गेल्या महिन्यात २५ सप्टेंबर रोजी तब्बल २५ भटक्यानी पवना धरणाच्या समोर असलेला तिकोनागड सर केला. तारीख २५ आणि भटके देखील २५. पहाटे ६ वाजताच ट्रेकसाठी धाव मारली. आता धाव गाडीने मारली. आम्ही आपले त्यात बसून... तासाभरात पनवेलला आणि मग अजून तासाभरात लोणावळ्याला पोचलो. सर्वात महत्वाचा असा खादाडी ब्रेक घेतला आणि मग तिथून कामशेतच्या दिशेने निघालो. कामशेत फाट्याला उजवू मारत आमचा लवाजमा तिकोना पेठ गावाच्या दिशेने निघाला. डाव्या बाजूला बेडसे गाव आणि मग पवना कॉलोनी पार करत धरणाच्या काठाला लागल्यावर समोरचे दृश्य पाहून गाडी न थांबवणे म्हणजे अरीसकपणाचा कळस झाला असता. मी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि तिकडे पुन्हा एकदा सर्वांची फोटोगिरी सुरू झाली. पवना धरणाच्या भिंतीमागून आता तुंग किल्ला डोकावू लागला होता आणि डावीकडे तिकोना आम्हाला खुणावू लागला होता.
आता अजून वेळ दडवून चालणार नव्हते. शेवटची धाव मारत तिकोना पेठच्या आधीचा खडा चढ पार करत आम्ही पायथ्याला पोचलो. गावातल्या देवळासमोर गाड्या टाकल्या आणि निघण्याआधी एक ओळखसत्र घेतले. मोठा ग्रुप असेल आणि बरेच लोक एकमेकांना ओळखत नसतील तर असे एक छोटेसे सत्र घेणे उत्तम. काही नवखे ट्रेकर्स असल्याने मी काही मोजक्या सूचना दिल्या. मग आम्ही सर्व तो गडाकडे जाणारा लाल मातीचा रस्ता तुडवत निघालो. पाउस तर दूरच पण मळभ सुद्धा नव्हते. उनाचा त्रास होणार म्हणून सर्वांना जास्तीतजास्त पाणी सोबत ठेवायला सांगितले होतेच.
पायथ्यापासून निघालेलो आम्ही एकामागून एक टप्पे सर करत राम ध्यान मंदिर, मारुतीची मूर्ती आणि गडाचा खालचा दरवाजा पार करत पायऱ्यांना भिडलो. गडाचा दरवाजा शिवकालीन पद्धतीचा असून बुरुज पुढे देऊन मागे लपवलेला आहे. बुरुज साधारण २० मीटर उंचीचा तरी असावा.
गडाची उजवी भिंत आणि बांधीव बुरुज ह्या मधून १०० एक खोदीव पायऱ्या आपल्याला गड माथ्यावर घेऊन जातात. पायऱ्यांच्या अर्ध्या वाटेवर उजव्या हाताला एक शुद्ध पाण्याचे टाके आहे. इथून वरच्या काही पायऱ्या थोड्या खराब झालेल्या आहेत. तेंव्हा जरा जपून. पायऱ्या संपल्या की डाव्या हाताला बुरुजावर जाता येते. दरवाज्याच्या बाजूला उजव्या हाताला पाण्याच्या २ टाक्या आहेत.
ह्यातले पाणी अतिशय गार आणि शुद्ध असून पिण्यासाठी एकदम योग्य आहे. २००२ साली ह्या टाक्याचे पाणी वापरून शामिकाने अशी काही साबुदाणा खिचडी बनवली होती की ती चव अजून सुद्धा जिभेवर आहे. ते टाके बघताच त्या ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या.
अर्धा तासभर खादाडी महोत्सव साजरा करत मग आम्ही गड बघायला निघालो. एक गडफेरी पूर्ण केली. गडाच्या माथ्यावर शिवशंकराचे मंदिर असून मंदिराच्या खाली पाण्याचे कुंड आहे. २००२ साली मी इकडे आलो होतो तेंव्हा हे पाणी पिण्यायोग्य होते पण आता इकडे बरीच पडझड झाली आहे.
