मालिकांच्या गप्पांच्या पानावरच्या निवडक पोस्टस साठवण्यासाठी हा धागा उघडलाय.
वि.सू. १- झी मराठी/हिंदी चॅनेल किंवा चॅनेलशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेशी माझं कोणतंही वैयक्तिक वैर नाही. मराठी/हिंदी चॅनेल्स दर्जेदार प्रोग्राम्स दाखवू शकतात पण दाखवत नाहीत ह्याबद्दलचं दु:ख आणि राग व्यक्त करायचं हे एक माध्यम आहे. हे चॅनेल कोणतंही चॅनेल असू शकतं. आमच्या घरी झी मराठी आणि हिंदी पाहिलं जातं त्यामुळे सर्व उल्लेख त्यावरील प्रोग्राम्सबद्दल आहेत.
वि.सू. २ - कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर कसल्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास माफी असावी.
वि.सू. ३ - मी ह्या मालिका स्वखुशीने पहात नाही. घरात पाहिल्या जातात.
-----
गौतम बुध्द प्रवचनाला बसले होते. लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं कानात साठवून घेत होते. एव्हढ्यात एक स्त्री धडपडत तिथे आली. दु:खाने आणि वेदनेने तिचा चेहेरा पिळवटला होता. डोळ्यांतून सारखे अश्रू वहात होते. "महाराज, मला मदत करा, मला मदत करा. मला माझा मुलगा परत द्या. हा चमत्कार तुम्हीच करू शकता."
"बाई, शांत व्हा, काय झालंय?" बुध्दांनी विचारले.
"महाराज, मी कृशा गौतमी. माझा एकुलता एक मुलगा अचानक वारला. नवर्याच्या मागे मी त्याला तळहातावरच्या फ़ोडाप्रमाणे वाढवत होते. त्याच्याशिवाय कशी जगू? माझ्या मुलाला जिवंत करा महाराज"
"बाई, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. गावात जाऊन ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही अश्या घरातून मूठभर मोहोरा आणा."
बाई गावात घरोघर फ़िरली. पण तिला असं एकही घर मिळालं नाही. निराश होऊन ती बुध्दांकडे परतली. "महाराज, मला माझी चूक कळली. मृत्यू सर्वांनाच येतो आणि त्यावर कोणाकडेही उत्तर नाही"
कृशा गौतमी अश्या जड पावलांनी घरी परत जात असताना वाटेत तिला एक कपाळभर टिळा लावलेली बाई दिसली. तिने कृशा गौतमीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. कृशा गौतमीने सगळी हकिकत सांगितली. बाई मंद हसली आणि म्हणाली "आज रात्री ८ वाजता झी मराठीवर माप्रिप्रिकचा एपिसोड बघ. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल"
कृशा गौतमीने ८ वाजेतो कसातरी धीर धरला. माप्रिप्रिक सुरू होताच ती सावरून बसली.
"शमिका इज नो मोअर" असं डॊक्टरांनी सांगताच अभिने देवासमोर धरणं धरलं. प्रार्थना करताना तो चेहेरा एव्हढा वेडावाकडा करत होता की त्या मोटारीचं चाक ह्याच्याही पोटावरून गेलंय की काय अशी प्रेक्षकांना शंका यावी. एव्हढ्यात कुठूनशी एक परकर-पोलक्यातली मुलगी (तीसुध्दा मुंबई सारख्या शहरात!) आली. अभिने "माझी शमिका मला दे" अशी लहान मुलं रस्त्यात बैठा सत्याग्रह करताना ओरडतात तशी आरोळी ठोकली. त्या मुलीने प्रार्थना केली, मग अभिच्या पापणीचा केस उपटून त्याच्याच तळहातावर ठेऊन त्याला (म्हणजे केसाला!) फ़ुंकर मारली आणि तुझी बाहुली तुला परत मिळेल असं म्हणून ती निघून गेली. लगेच अभिला त्याच्या आईचा फ़ोन आला की शमिका शुध्दीवर आली.
इथे कृशा गौतमीने टीव्ही बंद केला आणि मुलाला जिवंत करायला ती निघून गेली.
तात्पर्य: गौतम बुध्दांना जे जमलं नाही ते केकतेने करून दाखवलंय. तस्मात केकताम शरणं गच्छामि.
रच्याकने, ज्या डॊक्टरला माणसाची शुध्द गेली आहे का जीव हे कळत नाही तो शमिकावर उपचार करतोय आणि वर अभिला सांगतोय की काळजी करण्याचं काही कारण नाही? ये बात कुछ हजम नही हुई. दवा आणि दुवा जिवंत माणसावर परिणाम करतात हो, मेलेल्या माणसावर नाssssssही.
