Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
अवगुंठन = चेहरा झाकण्याचे
अवगुंठन = चेहरा झाकण्याचे कापड, झाकण, किंवा एखादी गोष्ट बंदिस्त करणे
अवगुंठन - आवरण, बुरखा
अवगुंठन - आवरण, बुरखा
इन्डिजनस (indigenous) ला
इन्डिजनस (indigenous) ला मराठीत चपखल असा कोणता शब्द योजता येईल? (e.g. raw materials consumed indigenous)
इन्डीजनस ला मराठीत मूळ
इन्डीजनस ला मराठीत मूळ स्त्रोत्/उत्पत्तीस्थान्/उगमस्थान म्हणता येईल वाक्याच्या संदर्भावरून या तिन्हीपैकी एक वापरता येईल
गजानन raw material indigenous
गजानन
raw material indigenous साठी "घरगुती" अथवा "स्थानिक" हा शब्द वापरता येईल.
एतद्देशिय?
एतद्देशिय?
मी दिलेल्या संदर्भात
मी दिलेल्या संदर्भात 'एतद्देशीय' चांगले बसेल असे वाटते.
धन्यवाद.
एतद्देशीय ऐवजी मग स्वदेशी खप
एतद्देशीय ऐवजी मग स्वदेशी खप का नाही वापरत्?प्रचलित आहे म्हणून!!
स्वदेशी अधिकच सुटसुटीत
स्वदेशी अधिकच सुटसुटीत राहील...
किंवा अन्तर्देशीय
किंवा अन्तर्देशीय
बांगड्या हातात भरणे असा आपण
बांगड्या हातात भरणे असा आपण वाक्यप्रचार आहे ज्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीत काही करुन दाखवायची धम्मक नसणे वगैरे वगैरे पण अगदी जुन्या काळी देखील बांगड्या भरणार्या स्त्रिया ह्या शूर होत्या.. त्यांनी देखील पराक्रम केलेत. मग हा वाकप्रचार निर्माण कसा झाला असावा याबद्दल माहिती असल्यास लिहा.
साऊथ ईस्ट म्हणजे मराठीत कोणती
साऊथ ईस्ट म्हणजे मराठीत कोणती उपदिशा?
अमि, साऊथ इस्ट म्हणजे आग्नेय.
अमि, साऊथ इस्ट म्हणजे आग्नेय.
धन्यवाद
धन्यवाद
random =
random = यादृच्छिक
representation = प्रतिरूपण
performance = संपादणूक
(महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकातून साभार)
मला अजून update करणे
मला अजून update करणे (माहिती), share करणे (अनुभव) याकरता चपखल मराठी शब्द आठवत/आढळत नाहीत. तुम्हाला माहीत असतील तर सांगा कृपया.
माहितीचे नूतनीकरण, अद्यावत
माहितीचे नूतनीकरण, अद्यावत करणे,
अनुभव शेर करणे - अनुभव सांगणे, ( तो काही वाटून घेता येत नाही , एखादी वस्तू वाटल्यासारखा )
मेधा, हो 'अद्ययावत' वापरायला
मेधा, हो 'अद्ययावत' वापरायला सोपा वाटेल. "मी मायबोलीवरचा एखादा धागा अद्ययावत केलाय" असे म्हणता येईल. (सवय नाही त्यामुळे जरा ऐकायला वेगळे वाटतेय.)
representation =
representation = प्रतिनीधीत्व
performance = काम करण्यातली गुणवत्ता
performance =
performance = कामगिरी
random=कधी कधी ,क्वचित
representation =
representation = प्रतिनीधीत्व
performance = कामगिरी
हे अर्थ अगदी बरोबर आहेत. मी वर दिलेले अर्थ ( यादृच्छिक, प्रतिरूपण, संपादणूक) हे मी त्या पाठ्यपुस्तकात पहिल्यांदाच वाचले.
random=कधी कधी ,क्वचित <<< रेव्यु, हे अर्थ मला चुकीचे वाटताहेत.
)
(उदा. रंगीबेरंगी चेंडूने भरलेल्या टोपलीतून randomly दोन चेंडू निवडले.
दुसरा एक शब्द आज वाचनात आला - उद्वाचन. म्हणजे decoding का?
random = असंबध्द ?
random = असंबध्द ?
random = not in series असंगत
random = not in series
असंगत ???
random = अधले मधले
random = अधले मधले
(१) random : मुशाफिर यानी
(१) random : मुशाफिर यानी सूचित केलेला अर्थ 'असंगत' जरी ठीक असला तरी तो व्यवहारात वापरत असतीलच असे वाटत नाही. असंगत = 'कशीही, कसाही, कसेही' असा घेतला जाऊ शकतो. जसे, "बाजारात भाजी निवडीला स्वातंत्र्य नसल्याने रॅण्डमली जी बरी वाटली तीच घेतली". या ठिकाणी 'भाजी तर घ्यायचीच आहे, पण ती आज कशीही घेतली' असे ध्वनीत होऊ शकते.
(२) random = अधले मधले. अश्विनी के याना हा अर्थ जर अपेक्षित असेल तर या adjective ला At हे preposition लावले गेले तरच अधले मधले हा अर्थ प्राप्त होईल. At Random = Not in a particular order असा स्पष्ट अर्थ मिळतो. केवळ random म्हणजे निवड स्वातंत्र्य नसलेली अवस्था.
माझ्या दिवाळी अंकातील
माझ्या दिवाळी अंकातील लेखामध्ये random करता 'निष्क्रम' हा शब्द वापरला होता.
तो Not in a particular order ला साजेसा आहे.
http://vishesh.maayboli.com/node/787
random करता स्वैर, विमुक्त,
random करता स्वैर, विमुक्त, अनिर्बंध असे शब्द वापरता येतील.
random walk करता स्वैर वावर.
रँडम = यदृच्छय रिप्रेझेंटेशन
रँडम = यदृच्छय
रिप्रेझेंटेशन = प्रतिनिधित्व
पर्फॉर्मन्स = कर्तब
असेच अनेक शब्द http://shabdaparyay.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवर सापडतील!
गोळे सर performance =कर्तब अन
गोळे सर
performance =कर्तब अन कामगिरी मध्ये फारसा फरक ध्वनित होत नाही.
random म्हणजे कुठल्याही नियमानुसार ,क्रमानुसार्,पध्दतीनुसार ,रीतीनुसार नसलेला म्हणजे अनियमित का ?यदृच्छय कठीण व अप्रचलित आहे म्हणून!!
रेव्यु साहेब, performance
रेव्यु साहेब,
performance =कर्तब अन कामगिरी मध्ये फारसा फरक ध्वनित होत नाही.>>>>
तसा त्यांत फारसा फरक नाहीच आहे. नक्की कोणता फरक ध्वनित व्हावा अशी तुम्हाला अपेक्षा आहे?
मात्र पर्फॉर्मन्स या शब्दाचे पुढील अर्थही संभवतात. "खेळ", "भूमिका वठवणे", "सोंग आणणे", साध्य करणे, करून दाखवणे, सिद्ध करणे.
random म्हणजे कुठल्याही नियमानुसार, क्रमानुसार्,पध्दतीनुसार,रीतीनुसार नसलेला म्हणजे अनियमित का ?>>>>> हो. मात्र त्याहूनही काही अधिक विशेषता असणारा. म्हणजे कुठल्याही एका घटनेची संभाव्यता दुसरीहून जास्त नसणे ही विशेषता असणारा.
यदृच्छय शब्द कठीण आहे मात्र अप्रचलित नाही! याकरता "यथासंभव" शब्दही वापरता येईल असे वाटते.
Pages