क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. आम्ही पहात होतो चँपिअन्स लीग. मजा आली.
पहिली कसोटी मोहाली.

क्रिकेट सिनेमा सारख होतय. पण चांगल आहे एक प्रकारे.

हजारो सिनेमे येतात. कसेही असो. पहाणारे पहातात. काही चालतात. काही पडतात. नविन हिरो तयार होतात. उद्याच्या स्वप्नात नविन गुंग असतात. बुजुर्ग दिलीप देव च्या काळात रमत बसतात.

टेक्नॉलॉजी येते. नविन फॅशन येते.प्रगती चालूच रहाते. न बघणार्‍यांना कंटाळा येतो न काम करणार्‍यांना.

विक्रम Happy खरयं.
ऑसिजने आल्या आल्या नेहेमीप्रमाणे भाषणबाजी सुरू केलीय. पाँटिंगने 'युवराज चांगला खेळाडू आहे, पण त्याच्याशिवायही भारतीय संघ ताकदवान आहे' असा शेरा मारून आग लावलीय Wink
नॅथन हॉरित्झने 'तेंडुलकर महान आहे पण आउट काढायला येइल इ.इ.' वल्गना केलीय.
धोनी बहुदा चँपिअस्न लीग मध्ये व्यस्त असल्यामुळे शांत आहे , तर सेहेवाग मौन धारण करून डायरेक्ट बॅटीने उत्तर देणार असं वाटतय.

<<हजारो सिनेमे येतात. कसेही असो. पहाणारे पहातात. काही चालतात. काही पडतात. नविन हिरो तयार होतात. उद्याच्या स्वप्नात नविन गुंग असतात. बुजुर्ग दिलीप देव च्या काळात रमत बसतात. >> बव्हंशी खरं असलं तरी "क्लासिक", "लीजंड" या सदरात मोडणारे मानदंडही कलौघात प्रत्येक क्षेत्रात निर्माण होतच असतात - मग ते नवे असोत किंवा जुने; त्यांची आठवण होणं, त्यांची कदर करणं हे तर रसिकतेचंच लक्षण मानावं लागेल, बुजुर्गच नव्हे तर नवीन पिढीसाठीही !

परवा वाचले - पाँटिंग आपल्याच हातांवर थुंकतो. अश्या माणसाशी हस्तांदोलन करण्यापेक्षा, भारतीय पद्धतीप्रमाणे दुरूनच नमस्कार केलेला बरा!!

>>पाँटिंग आपल्याच हातांवर थुंकतो. अश्या माणसाशी हस्तांदोलन करण्यापेक्षा, भारतीय पद्धतीप्रमाणे दुरूनच नमस्कार केलेला बरा!!<< Lol खरयं. तो स्लीप मध्ये उभा असताना तर हे कायमच करताना दिसतो.

<< भारतीय पद्धतीप्रमाणे दुरूनच नमस्कार केलेला बरा!!>> तोही कोपरापासून हात जोडून!

अश्या माणसाशी हस्तांदोलन करण्यापेक्षा, भारतीय पद्धतीप्रमाणे दुरूनच नमस्कार केलेला बरा!! >> छे छे. झक्की तुम्हाला सचिन, पाँटिंग झक्काझक्की माहित नाही का? एकदा सचिनने त्याला एकदा ए अरे पाँटिंग इकडे ये रे अन जरा माझ्या बुटाचे बंद बांध असे सांगीतले आहे. रिकी बिचारा करतो काय? बांधले बुटाचे बंद. फुकटात बंदांना मात्र थुंकी लागली.

ऑसीचे मिडियावॉर सुरु झाले आहे. सच्या नेहमीसारखाच जबरी खेळणार हे नक्की.

>>> अश्या माणसाशी हस्तांदोलन करण्यापेक्षा, भारतीय पद्धतीप्रमाणे दुरूनच नमस्कार केलेला बरा!!

झक्की,

तुम्हाला पाँटिंगशी हस्तांदोलन करायला लागणार आहे वाटतं? केव्हा? कुठे? ते करताना हातमोजे घाला.

पाँटिग आपल्याला आवडो नावडो, आपल्या गोलंदाजीला मात्र "थुंकी लावण्याची" ताकद त्याच्या फलंदाजीत आहे, हे नाकारता येणार नाही ! [ऑस्ट्रेलियातही तो खास लोकप्रिय नाही, हेही आता गुपित नाही].

मास्तुरे, मला 'पाँटिंगशी हस्तांदोलन करायला लागणार' नाही.
पण तुम्हाला जर माझ्या विधानाचा त्रास झाला असेल तर क्षमा करा.

कुटलीहि गोष्ट तक्रार करण्यासाठीच लिहीली असते असे समजत असाल तर इलाज नाही. घ्या त्रास करून. आणि तसे सांगा, म्हणजे मग मी सारखी सारखी क्षमा मागत बसणार नाही.

