केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्च धन्स गं....

माझे केस पातळ आहेत पण कमरेपर्यंत आहेत, साधारण पाव किलो मेंदी भिजवते एका वेळेस, दोन कप पाणी लागते. त्याला वरचे प्रमाण पुरेल ना? की कॉफी पावडर वाढवु थोडी?? आणि पाणी पुर्ण थंड झाल्यावर मेंदी भिजवायची ना त्यात??

अंजली, इंस्टंट कॉफी. जी पाण्यात विरघळते ती.

साधना, हो वाढवली तर चालेल. पाणी पूर्ण थंड करायला पाहिजे अस नाही.

बीटाचे पाणी कसे करायचे? मिक्सरमधुन?? पण आयडिया चांगली वाटतेय..

माझे ते मेंदीचे लालमलाल केस बघुन कंटाळा आलाय, काहितरी नविन करावेसे वाटतेय, पण ते हेअर कलर वगैरे नकोसे वाटते, उगाच एक करता दोन होईल आणि काय थोडेफार केस संभाळलेय त्यांची वाट लागायची......

कृष्णकुंतल नावाचं एक आयुर्वेदिय तेल मिळतं. या तेलाचा वास भयंकर आहे, पण हे तेल नियमितपणे लावल्याने अनेकांना खूप फायदा झाला आहे. Chemotherapyमुळे केस गेलेल्या काही रुग्णांनाही यामुळे फायदा झाला आहे.

या तेलातील औषधांचा थर बाटलीत खाली बसतो. हे औषध जखमांना, व्रणांना लावल्याने त्या बर्‍या होतात.

पुण्यात प्रभात चित्रपटगृहासमोर असलेल्या एका आयुर्वेदिय औषधांच्या दुकानात हे तेल मिळतं.

मी पुन्हा एकदा सांगतो की कापडचुरा, नागरमोथा, आवळाकंठी, रिठा, शिकेकाई हे सर्व भरडं कुटुंन ती पावडर लावावी. तेल निघतं रिठा असल्यामुळे. बाकी घटकांमुळे केसांच पोत तलम मुलायम राहतं. फक्त एकच की रात्रभर ही पावडर लागेल त्यावेळी भिजवून ठेवायची नि एक उकळी आणून मग गार होऊ द्यायची. असे केले के पावडरीचा पुर्ण अर्क केसांना मिळतो.

मी मेंदी बिटच्या पाण्यातच भिजवते.
मी बिट किसून लागेल तेवढे किंवा अंदाजाने पाण्यात टाकते. ( मिक्सरमधून कधी केले नाही )आणि नंतर गाळून त्या पाण्यात मेंदी भिजवते. मेंदी लावून दोन तासाने धुऊन सुकल्यावर मस्त तेल लावून ठेवते. दुसर्‍या दिवशी केस धुतल्यानंतर केस ईतके सुंदर दिसतात की बस. ऊन्हात तर त्या केसांचा रंग ( म्हणजे बीटचा रंग ) मस्तच वाटतो. मला याचा फार सुंदर अनुभव आहे.

घरासमोर चिक्कार ब्राह्मी पसरलेय. केसासाठी चांगली असते असे म्हणतात. पण ती लावायची कशी?

(आणि हो, समोरच्याच्या घरात आवळ्याच्या झाडाला आवळेच आवळे आहेत ते पण कसे लावू??)

आवळा खाल्ला रोज एक तर जास्त परिणामकारी होइल. नाहीतर मग बिया काढुन सुकवुन पुड करुन शिकेकाइत किंवा हेअर पॅक मध्ये टाकता येइल. हा टिकाउ उपाय. नाहीतर झाडावरचा आवळा घेउन रस काढुन पॅक मध्ये मिसळुन लावता येइल.

ब्राह्मी ही पोटातही घेता येते. शंखपुष्पी, ब्राम्ही व अजुन एक पुड आहे आत्ता आठवत नाही. ती ठरावीक प्रमाणानुसार मिक्स करुन रोज पुड खाल्ली तर मेमरी साठी चांगली. केसांसाठी लावताना त्याचे तेल करुन लावावी.

साधना, कापडकचुरा .. मी मधे क अक्षर गाळले वर.

कोरफडीचा प्रयोग मीही करुन पाहिला आहे पण काही फायदा होत नाही. शिवाय तो प्रयोग नियमित करुन पाहणे शक्य होत नाही. त्यापेक्षा वरची पावडर केंव्हाही उत्तम. आई माझी, शेतातली चिकण माती लावते. तो प्रयोग मी येत्या भारत भेटीत करणार आहे.

बीट वीट.. काहीही हं!!!!

बी, मी काल दादरला गेले होते तेव्हा शिकेकाई, रिठा आणि अजुन काही घटक असलेली पावडर विकत आणलीय. आज केस शांपुनेच धुतले कारण भरपुर तेल चोपडलेले म्हणुन... पुढच्या वेळेस वापरुन पाहते.

नंदिनी, लोणचे कर गं आवळ्याचे.. इतके सुंदर लागते की बाकीची लोणची फिकी पडतात त्यापुढे.
माझ्याकडे एका वैद्याने लिहिलेले 'महाऔषधी आवळा' पुस्तक होते. त्यात म्हटले होते की चैत्र सुरू झाल्याशिवाय आवळा तोडू/खाऊ नये. चैत्रात आवळ्यातले औषधी गुणधर्म पुर्णपणे तयार होतात आणि अशावेळी खाल्लेला आवळा सगळ्यात चांगले परिणाम देतो.

