क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> पुन्हा द्रविड : एकदिवसीय सामन्यात सुद्धा परिस्थिती प्रमाणे खेळ करायला, डाव बांधायला,त्याला आकार द्यायला कोणीतरी लागेलच.

श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनेची व द्रविडची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. दोघेही स्लिपमधले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. दोघेही सुरवातीला डाव बांधायला मदत करतात व नंतर योग्य वेळी फटकेबाजी करतात. श्रीलंकेकडे जयवर्धने आहे पण आपल्याकडे सध्याच्या संघात तसा कोणीही नाही.

>>> IPL च्या बळावर ODI मधे घेणे ह्याच प्रकारत मूळात गोच आहे.

IPL ने भारतीय क्रिकेटचे खूप नुकसान केलेले आहे. IPL मध्ये पराक्रम गाजविणारे खेळाडू अतिशय प्रतिभाशाली असल्याचा साक्षात्कार BCCI ला झाला व अनेक सामान्य कुवतीचे खेळाडू भारतीय संघात घुसले (उदा. अभिषेक नायर, जडेजा, युसुफ पठाण, कार्तिक, नमन ओझा, मुरली विजय, बद्रिनाथ).

Curious Case of Murali Vijay :
सर्वसाधरणतः आपल्याकडे खेळाडूंचा प्रवास IPL > ODI > Test असा होतो. मुरली विजय ह्याला सणसणीत अपवाद. त्याने बरोबर उलट प्रवास केलाय. त्याच्या Aus विरुद्ध असलेल्या Tests मधल्या innings नक्कीच reassuring होत्या. त्याची विचार करण्याची पद्धत पण uncluttered वाटली होती.

IPL मधे त्याने खेळलेले cross batted pulls पण neatly executed वाटत होते.टेस्ट्पासून IPL पर्यंत नीट adopt करतोय असे मलातरी वाटले होते. त्यानंतर श्रिकांत ला विजयला जिथे तिथे घुसवायची खाई खाई सुटली आणि तेंव्हापासून विजय अतिशय सामान्य खेळतोय. कदाचित added expectations चा परीणाम असेल किंवा pure loss of form असेल.

मुरली विजयने टेस्ट मध्ये फक्त एक इनिग चांगली म्हणावी अशी खेळली आहे. ८७ ची. एकुण तीन वर्षात सात टेस्ट, त्यातील पाच ह्या २०१० मध्ये आणि एव्हरेज २४ !! तर एकुण चार वनडेत अ‍ॅव्हरेज १७ ! त्यातील फक्त एक चांगली इनिंग.

तो ओपनर आहे, त्याचाकडून जास्त अपेक्षा आहेत. अगदी सचिन, दादा इ लोकांशी तुलना न करता गंभिरशी केली तर गंभिर ने पहिल्या वर्षी ५ टेस्ट मॅच खेळल्या १३९ सर्वात जास्त धावा तर एकुण अ‍ॅव्हरेज फक्त टेस्ट मध्ये ४३.८५!! . वनडेतपण पहिल्या वर्षी साधारण २३ च्या आसपास.

pure loss of form असला तरी हरकत नाही, पण मग ह्या लॉस ऑफ फॉर्म मध्ये त्याला भारतीय टीम मध्ये संधी देऊन काय साधणार? त्याची आकडेवारी त्याला सपोर्ट करत नाही, त्याने परत रणजी मध्ये जाउन खेळावे, त्याला एखाद वर्षाच्या गॅप द्यावा व घ्यावे.
वल्डकप साठी त्याला खेळायला स्पॉट पण नाही, गंभिर, सेहवाग, सचिन पैकीच पहिल्या दोन मध्ये खेळणार. ६ किंवा ७ व्या जागी त्याला घेणे योग्य वाटत नाही, संधी द्यावी पण आतापर्यंत टीम कशी तयार पाहीजे.

