शेवळांच्या ४-५ जुड्या
काकड १ वाटा
कोणतही बिरड किंवा कडध्यान्य किंवा नॉन व्हेज हव असल्यास ओली किंवा सुकी कोलंबी
कांदे २ चिरुन
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट १ चमचा
कांदा खोबर वाटण २ चमचे
अर्ध्या लिंबाएवढा चिंचेचा कोळ
हिंग, हळद, मसाला, मिठ गरजे नुसार
फोडणीसाठी लसुण- ३-४ पाकळ्या
२ पळ्या तेल
गरम मसाला अर्धा चमचा
पहिला शेवळ साफ करुन घ्यायची (खाली साफ करण्याची पद्धत देते). ती चिरुन पाण्यात टाकुन उकळुन घ्यायची. पाणी काढुन टाकायचे. आता भांड्यात लसणाची फोडणी देउन कांदा गुलाबी रंगावर शिजवावा. आल, लसुण, मिरची कोथिंबिरची पेस्ट घालावी. हिंग, हळद, मसाला, घालून बिरड किंवा कडध्यान्य घालाव. त्यावर शेवळ घालावीत मग काकड ठेचुन त्याच्या बिया टाकुन गर घालावा. आता बिरड शिजवुन घ्याव. शिजला की चिंचेचा कोळ, गरम मसाला, मिठ, कांदा खोबर्याचे वाटण घालावे. व थोड्या वेळाने ढवळून गॅस बंद करावा.
ही शेवळ कोलंबीत जास्त छान लागतात.
व्हेज मध्ये हवा असल्यास थोडा गुळ घातला तरी चालेल. चिंच जास्त घालु नये कारण काकड आंबट असतात. ह्या शेवळांना खाज असते सुरणा सारखी ती जाण्यासाठी काकड घालतात.
कुरडूची भाजी - http://www.maayboli.com/node/9313
कंटोळी - http://www.maayboli.com/node/9329
टाकळा - http://www.maayboli.com/node/9351
भारंगी - http://www.maayboli.com/node/9381
कुलू - http://www.maayboli.com/node/9406
ही आहेत शेवळे. ही खालील
ही आहेत शेवळे.
ही खालील प्रमाणे साफ करावीत. वरील कव्हर काढून टाकावे. आत दांडी असते. त्या दांडीला खाली पिवड्या कलरचा दांड्याचा भाग असतो तो काढून वरील भाग चिरुन घ्यावा.
आहा हा माझ्या आवडिची भाजी!
आहा हा माझ्या आवडिची भाजी! आता येतील बाजारात शेवळ! ह्यात भिजवलेले शेंगदाणे हि छान लागतात.
जागू, तों.पा.सू. अगं काकड
जागू, तों.पा.सू.
अगं काकड नसतील तर कुठचा तरी पाला पण वापरतात.... कुठचा तो ?
जागू, मस्त आठवण करून दिलीस
जागू, मस्त आठवण करून दिलीस ह्या भाजीची!
ही माझी आवडती पावसाळी भाजी!! सुकट घालून तर अफाट लागते.
आई कडून तिची रेसिपी घेऊन लिहीते इथे.
काकडांचा फोटो राहीलाच. हा
काकडांचा फोटो राहीलाच. हा घ्या. ही काकड मिठात मुरवुन ठेवतात. वर्षभरही टिकतात. मुरवुन छान लागतात. ह्यावर पाणी प्यालल्यावर पाणी गोड लागत. मोरआवळ्याप्रमाणे.
थंड माझ्या माहीती प्रमाणे जर
थंड माझ्या माहीती प्रमाणे जर डाळीमध्ये शेवळ घातली तर त्यात शेंगदाणे घालतात.
असुदे मला माहित नाही कुठला पाला तुला माहित असेल तर टाक इथे. आंबट वेल म्हणुन एक वेल येते. ती आंबट असते. ती ही टाकतात आमटी मध्ये तिची रेसिपी उद्या टाकते. पण एवढ्या लवकर येत नाही बाजारात. मी मागच्या वर्षी फोटो काढुन ठेवले आहेत. ते उद्या टाकेन.