नक्किच टिकून राहतो. आपण ज्याप्रमाणे मेंदी लावली की ती काही एकदा धुतल्याने त्याचा रंग लगेच निघून नाही जात ना त्याचप्रमाणे.
मी आमच्यायेथील पार्लरमधून मेंदी घेते , त्यांनीच मला सांगितलेले की बीटच्या पाण्यात भिजव.
बीटमध्ये भिजवलेल्या मेंदिचा effect हा उन्हातच कळून येतो.

बरेच लोक जास्वंदाचे तेल लावतात केस वाढण्यासाठी. पण त्या ऐवजी, तेलात ताजी जास्वंदाची फुले गरम करुन , मग ते तेल कोमट करुन लावले तर जास्त फायदा होतो. ताजी फुले नसतिल तर सुकलेली पण चालतात. किंवा ज्या दिवशी झाडाला फुल आले त्याच दिवशी तेल तयार करुन ठेवले आणि नंतर लावले तरी चालते.
असे केल्यास कंडिशनर ची आवश्यकता भासणार नाही. केस एकदम मऊ - मुलायम - चमकदार होतात.
कोमट तेलाने थोडाफार कोंडा असेल तर तो पणा निघुन जातो.

जस्वंदाचे एक झाड कुंडीत लावणे सहज शक्य असते. Happy

साधना मेहन्दी सोबत मन्डुर पावडर मिक्स कर केस नक्कि काळे होतिल मन्डुर तुला मेहन्दी ज्या दुकानतुन घेते तेथे मिळेल

आरती, मी घरातली जास्वंदी काढून टाकायच्या विचारात आहे. किमान पंधरा झाडे आहेत आमच्याकडे. कुणाला हवी असल्यास सांगा.
साधना, आवळ्याचे लोणचे मोरावळा इत्यादि सर्व प्रकार करून झाले. पण केसांसाठी कसा वापरू ते समजत नव्हतं.

साधना, आवळ्याचे लोणचे मोरावळा इत्यादि सर्व प्रकार करून झाले.

मग पाठव ना थोडे इकडे... Happy

अनु, मी मंडुर पण आणलीय. आताच नुपुर मेंदी भिजवुन ठेवलीय कॉफीच्या पाण्यात. अंदाज थोडा चुकला पाण्याचा, अर्धा कप साधे पाणी ओतले मग. Happy उद्या घालेन डोक्यात.

इन्डीगो पावडर पण घेतलीय, पण आज फक्त मंडुर मिक्स केली. उगाच सगळे प्रयोग एकदम नकोत Wink

आरती त्या एरंडेल तेलाबद्दल धन्यवाद गं.
मी आता त्याची पंखी झाली आहे. आमच्या इकडच्या फार्मसी मधुन एक बाटली आणले अगदी छोटी आहे ती. आता माझा वापर बघुन वाटते की होलसेलमध्येच आणावे की काय. मी ते ओठांना सुध्दा लावत आहे. Happy

शिकेकाई, रिठा आणि अजुन काही घटक असलेली पावडर विकत आणलीय>>> मीही आणलीय अशी पावडर पण त्याने केसांचे तेलच निघत नाही. आता ती पावडर सा.बा वापरतात.
मी एरंडेल तेल, बदाम तेल, ऑलिव ऑईल, खोबरेल तेल एकत्र करुन लावते. सध्या मी हिमालया कंपनीचा शांपु आणला आहे, माझे आणि लेकीचे केस थोडे गळतायेत (कदाचित शांपु बदलला म्हणुन असेल.) पण मस्त मऊ झालेत.

शिकेकाई, रिठा आणि अजुन काही घटक असलेली पावडर विकत आणलीय>>> मीही आणलीय अशी पावडर पण त्याने केसांचे तेलच निघत नाही. आता ती पावडर सा.बा वापरतात.
>>> तयार पावडरीपेक्षा हे घटक वेगळे आणून एक्त्र दळुन आणावे किंवा वेगवेगळे दळुन आणावे आणि हवे तसे एकत्र करुन वापरावे.शिकेकाईने केसांचा पोत सुधारतो (पण काहीवेळा कोंडाही होतो.)रिठयांनी भरपुर फेस होवुन केसांचे तेल निघते, केसांना चमक येते पण नुसत्याच रिठ्यांनी केस कोरडे होतात.आई जे मिश्रण बनवायची ते अस होत शिकेकाई, रिठे, संत्रा/लिंबाच्या वाळवलेले साल आणि शिकेकाई मसाला(बाजारात तयार मिळतो).

जेव्हा भरपूर तेल लावायचे तेव्हा शांपू करायचा आणि वरून कंडीशनर. हे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा. एरवी तेल न लावता शिकेकाई आणि मिश्रणाने धुवायचे केस व त्यावर जास्वंद जेल लावून धुवून टाकायचे. उपयोग होतो.
मी सध्या लोटसचा शांपू आणलाय मैत्रिणीच्या सांगण्यावरून आणि तो अजून तरी बरा वाटतोय.

पण कायम एकच शांपू वापरत राहू नये. एक बाटली संपली की दुसर्‍या प्रकारची आणावी मग परत पहिल्या. असं म्हणतात.

Pages