केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे बरीच माहिती जमा झालीये पण शोधायला अवघड जातेय. केसांचे आरोग्य ग्रूपमधे शिकेकाई, तेलं/मसाज, कंडिशनिंग, केस रंगवणे असे वेगवेगळे धागे केले तर ?

स्त्रियांनो, भारतात Organic shampoo मिळतात का? ते चांगले असतात. तसेच भरतात 'अमोनिया' नसलेले डाय/केसांचे रंग मिळतात का? ते वापरु शकतो म्हणे, म्हणजे अपायकारक नाहीत.

सिं. कल्पना छान. म्हणजे इथले कॉपी करुन तिथे पुन्हा लावायचे आहे का आधी?

सुनिधी,

अगदी Organic की ते माहीती नाही पण फॅब इंडीयामध्ये त्यासारखे काहीतरी पाहील्याचे आठवतेय.
स्वामी रामदेवांची दिव्य योग संस्था आहे ना त्यांचे शँपू मला कमीत कमी केमीकल्स वाले वाटले. तसेच खडीवल्या वेद्यांकडुन शँपू आणला होता तो पण बाहेरच्या प्रोडक्टस पे़क्षा चांगला वाटला केसांसाठी

आर्च Happy
मी फार्मसीतुन (छोटीच मिळाली)बाट्ली आणली, रात्री हाताला (म्हणजे हाताच्या कोपर्‍यापर्यंत) लावते. तेल पातळ नसल्यामुळे थोडा मसाज करावा लागतो. ओठांना, डोळ्याला तसेच फासते (मसाज नकरता). हे सगळे रात्री झोपायच्या आधी. केसांना या विकेंड्मध्ये लावेन.
आता एकदा संपुर्ण तोंडला फासायचा विचार आहे. पण ती बाटली जर सॅम्समध्ये मिळाली तर पुर्ण शरिराला लावायचा विचार आहे Proud
घरात भरपुर बेडशिट्स आहेत त्यामुळे रोज एक बदलीन(वासासाठी). Proud

मी फासलं काल तोंडाला. वाटल, जर डोळ्याभोवतीची वर्तुळ जात असली तर स्कीनपण तजेलदार होत असावं. माझ्या तेलाला अजिबात वास येत नाही. चिकट वाटतं म्हणून अर्धा तासाने धुवून टाकलं. म्हटल केस दाट होतात आणि काळे होतात तर तोंडावर केस येतील की काय? विचार आला मनात आणि ताबडतोब धुवून टाकलं. Proud

आर्च अगदी मलापण हिच शंका आली. Proud
अगं माझ्यापण तेलाला वास नाही येत. पण ते जनरली तेलाचा वास येतो ना नंतर मेंचट म्हणुन म्हटले गं. Proud

आर्च Lol माझ्याही मनात असच आलेल. कुणीतरी वर लिहिलय पण कि भुवया दाट करायला लावायचे म्हणुन.
मी कल केसांना थापलय आणि डोळ्यांभोवती पण लावल. आज लेकिच्या केसांना थापेन म्हणत्ये. आई मसाज करत्ये म्हंटल्यावर अगदी एका पायावर तयार होते ती.

मायबोलीवर सगळ्या बायांना दाढी मिशा येणार आता.....

दाढी मिशा नाही तर पुर्ण चेहरा केसांने भरणार.....

(माझ्या डोळ्याखाली अजुन काळी वर्तुळे उमटली नाहीयेत, सो मला गरज नाहीये अजुन...:) )

१. डोळ्यांना थंडाव्यासाठी आणि
२. शांत झोपेसाठी..
एरंडेल कसे वापरावे?

आर्च, मी कॉफी पावडर्मध्ये भिजवुन मेंदी लावली, फरक आहे. अजुन दोनतिनदा लावल्यावर खुप फरक दिसेल असे वाटते... कळवते नंतर Happy

'साधना'
डोळ्यांच्या थंडाव्यासाठी आणि शांत झोपेसाठी मि 'आय टोन' नावचे ड्रॉप्स वापरते (आयुर्वेदिक आहे). ड्रॉप्स घातल्यावर थोड चुरचुरत. पण मग झोप कधि लागते ते कळतच नाहि.
======
मि सध्या 'सेसा' नावाच ऑइल आणल आहे. मस्तच होतात केस त्याने. एकदम सॉफ्ट. मि फक्त एक केलय त्या बाटलितच दोन चमचे एरंडेल ऑइल घातल आहे. हे मि शनिवारी रात्रि लावते. रविवारि सकाळि उठ्ल्यावर जास्वंद जेल लावते. आणि थोड्या वेळाने डव्ह ने धुते. कंडिशनर हि लावते पण एकदम थोडा आणि अगदि केसांच्या टोकांना.
विडेज मध्ये दोनदा केस धुते. रात्रि 'प्याराशुट हेअर रिपेयर' लावते. बाकि सेम प्रोसिजर. गेले तिन चार महिने हेच कर्ते आहे. छान झाले आहेत केस.

