अग्निहोत्र : शेतीसाठी समृद्ध वरदान!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 24 October, 2010 - 04:23

मध्यंतरी एका परिचितांच्या ओळखीतील शेतावर जायचा योग आला. हिरवेगार शिवार, डोलणारी पिके, रसरशीत फळे - भाज्या पाहून मन प्रसन्न झाले. शेतमालकांनी आपल्या शेतीत आपण अग्निहोत्राचा दैनंदिन प्रयोग रोज करत असल्याचे व तेव्हापासून पिकाला खूप फायदा झाल्याचे आवर्जून सांगितले. ह्या अगोदरही मी अग्निहोत्र कसे करतात, का करतात, त्याचे वातावरणासाठी - शेतीसाठी व आरोग्यासाठी उपयोग इत्यादींविषयीची मार्गदर्शक भाषणे व प्रात्यक्षिके पाहिली होती. परंतु ज्या शेतजमीनीत असे अग्निहोत्र अनेक महिने नित्यनियमाने होत आहे असे शेत बघण्याचा योग बऱ्याच काळानंतर जुळून आला. अग्निहोत्राचा नित्य सराव शेतीसाठी खरोखरीच उपयोगी पडू शकतो हे जाणवले. तेव्हा पासून ही माहिती आपल्या इतर मराठी शेतकरी बांधवांपर्यंत विनासायास कशी नेता येईल ह्यावर माझे विचार मंथन सुरू झाले. आंतरजालावर मराठीत काही माहिती उपलब्ध होते का, हे धुंडाळले. परंतु हाती विशेष काही आले नाही. इंग्रजी व अन्य विदेशी भाषांमध्ये (जर्मन, फ्रेंच, पोलिश इ. ) मात्र विपुल माहिती उपलब्ध आहे. विज्ञान किंवा शेती हा काही माझा प्रांत नव्हे. परंतु तरीही माझ्या अल्पमतीला अनुसरून अग्निहोत्राविषयीची मला मिळालेली व शेतकरी बंधूंसाठी तसेच पर्यावरण प्रेमींसाठी उपयुक्त वाटणारी माहिती आपल्या समोर ठेवत आहे! (जाणकारांनी ह्या माहितीत भर घातली तर स्वागतच आहे!)

मानवाच्या व जीवसृष्टीच्या इतिहासात सूर्य व अग्नी यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सूर्याने औष्ण्य दिले, प्रकाश, प्राणऊर्जा, अन्न दिले तर अग्नीने भयमुक्त केले, अन्न रांधता येणे शक्य केले व पोषण केले. त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण भूमिकेला अनुसरून जगातील बहुविध संस्कृतींमध्ये सूर्य व अग्नी वंदनीय मानले गेले असून त्यांना देवत्व बहाल केलेले आढळते. त्यांचा आदरसन्मान, त्यांचे प्रती कृतज्ञता आणि त्यांची उपासना हा त्यामुळे अनेक संस्कृतींचा अविभाज्य भाग न बनला तरच नवल!

भारतात शेती व गोधनाच्या दृष्टीने अग्नी व सूर्य फारच उपयोगी! कदाचित त्यामुळे भारतीय संस्कृतीतही सूर्योपासना व अग्नीपूजा पुरातन कालापासून दिसून येते. ह्या उपासना व पूजांमधील एक भाग म्हणजे अग्निहोत्र. अग्नी व सूर्याची आराधना. प्रजापतीला अभिवादन. बल, पुष्टी, औष्ण्य, ऊर्जा यांची आराधना. अग्निहोत्राची सुरुवात नक्की कोणी, कशी, केव्हा केली याविषयी बरेच संशोधक बरेच काही सांगू शकतील. परंतु त्यापेक्षाही महत्त्वाची आहे ती अग्निहोत्राची शेतीसाठीची उपयुक्तता. भारतातील व भारताबाहेरील विविध विद्यापीठे, संशोधकांनी व कृषी तंत्रज्ञांनी केलेल्या आधुनिक, विज्ञानाधारित संशोधनानुसार अग्निहोत्राचा शेतीला खूप चांगला फायदा होतो हे निष्पन्न झाले आहे. एका शेतीप्रधान देशासाठी असे संशोधन व त्याची उपयुक्तता अमूल्य आहे.

पूर्वी अग्निहोत्र हे परंपरा, रूढींच्या जोखडात अडकले होते. परंतु आताचे त्याचे स्वरूप सर्वसामान्य माणसास अनुसरण्यास व समजण्यास सोपे, सहज झाले आहे. शेतकरी व त्याच्या कुटुंबातील कोणीही सदस्य आपल्या शेतीसाठी अग्निहोत्र करू शकतात. त्याला कसलेही बंधन नाही. अग्निहोत्र ही एक प्रकारची विज्ञानाधारित, शास्त्रशुद्ध वातावरण-प्रक्रियाच आहे असे म्हणता येईल. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान ह्यांच्या आधारे अग्निहोत्राचे सभोवतालच्या वातावरणावर, पिकांवर, जमिनीच्या कसावर, पाण्यावर होणारे परिणाम अभ्यासू जाता हा प्रकार खूपच लाभदायी व पर्यावरणपूरक आहे हे संशोधकांच्या लक्षात आले आणि सुरू झाली अग्निहोत्राचा पूरक वापर करून कसलेली शेती.

ह्या आधुनिक अग्निहोत्रात काय असते तरी काय?

१. सूर्योदय व सूर्यास्त ह्या दोन वेळांना हे अग्निहोत्र करतात.
२. त्यासाठी लागणारी सामग्री अतिशय कमी खर्चात, शेती व्यवसायात सहज उपलब्ध होणारी, पर्यावरणपूरक असते. अग्निहोत्राचे तांबे धातूचे पिरॅमिड आकारातील पात्र भारतात माफक किमतीत सामान्यतः पूजा भांडार, भांड्यांच्या दुकानात सहज उपलब्ध होऊ शकते.
३. अग्निहोत्राला लागणारा वेळ सकाळ-सायंकाळ मिळून जास्तीत जास्त अर्धा तास, व त्याचे होणारे फायदे मात्र दूरगामी आहेत.
४. सर्व परिवार अग्निहोत्रात सामील होऊ शकतो. त्याला संख्या, जाती, धर्म, लिंग, पंथाचे बंधन नाही.
५. अग्निहोत्र करताना उच्चारण्याचे मंत्र अतिशय सोपे असून परदेशी लोकही ते सहज पाठ करू शकतात.

