केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फायद्या पेक्षा तोटे अधिक! केस गळतात, पातळ होतात. आणि बहुतेक ते straightning जास्त दिवस टिकत नाही. पण दुष्परिणाम मात्र खूप टिकतात!

Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

काही लोक आपण कपड्यांवर इस्त्री फिरवतो, तशी केसांवर फिरवतात (म्हणे) आणि त्यानीसुद्धा केस straighten होतात.
पण मी म्हणतो हे असे केसांपायी डोके गरम करणे ठीक आहे का ? Happy
आणि बाकीच्यांचं काय? त्यांच्या तर टक्कला वरून इस्त्री फिरवावी लागेल.... आणि ती त्यांच्या डोक्यात जाईल... quite literally!
No pun intended Happy

Flat Iron कधी तरी वापरल्यानी काही लगेच केस गळायला सुरवात नाही होत !:)
पार्टी hair styling साठी वगैरे छान effect येतो !
फक्त ज्यांचे केस पातळ आहेत किंवा मोठ्ठ डोकं असेल तर flat iron effect अजिबात चांगला दिसत नाही Proud

डिजे, permanent hair straightening बद्दल काहितरी सांग ना...

सरळ केलेले केस सुरवातीला खुपच छान दिसतात, पण केस वाढले की ते नविन केस आणि जुने सरळ केलेले केस ह्यांचा एकुण लुक भयानक दिसतो. सुरवातीची चकाकी पण काही दिवसातच नाहिशी होते.

एकुणच हा केस कायमचे सरळ करण्याचा प्रकार भयानक आहे.

थोड्या दिवसा साठी केल्यास ठिक ( सरळ करुन घेतल्यावर, केस धुवेपर्यंत ते तसेच राहतात, धुतल्यावर परत आधीसारखेच होतात), पार्टीसाठी वगैरे छान लुक येतो. पण कायमचे सरळ करण्याच्या वाटेला कोणि जावु नये असे मला वाटते.

साधना

दिपांजली, तुझे पुण्याला पार्लर आहे का ग?

गेल्या आठवड्यात मी पण केसांवरुन इस्त्री फिरवली होती म्हणजे माझ्या पार्लरवालीने जबरदस्ती फिरवली. माझ्या लेकीचा वाढदिवस होता म्हणुन छोटिशी पार्टी होती, चांगले दिसेल म्हणुन मी पण तयार झाले. त्या दिवशी ते खुप छान वाटले पण आता केस खुपच गळतायत. आधिच माझे केस खुप पातळ आहेत या तर्‍हेने केस गळत राहिले तर माझे काही खरे नाहि. काहितरी उपाय सुचवाल का?

केस जाड व्हावेत यासाठी काय करावे? रोज तेल लावायला प्लीज सांगू नका आईसारखे! रोज ऑफिसला तेल लावून येणे शक्य नाही. केसांचा शॉर्ट लेअर कट आहे खांद्यापर्यंत.
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

मी मुंबईमधे लॅक्मेच्या पार्लर मधनं केस सरळ करून घेतले होते. दीड वर्षापूर्वी, सहा तास अन पाच हजार रुपये. शिवाय फारसं न हलता एका जागी बसावं लागतं ही मोठीच शिक्षा. म्हणजे तेव्हड्या वेळात मॅनि, पेडि पण करू देत नाहीत. सरळ केल्या नंतर काही फारसे गळले वगैरे नाहीत. त्या आधी मी फ्लॅट आयर्न घरी वापरत होते. साधारण दोन महिने पर्यंत रूट्स कुरळे असलेले जाणवत नाही. त्यानंतर मात्र परत फ्लॅट आयर्न वापरावी लागली.
एकदा सरळ केल्यावर जर पोनी, वेण्या किंवा क्लिपा वगैरे केल्यास केसांवर त्याचा मार्क राहतो. केसांना मेंदी लावलेली असेल तर लॅक्मे वाले पर्मनंट सरळ करत नाहीत. डाय असला तर चालतो म्हणे.आठवड्यातून एकदा तरी वीस्-पंचवीस मिनिटे कंडीशनर लावून ठेवावा असं ही त्या बाईने सांगितलं होतं. ते काही माझ्याच्याने जमलं नाही Happy

चि वाल्यांचं एक शायनिंग क्रीम आहे ते जरासं लावलं की केस छान तजेलदार दिसतात.