नारळाचे दूध लावले.लगेचच फरक जाणवला.दर आठवड्याला केसांना लावले तर चालेल का ? मस्त मऊ केस होतात.गळायचे प्रमाण कमी जाणवले.

हो चालेल. पण लिंबू मात्र दोनतीन महिन्यातून एकदा किंवा अति कोंडा झाला असेल तरच लावायचे.

एरंडेल तेल आणि खोबरेल तेल - Best Combination - Best Results! धन्यवाद! मला आणि माझ्या मुलीला फायदा होतो आहे असे वाटते. फक्त शाम्पू जास्त वेळा करावे लागते but that's fine!

शांपू दरवेळेला जास्त करू नकोस. एखाद्या वेळेला थोडे तेलकट राह्यले तरी राहूदेत. केस बांधल्यावर त्याने फार फरक पडत नाही. Happy

मी मागच्या तीन चार खेपेला शिककाई ने न्हायली, केस छान झाले आहेत. कंडीशनर लावला नाही..
काल परवा शिककाई भिजत घालतांना मेथी चे दाणे टाकले.. त्यानेही थोडा फरक् पडला.

मि इथे नविन आहे.
please मला केस गळणे थानबण्यासाथि उपाय सान्गा, आणि केस दाट होण्यासाथि सुदधा.

माझे केस एरंडेल तेल लावुन धुताना वाटत कि तेल जातच नाहि. मग जास्त शांपु लावला जातो. मग केस कोरडे. काय कराव केस कोरडे न होण्या साठी.

स्विटुपाय, ह्या अकरा पानांपैकी शेवटची ३-४ पाने वाचुन काढ.. गळण्यावरच्याच उपायांनी भरलीत.... Happy

आशुडे,
ते ज्यांचे मुळात कोरडे असतात त्यांच्यासाठी. त्वचा अजून कोरडी पडणे, केस तुटणे इत्यादी.
पण दही काय आणि लिंबू काय तेलकट केसातला कोंडा असेल तर तो जाण्यासाठी उत्तम उपयोग होतो.

thanks मि वाचल. पण थोडि confuse आहे. एरन्डेल तेल तर मी आता विकत घेणारच आहे, पण त्यात बदामाच तेल mix केल तर चालेल का? आणि केस दाट होण्यासाथि काय करु?

आता माझं उत्तर अगदी 'फारफेच्ड' वाटेल, पण माझा स्वतःचा आणि माझ्या मुलीचा अनुभव असा आहे की आपले आरोग्य सुधारले की आपोआप केसांचा पोत सुधारतो, दाट होतात, भराभरा वाढतात.

मुलीला ह्या वेळेला भेटले तर ती, 'आई, माझे केस खुप भरभर वाढताहेत गं, आता काय करू? दोनदा कापुन झाले' म्हणुन तक्रार करत होती. मी यावर फक्त हसले कारण आठदहा महिन्यांपुर्वी 'केस उगीचच कापले, आता वाढतच नाहीत' ही तक्रार होती.

तर स्विटू, तेल आण आणि सुरवात कर. हळूहळू फरक जाणवेल तुला. इथले वाचुन मला वाटते मिक्स केले तरी चालेल. फक्त बाटलीत मिक्स करुन न ठेवता जेव्हा लावशील तेव्हा मिक्स करुन घे.

<आता माझं उत्तर अगदी 'फारफेच्ड' वाटेल, पण माझा स्वतःचा आणि माझ्या मुलीचा अनुभव असा आहे की आपले आरोग्य सुधारले की आपोआप केसांचा पोत सुधारतो, दाट होतात, भराभरा वाढतात. >
अगदि अगदि
माणसाच आरोग्य त्याच्या केसावरुन ओळखता येते अस म्हणतात ते उगिच नाहि.

Pages