Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
गोळे सर!! कर्तब थोडेसे
गोळे सर!!

कर्तब थोडेसे श्रेष्ठ वाटते
आविष्करण, प्रकटन, सादरीकरण
आविष्करण, प्रकटन, सादरीकरण इत्यादी शब्दही प्रेझेंटेशन करताचे प्रतिशब्द असले तरीही,
पर्फॉर्मन्स करता सुद्धा संदर्भपरत्वे वापरता येतील.
गोळेसरांनी Performance साठी
गोळेसरांनी Performance साठी नक्की कोणता अर्थ अभिप्रेत आहे अशी विचारणा केली आहे. माझ्यासमोर आता तीन उदाहरणे आहेत. तिन्हीही Performance निगडित असल्याने त्याचे मराठीकरण कसे होईल ?
१. उस्ताद झाकीर हुसेन यांचा कालचा Performance पाहून श्रोते मंत्रमुग्ध झाले.
२. सचिन तेंडुलकरच्या आजच्या Performance वर सार्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
३. माझ्या भाचीच्या बारावी परीक्षेतील Performance बद्दल तिचे पालक साशंक आहेत.
तिन्हीच्या छ्टा विविध असल्याने (मराठीतील) नेमका प्रतिशब्द कुठला देता येईल? तसे पाहिले तर तिन्ही उदाहरणातील Performance चा वापर वाचताना/ऐकताना वा बोलताना अडचणीचा वाटत नाही. कार्यभाग साधतो.
प्रतीक, मला या तिन्ही ठिकाणी
प्रतीक, मला या तिन्ही ठिकाणी वर रेव्युंनी सांगितल्याप्रमाणे 'कामगिरी' हा शब्द योग्य वाटतोय.
धन्यवाद गजाननभाऊ. "कामगिरी"
धन्यवाद गजाननभाऊ. "कामगिरी" हा शब्द पहिल्या दोन उदाहरणासाठी तर चपखल लागू होतो; पण तरीही एका परीक्षार्थीसाठी 'कामगिरी' हे संबोधन थोडेसे क्लिष्ट वाटते. कारण ती विद्यार्थिनी पेपर 'सोडविण्या'साठी गेली होती आणि तिथे ती काहीशी अपयशी ठरण्याची शक्यता उदाहरणात वर्तविली आहे. इथे तिच्या अभ्यासास कामगिरी म्हणणे योग्य होईल की 'तयारी' ?
'तांदूळ धुण्याचे साधन' ला ३
'तांदूळ धुण्याचे साधन' ला ३ अक्षरी शब्द काय? शब्दकोड्यात अडला आहे.
वेळणी? पण ती शिजवलेल्या
वेळणी? पण ती शिजवलेल्या भातातल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वापरतात.
गजाभौ, मला वाटतं 'रोवळी'
गजाभौ, मला वाटतं 'रोवळी' असावा तो शब्द
धन्स गजानन. पण हा नाही.
धन्स गजानन. पण हा नाही. '..वळी' असा शब्द आहे. फक्त पहिले अक्षर हवे आहे.
बागुल, 'रोवळी' म्हणजे दुरडी.
बागुल, 'रोवळी' म्हणजे दुरडी.
बा.बु. बरोबर, रोवळी वापरतात
बा.बु. बरोबर, रोवळी वापरतात तांदुळ धुण्यासाठी. मी पहिल्यांदा ऐकला हा शब्द. इथेही सापडला - http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%B0%E0%A5%8B%E0...
धन्स गजानन
धन्स गजानन
इंग्लिशमध्ये Chandelier हे
इंग्लिशमध्ये Chandelier हे नाम दिवाणखान्यातील झुंबराला उद्देश्यून दिले आहे. झुंबर म्हटले की आपल्या नजरेसमोर 'तोरण' सम काहीतरी येते. पण प्रत्यक्षात याचा आकार खूपच भव्य असतो, देखणेही असतात (हे मी पाहिले आहे). तर अशा Chandelier साठी सार्थ मराठी नाम सुचवाल?
तसेच "Silhouette" हे एक नाम आहे. याचाही उच्चार वा वापर केल्यास पुनश्च ऐतिहासिक आणि अंतर्गत सजावटीसंदर्भात काहीतरी सुंदर असे नजरेसमोर येते. शब्दकोशात याचा अर्थ 'तिमिरचित्र' असा दिला आहे. यामुळे काहीच अर्थबोध होत नाही. यालाही पर्यायी/प्रभावी मराठी शब्द सुचवावा ही विनंती.
Chandelier म्हणजे झुंबरच.
Chandelier म्हणजे झुंबरच.
Silhouette:पर्यायी शब्द नाही
Silhouette:पर्यायी शब्द नाही सुचत.. पण अर्थ माहीत्येय:
एखाद्या वस्तू/व्यक्ती/प्राण्याची अंधारामुळे दिसणारी धूसर किनार किंवा कडा.
छायाकृती ?
छायाकृती ?
गजानन त्यात छाया नसतेच. कमी
गजानन त्यात छाया नसतेच. कमी प्रकाशामुळे किंवा प्रकाशाच्या दिशेमुळे त्या वस्तुचा फक्त बाह्य आकारच दिसतो.