पण तुम्ही जिथे जाल तिथे लोकांनी तुम्हाला त्रास होणार नाही असे लिहावे असे वाटत असेल तर मला ते काही जमणार नाही, जमवून घेण्याचा प्रयत्नहि करणार नाही. वाटल्यास तुम्ही नका येऊ इथे. मला त्रास होणार नाही त्याचा.
धन्यवाद.

अहो झक्की,

किती मनाला लावून घेताय? माझ्या लिखाणात तुम्हाला कोणती तक्रार आढळली? अहो मी गंमतीने लिहिले होते. तुमच्याविरूध्द तक्रार करण्याचा किंवा इतर कोणताही उद्देश नव्हता. पाँटिंग पचापचा दोन्ही हातावर थुंकुन हात चोळतो हे अनेकवेळा पाहिलेले आहे.

रच्याकने, सेहवाग दर मिनिटात २ वेळा असे एका दिवसात एकूण ७०० पेक्षा अधिक वेळा थुंकतो. फक्त तो जमिनीवर थुंकतो एवढाच फरक.

२०११ ची विश्वचषकस्पर्धा कुठे होणार आहे? कधी सुरु होणार? ते सामने २०-२० असतात की ५०-५०?ती स्पर्धा संपल्यावर, त्या स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी बघून चालू जमान्यातील विश्वसंघ १ व विश्वसंघ २ असे निवडून त्यांच्यात तीन सामने ठेवले तर जास्त मजा येईल बघायला?

हिम्सकूल, लिंकबद्दल धन्यवाद.
तिथली पाँटिंगची मुलाखतही मला अनपेक्षितपणे खूपच "सोबर" वाटली !

२०११ ची विश्वचषक स्पर्धा १९ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. सगळे सामने ५०-५० ओवर्स चे असणार आहेत. भारत-श्रीलंका-बांग्लादेश संयुक्त यजमान आहेत.

>>ती स्पर्धा संपल्यावर, त्या स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी बघून चालू जमान्यातील विश्वसंघ १ व विश्वसंघ २ असे निवडून त्यांच्यात तीन सामने ठेवले तर जास्त मजा येईल बघायला?<< वेगळी कल्पना Happy पवारांना ही कल्पना सांगितले तर नक्कीच नवीन स्पर्धा सुरु करतील.

मंडळी,

ऊद्यापासून पुन्हा मस्त क्रिकेट ची मेजवानी. आपली परिस्थिती फार काही बदललेली नाहीये. म्हणजे फलंदाजीवर सारी मदार, अन गोलंदाजी ऊदार असल्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली तर संधी आहे. द्रविड ने येथील कवितेची मानसशास्त्रीय गरज या बा.फ. वरील लिंक्स वाचून अनेक मानसशास्त्रीय सल्ले घेतले असतील अशी आशा करूया, किमान त्याच्या बॅट ने तरी ते सल्ले घेतले असतील अशी आशा करूयात. अन्यथा त्याला vrs देतील याची खात्री आहे.

पुजारा ला खेळायची संधी मिळेल का? का श्रीशांत ला घेतील? (द्रविड ला बसवून क्र. ३ वर रैना ला पाठवले तर पुजाराला जागा आहे!). भज्जी चा चेंडू वळणार का? सेहवाग ९९ वर षटकार मारणार का? Happy

बाकी काही असो, साहेबांची फलंदाजी पुन्हा एकदा पहायला मिळणार और क्या चाहीये!

<< द्रविड ने येथील कवितेची मानसशास्त्रीय गरज या बा.फ. वरील लिंक्स वाचून अनेक मानसशास्त्रीय सल्ले घेतले असतील>> योगजी, द्रविडचं माहित नाही. पण मी मात्र तिथं जरा टोलेबाजी करायचा केविलवाणा प्रयत्न केला. पण आपलं "होम पीच" तें नसून इथंच आहे, हेही उमगलं.
<<बाकी काही असो, साहेबांची फलंदाजी पुन्हा एकदा पहायला मिळणार और क्या चाहीये!>> १००% अनुमोदन !

पण आपलं "होम पीच" तें नसून इथंच आहे, हेही उमगलं >> Lol भाऊ. मग तुमची 'अवे' पिचवर धुळधान उडतीये तर. एकदम भारताच्या २००० आधीच्या टीम सारखं.

तुम्ही आपलं इकड तिकडे लक्ष न देता फर्स्टक्लास व्यंगचित्र काढा. ती एक मेजवानीच!

कालचा दिवस बर्‍याच प्रमाणात आपला ठरला, आता ऑसीजना ३००च्या आत गुंडाळायला हवे.
इशांत परत जखमी. एका मॅचमधे दोन पूर्ण फीट फास्ट बोलर दुसर्‍या टीमला ताप करताहेत हे चित्र भारतीय संघात शेवटाचे कधी दिसले होते?
'मेंटल डिसैंटीग्रेशन'ची सुरुवात यावेळी आपण केली,पॉटींगला भडकवून!