स्वप्ना , तु लईच out of the
स्वप्ना , तु लईच out of the box विचार करतीस ग !

परत एक भन्नाट पोस्ट !
(No subject)
स्वप्ना .... भन्नाट
स्वप्ना .... भन्नाट

स्वप्ना, भारी आहे. हे सगळे
स्वप्ना, भारी आहे.
हे सगळे प्रोग्रॅम झाल्यावर तु लिहितेस तसे किस्से दाखवणारा एक प्रोग्रॅम पाहिजे.
किंवा सरळ फु बाई फु मधे तुझ्या पोस्टसवर स्किट घ्यायला पाहिजेत
धमाल येईल!
या सिरीयल्सची शिर्षकं पण अशी
या सिरीयल्सची शिर्षकं पण अशी भन्नाट आहेत...
तु (जिथे नाही) तिथे मी!
मला सासु हवी (हे त्या मीरा सोडुन कोणालाच ... खुद्द सासुला पण वाटत नाहिये)
अजुन हि चांदरात आहे (एकहि चांदरात दिसली नाही. नि आता तर भुत बित सोडुन प्रेमाचा त्रिकोण वगैरे दाखवताहेत)
राधा हि बावरी (खडुस दिस्ते चक्क)
मस्त.. भन्नाट लिहितेस गं
मस्त..
भन्नाट लिहितेस गं तु...
स्वप्ना.... भन्नाट... आजकाल
स्वप्ना.... भन्नाट...
आजकाल जस सिनेमाच्या नाहितर सिरियलच्या DVD मधे Behind the Scenes असते, तसं स्वप्ना स्पेशल add करायला सांग... जास्ती खपतील..
गेला बाजार तुला सिरियलवाल्यांनी सिरियलच्या प्रमोशनबद्द्ल रॉयल्टी द्यायलाच पाहिजे.. मी चक्क ती सासूबाईवाली सिरियल २ वेळा बघितली..इथल्या पोस्ट वाचुन राहावलं नाही मला.
धन्स मंडळी
धन्स मंडळी
डॉक्टर वॉटसन २२१बी बेकर
डॉक्टर वॉटसन २२१बी बेकर स्ट्रीट मध्ये शिरला तेव्हा संध्याकाळ होऊ लागली होती. होम्सची खोली धुराने भरली होती. त्यावरून तो बराच वेळ पाईप ओढत बसला असावा हे वॉटसनने ताडलं. 'गुड इव्हिनिंग वॉटसन' त्याच्या खोकण्यावरून कोण आलंय हे अचूक ओळखत होम्स म्हणाला. 'गुड इव्हिनिंग होम्स' होम्स कुठे बसला आहे ह्याचा अंदाज घेत वॉटसन स्थानापन्न झाला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. होम्सने पाईप ओढणं थांबवलं असावं कारण धूर कमी होत चालला होता.
'कसला एव्हढा विचार करतोयस वॉटसन? एखादी नवी केस आहे का?' होम्सने विचारलं.
'छे, छे, उगाच आपलं' वॉटसन सावरून बसला.
'ह्म्म्म्म.....हाच विचार करतो आहेस ना की सौरभ खरं बोलतोय का खोटं?'
'सौरभ? कोण सौरभ?' वॉटसन अंमळ पटकन बोलला तेव्हा होम्सला आपला अंदाज अचूक असल्याचं कळलं.
'उगाच वेड पांघरून पेडगावला कशाला जातोस वॉटसन? आता लग्न झालंय तुझं. तेव्हा ह्या सिरियली पहाव्या लागणार. त्याला इलाज नाही मित्रा'.
'तेही खरंच म्हणा.' एक दीर्घ उसासा टाकून वॉटसन म्हणाला 'तुझं बरं आहे बाबा. एकटा जीव सदाशिव. मी मात्र लग्न करून अडकलोय. पण तुला सौरभ कसा माहित?'
'मिसेस हडसन बघते रे ती सिरियल. मीही बघतो कधी कधी थोडं हसावंसं वाटलं तर'
'मग तुझं काय मत?'
'एलिमेन्टरी माय डियर वॉटसन. बिचारा सौरभ खरं बोलतोय. अरे त्याने काही पाहिलं असतं तर तोच बेशुध्द नसता का पडला?' असं म्हणून होम्स पुन्हा विचारमग्न झाला.
'अरे हो. हे लक्षातच आलं नाही माझ्या. पण तू कसला गहन विचार करतो आहेस एव्हढा?'
'हाच की चादरीखालून एखाद्याचे कपडे कसे बदलता येतील?'
