेजेवरून, दुसरं रस्त्यावरच्या शेणावरून आणि तिसरं बाथरूममधल्या साबणाच्या पाण्यावरून घसरून पडलं आणि तिघीजणी "सुखासमाधानाने लंगडू लागल्या".
आजच्या ठळक बातम्या. सर्वप्रथम
आजच्या ठळक बातम्या. सर्वप्रथम शेअर बाजाराबद्दल. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जचा शेअर निर्देशांक सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला. नॅशनल स्टॉक एक्सचेन्जच्या निफ़्टीतही ३५० अंकांची घसरण झाल्याने शेअर बाजारात कमालीचं गोंधळाचं वातावरण होतं. आंतरराष्ट्रीय बाजारातील नॅस्डेक, फ़ूटसी, कोस्पी, हॅनसेन ह्या सर्व निर्देशांकांनी मोठी घसरण नोंदवल्याने भारतीय शेअर बाजारात ही उलथापालथ झाल्याचं तज्ञांकडून सांगण्यात येतं. ह्या निर्देशांकांवर परिणाम करणारी एकही घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर घडली नसल्याने वित्तीय निरिक्षक गोंधळून गेले आहेत.
परंतु आमच्या खास बातमीदाराने आणलेल्या खबरीनुसार ह्या सर्व उलथापालथीचं मूळ भारतातल्या बिरगावात आहे. ’संजय मोहिते’ ह्यांना त्यांची पत्नी काशी ही (पुन्हा एकदा) गायब झाली असं सांगण्यात आल्यानं (पुन्हा एकदा) जबर मानसिक धक्का बसला. तसंच त्यांना २४ तासाच्या आत वेडं करणाया गोळ्या (पुन्हा एकदा) देण्यात आल्या. त्यामुळे त्यांना (पुन्हा एकदा) वेड लागलं आहे. ह्याच घटनेचा परिणाम भारतीय आणि जागतिक शेअर बाजारांवर झाला आहे.
खास सूत्रांनी आपलं नाव जाहिर न करण्याच्या अटीवर असंही सांगितलंय की अमेरिकेची सीआयए, इस्त्रायलची मोसाद आणि युकेची ए्मआयसिक्स ह्यांनी आपापले एजन्ट्स भाग्यलक्ष्मीच्या सेटवर पाठ्वून त्या गोळ्या हस्तगत करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. अल कायदा, इंडियन मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबा आणि बाकीच्या अतिरेकी संघटना ह्यांनीही आपापले प्रतिनिधी, सॉरी, अतिरेकी पाठव्ले आहेत.
मात्र ह्या सर्वांना शूटींग चालू असताना काळे चष्मे घालण्याचे तसेच कान झाकून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्वप्ना तुसी ग्रेट हो...
स्वप्ना तुसी ग्रेट हो...
धन्स सायली
धन्स सायली
टीना: हॅलो, हॅलो, मिने, काय
टीना: हॅलो, हॅलो, मिने, काय करत असतेस ग? फोन उचलत नाहीस लवकर.
मिनी: अग, मेंदी लावलीय हाताला. पण सारखा वाजायला लागला म्हणून मेंदीची पर्वा न करता उचलला. म्हटलं तसंच अर्जंट काम असल्याशिवाय तू फोन वाजत ठेवणार नाहीस. बोल
टीना: बातमीच तशी आहे. हॅरी पॉटरचं नवं पुस्तक येतंय.
मिनी: टिने, अग पुस्तक नाही ग. पिक्चर येतोय नवा.
टीना: मिनटले, खबर पक्की आहे. नवं पुस्तक येतंय. विश्वास नसेल तर आत्ताच्या आत्ता गुगलून बघ. सगळीकडे ब्रेकींग न्यूज आहे.
मिनी: काय म्हणतेस काय? आलेच मी मेंदी धुवून.
मेंदी धुवून मिनी घाईघाईने नेट अॅक्सेस करते. आणि एकदम मोठयाने ओरडते. तिची आई धावत येते.