शोनू, माझा लॅक्मे पार्लरबद्दलचा अनुभव जाम वाईट होता. लेयर कट च्या ऐवजी त्या बयेने माझे केस चक्क वेडेवाकडे कापले आणि वर इतके सही ब्लो ड्राय मारला की मला घरी येऊन हेअर वॉश घेतल्यावरच भानगड समजली... ( मी तिथे जाऊन भांडून पैसे रीफंड करून घेतले. पण केसाचे काय? ते वाढेपर्यंत काहीही कट करत येणार नाही.)

मंजु. पर्मनंट hair straightening च्या फंदात पडू नकोस. त्यापेक्षा फ्लॅट आयर्न मारणे चांगले. माझ्य हॉस्टेलमधली एक मुलगी केसांवर (कपड्याची) इस्त्री फिरवून देते. पण एवीतेवी माझे केस गळत असल्याने मी त्या प्रकराकडे गेलेली नाहिये.

आशू, केस जाड होण्यासाठी आदल्या रात्री तेल लाव. व्यवस्थित मसाज कर आणि केसाना वाफ दे. दुसर्‍या दिवशी शांपू आणि कंडिशनर लावून धुवून टाक. शक्यतो ड्रायर मारू नकोस.

केस सिल्की करायचे असतील तर माझा फॉर्मुला.. केस बीअरने धुवावेत. सही शाईन येते.

--------------
नंदिनी
--------------

नंदिनी
ते इरॉस च्या जवळचं लॅक्मे आहे तिथे मी कधी जात नव्हते. पण आता गजालीच्या जवळ अन जुहुला रमेश देव- सीमा देव यांच्या घराच्या जवळ ज्या शाखा आहेत त्या चांगल्या आहेत असं माझ्या बहिणिने अन मैत्रिणी ने सांगितलं होतं म्हणून मी जायचा धीर केला. पूर्ण सहा तासात एक ही सेलेब्रिटी कोणी दिसली नाही Happy
इरॉस जवळच्या लॅक्मे मधे असं झालं तर दुकान बंद करावं लागेल !

मी केस धुवायच्या आधी १/२ किंवा १ तास, केसांच्या मुळांना तेल लावते, अगदी चपचपित नाही तर मुळांना पुरेल इतकेच. पुर्ण केस तेलकट करत नाही. जरासा मसाज करते.. केस धुतल्यावर मस्त नरम लागतात हातांना, चकाकी पण येते.. कधीकधी महिना महिना तेल लावायला जमत नाही/विसरते तेव्हा तेच केस हाताला एकदम भरभरीत लागतात, चकाकीही निघुन जाते..

पांढ-या केसांसाठी नियमित मेंदी लावते, त्यामुळेही चकाकी येते शिवाय केस जे आधी कुरळे होते ते ब-यापैकी सरळ झाले आहेत.

बीअर बद्दल ऐकलेय पण कधी ट्राय केले नाही.

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

शोनू, इरॉसजवळचंच लॅक्मे. Sad ऑफिसच्या जवळ पडते म्हणून गेले होते
आता परत तिकडे जाणार नाही. जुहूमधेच अजून एक पार्लर आहे क्लिप्स कर्ल्स नावाचं ते एकदम सही आहे.
सध्यातरी तीन महिने केसाना कात्री लावणार नाही. मग लग्नाच्या आधी लॉरीयल्स मधे जाऊन कापेन.

साधना, केसाना माहिनाभर वगैरे तेल न लावण्याची चूक कधीच करू नकोस. आठवड्यातून एकदा तरी तेल मस्ट आहे.

गौरवी, माझेतरी बीअरने केस कधीच गळाले नाहीत. खास केसासाठी म्हणुन प एक बीअर मिळते. ती ट्राय करून बघ.
--------------
नंदिनी
--------------

नन्दिनि, जुहुच्या पार्लरचा पत्ता मिलेल का?

नंदिनी खार ला ब्यूटीक मधे गेली नाहीयेस का कधी? (त्यांची शिवाजी पार्कला पण शाखा आहे.) तिथे हेअर कट चांगले करून देतात्,शिवाय फेशियल पण मस्त असतं तिथलं.
लॉरियाल कुठे आलं म्हणे हे?