'ह्म्म्म....माझ्या आर्काइव्हज साठी मस्त केस होईल बघ - द मिस्टरी ऑफ द पिंक नाईटगाऊन'
स्वप्ना
स्वप्ना
मी मिसला हा भाग शिरियलीत
मी मिसला हा भाग
शिरियलीत इण्ट्रेस्ट नही पण स्वप्नाच्या पोस्टींसाठी पहाण्याच मोह होतोय...
इथे ही सिरियल पाहाणारं बरचं पब्लिक दिसतय...एक नवा बाफ काढायला हवा...
एलदुगो सारखी धमाल उडुन जाईल
आसवरी जोशीचा मसाह ला रामराम!
आसवरी जोशीचा मसाह ला रामराम! (कंटाळली बहुदा परीक्षा देवुन!)
आता सविता प्रभुणे नव्या सासुबाई!
स्वप्नाची टिप्पणी आली नाही अजुन... कुठे आहेस ग!
आज खूप दिवसांनी तू तिथे मी
आज खूप दिवसांनी तू तिथे मी पहिले .सत्यजित मंजिरीची द्रुष्ट काढत होता चक्क !
मीठ मोहोरी ओवाळून !
आज खूप दिवसांनी तू तिथे मी
आज खूप दिवसांनी तू तिथे मी पहिले .सत्यजित मंजिरीची द्रुष्ट काढत होता चक्क ! स्मित मीठ मोहोरी ओवाळून !

>>>
हायला
हाऊ रोमँटीक
"नारायण, नारायण" शेषनागावर
"नारायण, नारायण" शेषनागावर पहुडलेल्या भगवान विष्णूना प्रणाम करतेवेळी नारदमुनींचे हात कापत होते.
'मुनिवर, झालंय काय? तुम्ही काळजीत दिसता' भगवान विष्णू उठून उभे रहात म्हणाले.
'बातमीच तशी आहे देवा. पृथ्वीने फिरणं थांबवलंय'
'काय? काय सांगताय काय?' भगवान विष्णू जवळ्जवळ ओरडलेच.
'खरं तेच सांगतोय देवा. सगळीकडे हाहाकार माजलाय. मानवजातीचं काही खरं दिसत नाही. लवकर उपाय शोधायला हवा.'
हिन्दी सिरियलमध्ये कसं एखादा प्रॉब्लेम असला की सगळी फॅमिली गोळा होते (पहा पवित्र रिश्ता!) तसं लगेच तिथे ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि इन्द्र अवतीर्ण झाले.
'पृथ्वी फिरायची थांबली? मग माझं सिंहासन डळमळलं नाही ते?' इन्द्र आश्चर्याने म्हणाला.
'तेही कंटाळलंय अलिकडे' नारदमुनी तु.क. टाकून म्हणाले.
'भगवन, तुम्ही तरी काही करा' मुनी महादेवांकडे पाहून म्हणाले. महादेव विचारमग्न होते पण त्यांनी लगेच पार्वतीला टेलिपथिक संदेश पाठवला (देवोंके देव महादेव पहायला लागल्यापासून त्यांना ही ट्रीक कळली होती). लगेच पार्वती हजर झाली.
ते काही बोलणार एव्हढयात तीच म्हणाली 'माहित आहे. पृथ्वी फिरायची थांबली आहे ना?'
'माहित आहे तुला?' महादेव अवाक होऊन म्हणाले.
'म्हणजे काय? मी जगन्माता आहे म्हटलं. आम्हालाही बातम्या लागतात बरं' हे वाकय नारदमुनींना उद्देशून होतं. महादेव गप्प बसले.
'माते, काही उपाय?' मुनी हात जोडून म्हणाले.
'सोप्पं आहे. काहीही करु नका. आज संध्याकाळी ७:३० वाजता पृथ्वी पुन्हा फिरायला लागेल.'
'काय?' त्रिदेव एकासुरात ओरडले. नारदमुनींच्या तोंडून फक्त "नारायण, नारायण" आलं.
'तर काय? अहो, राधाचा जोडीदार कोण होणार हे पहायला पृथ्वीने श्वास रोखून धरलाय. म्हणून ती फिरायची थांबली आहे. एकदा का राधाचं लग्न झालं की लागेल ती फिरायला'
(No subject)
'नारायण नारायण' चालता चालता
'नारायण नारायण' चालता चालता नारदमुनी एकदम थबकले. यम आणि त्याचा रेडा घामाघूम होऊन धावत धावत येत होते. शोलेमध्ये बसंती आणि धन्नोच्या मागे गब्बरची माणसं आणि त्यांचे घोडे लागल्यावर त्या कश्या पळतात अगदी तस्से. म्हशीवर बसलेली कोणी बाई त्यांच्या मागे लागली आहे हा काय असं वाटलं त्यांना. पण तो विचार झटकत त्यांनी त्या दोघांना थांबवायचा यत्न केला.