आपली ही नेहमीची बोंब वल्डकपच्या दिड दोन वर्षे आधी आपली टीम एकदम जबरी वगैरे असते, अन नतर लय जाउन ६ महिने आधी बदल होतात. २००३ अपवाद कारण सचिन फुल फॉर्म मध्ये खेळला, एकट्यानेच बहुतेक सगळ्या मॅच जिंकुन दिल्या.

केदार मी कुठेही म्हटले नाहिये कि त्याला घ्या.

पण तुझे पोस्ट पूर्णपणे बरोबर नाही. तो जेमतेम दोन वर्षे खेळतोय (२००८ च्या शेवटी तो पहिली टेस्ट खेळला). दुसरी गोष्ट, त्याह्ची सरासरी बघताना तो ज्या संघाविरुद्ध खेळला ते मह्त्वाचे आहे. तिसरी गोष्ट जि सगळ्यात मह्त्वाची हि ती कि तो stop gap arrangement म्हणून खेळला होता. मूळात तो १६ जणांमधे पण नव्ह्ता. गंभीर च्या suspension मुळे तो पहिली मॅच खेळला होता.

वल्डकप साठी त्याला खेळायला स्पॉट पण नाही,>> ह्याबद्दल दुमतच नाहि.

मुरली विजयच्या संदर्भातली इथलीच माझी जुनी पोस्ट - << योगजी, भविष्याचाच विचार करायचाच झाला, तर मुरली विजय हा काही अनुभवानंतर एक चांगला ओपनींग फलंदाज होईल असं मला राहून राहून वाटतं. त्याच्यावर आताच काट मारणं योग्य नसावं. तो बराचसा तंत्रशुद्ध खेळतो व त्याला "टेंपरॅमेंट"ही बर्‍यापैकी असावं असं वाटतं. गंभीर व सेहवाग दोघेही मुख्यतः आक्रमक खेळाडू आहेत व म्हणूनच सेहवाग व मुरली ही आदर्श ओपनींग जोडी होईल, असा माझा होरा आहे. गभीर क्र. ३ व युवीऐवजी रैना क्र.६, असा बदल मला सुचवासा वाटतो. [अर्थात, निदान ऑसीज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत तरी रैना ऐवजी द्रविडला खेळवून पहाणं शहाणपणाचं ठरेल, असंही मला वाटतच ]>> केदारजी, नवीन खेळाडूंच्या बाबतीत तरी आंकडेवारीपेक्षांही प्रतिभा, तंत्र व कुवत यावर लक्ष केंद्रीत करावं, असं मला नम्रपणे सुचवावसं वाटतं. श्रीलंकेचा आट्टापट्टू सुरवातीला सतत अपयशी ठरत होता तरी निवड समितीने त्याच्यावर डोळस विश्वास टाकला व तो त्याने सार्थही केला. शेवटी, निवड समितीत जाणकार मंडळी अशी पारख करण्यासाठीच तर घेतात ना ! प्रतिभा असूनही, सुरवातीच्या कसोटींतच शतकं मारणारे अझरुद्दीनसारखे खेळाडू दुर्मिळच असतात. [मुरलीला विश्वचषकासाठी घ्यावं ,असं अजिबात सुचवायचं नाहीय]

कसोटीत तरी रैना ऐवजी द्रविडला खेळवून पहाणं शहाणपणाचं ठरेल. >> भाउ साहेब. अहो रैना ऐवजी वगैरे नाही. कसोटीत द्रविड हक्काने आहेच.

अट्टापट्टूच्या उलट मुरली विजय - सुरूवातीला चांगला खेळला (मला वाटत त्याच्या पहिल्या ३ इनिंग मधे चांगल्या पार्टनरशीप्स होत्या). पण अस वाचल की नंतर त्याला बॉलर्सनी सॉर्ट आउट केला. म्हणजे कुठे तरी तंत्रात कमी आहे. ते जो पर्यंत सुधारत नाही तो पर्यंत त्याला घेउही नये..