आंबट चुका टाकत असतील पाला
आंबट चुका टाकत असतील पाला म्हणजे.
आंबट चुका ? पांशा मोड ऑफ
आंबट चुका ? पांशा मोड ऑफ प्लीज्ज...
अरे खरंच असतात आंबट चुका.
अरे खरंच असतात आंबट चुका. अळूच्या भाजीत घालतात ऑक्झलेट्सची खाज जाण्यासाठी. आई नाहीतर मयुरीला विचार.
मला माहित्ताय गं.... तू आता
मला माहित्ताय गं....
तू आता मला सिरियसली घ्यायच्या चुका करु नकोस.
नाही ग अश्विनी ह्यात आंबट
नाही ग अश्विनी ह्यात आंबट चुखा नाही टाकत. त्याची भाजी करतात वेगळी. मला वाटत असुदे ने काहीतरी पिल्लु सोडलय पाल्याच.
जागू नाय गं, खरच... मी काढतो
जागू नाय गं, खरच... मी काढतो माहिती..
असुदे सॉरी ह. नक्की काढ
असुदे सॉरी ह. नक्की काढ माहीती.
जागू शेवळाच्या भाजीत सुकट /
जागू शेवळाच्या भाजीत सुकट / कोळंबी किंवा खिमा घालून केलेली भाजी आहाहा तोंडाला पाणी सुटलं. आताच्या आता जेवायला घाल बरं
अग ये खरच. आत्ताच जाउन घेते
अग ये खरच. आत्ताच जाउन घेते शेवळ.
अच्छा ही शेवळ होय...
अच्छा ही शेवळ होय... आत्तापर्यंत भाजीवाल्यांकडे पाहून 'काय कमळाची देठं पण सोडत नाहीत लोकं भाजीसाठी' असा विचार यायचा मनात..
मंजुडे, हाय कम्बख्त तूने तो
मंजुडे, हाय कम्बख्त तूने तो खायी ही नही......
बादवे कमळांच्या देठांचीही भाजी करतात हो लोक... सिंधी स्पेशॅलिटी आहे ती.....
जागू , भरलं पोट आमच्या
जागू , भरलं पोट आमच्या पुण्यात नाही मिळत गं मग काय अशीच भागवावी लागते तल्ल्फ
या भाज्या अगदी खास खास ना !
या भाज्या अगदी खास खास ना ! काकडे नाही मिळाली (असे सहसा होत नाही ) तर चिंच वापरतात.
पहिला पाऊस पडला कि आठवडाभरात येतात बाजारात ही. ही भाजी कापून सुकवूनही ठेवतात.
आमच्या घरी, यातली आतली पाने पण घेतात. (पांढरी असलेली.)
असे दिसणारे अनेक कोंब रानात या दिवसात असतात, पण जाणकार व्यक्तीच हे ओळखू शकतात. (असे कर्नाळ्याच्या फॉरेष्ट ऑफिसरने, ज्यावेळी आम्ही हे कोंब गोळा करत होतो, त्यावेळी सांगितले होते )
काकड फळांचे झाड बोरिवलीच्या नॅशनल पार्कात आहे.
जागू, आता आंबट चुक्याचा पण फोटो काढावा लागणार !!!
दिनेशदा हो मी ही ऐकलय की शेवळ
दिनेशदा हो मी ही ऐकलय की शेवळ सुकवुनही बारा महिने भाजी करता येते. आता रानभाजी आंबटवेलीचा टाकेन फोटो. आंबटचुका हल्ली कॉमन भाजी झाल्यासारखी वाटते. नेहमी बाजारात मिळते.
सोडे आणि तांदळाची कणी घालून
सोडे आणि तांदळाची कणी घालून ही भाजी मस्त होते. आईच्या हातची भाजी . केवढ्या त्या आठवणी.
आईला विचारली फोनवर तिची कृती.
आईला विचारली फोनवर तिची कृती. साधारण सेमच आहे.