मंदिरासमोरचा नंदी बराच झिजला असून एक नवीन छोटा नंदी पिंडी समोर बसवला आहे. आम्ही गड माथ्यावरून सभोवतालचा नजारा बघून तृप्त झालो. पश्चिमेला विस्तीर्ण पवना जलाशय आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असणारा तुंग किल्ला एक आगळेच विलोभनीय दृश्य निर्माण करीत होता. हिरवीगार जमीन, निळेशार पाणी आणि पांढरेशुभ्र ढग यांनी एक सुंदर चित्र रेखाटले होते.
हल्लीच जाऊन आलेलो तो विसापूर उत्तरेकडून हाक मारत होता. विचारात होता बहुदा,'काय काही दिवसांपूर्वी इकडे होता विसरला नाही ना?' आणि बाजूचा लोहगड म्हणत होता,'काय राव इकडे कधी येताय? खूप दिस झालं की तुम्हाला भेटून' मनोमन लोहगडाला भेटायचे ठरवून पुन्हा एकदा खाली दरवाज्यापाशी आलो आणि निघायच्या तयारीला लागलो. ४ वाजून गेले होते. पण माझी क्लिका-क्लिकी सुरूच होती.गड चढताना मारुतीच्या मूर्तीपाशी थांबून फक्त नमस्कार केला होता पण फोटो राहिला होता तो घेतला. खाली २००२ सालचा फोटो दिलाय जेंव्हा मी पहिल्यांदा तिकोनाला आलो होतो.
पायथ्याला पोचलो तेंव्हा ५ वाजून गेले होते. लाल मातीच्या वाटेवरून वळून पुन्हा एकदा तिकोनाकडे पाहिले. तो म्हणत होता,'सुखरूप जा पोरांनो. आठवणीने आलात बरं वाटले.' गड-किल्ले नेहमीच आपल्याशी बोलतात असे मला वाटत आले आहे. अर्थात त्यांची भाषा आपल्याला समजायला हवी.
आजचा ट्रेक तिकोना असला तरी संपूर्ण वेळ पवना धरणाने वेढा घातलेला उत्तुंग तुंग आम्हाला खुणावत राहिला. परतीच्या वाटेवर मावळतीच्या सूर्याबरोबर देखील त्याचेच दर्शन झाले... मनात आल्याशिवाय राहिले नाही. मी मनात म्हणालो, 'काळजी करू नकोस. लवकरच येतोय मी तुझ्या भेटीला.'
.......... पक्का भटक्या...
थँक्स! माझ्या आवडत्या
थँक्स!
माझ्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक!
चूकून दोन पोस्ट!
चूकून दोन पोस्ट!
रोह्या.. जबरदस्त.. तुझा
रोह्या.. जबरदस्त.. तुझा दुर्गभ्रमणाच्या वृतांत असा फोटो बरोबर आला की एकदम जबरदस्त वाटते मित्रा.. पहिला अन शेवटचा प्रचि... एकदम क्लास !
मस्तच ! पहीला, दहावा
मस्तच !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहीला, दहावा (हिरवीगार जमीन, निळेशार पाणी आणि पांढरेशुभ्र ढग यांनी एक सुंदर चित्र) आणि शेवटच फोटो अप्रतिम !
सुंदर रे. या तिकोन्याचे
सुंदर रे. या तिकोन्याचे जलाशयाच्या बाजूने दिसनारे रुप खुपच अनोखे.
मस्त...
मस्त...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटचे दोन खूप आवडले!
शेवटचे दोन खूप आवडले!
नेहमीप्रमाणे मस्तच खाली २००२
नेहमीप्रमाणे मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खाली २००२ सालचा फोटो दिलाय जेंव्हा मी पहिल्यांदा तिकोनाला आलो होतो.>>>>. रोहन, Before and After![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सूर्या... आपल्या एकत्र
सूर्या... आपल्या एकत्र ट्रेकचे जमव रे लवकर ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यो... आता २०१८ चा टाकीन पुढच्या वेळी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यो... आता २०१८ चा टाकीन
यो... आता २०१८ चा टाकीन पुढच्या वेळी...>>>>नक्कीच टाक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असाच भटकत रहा आणि तुझ्या लिखाणातुन/फोटोतुन आम्हालाही Virtual Tour घडवत रहा.
:पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा देणारा बाहुला:
मस्त रे भटक्या...
मस्त रे भटक्या...
पक्या.. इथे सगळे एकत्र जमले
पक्या.. इथे सगळे एकत्र जमले आहेत ( तुला कन्सिडर करूनच ) .. फक्त आता ट्रेक डेस्टिनेशन ठरायचं बाकी आहे.. !
सूर्या ठरलाय की.... आपण
सूर्या ठरलाय की.... आपण सर्वजण खांदेरीला जातोय लवकरच...
पण माझ्या मनात तुंग करायचा खूप विचार सुरू आहे... उत्तुंग तुंग... बोला काय म्हणताय?
हवंतर 'माझे दुर्गभ्रमण' मध्ये एक नवीन 'गप्पांचे पान' सुरू करुया??? त्यावर चर्चा होऊ दे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रोह्या.. हरकत नाही.. तू
रोह्या.. हरकत नाही.. तू सुन्या अंबोलकर अन यो रॉक्सला बोलून बघ.. त्यांना ह्यातली जास्त माहीती आहे.. तुझ्या गप्पांच्या पानाची आयडीया आवडली रे.
आत्ताच पान सुरू करतोय...
आत्ताच पान सुरू करतोय...
तिकडेच होऊन जाऊ दे काय ते... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वेढा घातलेला उत्तुंग तुंग
वेढा घातलेला उत्तुंग तुंग आम्हाला खुणावत राहिला. >> पुढच्या महिन्यात.. तुंग नि कोरीगड !! बाकी तारीख लवकरच..
तुम्ही फक्त हो म्हणा असे नाही.. बरोबर चला.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी पक्क्या.. मस्त वर्णन नि
बाकी पक्क्या.. मस्त वर्णन नि फोटो.. मी तिकोना नि तुंग फक्त लांबूनच पाहिलेत.. पण माहित नाही.. ठरवायचे म्हटले तर तुंगला मिठी मारीन.. तुझे फोटो बघून तर अजून उत्सुक झालो आहे..
योरा.. मी तय्यार.. फक्त
योरा.. मी तय्यार.. फक्त पुढच्या महिन्यात २५ नंतर असेल तर उत्तमच.. ! कारण २३ पर्यंत बिझी जाम.. रोह्या.. तू पान सुरू कर रे.. !
पान सुरू केलंय.. तिकडेच या
पान सुरू केलंय.. तिकडेच या रे!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम, लास्ट फोटो
अप्रतिम,
लास्ट फोटो जबरदस्त.....
योगेश, मस्त वर्णन रे ! फोटो
योगेश,
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त वर्णन रे !
फोटो आणखी हवे होते !
तुझ्यात आणि मारूतीराय
तुझ्यात आणि मारूतीराय यांच्यात बराच बदल झालेला जाणवतोय....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मित्रांनो... हा लेख थोडा
मित्रांनो... हा लेख थोडा बदलून... महाराष्ट्र टाईम्स (पुणे) मध्ये आज प्रकाशित झाला आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हार्दिक अभिनंदन रोहन
हार्दिक अभिनंदन रोहन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन पक्क्या भटक्या....
अभिनंदन पक्क्या भटक्या....
खूप खूप अभिनंदन रोहन!!
खूप खूप अभिनंदन रोहन!!
वा! सुंदरच ! महाराष्ट्र
वा! सुंदरच ! महाराष्ट्र टाईंम्समधला लेख आता वाचते.
वाचला रे..
वाचला रे..
मार्चच्या शेवटी मुळशीला
मार्चच्या शेवटी मुळशीला जातोय. सोबत ४.५-८ च्या वयातली ७ मुले आहेत. ह्या मुलांना तिकोनाला घेऊन जावे का? प्रत्येक मुलासोबत एक मोठं माणोस असेल. तिकोनाच्या पायथ्याला गावात गाड्या पार्क करून मग वर जायचा बेत आहे.