साहित्य :

१. तांबे धातूचे ठराविक आकाराचे पिरॅमिड पात्र
२. गायीच्या शेणाची गोवरी, गायीचे तूप, हातसडीचा अख्खा तांदूळ (महिनाभरासाठी पावशेर तांदूळ पुरेसा)
३. काडेपेटी
४. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेचे नेमके वेळापत्रक.
५. काटक्या वापरायच्या असल्यास वड, पिंपळ, बेल, उंबर, पळस यांच्या वाळक्या काटक्या.

अग्निहोत्राचा प्रत्यक्ष विधी :

स्थळ : शेताच्या मध्यात एखादे खोपटे बांधून तिथे हे अग्निहोत्र केल्यास त्याचा उत्तम फायदा होतो.

सूर्याला सन्मुख बसावे. (सकाळी पूर्वेस व सायंकाळी पश्चिमेस तोंड करून) समोर तांब्याच्या पिरॅमिड पात्रात गोवरीचा छोटा तुकडा तळाशी ठेवून त्याच्या भोवती गोवरीचे इतर तुकडे रचत जाणे, ज्यामुळे मध्यात थोडा खळगा तयार होईल. मग एका गोवरीच्या तुकड्याच्या टोकाला थोडे तूप लावून तो आगकाडीने पेटविणे व तो तुकडा अग्निहोत्र पात्रात ठेवणे. अग्निहोत्र प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही मधल्या खळग्यात कापूर वडी ठेवू शकता. नेमक्या सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी गायीच्या तुपात भिजलेले दोन चिमटी तांदूळ (अक्षता) ह्या पेटत्या अग्नीला अर्पण करणे. दोन्ही वेळा भिन्न मंत्र म्हटले जातात. दोन्ही वेळा अग्नीत अक्षता अर्पण केल्यावर ते तांदूळ पूर्णपणे जळेपर्यंत तुम्ही बसले असाल त्याच जागी डोळे मिटून स्थिर, शांत बसू शकता.

१. सूर्योदयाचे वेळी अग्निहोत्र करताना म्हणावयाचा मंत्र :

सूर्याय स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) सूर्याय इदं न मम ॥ प्रजापतये स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) प्रजापतये इदं न मम ॥

२. सूर्यास्ताचे वेळी अग्निहोत्र करताना म्हणावयाचा मंत्र :

अग्नये स्वाहा । (चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ अग्नीत घालणे) अग्नये इदं न मम ॥ प्रजापतये स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) प्रजापतये इदं न मम ॥

अग्निहोत्र हे वातावरण, जमीन, पाणी, वनस्पती, प्राणी व मानवास आरोग्यदायी असून दोषनिर्मूलनाचे, शुद्धीकरणाचे काम करते असा अभ्यासकांचा दावा आहे. मंत्रांसहित अग्निहोत्राचे परिणाम फक्त पिकावरच नव्हे, तर मानवी आरोग्यावर, मनस्थितीवर सकारात्मक पद्धतीने दिसून आले आहेत. मंत्र म्हणजे मनाला जे तारतात ते. संस्कृत मंत्रांची कंपने/ तरंग व त्यांचा मानवी चेतासंस्थेवरील, जीवसृष्टीवरील सकारात्मक परिणाम ह्यांवर संशोधन चालू आहेच! अग्निहोत्रात म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचाही सभोवतालच्या जीवसृष्टीवर व मानवी आरोग्यावर -स्वास्थ्यावर चांगला परिणाम दिसून आला आहे.

भारतात अग्निहोत्र करण्याच्या वेळापत्रकासाठी ही लिंक पहा.

रोज अग्निहोत्र करून जोपासलेल्या, कसलेल्या शेतीचा भारतातील वेगवेगळ्या कृषी संशोधन संस्था, अभ्यासक व भारताबाहेरील तज्ञांनी अभ्यास केल्यावर त्यांनी खालील प्रमाणे निष्कर्ष काढले :

१. अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पोषक वायूंचे प्रमाण परिणामकारक रितीने वाढले. (इथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलीन ऑक्साईड, फॉर्मॅल्डिहाईड, ब्यूटाप्रोपियोलॅक्टोन) त्या भागातील पॅथोजेनिक बॅक्टेरियाजचे प्रमाण ९६% ने घटले व हवा शुद्ध होण्यास मदत झाली. अग्नीत आहुती घातल्यावर गायीच्या तुपामुळे ऍसिटिलीन तयार होऊन त्यामुळे प्रदूषित हवा शुद्ध होण्यास मदत होते.

२. पिकाची गुणवत्ता व उत्पादनात वाढ.

३. कृषी रसायनांच्या फवारणीच्या खर्चात घट.

४. चव, रंग, पोत व पोषणमूल्यांच्या दृष्टीने सरस पीक.

५. अधिक टिकाऊ व निर्यातीस अनुकूल उत्पादन.

६. कमी काळात जास्त पीक. एका वर्षात अधिक वेळा पीक घेऊ शकता.

७. अग्निहोत्रात वापरल्या जाणाऱ्या तुपाची सूक्ष्म स्तरावर प्रक्रिया होऊन त्यामुळे वनस्पतींना हरितद्रव्य उत्पन्न करण्यास मदत मिळते.

८. मधमाश्या अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पिकाकडे, झाडांकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होताना दिसून आले आहे. त्यामुळे परागसिंचनास मदत होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.

९. अग्निहोत्रातील राख घन, द्राव, जैव-रसायनांच्या रूपात किंवा बायोसोल सारख्या स्वरूपात शेतात वापरल्यास पिकाला अधिक पोषण देण्यास, तसेच कीड व रोगांपासून त्यांचा बचाव करण्यास मदत करते असेही दिसून आले आहे.

अग्निहोत्र वापरून केलेल्या शेती/ पिकात खालील प्रमाणे फरक दिसून आला :

टोमॅटो : ( अगोदर, कृषी रसायने वापरून) : आकार - ७ सेंमी, वजन -८५ ग्रॅ., जाडी - १३ सेंमी, चव - बेचव,पोत - निस्तेज, रंग - फिकट लाल , दर झाडागणिक उत्पादन - १ ते २ किलो, लागवडीपासून सुगीचा काळ - १२ आठवडे.
टोमॅटो : ( अग्निहोत्र वापरून) : आकार - १० सेंमी, वजन - १२० ग्रॅ., जाडी - २० सेंमी, चव - चांगली , पोत - टणक , रंग -गडद लाल, ,दर झाडागणिक उत्पादन - ३ ते ४ किलो, लागवडीपासून सुगीचा काळ - ७ आठवडे.