<<अहो रैना ऐवजी वगैरे नाही. कसोटीत द्रविड हक्काने आहेच.>>विक्रमजी, माझी ती कॉमेंट त्या जुन्या पोस्टमध्ये त्यावेळच्या चर्चेत मांडलेल्या मुद्यासंदर्भातच होती ! तरीपण इतकं मवाळपणे द्रविडला घेण्याबद्दल लिहायला नको होतं. मान्य. द्रविड हक्काने कसोटीत येतो व यावा, हे निर्विवाद.

जनरल माझे मत World Cup बद्दल हे आहे कि आपण सेमी पर्यंत नक्की जाऊ. पण कप जिंकणे कठीण आहे. मुख्य कारण आपण पूर्णपणे batting centric आहोत. fit and in-form balling resources हा आपला नेहमीचाच वांदा राहिला आहे नि ह्यावेळी तो जास्त जाणवतोय. batting powers एका मर्यादेपर्यंत matches जिंकू शकतात. All it will need is, few hours of damp pitch/due/wind blowing across etc and then we will be at defending sub par score with limited balling resources. आपल्या पिचेस स्वरुप बघता जोवर spin assisted pitches नसतील तोवर असा स्कोर डिफेंड करणे कठीण आहे.

I hope I will be proved wrong. Happy

लोकहो, आता पिचवर किती दिवस दोष ढकलणार?
एव्हढे पैसे आहेत म्हणे BCCI कडे. करा सगळ्या प्रकारची पिचे तयार नि करा चांगला सराव.

damp pitch, dew, wind blowing across हे करायला आपल्याकडे तंत्रज्ञान नाही?

जरा घरीच कस्सून (म्हणजे इशांत शर्मा सारखे नाही, निदान तीन तास रोज असे आठवड्याचे पाच दिवस ,) सराव करा नि मगच आंतर्देशीय सामन्यात उतरा. म्हणजे स्वतःची फजिती, नि देशाची नाचक्की होणार नाही!

BCCI जवळ एव्हढे पैसे आहेत तर जरा होतकरू नि स्वतः ला ज्येष्ठ नि श्रेष्ट समजणारे असे २५ खेळाडू घ्या नि त्यांना सरावाचे सुद्धा पैसे द्या. आशा आहे की चांगले फलंदाज नियमात बसणारी, स्वतःला वापरायला चांगली अशी बॅट स्वतःच्या पैशाने कस्टम मेड करून घेत असतील! (अमेरिकेत तो खर्च टॅक्स डिडक्टिबल पण असतो).

गोलंदाजांनी सुद्धा नियमांचे सक्त पालन करून गोलंदाजी चा सराव करावा. 'पावर प्ले ला मी चेंडू थोडा कुरतडीन किंवा त्याला थोडा गम चिकटवीन' या युक्तीवर अवलंबून राहू नये. ते गोर्‍यांचे धंदे.

हे सगळे लवकर करा, नाहीतर BCCI चे पैसे जप्त करून टाकतील कृषिमंत्री. (पैसे खातील असे लिहीणार होतो, पण त्यांच्या बद्दल असे असभ्य कसे बोलायचे? अर्थ तोच होता म्हणा. )

पाँटिंग येणार आहे झक्कीं, बॉल ला अ‍ॅन्टीसलाव्हा इंजेक्शन दिली आहेत म्हणे. आता ते टॅक्स डिडक्टेबल नाहीत ही गोष्ट अलहिदा.

मयेकर आर्टिकल लिंक बद्दल धन्यवाद. कठीण आहे. फिटनेस मध्ये का मागे आहेत हे दिसतेच. नाहीतर सच्या. अजूनही नेट मध्ये प्रॅक्टीस करतो.

पण त्याला 'कुरतड' प्रूफ केले आहे की नाही?
आपल्या संघात जलदगति गोलंदाज असतील, नि विकेट जलदगति गोलंदाजीला अनुकूल असेल, तर चेंडूवरची शिलाई भराभरा कापावी, हातात ब्लेड लपवून. म्हणजे लवकर लवकर नवीन चेंडू घ्यावा लागेल नि मग मज्जा.

