शेवळांच्या ४-५ जुड्या
काकड १ वाटा
कोणतही बिरड किंवा कडध्यान्य किंवा नॉन व्हेज हव असल्यास ओली किंवा सुकी कोलंबी
कांदे २ चिरुन
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट १ चमचा
कांदा खोबर वाटण २ चमचे
अर्ध्या लिंबाएवढा चिंचेचा कोळ
हिंग, हळद, मसाला, मिठ गरजे नुसार
फोडणीसाठी लसुण- ३-४ पाकळ्या
२ पळ्या तेल
गरम मसाला अर्धा चमचा
पहिला शेवळ साफ करुन घ्यायची (खाली साफ करण्याची पद्धत देते). ती चिरुन पाण्यात टाकुन उकळुन घ्यायची. पाणी काढुन टाकायचे. आता भांड्यात लसणाची फोडणी देउन कांदा गुलाबी रंगावर शिजवावा. आल, लसुण, मिरची कोथिंबिरची पेस्ट घालावी. हिंग, हळद, मसाला, घालून बिरड किंवा कडध्यान्य घालाव. त्यावर शेवळ घालावीत मग काकड ठेचुन त्याच्या बिया टाकुन गर घालावा. आता बिरड शिजवुन घ्याव. शिजला की चिंचेचा कोळ, गरम मसाला, मिठ, कांदा खोबर्याचे वाटण घालावे. व थोड्या वेळाने ढवळून गॅस बंद करावा.
ही शेवळ कोलंबीत जास्त छान लागतात.
व्हेज मध्ये हवा असल्यास थोडा गुळ घातला तरी चालेल. चिंच जास्त घालु नये कारण काकड आंबट असतात. ह्या शेवळांना खाज असते सुरणा सारखी ती जाण्यासाठी काकड घालतात.
कुरडूची भाजी - http://www.maayboli.com/node/9313
कंटोळी - http://www.maayboli.com/node/9329
टाकळा - http://www.maayboli.com/node/9351
भारंगी - http://www.maayboli.com/node/9381
कुलू - http://www.maayboli.com/node/9406
निकिता, एखादी भाजी जास्त
निकिता, एखादी भाजी जास्त खाजरी असते. चिरतानाच ते जाणवते. अश्यावेळी चिंचेचे पाणी करुन त्यात हि भाजी अर्धा तास ठेवावी. मग धुवून परत एकदा वेग़ळ्या पाण्यात ठेवावी, मग शिजवावी.
निकिता कदाचित चिंच कमी पडली
निकिता कदाचित चिंच कमी पडली असेल. आणि शेवळ शिजवुन घेतल्यावर त्यातल पाणि काढल होत ना ?
अप्रतिम! पांढरे वाल घालून
अप्रतिम! पांढरे वाल घालून कालच केली होती.
केळफुलाची वडी करतो त्याप्रमाणे शेवळीची वडी पण मस्त चमचमीत होते.
मी आत्ताच जागूला लिहिले आहे.
मी आत्ताच जागूला लिहिले आहे. या भाजीचे फोटो पाहिजेत. साफ कशी करायची त्याचे पण फोटो हवेत.
वित्तंबुंगा मी तेच करणार आहे
वित्तंबुंगा मी तेच करणार आहे ह्यावर्षी ह्या सगळ्या रानभाज्यांचे वेगवेगळे पदार्थ करुन बघणार आहे.
दिनेशदा पहिल्या पानावर फोटो आहेत. अजुन हवेत तर उद्या टाकते परवाच मी आमटी केली होती शेवळांची.
जागूतै आज शेवंळ मिळाली
जागूतै आज शेवंळ मिळाली बाजारात आणलीत. पण काकड मला माहिती नाही कसे असते , वरचा फोटो दिसत नाहियै. आता काय करू?????????
पहिल्यांदाच करणार आहे.
@निकिता, आमच्याकडे शेवळे साफ
@निकिता, आमच्याकडे शेवळे साफ करून चिरण्यापूर्वी धुवून घेतात आणि मग अगदी बारीक चिरून तेलावर खूप वेळ गोळा होईपर्यंत चांगली परतून घेतात.असे परतल्याने खाज येत नाही असे सांगतात.शिवाय अशी परतलेली शेवळे पुढे शिजवताना त्यात काकडाच्या फळांचा रस घालून कुकर मध्ये शिजवतात. अलीकडील सुधारणा म्हणजे घरात शेवळे फूड-प्रोसेसरला लावतात. आणखी म्हणजे अशी चांगली परतलेली शेवळे डीप्-फ्रीझ करून ठेवतात,ती वर्षभर टिकतात आणि मोसम नसताना खाता येतात.
हीरा शेवळे सुकवुन पण ठेवतात
हीरा शेवळे सुकवुन पण ठेवतात वर्षभरासाठी. मी आता तुझ्या पद्धतीने पण करुन बघेन.
साक्षी शोधते काकडांचा फोटो.
परवाच खाल्ली, कोलंबी घालुन!!
परवाच खाल्ली, कोलंबी घालुन!!
>>मग अगदी बारीक चिरून तेलावर
>>मग अगदी बारीक चिरून तेलावर खूप वेळ गोळा होईपर्यंत चांगली परतून घेतात.असे परतल्याने खाज येत नाही असे सांगतात.>>
हे करुन बघायला हवे!