आंबा : (अगोदर, कृषी रसायने न वापरता) : १०,००० किलो प्रती हेक्टर ( ८,९२५ पाऊंडस/ एकर)
(अगोदर, कृषी रसायने - कीटकनाशके व खते वापरून): ३०,००० किलो/ हेक्टर ( २६,७०० पाऊंडस/एकर)
(अग्निहोत्र वापरून) : ८४,००० किलो प्रती हेक्टर ( ७४,८०० पाऊंडस/ एकर)

केळी :
१. पाचव्या पिढीतील केळीची बाग, फळाचा आकार लहान आणि कमी उत्पादन.
२. बाग फुसॅरियम (Fusarium) ह्या बुरशीने ७०% ग्रस्त.
३. ४०% moco Pseudomona Solanace.
४. एका झाडापासून जास्तीत जास्त ६ ते ७ नवीन झाडे तयार.
५. लागवडीपासून उत्पादनाचा काळ ८ ते १२ महिने.

चार महिने अग्निहोत्राचा शेतात/ बागांमध्ये नियमित वापर केल्यावर :
१. सर्व बागेचे एकसंध पुनरुज्जीवन.
२. रोग व कीड यांचा अभाव.
३. केळीचे घड आकाराने व वजनाने जास्त मोठे. सरासरी १२० केळी.
४. एका झाडापासून १० ते १२ नव्या झाडांची निर्मिती.
५. लागवडीपासून उत्पादनाचा काळ ६ महिने.

भाताच्या पिकाच्या बाबत, अग्निहोत्राने बीज अंकुरित होण्यास मदत होते का या विषयी बेंगळुरू येथील विवेकानंद योग संशोधन संस्थेने केलेल्या पाहणी व निष्कर्षांबद्दलचा हा दुवा :

अग्निहोत्राने बीज अंकुरित होण्यास मदत.

तसेच मायक्रो-बायॉलॉजिस्ट व संशोधक यांनी वेगवेगळे शास्त्रीय प्रयोग करून अग्निहोत्राची वातावरणासाठी व पिकांसाठीची उपयुक्तता सिद्ध केली आहे. अग्निहोत्र व सूक्ष्म-जीव (मायक्रोब्ज), अग्निहोत्राची राख व पाण्यात विरघळणारी फॉस्फेटस, अग्निहोत्र व द्राक्षे, अग्निहोत्र व व्हॅनिला वनस्पती यांविषयी केलेल्या प्रयोगांमधून त्याचे महत्त्व व उपयुक्तता अधोरेखितच झाली आहे. ह्या प्रयोगांविषयीचा दुवा :

अग्निहोत्रासंदर्भात शास्त्रीय प्रयोग व निष्कर्ष

अग्निहोत्राचे अन्य उपयोग :

१. अनेक मनोकायिक आजारांवर, जुन्या दुखण्यांवर तसेच नशाखोरीतून सुटण्यासाठी पूरक व उपयुक्त.

दुवा : नशाखोर व्यक्तीवरील उपचार

दुवा : इतर उपयोग

२. ध्यान, एकाग्रता यांसाठी पोषक.

३. आरोग्यास उपयुक्त, प्रतिकारशक्ती वाढविते, ताण कमी करते, सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यासाठी पूरक.

अग्निहोत्र व होम उपचार ( होमा थेरपी) विषयी आंतरजालावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. त्याचा अनेक देशी-विदेशी लोक लाभ घेत आहेत. अग्निहोत्रा विषयीची अनेक संकेतस्थळेही उपलब्ध आहेत.
कर्नाटकातील एका शेतकऱ्याची ही अनुभव गाथा व आपल्या शेतातील अग्निहोत्राच्या प्रयोगानंतर त्याने अनुभवलेले बदल ह्या विषयीचा अजून एक लेख :

अभय मुतालिक देसाई यांचा आत्मनिर्भर शेतीचा शास्त्रीय प्रयोग

श्री. देसाई ह्यांनी आपल्या शेताच्या मध्यावर अग्निहोत्रासाठी छोटेसे खोपटे बांधले. त्याचा उपयोग फक्त अग्निहोत्र करणे व मंत्रोच्चारण करणे एवढ्यासाठीच केला. रोज सूर्योदय व सूर्यास्त समयी अग्निहोत्र केल्याने त्यांना कशा प्रकारे आपल्या शेतीत सुधारणा घडवता आली ह्याचा आढावा त्यांचा लेख घेतो.

हिमाचल प्रदेशातील शेतकर्‍यांनी अग्निहोत्र शेती करण्यास सुरुवात केल्याची ही बातमी : हिमाचल प्रदेशात अग्निहोत्र शेती

यूट्यूबवरही ह्याविषयीच्या ध्वनिचित्रफीती उपलब्ध असून त्या अवश्य पाहाव्यात :

श्री. रवी वाडेकर, रत्नागिरी ह्यांची मुलाखत

श्री. रमेश तिवारी ह्या उत्तर प्रदेशातील आंबा उत्पादकाची परदेशी वृत्तवाहिनीवर अग्निहोत्र शेतीबद्दलची बातमी

ठाण्याच्या श्री. व्यंकटेश कुलकर्णी या कृषी उत्पादकाची मुलाखत

दक्षिण जर्मनीतील हाल्डेन्होफ अग्निहोत्र शेती

श्री. अभय मुतालिक देसाई, कर्नाटक यांची मुलाखत

श्री. वसंत परांजपे यांची मुलाखत व अग्निहोत्र प्रात्यक्षिक

भारतातील गरीब शेतकऱ्याला परवडणारी, त्याला सहज करता येणारी व अनुभवसिद्ध अशी ही अग्निहोत्राची पद्धती जर आधुनिक शेतकऱ्याने अवलंबली तर परंपरागत ज्ञानाचा व्यवहारी उपयोग करून त्याला आपले व घरादाराचे आयुष्य तर समृद्ध बनवता येईलच, शिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते एक फार मोठे योगदान ठरेल. सर्वसामान्य माणसालाही अग्निहोत्र करणे सहज शक्य असून रोज किमान एका वेळी अग्निहोत्र करता आले तरीही ते लाभदायकच आहे!

