Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हायला आरती धन्यवाद. अशी
हायला आरती धन्यवाद. अशी लावतात होय कोरफड ?
एरंडेल तेल सगळ्यांनाच सूट
एरंडेल तेल सगळ्यांनाच सूट होतं का पण? मी ऐकलंय की काही लोकांना सूट होत नाही म्हणून. सूट झाल्यास बरेच फायदे आहेत, जसं डोळ्यांना थंडावा, केसगळती पुर्ण बंद, कोंडा नाहीसा, केशवृद्धी, दाटपणा इ. तळपायाला ही मसाज करतात म्हणे...
दक्षिणा, सगळ्यांना सुट होते.
दक्षिणा,
सगळ्यांना सुट होते. तळपायाल मसाज केल्याने तर खुपच फायदा होतो. स्वताच्या हाताने मसाज केला तर हात पण एक्दम मौ छान होतात.
मी तर अगदी फॅन आहे 'एरंडेल' ची
इतर कुठल्याही सौंदर्य प्रसाधना ऐवजी हे वापरले तरी चालते.
१.डोळ्याखालची काळी वर्तुळे.
२.उष्ण्तेची मुरमे वगैरे
३.त्वचा कोरडी होणे.
४.पायाला भेगा
५.शांत झोप लागणे.
६.जागरणाने होणारी अॅसीडीटी ई.ई.ई.
बाकी तु लिहीले आहेच. सर्व मेडिकल मधे मिळते.
मनु मी तु दिलेला पॅक एकदा
मनु मी तु दिलेला पॅक एकदा लावलेला. तेव्हा मी साठवुन ठेवलेले दोन योक्स होते ते वापरले, त्यामुळे पॅक कमी पडला. पण तासभर वाळवुन धुतले आणि मग दुस-या दिवशी शांपु केले तेव्हा खुप मस्त मऊ वगैरे झाले.
गेल्या आठवड्यात मी मेंदी लाऊन केस नुसतेच धुतलेले.. आणि मग रात्री त्या केसांना दोन अंड्यांचा पॅक करुन लावला. रात्रीचे ११ वाजल्यामुळे शेवटी अर्ध्या तासातच धुतले. पण दुस-या दिवशी शांपु केल्यावर तो पहिल्या वेळेसारखा फिल नाही आला... एकतर मी अंडे पुर्ण न वाळवता धुतले त्यामुळे असेल किंवा केस अगदी स्वच्छ नव्हते. कोरडी मेंदी थोडीफार शिल्लक होती त्यामुळेही असेल..
आता परत मेंदीचे केस नुसतेच धुतलेत. उद्या तेल लावून शांपु करते आणि रविवारी पॅक लाऊन बघते...
मी बघते वापरुन एरंडेल आता.
मी बघते वापरुन एरंडेल आता. पायाला भेगा पडल्यात आणि एकदम काळ्याकाळ्या झाल्यात. घरात धुळ खुप येते म्हणुन घरातही स्लिपर्स ठेवते पायात. बाहेर जाताना मोजे वापरते. तरी पायाच्या भेगा काही मला सोडायचे नाव घेत नाहीत. क्रॅक लावले तर पायाला खाज सुटते, म्हणुन कैलास जीवन लावतेय सध्या पण काही फरक नाही. पाय आंघोळ करताना घासते. तरीही ...... आता एरंडेल लावुन बघते
बेबे तुझी विपु बघ.
बेबे तुझी विपु बघ.
beer and egg नावाचा एक शांपू
beer and egg नावाचा एक शांपू आहे.>>>> मुंबईत कुठे मिळतो?
माझ्या पुतणीचे केस खूप पातळ
माझ्या पुतणीचे केस खूप पातळ आहेत, त्यातनं हल्ली तिने केस वाढवायचं डोक्यात घेतलय. अगदीच पातळ दिसतात केस बांधल्यावर वैगरे. काही घरगुती उपाय? तिचं वय ८ वर्षे आहे. डोक्यात बर्यापैकी कोंडा पण झालाय. कोंड्यासाठी नारळाच्या दुधाचा उपाय करणार आहे, मला उपयोग झाला होता. पण सध्या थंडी अगदी भयानक ( १-२ सेलियस टेम्प) असल्यामूळे लगेच नाही करता येणार हा उपाय. दुसरा काही सध्या करता येण्याजोगा उपाय असेल तर सांगा प्लिज.
एरंडेल लावलच पाहिजे आता
एरंडेल लावलच पाहिजे आता डोक्याला. इथे मिळेल बहुदा इंडियत ग्रोसरी मधे.
थँक्स आरती.
डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांसाठी डोळ्याभोवती लावायच न तेल? कि डोक्यावर लावुन पण फरक पडतो?