आठवड्यातून एकदा जे तेल लावणार ते किंचित कोमट करून लावावे म्हणतात. मी आठवेल तेंव्हा करते Happy

माया परांजपेचं ब्युटीक मस्त आहे एकदम.... शिवाजी पार्क कॅडल रोडला शाखा आहे त्यांची. मी एकदा त्यांची हेअर ट्रिटमेंट घेतली होती.. ६ सिटींग्जची.. माझे कुरळे केस बर्‍यापैकी सरळ झाले. स्प्रिंगसारखे कुरळे होते ते आता नूडल्ससारखे waivy झालेत. Happy तेच सरळ करून घेण्यासाठी मी विचार करत होते. म्हणून मी ironing करून पाहिलं. पण ते काही माझ्या चेहर्‍याला सूट करत नाही. म्हणून मग प्रोग्राम कॅन्सल. तेच पैसे दुसर्‍या कुठल्यातरी ट्रिटमेंटवर सत्कारणी लावेन म्हणते. Happy

>>मग लग्नाच्या आधी लॉरीयल्स मधे जाऊन कापेन. <<
आयला खरं की काय? अभिनंदन ग पोरी!

पार्ल्यातल्या लॅक्मेमधे जाता जाता वाचले मी असं दिसतंय..
१५ च दिवसांपूर्वी केस कापलेत. मस्त पार्लर मिळालंय मला.
एकदा पार्ल्यात एका मैत्रिणीने स्टेशनजवळच्या चायनीज बाईकडे नेलं होतं तेव्हापासून पार्ल्यात जायचा धसकाच घेतला होता मी.
आता गेले होते ते जुहू तारा रोड ला सी प्रिन्सेस च्या समोर 'पद्माशैला' म्हणून आहे. घरात असलं तरी एकदम मस्त आहे. ही पद्मा सेलेब क्लायंटस पण घेते. परत तुझ्या केसासाठी काय करायला हवं तेही सल्ले देते.

केस खूप खरखरीत होत असतील तर मेंदी लावणं कमी/ बंद करायला हवं. एकुणातच केमिकल्सचा वापर शक्यतो नको.. म्हणजे कलरींग, हायलाइटस, पर्मिंग इत्यादी.

कंडिशनर लावून २ तास केसात तसंच ठेवून मग धूवून टाकायचे केस हे १५ दिवसातून एकदा तरी नक्की. आणि हो केस धुण्यापूर्वी तेल लावणे मस्ट. नुसतंच लावायचं नाही तर ते मुरवायचंही. चोळून चोळून.

ब्लो ड्राय ने केस गळतात हे खरं आहे पण पावसाळ्यात, मुंबईत केस वाळत नाहीत पटकन किंवा वाळेपर्यंत घामाने ओले होतातच त्यामुळे ते उबून अजून खराब होतात. त्यापेक्षा पावसाळ्यापुरता ब्लो ड्राय परवडला.

शक्यतो राउंड ब्रश वापरू नये त्याने केस जास्त तुटतात. फ्लॅट ब्रश ने जास्त चांगले रहातात.

बाकी शॅम्पू+कंडिशनर रूटिन मधून अधेमधे शिकेकाई+इतर औषधी वनस्पतींची पावडर उकळून गाळून घेतलेले पाणी याने केस धुणे आणि जास्वंद जेल चे कंडिशनिंग केल्यास केसांचे पोषण होते. अर्थात ह्या केस धुण्याच्या आधी तेल लावू नका जर तुम्हाला केस चप्प नको असतील तर. किंवा आदल्या दिवशी शॅम्पू करून दुसर्‍या दिवशी हा उद्योग करा म्हणजे तेलकटपणाही नाही आणि भरभरीतपणाही नाही.

यातलं सगळं मी करते असं काही नाही पण जेव्हा जेव्हा केलंय तेव्हा तेव्हा एसओएस पातळीवरच आणि त्याचा उपयोग झालाय. पण उपयोग झाला की आळस येतो किंवा कामाच्या धावपळीत मरू देत ना असं होतं...

-नी

मंजु, काल अपघाताने सापडलेला एक उपाय..
मी भरपूर तेल लावले होते. दुसर्‍या दिवशी केस धुवायचे म्हणून.. आणि संध्याकाळी सात वाजता समजलं की पार्टी आहे..
मग काय पार्लरमधे जाऊन हेअर वॉष घेतला आणि ब्लो ड्राय...
केस असले सही सिल्की झाले होते. सर्व म्हणे स्ट्रेटनिंग केले का?
कधीतरी करायला हा उपाय चांगला आहे

तुझे कुरळे केस तुझ्या चेहर्‍याला शोभतात.. शांपू केल्यावर गेलने व्यवस्थित क्रंच करून कर्ल्स डीफाईन कर.. मस्त एफेक्ट येतो.
आणि हो, केसाना मस्त हायलाईटिंग करून घे.. छान ईफेक्ट येतो!!

--------------
नंदिनी
--------------

अज्जुका.. धन्यवाद..

--------------
नंदिनी
--------------

अर्र! ते अभिनंदना चं राहिलंच की!!