फिक्सिंग मधे गुंतलेले पाक खेळाडू आणि एक प्रदीर्घ चांगली करीअर, एक्सलंस मिळवण्यासाठी करायची खडतर साधना यापेक्षा झटपट पैसा मिळवून छानछोकीचे आयुष्य जगण्यात मजा मानणार्‍या नव्या भारतीय क्रिकेटपटूंकडे पाहून फिक्सिंगचे गिधाड भारतीय क्रिकेट भोवती घिरट्या घालत असेल...अशी पाल चुकचुकली.
नाहीतरी बहुतांश बदनाम बुकीज भारतीयच आहेत.
आणि हर्ष भोगलेचा हा लेख आला :
http://www.indianexpress.com/news/make-no-mistake-india-face-a-threat-gr...

भरतजी, लींकबद्दल आभार.
हॉकी व क्रिकेटमधले "लिजंड" लोकल ट्रेनमधून, तेही दुसर्‍या वर्गात, प्रवास करताना पाहिलेल्या माझ्यासारख्याना जर हे पचनी पडणं अवघड जातं, तर खुद्द त्या "लिजंड"ना काय वाटत असावं !
पण नव्या खेळाडूंच्या हातात सिस्टीममुळे अमाप पैसा आला व त्यामुळेच सुस्ती आली म्हणावं, तर <<नाहीतर सच्या. अजूनही नेट मध्ये प्रॅक्टीस करतो.>> हे आहेच. सौरवदादा तर गर्भ श्रीमंत पण मेहनतीत कमी नसावा. कदाचित, मुळचं "मोटीवेशन"च क्रिकेटबद्दलच्या "पॅशन"पेक्षां पैसा हेच असावं व म्हणूनच ही गोची होत असावी.
जाउद्या, काय हवी ती झक मारा पण आम्हाला जरा अभिमान वाटेल असं मैदानावर कांहीतरी करा, एव्हढंच वाजवी मागणं !

आयपीएल क्रिकेटचे, विशेषतः भारतीय क्रिकेटचे वाटोळे करणार यात मलाही माझा सूर मिळवावासा वाटू लागलाय.

चॅम्पियन्स लीग कोणी पाहात आहे का? आपल्याला केवळ सचिन मुळे इंटरेस्ट!

बघू आज काय करतो ते.

कसोटी वाल्यांसाठी पुढची १ ऑक्टो. मोहाली. ऑस्ट्रेलिया.

साहेबांची विकेट बेक्कार होती पण.. नंतर पोलार्डने पण जबरीच मारला... पण त्याची पण विकेट लय भारी.. तिथेच फिरली मॅच.. अर्थात झॅकच्या शेवटच्या ओव्हरमधे जो धुतलाय त्याला तोड नाही... तिथेच फरक पडला सगळा...

http://www.cricinfo.com/india/content/current/story/476777.html

ESPN ने निवडलेला भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट संघ -

(१) सुनील गावसकर
(२) सेहवाग
(३) द्रविड
(४) सचिन
(५) विजय हजारे
(६) विनू मंकड
(७) धोनी
(८) कपिल देव
(९) श्रीनाथ
(१०) कुम्बळे
(११) इरापल्ली प्रसन्ना

कुम्बळेच्या ऐवजी सुभाष गुप्ते हवा होता. बाकी संघ योग्य आहे. या संघात दोनच मध्यमगती गोलंदाज आहेत. पण ३ मुख्य फिरकी गोलंदाज आहेत (कुम्बळे, प्रसन्ना, विनू मंकड). सेहवाग आणि सचिन हे कामचलाऊ फिरकी गोलंदाज सुद्धा आहेत. विनू मंकड व कपिल देव हे दोन अष्टपैलू खेळाडू आहेत. जरूर पडली तर विनू मंकड सलामीला फलंदाजी करू शकतो. द्रविड हा कामचलाऊ यष्टिरक्षक सुद्धा आहे. हा भारताचा सर्वात समतोल संघ वाटतो. अजून एक मध्यमगती गोलंदाज संघात हवा होता. परंतु भारतात कपिल देव व काही प्रमाणात श्रीनाथ सोडला तर एकही चांगला मध्यमगती गोलंदाज अजून झालेला नाही.