'यमराज, थांबा थांबा'
'नाही मुनिवर आता थांबवू नका' यम पळत पळत म्हणाला.
'अहो पण झालंय काय?' यमाचा हात धरून त्याला जवळजवळ खेचत त्यांनी थांबवलं.
'काय झालंय? सगळे यमदूत संपावर गेलेत. आता मोर्चा घेऊन येताहेत असं कळलंय म्हणून धावतोय मी'.
'पण त्यांना संपावर जायचं कारणच काय? तुम्ही काही आर्थिक लोचा तर नाही ना केला' नारदमुनी रोखून बघत म्हणाले.
'अहो, मी कुबेराच्या डिपार्टमेन्टमध्ये आहे का लोचा करायला?'
'मग?'
'मग काय? अहो, यमदूत कोणाही बाईचे प्राण हरण करायला जाणार नाही म्हणतात'
'ऑ? का?'
'म्हणे बायका हटून बसतात की आमचा नवरा आम्हाला परत यायला नेईपर्यंत थांबा.'
'नवरा त्यांना कशाला न्यायला येईल?'
'त्या अर्चनाचा नाही का आला? म्हणून सगळ्या बायांना वाटतं आपलाही येईल'
'असं का? मग येतात का नवरे?'
'९०% केसेसमध्ये नाही येत.'
'वा! काय सांगताय? १०% बायकांचे नवरे येतात? छान छान'
'अहो छान छान काय मुनिवर? ते येतात आणि म्हणतात हिला परत पाठवणार असाल तर मला तुमच्याबरोबर घेऊन चला' यमाने कपाळाला हात लावत सांगितलं आणि रेडा मान हलवत खिन्न मनाने ज्ञानेश्वरांनी शिकवलेले वेद आठवू लागला.
अर्चना कौन है???? पामरावर
अर्चना कौन है????
पामरावर उजेड पाडा प्लिज
(No subject)
अर्चना कौन है??? >>>> एवढ
अर्चना कौन है??? >>>>
एवढ रामायण होऊन रामाची सिता कोण? 
अर्चना पवित्र रिश्ता मधली.
स्वप्ना अशक्य आहेस
रेडा मान हलवत खिन्न मनाने
रेडा मान हलवत खिन्न मनाने ज्ञानेश्वरांनी शिकवलेले वेद आठवू लागला. >> हे वाक्य म्हणजे मास्टरस्ट्रोक!
स्वप्ना तु प्लिज वविला ये,
स्वप्ना तु प्लिज वविला ये, मला तुला साष्टांग नमस्कार घालायचा आहे.
राधा ही बावरी काय भयाण आणि
राधा ही बावरी काय भयाण आणि टुकार आहे.... देवारे..कविता लाड मेढेकर आणि त्या राधाची सावत्र आई काय आक्रस्ताळेपणा करतात.... हिरो आणि हिरवीण अतिशय सुमार अॅक्टिंग करतात.....वैद्यबुवांचा विग आणि मनोरुग्ण असल्याच नाटक करणारा भाऊ अतिशय इरिटेटिंग.....
धन्स मंडळी
धन्स मंडळी
(No subject)
भाऊ ___/\___ द बेस्ट
भाऊ ___/\___
द बेस्ट
स्वप्ना
स्वप्ना
खल्लास..!!!!!
खल्लास..!!!!!
Цветовете на Любовта Bidaai -
Цветовете на Любовта Bidaai - ОФициална страница
फेसबुक वर बल्गेरिअन भाषेत "बिदाई" मालिकेचे फॅन पेज आहे.............
माझी बल्गेरिअन मैत्रिण ने विचारलेले ... मला ही मालिका बघतोस का...फार छान आहे..
हे असे कपडे दागिने कुठे मिळतील....
तुमच्या इथे बायका हे सगळे घालुन झोपतात का ? झोपताना पुर्ण साडी वगैरे नेसुन झोपतात का ?
अरे भारताच्या मालिका परदेशी दाखवणे बंद करा...............
आम्हाला उत्तर देतादेता नाकी नउ येतात ..........
भारताच्या मालिका परदेशी
भारताच्या मालिका परदेशी दाखवणे बंद करा.>>>>:हाहा:
खरय ते असले पाहुन त्या बायका/पोरी जाम येड्या होतात.:फिदी: त्यात अनिवासी भारतीय पण सामिल आहेत.:खोखो:
Pages