अभिनंदन नंदिनी! मायबोलीकर आहे का नवरा? निदान मायबोलीची भाषा बोलणारा ,समजणारा तरी आहे का Proud

मला इथे अमेरिकेत पर्मनंट सरळ करणारे पार्लर आमच्या जवळ पास सापडलं नाही. न्यू यॉर्क मधे आहेत म्हणे. पण तिथे एक दिवसभर जायला मिळाले तर पार्लर मधे कोण बसेल ? त्यामुळे इथे मी फ्लॅट आयर्न वापरते घरीच. केस पूर्ण कोरडे असावे लागतात हा जरा त्रास आहे. पार्लर मधे केस कापून घेतले की तिथेच ब्लो ड्राय अन फ्लॅट आयर्न करून देतात ते मात्र एकदम मस्त दिसतात.

जास्वंदाचं तेल हा काय प्रकार? कुठे मिळेल?

शोनू, उर्जिता जैनचं असतं ना जास्वंद तेल. चांगलं असतं केसांकरता. इथे मिळण्याची शक्यता जरा कमीच. तरी विचारुन पहा किंवा तिच्या वेबसाईटवर जाऊन पहा.

कदाचित देसी स्टोर्स मधे मिळायची शक्यता आहे. नाहीतर भारतातून मागवून घ्या.
-नी

शोनू, मायबोलीवर तो सध्या रोमात असतो Happy
उर्जिता जैनचे प्रॉडक्ट्स चांगले असतात का? मुंबईत कुठे मिळतील.
माझा केसाचा एक वेगळाच प्रॉब्लेम आहे. सकाळी केस धुतल्यावर ड्रायर मारण्याइतक वेळ नसतो आणि बाहेर तसेच अर्धवट सुके केस घेऊन गेल्यानंतर ते एकदम कोरडे वाटतात, कंडिशनर वापरून सुद्धा,, आणि केस एकदम जंगली होतात. मॅनेज करणं मुश्किल होउन जाते. यावर काही उपाय आहे का?

--------------
नंदिनी
--------------

मी गेले कैक वर्षं उर्जिता जैन कोरफड जेल आणि जास्वंद जेल वापरते अधूनमधून. जास्वंद जेल मुळे माझे तरी केस गळायचे थांबलेत आजपर्यंत.
मुंबईत आयुर्वेदीक औषधांची दुकानं जिथे आहेत तिथे हे सगळं मिळतं. क्वचित नॉर्मल केमिस्टकडे पण मिळतं. चौकशी करून बघ.

एखाद्या माहितगार माणसाला विचारून कुठलं तरी लिव्ह इन प्रकारचं कंडिशनर वापर.
पॅराशूटचं एक हिरव्या बाटलीत येतं जे केस पूर्ण वाळायच्या आधी केसावर दोन थेंब लावायचं असतं. कधी कुठे पार्टीबिर्टीला जाताना मी वापरते पण रेग्युलर वापरायला ठिक आहे की नाही माहित नाही.

-नी

इकडे infusium चं एक लीव्ह-इन कंडिशनर मिळतं ते छान वाटतं मला. पँटीन वाल्यांचं आहे बहुतेक. गार्निए चं पण एक आहे - पण महागडं आहे थोडं अन मला तरी चिकट वाटलं.
Infusium अगदी केस ओले असताना लावता येतं अन सुकल्यावर केस भरकटत नाहीत.

अरे हो पर्वा एक मस्त उपाय केला.
नारळाचं दूध डोक्याला आणि संपूर्ण केसांनाही चोपडलं. डोकं अगदी भरपूर चोळलं. सगळं नारळाचं दूध मुरवलं. मग अर्ध्यापाउण तासाने लिंबाचा रस लावला संपूर्ण डोक्याला तो चोळला. आणि १० मिनिटांनी माइल्ड शाम्पू व मग कंडिशनर.
केस एकदम मऊ आणि झुळझुळीत. गळणं पण कमी झालंय एका धुण्यात.

-नी

>>मायबोलीवर तो सध्या रोमात असतो<<
कोडी कशाला? सांग ना नाव!! Happy

-नी

अज्जुका, सही उपाय सांगितला आहेस तू... आता एका रविवारी करून पाहिलं पाहिजे. साधारण वाटीभर पुरेल का नारळाचं दूध?

वाटीभर? अगं संपूर्ण अंघोळ नाही करायचीये. पाव वाटी पुरतं खांद्यापर्यंत केस असतील तर.
तुझे केस ड्राय असतील मुळात तर आदल्या रात्री तेल लाव.
-नी

Pages