कुंबळे प्रसन्ना पैकी एक (बहुधा प्रसन्ना कारण मंकड स्लो लेफ्ट आर्म orthodox spinner) घेऊन झहीर/रमकांत देसाई/निस्सार .. विशेषतः Eng/SA मधे खेळण्यासाठी. विश्वनाथ कुठेतरी हवा होता असेहि वाटते.

जरूर पडली तर विनू मंकड सलामीला फलंदाजी करू शकतो.

मंकड व पंकज रॉय यांची सलामीची जोडी प्रसिद्ध होती. त्यांच्या नावावर ४२५ धावांच्या भागीदारीचा विक्रम नोंदवण्यात आला आहे.
एरवी पंकज रॉय हा शून्यावर बाद होण्यात पटाईत होता. तो स्वतःच म्हणायचा, गेल्या तीन इनिंगमधले १, ०, ० असे लिहिण्यापेक्षा जर १०० असे लिहीले तर माझी पण सेंच्युरी!

आणि विजय मांजरेकर? त्याने २४ व्या वर्षी कसोटीत पदार्पण केले, तेंव्हा तो बेबी च समजला जायचा. पण इंग्लंडमधे ४ बाद शून्य असताना त्याने एकट्याने २४ धावा काढल्या. त्यामुळे आपल्या संघाचा सर्वबाद ३२ असा दणदणित पराक्रम झाला!

त्या वेळी फ्रेडी Truman ने "gimme the @X$**cherry, I'll getem all bastards out" असे मोठ्यांने म्हंटल्याचे बर्‍याच भारतीयांनी ऐकले म्हणून त्याला असभ्य भाषेबद्दल क्रिकेट्मधून काढून टाकावे की काय अशी चर्चा झाली होती.

यू ट्यूबवर एक पाकीस्तानी व गौतम गंभीर यांचा 'प्रेमळ संवाद' ऐकून या वयात सुद्धा मला धस्स झाले होते!!

पुढे पोट वाढल्याने मांजरेकरला क्षेत्ररक्षणास त्रास होऊ लागला.

शिवाय नवीन कप्तान, नवाब ऑफ पतौडीने एकदम भलतेच नियम काढले - खाली वाकून हाताने चेंडू अडवायचा, थोडे आजूबाजूला पळून सुद्धा चेंडू अडवायचा नि सर्वात कहर म्हणजे वेळप्रसंगी कपडे मळले तरी सूर मारून चेंडू अडवायचा, किंवा धावचित होण्यापासून स्वतःला वाचवायचे!

विशेषतः शेवटच्या नियमा मुळे धोबी वि. BCCI यांच्यात चांगलाच वाद झाला. कारण तेंव्हा BCCI जवळ कपडे धुवायला पैसे नव्हते. (आता शरद पवार जेंव्हा त्यांचे अध्यक्षपद सोडतील तेंव्हा अशी च वेळ येणार आहे BCCI वर)

बिचारा विजय! निवृत्त झाल्यावर बँकेसमोर सेक्युरिटि गार्ड म्हणून काम करत होता.

माटुंगा जिमखान्यावर तो एकदा फलंदाजीला आला तेंव्हा गोलंदाज चेंडू टाकेचना. कारण विचारले तर म्हणाला अजून विकेट कीपर आला नाही!! मग मांजरेकर थोडा बाजूला झाला तेंव्हा तो विकेट कीपर दिसला.

आजकाल क्रिकेट म्हणजे धंदा झाला आहे, चिक्कार पैशाचा प्रश्न असल्याने सगळे कसे अत्यंत गंभीरपणे विचार करतात, लिहीतात, गंमत म्हणून काही नाहीच.

वास्तविक ५०-५० किंवा २०-२० मधे लेग स्पिनर बापू नाडकर्णी याला घ्यावे. त्याची गोलंदाजी म्हणजे ४०-३५-६-० अशी असायची. पण त्याला जोडीला कुणि नाही.