पाँटिंगने झहीरला गोलंदाजी सुधारण्यावर लक्ष द्यायला सांगितलेय, त्याने आणखी गोलंदाजी सुधारली आणि भारतीय क्षेत्ररक्षकांचा 'हात'भार लागला तर ऑस्ट्रेलियाचा स्कोर बांग्लादेश्/झिंबाब्वेसारखा दिसेल!

<<कालचा दिवस बर्‍याच प्रमाणात आपला ठरला,>> खरंय; पण तीन सोपे झेल सोडल्याची तीट लागलीच ना ! खूप दिवसानी सचिनची फिरकी पहायला मिळेल अशी आशा निर्माण झाली होती, पण तसं होणं नव्हतं. ओझा आता सेवेत "कायम" झाल्यासारखाच वाटतोय. स्टेडीयमचा बहुतेक भाग रिकामा पाहून कसंसच वाटलं. अयोध्या निकाल ?
<<पाँटिंगने झहीरला गोलंदाजी सुधारण्यावर लक्ष द्यायला सांगितलेय>> काल कदाचित "इशांतचा पाय आपोआपच मोडलाय, तुझा मी मोडून ठेवीन" असं कांहीसं तो झहीरला बोलला असावा असं वाटलं !
<< भाऊ. मग तुमची 'अवे' पिचवर धुळधान उडतीये तर.>> "होम पिच"वरही माझी अवस्था काही वेगळी नाहीय. पण आईच्या हातचा मार लागत नाही म्हणतात ना, इथं तसंच कांहीसं ! नाही तरी, गोंजारण्याचं नाटक करत मला व्यंगचित्रातच ढकलून देण्याचा बेत शिजतोयच ना इथंही !!

नकोच आता सालस आणि गुणी बाळं. पण अगदी गुंड नाही म्हणवली तेवढे पुरे.
ऑसीज सचिन , द्रविड बाद झाल्यावर त्यांना पण टोमणे मारायचे/मारतात म्हणे....
गंभीरला तर खूप गंभीर शेरे मारले त्यांनी.

ऑसीज चे ४००+ होतील..
लंकेच्या दौर्‍यातील सामन्याचे विवेचन ईथे कॉपी पेस्ट करता येईल- पुन्हा तेच. शेपूट न गुंडाळता येण्याचा रोग. या शेपटाचा विळखा या खेपेस आपल्याला भारी पडणार बहुतेक कारण गोलंदाज अन क्षेत्ररक्षण ऑसी चे आहे, लंकेचे नव्हे. प्रत्त्येक झेल जन्मोजन्मीची भूक असल्यागत ते गिळतील.. अन जी खेळपट्टी आपल्या गोलंदाजांन्ना विशेष साथ देत नव्हती तीच खेळपट्टी ऑसी गोलंदाज आले की अचानक भेदक वाटायला लगेल.
तेव्हा सर्व काही नेहेमीचे प्रक्षेपण दिसेल- गंभीर अन सेहवाग बेभरवशाचे अन मग साहेब, द्रविड अन लक्षमण यांची "कसोटी"!
चौथ्या अन पाचव्या दिवशी ही खेळपट्टी फिरकीला भयंकर अनुकूल ठरेल असे मला वाटते, पण तोपर्यंत आपल्याला त्यांची धावसंख्या पार करता येईल का? सद्य्द्य स्थितीवरून पुढे ऑसीज हरण्याची शक्यता खूपच कमी आहे- आपण तग धरतो का हाच प्रश्ण आहे.
-------------------------------------------------------------------------------------
फक्त सात षटके टाकून ईशांत दिवसभर तंबूत बसतो, पाय लचकला म्हणून. काय हा फिटनेस!
डग बॉलिंजर या खेळपट्टीवर ५ विकेट्स घेईल असा माझा अंदाज आहे.

डग बॉलिंजर या खेळपट्टीवर ५ विकेट्स घेईल असा माझा अंदाज आहे>> येस्स, माझ्या मते तो त्यांचा डार्क हॉर्स ठरणार. साहेब, सेहवाग त्याला कसे खेळतात यावर बरेच काही अवलंबून आहे
कॅचेस पोत्यांनी सोडले आपण, पेनचा तर शून्यावर असताना.

Ishant Sharma - 11.4-1-71-0

या ईशांत शर्माच्या गोलंदाजीला काही अर्थ आहे का? त्याला वारंवार का संधी देतात?

148.4 Khan to Paine, FOUR, 133.1 kph, dropped, that was Dhoni's catch. Paine tried to guide a short of a length ball that slanted across the right-hander, he edged it and the ball flew between Dhoni and first slip (Dravid) to the boundary. It was closer to Dhoni, it was to his right and he has the gloves. His catch. That's the third chance he's not taken this innings.

धोनी अजून किती झेल सोडणार आहे?

Pages