माधव, दोन्हींमधला फरक लक्षात
माधव, दोन्हींमधला फरक लक्षात आला. मग रेखाकृती म्हणता येईल का?
"अस्थानी" ला इंग्रजीत काय
"अस्थानी" ला इंग्रजीत काय म्हणतात?
वाक्यः "त्या प्रसंगी अस्थानी असं काहीतरी बोलला"
श्री.माधव, गजानन आणि गिरीराज
श्री.माधव, गजानन आणि गिरीराज ~ धन्यवाद. : झुंबर स्वीकारण्यास अडचण नाही तरीही Chandelier ची भव्यता झुंबर, का कोण जाणे, मध्ये येत नाही.
Silhouette धूसर कडा म्हटले तरीही एखाद्या वस्तूची तशी भव्यता नजरेसमोर येत नाही. वर प्राणी, वस्तू, व्यक्तीसंदर्भात उल्लेख आला आहे, पण Silhouette चे उल्लेख अंतर्गत सजावटीसाठी वाचल्याचे स्मरते.
@ वर्षा "अस्थानी" साठी तुम्ही
@ वर्षा
"अस्थानी" साठी तुम्ही Inconsiderate वापरू शकता. जसे His inconsiderate remarks about President's speech created chaos among all. तसे पाहिल्यास Inconsiderate चा सरळसोट अर्थ आहे अविचारी, अविवेकी तसेच विचारशून्य. तरीही अस्थानीसाठी याचा प्रयोग विचारात घेता येतो.
धन्यवाद प्रतीक.
धन्यवाद प्रतीक.
Silhouette धूसर कडा म्हटले
Silhouette धूसर कडा म्हटले तरीही एखाद्या वस्तूची तशी भव्यता नजरेसमोर येत नाही. >>> प्रकाशाची झालर्/किनार
'व्यर्थ, निष्फळ' साठी ३
'व्यर्थ, निष्फळ' साठी ३ अक्षरी समानार्थी हवा आहे. '..पट' असे कोड्यात आहे.
मोठ्या झाडांच्या फांद्यांवर
मोठ्या झाडांच्या फांद्यांवर काही छोटी झाडे वाढतात. पण ती बांडगुळे नव्हेत. इंग्रजीमधे त्यांना एपिफाईट्स आणि स्क्वॅटर्स असे शब्द आहेत. त्यांना मराठीत काही शब्द आहे का ? मला एका लेखाच्या शीर्षकासाठी हवाय तो शब्द.
नेणीव या शब्दाचा नेमका अर्थ
नेणीव या शब्दाचा नेमका अर्थ काय? जाणीव या शब्दापासून तो कसा वेगळा आहे?
नेणीव शब्दाचा नेमका अर्थ हवा
नेणीव शब्दाचा नेमका अर्थ हवा असेल तर प्रथम "जाणीव" चा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. जाणीव म्हणजे Perception. एखादी बाब 'काय असेल' हे पाहणे वा समजणे. उदा. नदीला पूर आल्याची तुम्हास "जाणीव" झाली. पण इथे तुमच्या अंगी जी जन्मजात Power of Perception आहे, ती समजून घेण्याची शक्ती म्हणजेच नेणीव. पूर आला आहे हे तुम्हाला जाणवले पण तो नदीकाठच्या वस्तीसाठी धोकादायक ठरू शकतो हे समजणे म्हणजेच नेणीव.
"जाणीव" सहजपणे होत असते पण 'नेणीव' आपल्या शहाणपणावर अवलंबून असते. त्यामुळे व्यवहारात सरसकट "समजुती" साठी जाणीव शब्दच प्राधान्याने उपयोगात आणला जातो.
माझ्या मते नेणीव हा शब्द
माझ्या मते नेणीव हा शब्द जाणीव या शब्दाचा बरोब्बर विरूद्धार्थी शब्द आहे. म्हणजे नेणीव= जाणीव नसणे.
मराठी अध्यात्मग्रंथांमध्ये बरेचदा येतो हा शब्द. उदा. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात असे आहे - 'जाणीव नेणीव भगवंती नाही'. नामदेवांच्या 'काळ देहासी आला खाऊ' या अभंगात सुद्धा असे वाक्य आहे - 'कोणे वेळे काय गाणे, हे तो भगवंता मी नेणे'. (मला ही दोनच उदाहरणं आठवतायेत).
तसेच आपणही त्याच अर्थाने तो शब्द वापरतो. नेणतेपणे केलेले काम म्हणजे अजाणतेपणे केलेले काम.
फचिन, नाही,. प्रतीक यांनी
फचिन, नाही,. प्रतीक यांनी सांगितलेला अर्थ बरोबर आहे. पंचेंद्रियांच्या कक्षेत न येणारे ज्ञान म्हणजे नेणीव. (सबकॉन्शस किंवा गट-फीलिंग म्हणतो त्या अर्थी.)
जाणीव
जाणीव नेणीव
http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A8%E0%A5%87%E0...
Pages