तसाच रमाकांत देसाई हा पाच फूट उंचीचा, ९० पाऊंड वजनाचा जलदगति गोलंदाज फार प्रसिद्ध होता. बंपर टाकणारा भारताचा एकमेव गोलंदाज. तो येईस्तवर भारताकडे फक्त मिडियम पेस गोलंदाज होते - दत्तू फडकर, घुलाम महंमद इ.

पाकिस्तानचा हनिफ महंमद, ज्याने गॅरी सोबर्सचा ३६५ धावांचा विक्रम मोडला, जगातील त्या काळचा सलामीचा उत्कृष्ठ फलंदाज सुद्धा रमाकांत देसाई ला घाबरायचा. बिचार्‍या देसाइने सिगरेटी फुकून फुकून छातीचे खोके केले, म्हणून तो लवकर 'निवृत्त' झाला.

काल मुंबई इंडीयन्स परत एकदा मठ्ठपणामुळे पराभव.. १८१ धावा सुद्धा वाचवू शकल्या नाहीत पराभव... मधली काही षटके अगदीच सुमार टाकून वाट लावून घेतली पार.. झहीरखानला एकाच स्पेल मध्ये गोलंदाजी देऊन टाकली पाहिजे.. परत बॉलींगला आला की काय करुन येतो त्यालाच महिती.. त्याच्या एका ओव्हरमध्ये परत एकदा मॅच फिरली... मलिंगा बिच्चारा.. जीवतोड बॉलींग करून मॅच वाचवायचा प्रयत्न करतो आणि झहीर भंगार बॉलींग करून मॅच घालवतो.. सचिन बर्‍याच वेळा फारच अनाकलनीय निर्णय घेतो बॉलींगचे.. त्या ड्युमिनीला नाहीतर ब्राव्होला करा कप्तान... निदान योग्य ते बदल तरी बघायला मिळतील बॉलींग मधले..

जसे 'आपण आपल्या देशासाठी खेळतो' या अभिमानाने, आंतर्देशीय सामन्यात, खेळाडू जास्तीत जास्त चांगले खेळायचा प्रयत्न करतात, तसे spirit या असल्या सामन्यातून कुठून येणार? केवळ पैशासाठी, गंमत म्हणून खेळायचे.

माझेहि मत असे होत चालले आहे की असले सामने, आय पी एल, अगदी तिरंगी सामने सुद्धा क्रिकेटमधून काढून टाकावेत. त्या ऐवजी दर वर्षी फक्त एक परदेश दौरा, व एक घरी अश्या दोन आंतर्देशिय स्पर्धा ठेवाव्यात. त्यात तीन कसोटी, पाच ५० ५० व दहा २०-२० सामने ठेवावेत.
भरपूर होईल.

उरल्या वेळात रणजी, नाहीतर चक्क सराव करत रहावे.
उगाच आपला पैशाचा माज आलाय् म्हणून वाट्टेल ते करायचे! लोकहि नादान, हरण्या जिंकण्या पेक्षा सामन्यावर पैसे लावण्यात जास्त गम्य.

मला आशा आहे की याचा अतिरेक होऊन शेवटी क्रिकेट बंद पडेल. मग लोक जरा तरी इतर गोष्टींकडे लक्ष देतील.

सारखे सारखे सामने, नि त्यातहि जिंकायचे spirit नाही. म्हणजे शिकवण्या ऐवजी सतत परीक्षा. नि मग या परीक्षांमधे काही परीक्षांमधे नापास झाले तरी शेवटी सरासरी पुरेशी असली की झाले. शिकला काय? अभ्यासातले काही नाही, फक्त कॉपी करण्याच्या निरनिराळ्या युक्त्या.

चेन्नई सुपरकिंग्स संघाने चँपिअन्स लीग पण जिंकली. कुणी पाहात होत का ही स्पर्धा?
असो ऑस्ट्रेलियाविरुध्द युवीला वगळून चेतेश्वर पुजाराला संधी दिलीय. पहिली कसोटी कुठे आहे?

Pages