सुरवातीला तेलावर थोडा कांदा, शेवळं आणि काकडं ठेचवून त्याचा रस असं तेलावर चांगलं परतून घ्यायचं . आणि मग कूकरला शिजवताना थोडी हळद व हिंग पण टाकायचे. मग परत भरपूर कांदा, आलं लसणीची पेस्ट हे तेलावर छानपैकी परतून घ्यायचं , त्यात शिजवलेली शेवळं, कोळवलेली चिंच/ कोकम आणि सोडे/सुकट/कोलंबी/खिमा ह्या पैकी जे आवडत असेल ते टाकायचं. मीठ, तिखट, गरम मसाला हे चवीप्रमाणे घालायचे.
कधीतरी बदल म्हणून तेलावर भाजलेल्या कांदा व सुक्या खोबर्याचे वाटणही चांगले लागते.
पन्ना,एवढंसगळंघातल्यावरशेवळाच
पन्ना,एवढंसगळंघातल्यावरशेवळाचीस्वतःचीचवकायलागणार?
अगं लागते.. ह्या भाजी ची
अगं लागते.. ह्या भाजी ची स्वतःची अशी एक वेगळी चव लक्षात येते.
आपल्याकडे रानभाज्या म्हणून एक
आपल्याकडे रानभाज्या म्हणून एक वेगळा बीबी होता.
केनी, कोरलं, मोहट्या, वाघाटी, काजूच्या बिरड्या, हादगा ....
अश्विनी अग शेवळांची वेगळी चव
अश्विनी अग शेवळांची वेगळी चव तर लागतेच पण आपण जे त्यात टाकतो त्याची चवही अजुन छान लागते.
पन्ना तुझी रेसिपिही छान आहे. मी पण कधी कधी कांदा खोबर्याचे वाटण नाही घालत.
दिनेशदा शोधतेच मी आता हा बिबि. कोरल आणि काजु सोडून माझ्यासाठी सगळ नवीन वाटतय.
ज्ञानात भर पडली... (भाज्याचा
ज्ञानात भर पडली... (भाज्याचा बाबतीत 'माठ'च आहोत. )
जागू, या भाज्यांचे फोटो
जागू, या भाज्यांचे फोटो मिळाले तर फारच छान.
केनी कुर्डू अशी जोडभाजी असते.
कोरलाची पाने आपट्याच्या पानासारखी पण कोवळी असतात. याची फुलपुडीसारखी पुडी बांधून आणतात.
मोहट्या म्हणजे मोहाची फळे. हिरवी असतात व आत पांढरी मोठी बी असते. ती उकडून भाजी करतात.
वाघाटीचा वेल असतो. त्याला छोटी लंबगोल फळे लागतात. कडू असतात, पण भाजी चवदार होते.
काजूच्या बिया उगवून आल्यावर त्याची भाजी करतात. अगस्तीची किंवा हादग्याची मोठी पांढरी किवा गुलबट रंगाची मांसल फूले असतात, त्याची भजी करतात.
मसाल्याची पाने पण आता मिळतील. हाताच्या पंज्याएवढी पाने असतात. अळुवडीप्रमाणे त्याची वडी करता येते.
टाकळा पण आता येईल.
पावसा बरोबर मला या भाज्यांच्या आठवणी येतात.
दिनेशदा मला कोरलाची भाजी
दिनेशदा मला कोरलाची भाजी माहीत आहे. ती आली की मी टाकतेच फोटो. मोहाची फळ आली माझ्या लक्शात त्याची भाजी माझी आजी मी लहान असताना करायची.
अजुन हादगा, मसाल्याची पाने नाही पाहीली तुम्हाला फोटो मिळाला तर नक्की टाका.
मी केली काल शेवळांची भाजी. पण
मी केली काल शेवळांची भाजी. पण खाज नव्हती गेली. तरी खाल्ली (हावरट दुसरं काय्..खरतर टाकायला जिवावर आलं होते). घसा आणी तोंड फुटलय सगळं
उकळली, काकड टाकली तरी असं का झालं?
Pages