अग्निहोत्राविषयी अधिक माहितीसाठी :

तपोवन, मु.पो. : रत्नपिंपरी, तालुका : पारोळा, जि : जळगाव, महाराष्ट्र, भारत

दूरभाष : +९१ २५९७ २३५ २०३, +९१ २५९७ २८६ ०९१.

मोबाईल : श्री. अभय परांजपे : +९१ ९९८१३ ५२४६३.

ईमेल : tapovan3@yahoo.com

वेबसाईट : http://www.tapovan.net/

--- लेखिका : अरुंधती कुलकर्णी.

(माहितीस्रोत : आंतरजाल व अन्य)

--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुंधती,
धन्यवाद !
चांगली माहीतीबद्दल !
पण आमच्या कडे इतक्या वर्षात याबद्दल काहीही कसं ऐकलं नाही
वरील उपाय एकाचवेळी ५-१० एकर ला उपयोगी पडेल ?
Happy

मी मागे एकदा वाचले होते अग्निहोत्रावर पण तुमचे लेखन वाचून खात्री पटली. धन्यवाद.

अनिल, कैलास, सुनिल, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! बित्तुबंगा, दुव्याबद्दल आभार! Happy

अनिल, अग्निहोत्राची राख वेगवेगळ्या प्रकारे शेतीत वापरणे, रोज अग्निहोत्र करणे ह्यासाठी जमीन कितीही लहान असो वा कितीही मोठी.... बंधने नाहीत. परदेशात अनेक लोक आपल्या घरगुती परसबागेसाठीही अग्निहोत्र वापरतात. अग्निहोत्राची राख शेतीत कशी, किती एकरांना, कोणत्या प्रकारे वापरता येते त्यासंबंधी हा दुवा बघा : अग्निहोत्र राख वापर.

सुदैवाने शेतकरी मायबोली वाचत नाहीत नाहीतर असल्या अशास्त्रीय आणि अंधश्रद्धाळू प्रकाराने त्यांचे अपरिमीत नुकसानच झाले असते. या अग्निहोत्रवाल्यांचे १९८० च्या सुमारारास यथेच्छ वाभाडे काढलेले आहेत. आमच्या बरोबर कॉलेजचे बरच जण असली थेरे करीत अगदी होस्तेल मधेही . एकानेही पुढे नीट करीअर केले नाही. सामान्या माणसांप्रमाणेच त्यांच्यावरही सासरिक संकटे आलीच.
अनिल७६, तुम्ही तर शेती व्यवसायाशी संबंधित , तुम्हीही यात रस दाखवावा याचे आश्चर्य वाटले Sad

बाळू जोशी टिंब, आपण आपल्याकडे जर काही ह्या संबंधीची शास्त्रीय माहिती असेल तर ती कृपया शेअर करावीत ही विनंती. कोणी, कसे, काय, कशा पध्दतीने खोडून काढले वगैरे वगैरे. मला तरी अग्निहोत्राच्या ह्या पध्दतीत काही वावगे वाटले नाही.

ह्यात अंधश्रध्दा इत्यादी तुम्हाला कोठे बरे दिसली? तुमच्या मित्रांनी करीयर केले किंवा नाही ह्याचा शेती व अग्निहोत्राचे त्याला होणारे फायदे ह्याच्याशी काही संबंध? सांसारिक संकटांचा आणि अग्निहोत्राचा तुम्ही जो ताळमेळ लावताय ते वाचून नवलच वाटले. वरच्या लेखात असा दावा कोठे केलेला दिसतोय का, की अग्निहोत्र केल्यामुळे सांसारिक संकटे येत नाहीत इ.इ......?? जर तुमच्याकडे ठोस माहिती असेल तर ती पुरवा, जेणेकरून सर्वांचा फायदा होईल. ह्यात ''अशास्त्रीय'' असे काय दिसले? म्हणजे आतापर्यंत जे जे संशोधन झाले आहे ते तुम्ही ''अशास्त्रीय'' म्हणणार काय?

मंदार, प्रतिसादाबद्दल थँक्स!

अतिच शय अशास्त्रीय प्रकार आहे हा.
त्या थोड्या राखेमुळे रसायन फवारणी अशी किती कमी होणार?
शुद्धिकरण खरंच होत असेल तर ते किती घनफळाचे होणार? वारा एका दिशेला वहात असेल तर फक्त तिकडचे शुद्धिकरण होणार? आणि ते मंत्रांमुळे होत असेल तर वेळेचा काय संबंध? किंवा काय जाळतो याचा? आणि मंत्रांचा संबंध नसेल तर मंत्र कशाला म्हणायचे? मंत्र चुकले तर शेताचे किती नुकसान होते?

> ८. मधमाश्या अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पिकाकडे, झाडांकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होताना दिसून आले आहे. त्यामुळे परागसिंचनास मदत होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.
> ९. अग्निहोत्रातील राख घन, द्राव, जैव-रसायनांच्या रूपात किंवा बायोसोल सारख्या स्वरूपात शेतात वापरल्यास पिकाला अधिक पोषण देण्यास, तसेच कीड व रोगांपासून त्यांचा बचाव करण्यास मदत करते असेही दिसून आले आहे.

मधमाश्या येणार, पण इतर किडे पळुन जाणार? हा कोणत्या देवाघरचा न्याय?

अग्नीहोत्रापेक्षा शेतातील झाडांशी बोलल्यास व त्यांच्यावर प्रेम केल्यास जास्त फायदा होईल. तांदुळ, गोवर्‍या पण वाचतील.

हे प्रथमच ऐकले. शेतीत काम करताना अनेकदा देवाचा धावा केला जातो, पेरणी, काढणी, पोळा ई सणांच्या वेळी पुजा केली जाते. पण असे मंट्र म्हणुन शेती सुधारली हे प्रथमच ऐकले.

माझे एक बांध-भाऊ ब्राम्हण आहेत. मंत्र, पुजा याबद्दल त्यांना खुप माहितीही आहे. त्यांची २५० एकर जमीन आहे. पण त्यांनी कधीही असे काही केल्याचे आठवत नाही. मी त्यांना याबद्दल विचारुन पाहिल...