अमृता, डोळ्याखालच्या काळ्या
अमृता, डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांसाठी ***ला चोळ तेल काय तू पण यडपटच आहेस. हो, डोळ्यांभोवतीच अगदी थेंबभर घेऊन हलक्या हाताने मसाज कर. देसी दुकानात उदबत्त्या, निरांजनी आणि रिन साबणावाल्या रॅकमधे मिळेल एरंडेल. साबण घेऊ नकोस, तेल घे.
सिंडे, आईशप्पथ लिहिताना मला
सिंडे, आईशप्पथ लिहिताना मला वाटलेलच कि असा रिप्लाय येइल म्हणुन.. तरी लिहिल.. खरच येडपट
खरच येडपट मी पण हेच विचारणार
खरच येडपट
मी पण हेच विचारणार होते की फक्त डोक्याला तेल लावल्याने एवढे फायदे होतात का (अगदी पायापर्यंत)?
डोक्याला तेल लावल्याने
डोक्याला तेल लावल्याने पायाच्या भेगा वगळता बहुतेक प्रॉब्लेम्स कमी होतात. (पायाच्या) भेगांसाठी मात्र पायालाच तेल लावा
सर्फिंग करताना हिमालयाची साईट
सर्फिंग करताना हिमालयाची साईट सापडली, त्यावरचे शाम्पु, कंडिशनर चांगले वाटले मला, कोणी वापरले आहेत का?
मी त्यांचा शँपू वापरला आहे.
मी त्यांचा शँपू वापरला आहे. चांगला आहे. आता कुठल्या प्रकारचा ते आठवत नाही पण एकंदरीत त्यांचे प्रोडक्ट चांगले वाटले.
धन्स स्वाती. मी सध्या
धन्स स्वाती.
मी सध्या शिकेकाई, रिठा असे एकत्र करुन ठेवले आहे, त्यानेच केस धुते माझे आणि लेकीचेपण, कधी तेल निघते तर कधी नाही, मग फार कसेतरीच दिसतात केस, लेकीने तर मला दम दिलाय(वय ११) गेल्या रविवारी, तुला वापरायचे तर वापर पण मलातरी शाम्पुच हवा आहे. आज हिमालयाचा आणुन बघते.
मी बदाम तेल, एरंडेल तेल आणि ऑलिव ऑईल एकत्र करुन ठेवते आणि तेच लावते, केस मस्त मऊ होतात. पण तरी माझे केस वाढतच नाहिएत.
मी पण हेच विचारणार होते की
मी पण हेच विचारणार होते की फक्त डोक्याला तेल लावल्याने एवढे फायदे होतात का >>
फक्त पायाला लावल्याने जास्त फायदे होतात. डोक्याला लावल्याने, डोळे आणि केस दोनच गोष्टींना फायदा होतो. अर्थात उष्ण्ता कमी होतेच कुठेही (?) लावले तरी.
वर्षा, केस वाढण्यात जेनेटिक
वर्षा, केस वाढण्यात जेनेटिक फॅक्टर पण असतो गं.. तुझ्या आईचे, मावशीचे वगैरे बघ कसे आहेत ते. तुझेही थोड्याफार फरकाने तसेच असणार.
माझ्या आईकडच्या बाजुला केसांचे वरदान होते. पण तरीही माझे केस वाढत नाहीत अशी माझी तक्रार असायची कायम. वाढीचा वेग अतिशय कमी होता. आता लक्षात येतेय की त्या काळात मला केसांकडे लक्ष द्यायला वेळच नसे. दिवसातुन एकदाच केस विंचरायला मिळत, तेही ऑफिसात आल्यावर, घरी नुसते गुंडाळून, सुट्टीच्या दिवशी नो कोमिंग.... तेलपाणीही नियमीत होत नसे, कधी लक्षात आले तर केले, नाहितर नाही. कधी शिकेकाई वगैरे आणून निगा राखायचे पण ते तेवढ्यापुरते. परत कामांच्या रेट्यात दुर्लक्ष व्हायचे. शिवाय इतर शारिरीक, मानसिक असे प्रश्न भरपुर होते.
पण आता लक्ष द्यायला वेळ मिळतोय, त्यामुळे केसांच्या निगराणीत सातत्य आलेय, आहार सुधारलाय, नियमीत झालाय आणि त्याचा परिणाम म्हणुन केसही व्यवस्थित नीट वाढताहेत.
साधना, माझ्या आईचे केस खुप
साधना, माझ्या आईचे केस खुप कुरळे आहेत तर दोन्ही मावशींचे सरळ. माझ्या वडिलांचे केस सरळ पण पातळ आहेत, माझे केसही तसेच झालेत. माझे केस नेहमी पाठीपर्यंतच असत तेही १०वी नंतर. कारण मी शाळेत असताना, आईला ऑफिसला जायला उशीर व्हायचा म्हणुन ती माझे केस कधी वाढवायचीच नाहि, पण माझे केस खुप मऊ आणि चमकदार होते. बहुतेक पुण्याच्या पाण्याचा परिणाम असेल मी जुलै मधे केस कापले होते , तेव्हापासुन म्हणावे तसे वाढलेच नाहित, अत्ता माझे केस खांद्यापर्यंतच वाढलेत. शांम्पुने केस जातात म्हणुन ईथले वाचुन शिकेकाई वगैरे आणले, पण काहि उपयोग होत नाही.
