Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
त्रिनिशा, ' निरामय ' कसे
त्रिनिशा, ' निरामय ' कसे वाटते ?
छान आहे पन ते एक
छान आहे पन ते एक general+cosmetic clinic असनार आहे.म्हनुन एक modern/catchy नाव हव आहे. तरिहि thanks a lot .
विंझणवारा म्हणजे काय?
विंझणवारा म्हणजे काय?
माझ्याकडील शब्दकोशात विंझणा =
माझ्याकडील शब्दकोशात
विंझणा = पंखा (fan)
त्यामुळे विंझणवारा म्हणजे पंख्याचा/पंख्यासारखा (आल्हाददायक?) वारा असेल कदाचित
'पाती ठेवणे' म्हणजे नक्की
'पाती ठेवणे' म्हणजे नक्की काय? मला अंधुकसं असं वाटतंय की पाती ठेवणे म्हणजे हिस्सा ठेवणे. कृपया लवकर सांगावे. आगाऊ धन्यवाद
अश्विनी के, बरोबर आहे. पाती =
अश्विनी के, बरोबर आहे.
पाती = सामाईक व्यवहारातील वाटा, भागीदारी, हिस्सा (partnership, a share in a joint concern)
वर्षा, धन्यवाद.
वर्षा, धन्यवाद.
स्वातीताई. ग ह पाटलांची किंवा
स्वातीताई. ग ह पाटलांची किंवा गल ठोकळांची एक कविता आहे, पेंडसे गुरुजींची आवडती.
आलोच पहा ग्रीष्म अशी दे ललकारी
ओकीत सुटे आग नभी सूर्य दुपारी
या ऊन झळा करीती तप्त शरीरा
आता कुठला शीतळसा विंझणवारा....
धन्यवाद बाळूदादा.
धन्यवाद बाळूदादा.
एकसमयावच्छेदे करुन म्हणजे
एकसमयावच्छेदे करुन म्हणजे काय?
लॉकस्मिथ ला पर्यायी मराठी
लॉकस्मिथ ला पर्यायी मराठी शब्द आहे का ?
घड्याळ घिसाडी. खर म्हणजे
घड्याळ घिसाडी.
खर म्हणजे आपल्याकडे घिसाडी घड्याळ बनवायचे नाहीत. फक्त कुर्हाडी.
वर्षा, धन्यवाद
वर्षा, धन्यवाद
लॉकस्मिथ म्हणजे लोहार ना? की
लॉकस्मिथ म्हणजे लोहार ना?
की मी माझे अज्ञान उघड करतोय 
एकसमयावच्छेदे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे "एकाच वेळी" One point in time
धन्यवाद किरण
धन्यवाद किरण
कुठे विचाराव न कळल्याने इथे
कुठे विचाराव न कळल्याने इथे विचारतेय.
मला मराठी SMS हवे आहेत. जनरल स्वरुपाचे, उदा. इंग्रजीतील हा SMS: Good luck! See you again!
अश्या रेडीमेड मराठी समसची एखादी वेबसाईट वगैरे आहे का?
.
.
बुर्झ्वा या शब्दाचा मराठीत
बुर्झ्वा या शब्दाचा मराठीत अर्थ काय?
बूर्झ्वा = मध्यमवर्गीय,
बूर्झ्वा = मध्यमवर्गीय, स्वतःची तात्त्विक बैठक नसलेला.
जुन्या, संकुचित विचारांचा,
जुन्या, संकुचित विचारांचा, प्रतिगामी असाही "बूर्झ्वा" शब्दाचा अर्थ होतो.
एक गाणं आहे ...... वाट पाहुनी
एक गाणं आहे ...... वाट पाहुनी जीव शिणला
त्यात एक ओळ आहे
सूर्व्या आला, तळपून गेला ...... यापुढची ओळ काय आहे ?
मावळतीच्या खळी गालाला ............. की
मावळतीचा खळीगाल आला .............
आणि याचा नक्की अर्थ काय ?
१)अनुशंगाने की
१)अनुशंगाने की अनुषंगाने
२)अपरोक्ष या शब्दाचा अर्थ काय? मला शाळेत शिकवला गेलेला अर्थ असा :
अक्ष =डोळा. परोक्ष = unseen. अपरोक्ष = नजरेसमोर.
मात्र आजकाल अपरोक्ष = नजरेआड अशा अर्थाने सर्रास वापरला जातो.
शुक्तिका चा अर्थ काय ??
शुक्तिका चा अर्थ काय ??
भरत, १. अनुषंगाने. २. अपरोक्ष
भरत,
१. अनुषंगाने.
२. अपरोक्ष म्हणजे डोळ्यांदेखत / प्रत्यक्ष हा अर्थ बरोबर आहे. आता आपण नेमका उलट अर्थाने वापरतो ते चूक आहे.
षड्जपंचम, मोल्सवर्थने हा अर्थ दिला आहे :
शुक्ति (p. 795) [ śukti ] f (S) शुक्तिका f (S) A pearl-oyster. Pr. शुक्तिकेपासून मौक्तिक. 2 A half of an oyster-shell, cockle, muscle, or other bivalvular shell.
@टाकाउ : शब्द बुर्ज्वा
@टाकाउ :
शब्द बुर्ज्वा (फ्रेंच) आहे. म्हणजे मध्यमवर्गीय विचारसरणीचा.
@मास्तुरे:
माझ्यामते प्रतिगामीसाठी रत्रोगार्द (retrogarde) (फ्रेंच) हा शब्द english मधे आला आहे. आणि पुरोगामी साठी अव्हाँगार्द (avant-garde)(फ्रेंच).
असेच काही फ्रेंच शब्द जे english मधे प्रचलीत झाले आहेत:
volteface =व्होल्तफास= घुमजाव
sans =साँ=without/ शिवाय
de-hors de = दे ऑर द= outside of/ च्या बाहेर
'डच' लोकांना मराठीत 'वलंदेज'
'डच' लोकांना मराठीत 'वलंदेज' म्हणतात. या शब्दावर कोणी प्रकाश टाकेल का ?
'वलंदेज' हा शब्द आधी ऐकला
'वलंदेज' हा शब्द आधी ऐकला नव्हता, पण तो नक्की 'हॉलंदे' / 'हॉलंदेझ' (hollandaise) या शब्दावरून आला असावा.
हॉलन्ड देश वरून...
हॉलन्ड देश वरून...
अवगुंठन या शब्दाचा नक्की अर्थ
अवगुंठन या शब्दाचा नक्की अर्थ काय ?
वलंदेज मी सुद्धा इतिहासाच्या
वलंदेज मी सुद्धा इतिहासाच्या (शालेय) पुस्तकात किंवा इतिहासाबद्दल असलेल्या पुस्तकांत वाचल्याचे आठवते.
अवगुंठन - कशाच्यातरी भोवती गुंडाळलेला दागिना?
Pages