(पण, जर असे होत असेल, तर माझा मेंदु बांधावरच्या बाभळीला अडकवुन ठेवुन मी हे करायला तयार आहे! :))

तर माझा मेंदु बांधावरच्या बाभळीला अडकवुन ठेवुन मी हे करायला तयार आहे! >>> चंपक डब्यात भरुन ठेवायला विसरु नकोस नाहीतर कावळे येऊन टोच्या मारतील Proud

अरूंधतीजी,
अग्निहोत्र या विषयात मी अज्ञानी असल्याने अग्निहोत्र चांगले की वाईट या विषयी बोलू शकत नाही.
पण अग्निहोत्राची भारतिय शेतीत अजिबात गरज नाहीये.
परंतु
जागतिक बाजारपेठेत कापसाचे भाव ९००० रू. प्रतिक्विंटल असताना देशांतर्गत बाजारपेठेत कापसाला ३००० रू. पेक्षा जास्त किंमत मिळू नये म्हणुन आमचे राज्यकर्ते जीवाच्या आकांताने प्रयत्न करण्यात गुंतले आहे. त्यावरून संसद, सफदरजंग व जनपथ या ठिकाणची हवा अत्यंत प्रदुषित आणि घाणेरडी असावी, त्यामुळेच आमच्या नेत्यांची मनोवृत्ती कलुषित बनली असावी, असा एक अंदाज आहे.
त्यामुळे असा अग्निहोत्र वगैरे करण्याची गरज संसद, सफदरजंग व जनपथ या ठिकाणीच जास्त आहे.
तुमच्या पुढाकाराने करूयात का? Happy

aschig पुर्णपणे सहमत....

अरुंधती, तुम्ही खुप छान लिहता ... पण जरा विषयच चुकिचा आहे...

पोषक वायूंचे प्रमाण परिणामकारक रितीने वाढले. (इथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलीन ऑक्साईड, फॉर्मॅल्डिहाईड, ब्यूटाप्रोपियोलॅक्टोन) त्या भागातील पॅथोजेनिक बॅक्टेरियाजचे प्रमाण ९६% ने घटले व हवा शुद्ध होण्यास मदत झाली. >>> हे वाक्यच रासायनीक दृष्ट्या चुकिचे आहे...

चंपकजी... बस्स क्या? Happy

हे सगळे जे फायदे होतात ते अग्निहोत्रामुळेच होतात हे यातल्या कुठल्याही लिंकवरच्या माहितिने सिद्ध होत नाही.
शास्त्रिय प्रयोगात दिसून आलेला बदल हा त्यातल्या 'इंडीपेंडंट वेरिएबल'मुळेच झाला आहे हे सिद्ध होण्याकरिता बाकीचे सगळे वेरिएबल कॉन्स्ट्ट असायला हवेत तसे इथे दिसत नाही.
अशा प्रकारच्या प्रयोगामधे बर्‍याचदा तो प्रयोग करणार्‍याचा त्याच्या परिणामावर इतका प्रचंड आंधळा विश्वास असतो की प्रयोगानंतर मिळालेला कुठलाही डेटा आपल्याला पाहिजे त्या निष्कर्षात बसवण्यात येतो.
असा आंधळा विश्वास अनेक वेळा, सर्वच देशात, अनेक शास्त्रज्ञांनी दाखवला आहे,
वरील लेखातील विधानांना विरोध करण्यामागे, भारतीय संस्कृती, हिंदू धर्म इ.इ. वर हल्ला करण्याचा काही उद्देश नाही. त्या मुद्द्यावरुन कुणी उर बडवू नये.
अनेक वेळा लोक ,'एखाद्या गोष्टीने लोकांचा फायदा होत असेल तर त्याला विरोध का?' असे विचारतात. इथे विरोध अग्निहोत्र करण्याला नसून त्याला खोटा शास्त्रिय मुलामा देण्यास आहे. 'आमच्या परंपरेत आहे म्हणून आम्ही करणार, शास्र्तिय नसेल तर नसो' अशी हिंमत का दाखवली जात नाही?

माहिती छानच आहे अकु.

गंगाधरजी, अहो समजा मिळतोय ३००० भाव त्यावर आपल नियंत्रण नाही. पण जर अग्निहोत्राने उत्पादन वाढत असेल तर तेव्हढ्याच क्षेत्रात पैसे जास्त मिळतील कि नाही.

आगाउ आपल्याशी सहमत आहे.

अस्चिग अनुमोदन. अशास्त्रीय प्रकार वाट्तो. फॉर्मल्डिहाइड व इतर तीन केमिकल्स कोणाला पोषक आहेत?
या तीन केमिकल्सचा शेतीला काय उपयोग आहे?

अंरुधतीजी,
अग्निहोत्राने जर उत्पादन वाढत असेल तर आता प्रयंत शेतकर्यानी त्याचा वापर का केला नाही,.... चांगल्या गोष्टी सांगाव्या लागत नाही.. त्या मागे लोक आपोआप पळतात. तपोवन माझ्या गावा पासुन फक्त २०-२२ कि. मी. आहे..... तरी सुधा आमच्या भागातील लोकाना या बद्दल माहीती नाही.......
Backyard मध्ये १-२ किलो भाजी पाला पिकवण्या साठी छान आहे.

<<<<<<<<त्या भागातील पॅथोजेनिक बॅक्टेरियाजचे प्रमाण ९६% ने>>>>>>>

पॅथोजेनिक बॅक्टेरिया कुठले, हवेतील कि जमीनीतील?

मुटेसाहेब,
अमळनेर बाजार समितीत कापसाचा भाव ४७५१ रुपये आहे...... कापुस निघला असेल तर या तिकडे विकायला....... परदेशात ९००० प्रमाणे कापुस विकायचा / पाठवायचा म्हटल्यावर खर्च पण तेवढाच येइल ना?

हम्म्म, पण माझ्या माहितीतील शेतकर्‍यांना ह्या अग्निहोत्र पध्दतीचा फायदा होत आहे असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या शेतात ते अग्निहोत्रात तयार झालेले भस्म नियमित स्वरूपात वापरतात. त्यातून त्यांचे शेती उत्पन्न आधीपेक्षा तिप्पटी-चौपटीने वाढले आहे असेही ते सांगतात, त्याचे काय? जर उत्पादन वाढतंय, येणारं पीक हे चांगल्या प्रतीचे आहे तर त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे असे मानायला जागा आहे, नाही का?
वर दिलेल्या लिंक्स मधील प्रयोगांची माहिती इथे पुन्हा देत आहे.