शारिरिक, मानसिक त्रास तर खुप आहेत ग, पंधरा दिवसांपासुन माझे बि.पी. कधी लो तर कधी हाय असे होत आहे, औषधे चालु आहेत, थॉयरॉईडची टेस्ट्पण करुन झाली, ती नॉर्मल आली आहे, डॉक्टरला केसांचे पण सांगितले तर तीने multi vitamin च्या गोळ्या दिल्यात बघुया त्याने काही फरक पडतो का.
पण माझ्या लेकीचे केस माझ्यापेक्षा जाड आहेत, सरळ आहेत पण रुक्ष. तीचे पण केस हल्लीच वाढवायला सुरवात केलिय. माझ्या केसांकडे बघुन माझा नवरा म्हणतो, तुझ्यापेक्षा लेकीचेच केस मोठे आहेत.
दाजीबा | 23 January, 2010 -
दाजीबा | 23 January, 2010 - 11:45
रिठ शिकाकाई आणा अन ठेचुन भिजवा आन तेवड्याच पैश्यात वरीसभर डोस्क धुवा.
मैने वापरा. मेरुकु फैदा हूवा. तुमबी वापरके देखो.
एरंडेल तेल खूप थंड असते.
एरंडेल तेल खूप थंड असते. तेव्हा ज्यांना सर्दी आहे मूळात आहे त्यांनी जपून लावावे.
आरती धन्यवाद गं. मी कधी आणले
आरती धन्यवाद गं.
मी कधी आणले नाहि. माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये ऐकले होते की ड्यु डेट जवळ आली की रोज एक चमचा जर हे तेल पिले तर बाळंत लवकर होते म्हणुन. (old wives tales). पण माझे धैर्य झाले नाही आणि c-section झाले. असो खुप विषयांतर झाले.
मनुस्विनी,तु सांगितलेल्या
मनुस्विनी,तु सांगितलेल्या पॅकमध्ये रोझमेरी पूड वापरयची का? मी आणलीय ती रोझमेरी पूड नाहिये.छोट्या काड्या आहेत.
रोझमेरीनी काय होते? मागे
रोझमेरीनी काय होते? मागे अज्जुका पण लिहिली तशी.
एरंडेल तेलाला वास येत नाही
एरंडेल तेलाला वास येत नाही का?. मला तर वास आला तरी पोटात मळमळायला होत.
लहानपणी आईने खूपदा घ्यायला
लहानपणी आईने खूपदा घ्यायला लावलय का भाई??
घरी एरंडेल आहे अस आजच नवर्याने सांगितल. कधीतरी घ्याव म्हणुन कधीतरी आणलेल.
आता आजपासुन डोक्यावर आणि डोळ्यांवर प्रयोग करते.
रोहिणी, रोजमेरीवर मी एक लिंक
रोहिणी, रोजमेरीवर मी एक लिंक दिलीय बघ. त्या काड्या म्हणजे त्याची वाळलेली पाने आहेत. ती खलबत्यात घालुन कुट. कुटतानाच एक मस्त वास सुटतो. आणि मग केसांना लावतानाही खुप छान वास येतो.
ह्या वेळी पॅक करताना मी रोजमेरीही वापरली नाही, रात्र खुप झालेली म्हणुन कुटायचा कंटाळा केला
(कुठल्याही कृतीतला एकेक पदार्थ गाळायचा आपल्या सोयीप्रमाणे आणि मग मुळ पदार्थाबरहुकूम चव्/रंग्/परिणाम आला नाही म्हणुन रडायचे ही माझी जुनीच खोड आहे )
माझा स्वानुभव असा आहे की
माझा स्वानुभव असा आहे की पावडरी खूप बारीक केल्यात की त्यांचा केसांना कमी फायदा होतो. जाड.. भरड पावडरीच जास्त उत्तम.
साधना धन्यवाद. मी काल तशीच
साधना धन्यवाद.
मी काल तशीच रोझमेरी वापरली न कुटता
आता पुन्हा लाऊन बघेन.
इथली एरंडेल तेलाची चर्चा
इथली एरंडेल तेलाची चर्चा वाचुन , दुकानातुन कॅस्टर ऑईलची डबी आणली , फक्त ३ दिवस झालेत दररोज रात्री डोक्याला लावतोय , माझे केस गळणे बंद झालयं .
धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहीतीसाठी .
http://www.amazon.com/Hollywood-Beauty-Castor-Oil-Mink/dp/B0010KR098
Pages