मुंबईत रानडे रोडवरच्या [दादर]
मुंबईत रानडे रोडवरच्या [दादर] भाजीवाल्यांकडे सध्या भरपूर शेवळे [ शेवरे] मिळतात. बरोबर कांकडं पण देतात. गेल्या पंधरावड्यात पांच वेळां घरी ही आवडती भाजी केली होती [ बायकोने ]. आणखी आठ एक दिवसात शेवळं गायब होतील.
शिजवण्यापूर्वी तेलावर चांगलं परतून घेणं मात्र आवश्यक. काजूचे तुकडे टाकूनही छान लागते ही भाजी.
जागूजी, पुन्हा एकदा सलाम !
पुण्यात मिळते का हि
पुण्यात मिळते का हि भाजी/
काकडं कशी दिसतात/
आत्ताच खाउन उठलोय शेवरं
आत्ताच खाउन उठलोय शेवरं
जागूची आठवणपण काढली.
भ्रमर भाऊ, बागुलबुवा
भ्रमर
भाऊ, बागुलबुवा धन्यवाद.
मीरा काकडांचा फोटो शोधुन टाकते.
जागू,तू खरंच सुगरण आहेस गं! ,
जागू,तू खरंच सुगरण आहेस गं! , तुझी रानभाज्यांवरील लेखमाला मी वाचली, त्या त्या भाज्यांचे फोटोही तू दिलेत. पण पुण्यात या भाज्या मिळत नाहीत.किंवा मिळत असतील तर अगदी एखाद्या ठिकाणी क्वचित मिळत असतील.मुंबईत या सर्व भाज्या सहज मिळत असणार.त्याबाबत तुम्ही मुंबईकर नशिबवान आहात.
शांकली धन्स. रानभाज्या आणि
शांकली धन्स. रानभाज्या आणि माश्यांसाठी खरच मुंबईकर नशिबवान आहेत ग.
हा आहे काकडांचा फोटो
शेवळांच्या ४-५ जुड्या काकड १
शेवळांच्या ४-५ जुड्या
काकड १ वाटाकांदे २ चिरुन
आल, लसुण,
कांदा खोबर वाटण (धने,लवन्ग,दालचिनी,मिरी)
२ पळ्या तेल
गरम मसाला अर्धा चमचा
पहिला शेवळ साफ करुन घ्यायची . ती चिरुन तेलात टाकुन परतून घ्यायची. आता भांड्यात थोड्या कांद्याची फोडणी देउन कांदा गुलाबी रंगावर शिजवावा. आल, लसुण,पेस्ट हवी असेल तर घालावी. त्यावर शेवळ घालावीत बरीच परतावी. थोडॅ पानी घालून शिजवावे.मग काकड चिरून रस काधावा.गालून रस घालावा. गरम मसाला, मीठ, कांदा खोबर्याचे वाटण घालावे. व थोड्या वेळाने ढवळून गॅस बंद करावा.
मुंबईत असताना काकडं वापरुनच
मुंबईत असताना काकडं वापरुनच शेवळाची भाजी करायची माहिती होती पण आता ईथे शेवळांबरोबर एक प्रकारचा पाला मिळतो,तो वापरला तरी चालतो, त्याचे नाव मात्र माहित नाही
अंशा आंबटवेल असते का ग? फोटो
अंशा आंबटवेल असते का ग? फोटो टाक मग समजेल.
आता शेवळ यायला काही दिवसांत सुरुवात होईल.
शेवळे मिळाली पाल्याबरोबर तर
शेवळे मिळाली पाल्याबरोबर तर नक्की टाकेन फोटो.
प्रकारचा पाला मिळतो,तो वापरला
प्रकारचा पाला मिळतो,तो वापरला तरी चालतो, त्याचे नाव मात्र माहित नाही >>>> त्याला नाण्याचा पाला म्हणतात.
मीरा काकडांचा फोटो शोधुन
मीरा काकडांचा फोटो शोधुन टाकते.
>>> जागू, हे तू कोणाला उद्देशून म्हटलंयस?
धन्स मामी.
धन्स मामी.
मामी साक्षीची चुकुन मिरा
मामी साक्षीची चुकुन मिरा झालेली दिसते. चुकून टाइपलय ग. साक्षी हव असेल.
त्याला रोहा सुधागड मध्ये
त्याला रोहा सुधागड मध्ये बोन्ड्श्याचा पाला म्हणतात.
त्यात जो पाला टाकतात त्याला
त्यात जो पाला टाकतात त्याला बोंडारा असं नाव आहे. आणि भाजी करण्या आगोदर सोपा उपाय म्हणजे जर उकळत्या पाण्यात शेवळ चिरून टाकली तर त्या पाण्याला तपकिरी रंग येतो ते पाणी फेकायचे आणि मग भाजी करायची म्हणजे खाज कमी होते.
शेवळाच्या भाजीचाही व्हिडिओ
शेवळाच्या भाजीचाही व्हिडिओ केला आहे. या पद्घतीनेही खुओ छान झाली होती शेवळ. नक्की पहा आणि सब्सक्राईबही करा. कारण सगळ्या रानभाज्यांचाही व्हिडिओ काढणार आहोत आम्ही. रेसिपीही मायबोलीवर देत जाईन.
https://youtu.be/mdmiKhKSkQA
Pages