Agnihotra and Microbes, A Laboratory Experience
Dr. Arvind D. Mondkar M.Sc; Ph.D (Micro)

Our way of life has intensified the quantum of pollution. No place can be
called safe from pollution. What varies is the type of pollutant and the degree of
pollution. Pollution is of various types such as gaseous pollution, water pollution,
food pollution, radioactive pollution and so on. Of these types microbial pollution is
the most important type of pollution for people in the medical or paramedical field.
Microorganisms are ubiquitous in nature.

There are mainly two types, namely non-pathogenic or saprophytic (harmless and not causing any disease) and pathogenic (disease producing). There are certain opportunistic pathogens which, given a chance, can produce disease in human beings. Thus the mere presence of these microorganisms in a definite strength in various media can produce contaminants.
Microorganisms like Salmonellae, Shigellae or Vibrios contaminate water,
eatables, milk and milk products. When the contaminated eatables are consumed
the individual suffers from typhoid, bacillary dysentary or cholera. Similarly,
organisms like Staphylococci cause food poisoning by increasing toxins in food.
This microorganism also causes wound infections with pus formation. Streptococci
infect the respiratory tract after inhalation of the droplet nuclei on which they are
settled. Hospital infections by Staphylococci and Pseudomones are not
uncommon. Recently, Pseudomonas aeruginosa has been reported to have entered
the space age. This microorganism was isolated from the lining of the fuel tank of
a jet engine and was found to be responsible for the corrosion of the tank.

It is stated that Agnihotra helps to undo the effects of pollution. In this respect it was decided to observe the last type of pollutant, i.e., microorganisms and the effect of Agnihotra on them. The present article restricts only to the effect of Agnihotra on microorganisms as observed in a microbiology laboratory.

Agnihotra Effect on Bacterial Population

A preliminary experiment was carried out to study the effect of Agnihotra on
the bacterial population in a room where Agnihotra was performed. For this study,
two rooms of equal dimensions (13¼’ x 8’ x 11’) were selected. In both rooms fire
was prepared from dried cowdung cakes in copper pyramids and the basal reading
of number of microorganisms in both the rooms was taken by exposing blood agar
plates at four corners of the room for 10 minutes. This was done exactly half an
hour before Agnihotra time. Agnihotra was performed exactly at sunset in one of
the rooms. Bacterial counts were taken again in both the rooms in a similar manner
at half hour intervals. Thus readings were taken in both the rooms up to two hours
after performance of Agnihotra. It was quite interesting to note that microbial
counts in the room where Agnihotra was performed were reduced by 91.4%
whereas the room where only fire was generated did not show appreciable changes
in the microbial counts. This leads one to think that it was the process of Agnihotra
which was responsible for the reduction of bacterial counts and not the mere
presence of fire.

Two other similar experiments revealed similar findings. The phenomenon
could be explained by giving two reasons:

- Agnihotra fumes are rich in formaldehyde and other substances which have
inhibitory effect on microorganisms.

- A phenomenon like smog formation and its diffusion in the upper strata might be
a likely postulation.

In the regions of North and South poles, many times, carbon particles accumulate
to form a layer called “smog”. When fire is lit the hot currents push the smog into
the upper strata and it is diffused in such a way that the carbon particles are no
longer harmful in the residual concentration. In the present study perhaps
Agnihotra fumes might have dissociated the microorganisms in such a way that the
residual population was no more harmful and was well within tolerable limit to
human beings.

Agnihotra Effects on Bioenergetic Systems of Individual Microorganisms

This kindled our interest and it was decided to study the effect of Agnihotra
on the bioenergetic systems of individual microorganisms. A strain of
Staphylococci pyogenes isolated from a pus sample was selected for the study. The
strain showed all the characteristics of a pathogen. It was isolated from a lesion,
produced beta haemolyses on blood agar, showed a positive coagulase test and
fermented mannitol with the production of acid. The strain was innoculated on a
pair of blood agar plates, one of which was kept away from the Agnihotra
atmosphere (control plate). The other one was exposed to Agnihotra fumes for five
minutes and was allowed to remain in that atmosphere till next Agnihotra was
performed (approximately 12 hours). Agnihotra is to be performed on the
biorhythm of sunrise/sunset. Surprisingly, it was observed that the plate exposed to
Agnihotra (test plate) showed a tremendous reduction in the zone of haemolysis as
against a wide zone of haemolysis in the control plate.

Organisms from both the plates were then subjected to coagulase test. The
organisms from the test plate showed a negative coagulase test demonstrating their
inability to produce coagulase. Finally, the organisms from both the plates were
emulsified in one ml. of normal saline separately to give suspensions of equal
strength. This was achieved by use of Brown’s opacity tube no. 3. The suspensions
were then injected intradermally into the thighs of an albino mouse. The mouse
was kept under observation for five days.

It was very interesting to note that the suspension from the test plate failed
to produce any lesion in the mouse wheras the suspension from the control plate
produced typical abscess. These results suggest that Agnihotra played a pivotal role
in controlling the metabolic activities of this microorganism. In this case, a
pathogenic strain of Staphylococcus pyogenes showed characteristics of a
nonpathogenic strain ofter exposure to Agnihotra atmosphere. This was just an
observation and triggered quite a number of questions in the mind:

- Is this effect phenotypic or genotypic?
- Is it necessary to expose the strain for a prolonged time interval or will a short
exposure cause a similar effect?
- Will the progeny of these microorganisms behave in a similar manner?
- Does the small or microdose of substances released from Agnihotra process boost
the immunity mechanism of the patient to get rid of the infection or does the
infecting agent lose its virulence? Perhaps both the effects go hand in hand.
Answers to these questions are still beyond sight and show a need for further
experimentation in this field.

Agnihotra Ash and Water Soluble Phosphates
Dr. Tung Ming Lai, Denver, Colorado

I did some lab testing on Agnihotra ash. The results are interesting. 0.10 g. of ash
was shaken with 25 mi. of water for forty-eight hours and then the water soluble
phosphate content was measured. The same amount of ash was shaken with two
different soils (5 g.) from Colorado (also 25 mi. of water) and phosphate content
was measured after forty-eight hours of being shaken. The results are as follows.
(The values are the average values of duplicates.)