मिनीची आई: काय झालं ग?
टीना: हॅलो, हॅलो
मिनी: काही नाही आई. व्हॉल्डमॉर्ट परत आलाय.
मिनीची आई: कोण?
मिनी: लॉर्ड व्हॉल्डमॉर्ट
टीना: हॅलो, हॅलो, मिने, आहेस की नाहीस?
मिनीची आई: लॉर्ड व्हॉल्डमॉर्ट? हा कोण? आणि कुठून परत आलाय?
मिनी: आई, तुला मी नंतर सांगते समजावून
मिनी फोन उचलते.
मिनी: अग, तू खरंच बोलत होतीस. पण असा कसा आला परत? काहीच माहिती नाहिये कुठल्याच साईटवर.
टीना: हो ना अग. मी युएसमध्ये असलेल्या माझ्या कझिनला माहिती काढायला सांगितलंय. त्याचा ट्विट होता की अजून नीट कळलं नाहिये पण बहुतेक डंबलडोअर, स्नेप आणि ब्लॅक पण परत येताहेत.
मिनी: सॉल्लिड!
---
अनेक मैल दूर जे.के.रॉलिंग गुणगुणत असते "अॅला अॅला रे व्हॉल्डमॉर्ट. अॅला अॅला लॉर्ड व्हॉल्डमॉर्ट"
आता एवढे सगळे जण परत येणारेत
आता एवढे सगळे जण परत येणारेत तर सेड्रिक डिगोरीला पण बोलवा. माझ्याच्यानी चो चँगचं एकटेपण बघवत नाही.
भरत कालचा कॅसलचा एपिसोड
भरत
कालचा कॅसलचा एपिसोड पाहून उगाचच आपल्या मायभूमीत ही सिरियल काढ्ली असती तर शेवटच्या काही क्षणातले ड्वायलॉग्ज कसे असते असा विचार मनात येऊन गेला. काल्चा म्हणजे सिझन ३ चा शेवटचा एपिसोड तुम्ही पाहिला नसेल आणि पहायची इच्छा असेल तर पुढील पोस्ट वाचू नका. कारण त्यात बेकेटच्या आईच्या खुनाबद्दल एक रहस्यभेद आहे.
सीन १:
तर रॉय मॉन्टगॉमरी गोळ्या लागून जमिनीवर पडला आहे. बेकेट धावत धावत त्याच्याकडे जाते.
"सर, सर, ये आपने क्या किया सर? आंखे खोलिये सर, भगवानके लिये आखे खोलिये"
"कौन? बेकेट?" मॉन्टगॉमरी कष्टाने डोळे उघडतो.
"हा, सर, मैही हू. आप चिंता मत किजिये, आपको कुछ नही होगा, मै आपको कुछ नही होने दूंगी, हम अभी आपको हस्पताल ले चलते है"
"बेकेट, मेरी बात सुनो बेकेट, मै तुमसे माफ़ी मांगना चाहता हू"
"सर, ये आप क्या कह रहे है सर?"
"मुझे बोलने दो बेकेट, मेरे पास वक्त बहोत कम है. मेरी एक गलतीकी बजहसे तुम्हारे सरसे मांका साया उठ गया. तुम्हारा बचपन अनाथ हो गया. मै तुम्हारा गुनहगार हू, माफ़ीके काबील तो नही लेकिन फ़िरभी दोनो हात जोडके माफ़ी मांगता हू. हो सके तो मुझे माफ़ कर देना. और मेरी पत्नीको कुछ मत बताना, वो ये सदमा बरदाश्त नही कर पायेगी, मर जायेगी. वादा करो मुझसे, वादा करो बेकेट" चेहेरा वेदनेने पिळवटलेला.