SOIL USED
ASH ADDED
WATER SOLUBLE

PHOSHATE EXTRACTED

None
Non-Agnihotra ash
0.68 mg. P/.02 g. ash

None
Agnihotra ash
1.78 mg. P/.02 g. ash

Weld loam
Non-Agnihotra ash (0.02 g. ash/g. soil)
4.2 mg. P/ g. soil

Weld loam
Agnihotra ash (0.02 g. ash/g. soil)
17.2 mg. P/ g. soil

Red Feather loamy sand
Non-Agnihotra ash (0.02 g. ash/g. soil)
2.3 mg. P/ g. soil

Red Feather loamy sand
Agnihotra ash (0.02 g. ash/g. soil)
11.5 mg. P/ g. soil

The non-Agnihotra ash was produced with the same ingredients in the same copper vessal as Agnihotra ash. The only difference was the non-Agnihotra ash was not produced at sunrise or sunset, and no mantras were chanted.
(All growing plants need phosphorus; however, regardless of how much
phosphorus is added to the soil, only the water soluble portion can be utilized by
the plant. On an average, only about five percent of the phosphorus in conventional chemical fertilizers is water soluble.--Ed.)

Agnihotra and Grapes
Dr. B. G. Bhujbal, Research Officer Maharashtra State Grape Growers' Association, Poona, India
Grapes are a difficult crop to grow under Maharashtra's climatic conditions and also equally difficult to study. I have been associated with research work on grapes while studying for my M.Sc. degree at the University of Poona, India since 1967. Various problems faced by the workers since then were finally put before the research workers at the Agricultural College, Poona.

Hybridization work with grapes had already commenced before my association with this work. I have been observing the results of that work. It was reported that the germination of hybrid grape seeds had been very late and low. When I conducted hundreds of crosses at the Ganeshkhind Fruit Experimental Station, Poona-7 and sowed the seeds after treatment by advanced techniques which included hormones, scarification, stratification etc., the results were discouraging. The germination percentage was very low, i.e. below 20 % and some of the seeds even took 300 days for germination.

Meanwhile I came to learn of Agnihotra and Homa Therapy farming and thought why not have a trial of this therapy in grape research. There was a solar eclipse on 16th of February 1980. I had also read previously that the no-moon day was the best day for seed treatment and sowing. With this background and not to miss the opportunity I coIlected seeds of the Anab-e-shahi, Pandhari Sahebi and Kali Sahebi varieties, local vinifera varieties, as well as some crossed seeds which were collected using the Thompson seedless variety as a male parent to make the cross. In order to conduct the experiment properly, I applied for leave on 20th of February 1980 in time for the treatment to commence on 16th of February, 1980. Some unrooted cuttings of local grape varieties were also collected for additional treatments.

Experimental Plot

All the seeds and the unrooted cuttings were kept in an environment open to Agnihotra fumes. As far as mantras were concerned, I began with the "Tryambakam" Mantra and Homa continued for 2 hours, after which the samples were treated with Agnihotra ash and then put into pots ready for planting. An untreated lot of samples served as a control.

Observations

It was indeed a surprise not only to me and my wife but also to friends who had been laughing at my experiments to observe the first seedlings sprouting on the 21st day of sowing. Some of the recorded observations are given in a table below. The second experiment concerned making raisins. At present, raisin-making is not carried out in Maharashtra except on an experimental basis using the dehydration and sun-drying methods. I collected a few bunches of grapes from growers and hung them in the environment where I was performing Agnihotra. Similar clusters were kept with the growers for making raisins using their own method of sun-drying. After 21 days the drying was almost complete, and after 35 days I collected the clusters and tested them. The raisins were very good in appearance and taste. Special interest rallied around the evidence that the raisins prepared from the Anabe-shahi variety and having low TSS contact were also good. Equally good results were obtained by the Thompson seedless variecy growing in the Agnihotra environment as compared to those varieties generally available in the market.

Another experiment was performed in a grower's field. Mr. Pundlik Khode, a small farmer from the village of Pimpalgaon-Baswant, Nasik District had been much worried about his crop and was doubtful regarding repayment of his bank loan obtained for the vineyard. Agnihotra was done regularly and Agnihotra ash was applied to his vines. The observations which were recorded at harvest time proved very good. The grower, Mr. Khode, had never believed in such a possibility until he saw the actual results. The individual berry as well as the cluster was superior in colour, taste, sweetness and weight. About 150 observers said that the crop was the best in that locality.

इथे आवर्जून प्रतिसाद देणार्‍यांचे मनःपूर्वक धन्यवाद! Happy

अकु, चांगली माहीती. कुठलाही प्रयोग हा सध्याच्या शास्त्रीय कसोट्यांवर जोखला तरच जग तो मान्य करणार. त्या दृष्टिने प्रयोग व्हायला हवेत. मागे चंपक ने पण अशा एका प्रयोगाची माहिती दिली होती (ती पाऊस पाडण्याबद्दल होती.) सध्या शेतीत संशोधन होणे गरजेचे आहे, या प्रयोगावर पण व्हायला हवे.

मी मागे एकदा वाचले होते, कि ज्याकाळात काडेपेटीसारखी साधने उपलब्ध नव्हती, त्यावेळी एका घरात सतत, अग्नि पेटता ठेवला जात असे. आणि ज्याला गरज वाटेल, तो त्या घरातून अग्नि नेत असे. आणि हे ज्या घरात होत असे, त्या घरातील माणसांना, अग्निहोत्री असे म्हणत असत.

अत्यंत अभ्यासपुर्ण लेख !!

(अवांतर : सूर्याय स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) सूर्याय इदं न मम ॥

>>> इथे मात्र मला हसु आले ...एकी कडे सूर्याय इदं न मम ॥ म्हणायचे ...संपुर्ण त्यागाचे प्रतिकात्मत असलेल्या एका विधीचा अवलंब करायचा अन चिमूटभर त्यागुन परत त्याच भौतिक मोहमायेत गुंतुन पडायचे ....
केवढा विरोधाभास !!!

(अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) हे अगदीच देवाला " चिरीमिरी" दिल्यासारखे वाटले Proud )

धन्स दिनेशदा! Happy

ज्यांना अग्निहोत्र करणार्‍या व त्याचा आपल्या शेतीत नियमित वापर करणार्‍या शेतकर्‍यांचे संपर्क हवे असतील त्यांनी मला विपु मधून कळवावे. त्या शेतकर्‍यांशी बोलून/ त्यांच्या शेताला भेट देऊन शंकासमाधान करून घ्यावे. शेतीत व्यावहारिक दृष्ट्या हे कसे शक्य आहे वगैरे गोष्टी ते जास्त उलगडून सांगू शकतील. तसेच मला वाटते की ह्या विषयावर अगोदर झालेले संशोधन ज्यांना अपुरे वाटत आहे त्यांनी ह्या विषयात रस घेऊन अधिक संशोधन जरूर करावे. कारण त्यातूनच अधिक माहिती हाती लागेल.

चान्गला लेख आहे Happy प्रयोग करुन बघायलाच हवा
(मात्र हल्ली हल्ली असे वाटू लागले आहे की इथे माबोवर असले काही लिहीणे म्हणजे "जागा चुकत्ये " की काय?)
अग्निहोत्र नाही, पण आमच्या लिम्बीने हट्टाने माझ्याकडून तुळशीवृन्दावन बान्धुन घेतले. लिम्बोटल्याकडून त्यात तुळस लावुन घेतली, व नन्तर मला रोज सन्ध्याकाळी तिथे उदबत्ती व दगडी पणती लावायची सक्ती केली! यानन्तर(च) सदरची तुळस इतकी जबरदस्त वाढली आहे की विचारता सोय नाही! जमल्यास फोटो काढून टाकेन इथे
(अवान्तरः आधी जी तुळस कुम्पणीपाशी होती, तीवर पिन्डीचे/हनुमानाचे अभिषेकाचे पाणी ओतले गेल्याने कित्येकदा मलुल होऊन वठून जायची, वृन्दावनात मात्र कटाक्षाने असे पाणी पडणे/टाकणे टाळले गेले - तुळशीला रुद्ररुपाच्या पुजेवरील अभिषेक वा तत्सम पाणी घातलेले चालत नाही असे ऐकुन होतो, प्रत्यक्ष अनुभवाने खात्री पटलि - मात्र मी काहि फारसा आकडेबहाद्दर नसल्याने, माझ्या मतास पुष्टीकरणार्थ, तुष्टीकरणार्थ अजुन कुणाकुणाची साईन्टीफिक आकडेवारी मिळते का ते मी बघितलेले नाहीये! चिकित्सकान्नि, केवळ यावर वावदुकाप्रमाणे वाद घालण्यापेक्षा, स्वतः प्रयोग करुन वा ज्यान्नी प्रयोग केलेत त्यान्चेकडून आकडेवारी गोळाकरुन मान्डली तर ते अधिकच सायन्टीफिक ठरेल, नै? Proud )

Regarding Agnihotra I realy dont know much but my opinion is
1. Due to Mantra chanting positive waves get created in the air....which makes positive effects all around. And its proved also.....
2. What ever the smoke is comming outoff the agnihotra combinely with Mantra chanting must be benifitial to improve plant health....which directly relate to low fertilizers and pestisides.....
3. How much output increased is bit difficult to measure but certainly quality of the fruits and vegitables gets improved.

मुम्बैमधे भाजी आणायला गेलात कधी? हमखास ऐकवले जाते, "साहेब, रेल्वेलायनीकडेला गटारीपाण्यावर नाय केलेली ही भाजी, अस्सल गावरान हे!"
गिर्‍हाईक देखिल राजीखुषीखुषीने आनन्दाने मान हलवुन "गटारी पाण्यावर न उगवलेली" ती भाजी पिशवीत भरुन घेऊन येते!
खर तर सोनखत सगळ्यात भारी ना? मग गटारी पाणी काय वाईटे? पण तो एक "कल्ट" बनलेला असावा की गटारी पाण्यावरची भाजी वापरणे अयोग्य! Proud
तर सान्गायचा मुद्दा हा की, मुबैत रेल्वेलायनीकडेला रेल्वेच्या पुढाकाराने गटारी पाण्यावर भाजी पिकवली जाते, विकली जाते, फक्त विकताना "गावरान आहे" असे सान्गुन विकावे लागते Wink हे सर्व चालते खुल्लेआम!
मात्र कोणी जरा काही म्हणले की आम्ही आमच्या पिकान्ना मन्त्रोच्चारण ऐकवले, अग्निहोत्रची "धुरी" दिली म्हणून हे पिक गावरान पेक्षाही भारी आले, तर मात्र निवडकान्च्या पोटात का दुखते काय की! Biggrin
गटारी पाण्यावरची भाजी चालते पण अग्निहोत्राची धुरी चालत नाही! गम्मते नै?

पुण्यातील एका संशोधन संस्थेच्या संचालकांना मी वरिल मजकुर पाठवला होता त्यावर त्यांचे आलेले उत्तर..

Dear Kardak,
I have known about Agnihotra but have never tried it myself, mainly because nobody has explained the real science behind it. Therefore I have to confess that I know nothing about it.

यामागील शास्त्र अजुन कुणीही सिद्ध केलेले नाही, अन त्यामुळे सदसद्विवेकबुद्धीला ते पटत नाही.

लिंब्या,
त्या गटाराच्या बाजूला काय काय असतं हे जरा बघितलंस तर कळेल त्यात काय काय मिसळलेलं असतं.
डाय करण्याची युनिट्स आणि वेगवेगळी अगदी छोट्या प्रमाणातली केमिकल युनिटस असतात. त्यांचं सगळं सांडपाणी जातं तिथे. अतिशय भयंकर केमिकल्स मिसळली जातात त्यात.

चम्प्या, तुझ्या आख्ख्या पोस्टीकरता.....
लेका, साध्या साध्या गोष्टीत दुसर्‍याच्या ओन्जळीने कितीक दिस पाणी पिणार?
अम्क्या ब्रह्मदेवाने सान्गितल की हे बरोबरे तरच बरोबर का? स्वतः करुन बघा की! (काही हरकत नाही, काही काळ प्रयोगादाखल केलस तर लग्गेच काय कोणी बोलणार नाय तुला की तू "अग्निहोत्राच्या कल्टमधे" (की चळ? ) वहावलाहेस! Proud

नीरजा, गटारी भाजी नाकारणारे "केमिकलच्या अन्तर्भावामुळे" नव्हे तर "गटाराच्या किळसीमुळे" नकार देत अस्तात! Happy

Pages

Back to top