"सर, मै वादा करती हू. जब तक मेरी सांसे चल रही है मै मिसेस मॉन्टगॉमरीको कुछ नही बताउंगी. ये राज हमेशा राज रहेगा"
मॉन्टगॉमरी कसाबसा हसतो
"मुझे तुमसे यही उम्मीद थी बेकेट. तुम बहोत तरक्की करोगी. मेरा आशिर्वाद हमेशा तुम्हारे साथ रहेगा, हमेशा जिती रहो. अब इस मरते हुए आदमीकी एक और बात सुनोगी?".
"ऐसा मत कहिये सर"
"मुझे बोलने दो. कॅसल तुमसे बहोत प्यार करता है लेकिन अपने दिलकी बात तुमसे कह नही पाता. उससे शादी करके अपना घर बसालो. वो तुम्हे बहोत खुश रखेगा"
"सर"
"हा कहो बेकेट, हा कहो, मेरे आत्माको शांती मिल जायेगी."
"हा सर, हा, मै कॅसलसे शादी करनेके लिये तय्यार हू"
मॉन्टगॉमरी हसतो आणि डोळे मिटून मान टाकतो. त्याचा हात जमिनीवर पडतो.
"सर, सर. आप हमे इस तरह छोडके नही जा सकते. सर.....नही" बेकेट मॉन्टगॉमरीच्या छातीवर पडून रडू लागते.
बेकेटचे २ कलिग्ज येतात - त्यातला एक मुसलमान, एक ख्रिश्चन. ते आपआपल्या धर्माच्या प्रार्थना म्हणतात. कॅमेरा दूर जातो तेव्हा सूर्यास्त होत असतो. पार्श्वसंगीतात एक बाई "आआआ" करून ओरडते (अधिक माहितीसाठी पहा - पवित्र रिश्ता)
सीन २:
नंतरचा शॊट मॉन्टगॉमरीच्या घरातला. त्याची बायको पूजा करत असते. देव्हायातल्या दिव्याची ज्योत फ़डफ़डते आणि विझते.
"हे भगवान, ये कैसा अपशगुन. मेरे सुहागकी रक्षा करना." मॉन्टगॉमरीची बायको म्हणते.
बेकेट आणि कॅसल येतात. मॉन्टगॉमरीची बायको देवघरातून बाहेर येते.
कॆमेरा कॅसलच्या चेहेयावर,बेकेटच्या चेहेयावर, मग मॉन्टगॉमरीच्या बायकोच्या चेहेयावर.
"अरे आप लोगोने कैसे आना किया? ये लिजिये प्रसाद. मै अभी चाय लेके आती हूं"
"ठहरिये मिसेस मॉन्टगॉमरी. हम एक बुरी खबर लेके आये है"
कॆमेरा बेकेटच्या चेहेयावर, मग कॅसलच्या चेहेयावर,मग मॉन्टगॉमरीच्या बायकोच्या चेहेयावर.
"क्या हुआ? उन्हे कुछ हुआ तो नही? बोलो बेकेट, तुम कुछ बोलती क्यो नही?" बेकेट गप्प.
कॆमेरा कॅसलच्या चेहेयावर,मग मॉन्टगॉमरीच्या बायकोच्या चेहेयावर.
"कॅसल, भगवानके लिये तुम तो कुछ बोलो"
कॆमेरा बेकेटच्या चेहेयावर,मग मॉन्टगॉमरीच्या बायकोच्या चेहेयावर.
"मिसेस मॉन्टगॉमरी. सर अब हमारे बीच्मे नही रहे"
मॉन्टगॉमरीची बायको "नही" असं ओरडते. तिच्या हातातून पूजेची थाळी खाली पड्ते. तिला चक्कर येते आणि बेकेट पुढे होऊन तिला सावरते. पार्श्वसंगीतात एक वेगळी बाई "आआआ" असंच ओरडते - पण थोडं वेगळ्या तर्हेने. (अधिक माहितीसाठी पहा - पवित्र रिश्ता)
(No subject)
अशक्य आहेस स्वप्ना
अशक्य आहेस स्वप्ना नेहमीप्रमाणेच ही: ही:
Pages